आत्मा अमर आहे, माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा हे शरीररुपी वस्त्र सोडून नवे रूप धारण करतो असे तत्वज्ञान आपण बऱ्याच वेळी ऐकलेले असते. पण नवे शरीर असले तरी आत्मा फॉरमॅट झालेला असतो, त्यामुळे गतजन्माची काहीही आठवण नसते. ते नवा गडी नवे राज्य असा प्रकार आहे.
पण ......
पण जर नवे शरीर आणि तोच आत्मा असेल तर ? अर्थात पन्नाशीचा आत्मा लहान शरिरात राहून बोअर होईल, त्यामुळे शरीर सुद्धा योग्य वयाचे हवे. त्यातही सिलेक्शन असेल तर उत्तम ! जन्मत: केआरके असेल तरी नंतर एसआरके चे शरीर मिळेल .
अल्टर्ड कार्बन ही याच कल्पनेवर आधारित वेब सीरिज आहे. भविष्यात (काही शतके) मानवाने आपले अस्तित्व नव्या शरीरात परावर्तित करण्यावर नियंत्रण मिळवले आहे. सध्याची जाणीव , आठवणी एका चिप मध्ये साठवल्या जातात त्याला स्टॅक असे संबोधतात. ही स्टॅक नवीन स्लिव्ह(शरीरात) बसवली की पुनश्च हरिओम ! पण जर ही स्टॅक नष्ट केली तर मात्र कायमस्वरूपी मृत्यू होतो. अर्थात श्रीमंत लोकांसाठी यावरही क्लाउड बॅकअप चा उपाय आहे.
लॉरेन्स बॅनक्राफ्ट या अतिगर्भश्रीमंत माणसाचा खून होतो .
बॅनक्राफ्टचा बॅकअप नवीन शरीरात रिस्टोअर करताच स्वतःच्या खुन्याचा शोध घेण्यासाठी तो ताकेशी कोवाचला
बंडखोर योध्दयाला पुनरुज्जीवित करतो.
अडीचशे वर्षापूर्वी एनव्हॉय या बंडखोर ग्रुपचा हा शेवटचा सोल्जर राहिलेला असतो, बंडखोरीची शिक्षा म्हणून याचा स्टॅक गोठवून ठेवला असतो.
त्याला नवीन स्लिव्ह (शरीर) मिळताच तो खुन्याच्या शोधात निघतो, त्याचबरोबर त्याला आपली प्रेमिका आणि बंडखोर लीडर क्वेलख्रिस्ट फाल्कनर हिचे काय झाले हेही शोधायचे असते. या कामात लेफ्टनंट ओरटेगा ही पोलीस त्याची मदत करते.
बेनक्राफ्टच्या मृत्यूचा नक्की फायदा कोणाला?
ताकेशीला मिळालेले शरीर कोणाचे असते ?
बेकायदेशीरपणे दुसरे शरीर बनवून मेमरी क्लोन केले तर नक्की खरा माणूस कोण? हे कसे समजणार ? अशा अनेक किचकट प्रश्नांचा वेध घेत ही 10 भागांची मालिका घेते.
ए आय आणि अनेक भविष्यातील तंत्रज्ञान यामुळे ही सीरिज बरीच ऍडव्हान्स वाटते.
यात एनव्हॉय विरुद्ध अपरायझिंग , काही व्हर्चुअल स्पेस , असे बरेच प्लॉट आहेत, त्यामुळे सीरिजमध्ये रंजकता वाढते.
रिचर्ड मॉर्गन च्या पुस्तकावर आधारित ही मालिका नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
कथानकाचा वेग ,तांत्रिक सफाई आणि ग्राफीक्स हे उत्तम आहेत. कथा चांगली आहे पण पटकथा कमजोर वाटते, लक्षात राहावे असे काही डायलॉग नाहीत. जोएल किनमॅन ची ऍक्टिंग ठीक-ठाक ! कथेप्रमाणे तो कधीही बॅड-ऍस वाटत नाही. या गोष्टी वगळता ही सीरिज या लॉकडाऊन मध्ये बिंज वॉच करण्यासारखी नक्की आहे.
प्रतिक्रिया
17 May 2020 - 8:52 pm | झपाटलेला फिलॉसॉफर
जबरदस्त सीरिज आहे ....
17 May 2020 - 9:18 pm | संन्यस्त खड्ग
मी पहिले काही भाग पाहिलेत ... आत्ता बघणार पूर्ण !
17 May 2020 - 10:58 pm | मदनबाण
मुनी तुम्ही छान छान वेब सिरीज सुचवता.
पल्याडला तुम्ही मला अल्टर्ड कार्बन सुचवली होती, तीचा पहिला सिझन पाहिला आणि आवडला देखील. दुसरा सिझन डाउनलोड मारुन ठेवला आहे, अजुन हवा तसा निवांतपणा मिळाला नसल्याने अजुन पाहणे बाकी आहे. अश्याच वेब सिरीज सुचवत रहा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile
18 May 2020 - 10:28 am | कपिलमुनी
_/\_
25 May 2020 - 7:42 pm | मंदार कात्रे
बघतो आहे सध्या
25 May 2020 - 7:50 pm | mrcoolguynice
प्राईम वरील "अपलोड" पाहिलाय कोणी ?
https://www.imdb.com/title/tt7826376/
6 Sep 2021 - 2:46 pm | गॉडजिला
आता दुसर्या सिजनची वाट बघतो आहे :) मस्त संकल्पना आहे.
6 Sep 2021 - 2:45 pm | गॉडजिला
अफलातुन सिरीज आहे.मजा आली बघायला… अजुन एखादा सिजन हवा होता. थोडक्यात आटोपलि आहे.
6 Sep 2021 - 5:30 pm | सोत्रि
ओक्के!
ब्लॅक मिरर नाबाची एक वेब सिरीज होती, त्यात एक अशीच गोष्ट होती. consciousness ला डिजीटाइझ करून चिप मधे स्टोअर करायचे आणि चीप नवीन शरीरात टाकायची.
- (डिजीटल) सोकाजी