आयडीचे डू-आयडीस पत्र
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं.
नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो.
मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' .... च्या, जुन्या-जाणत्या आयडींना छपरी प्रतिसाद टाकून चिथवशील तर ब्लॉक करीन !' तेंव्हापासनं तू फक्त गोग्गोड लिहू लागलास.