घायल, वन्स अगेन

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
8 Feb 2016 - 3:44 pm

घायल. १९९० मधे आलेला राजकुमार संतोषी यांचा पिक्चर. बॉक्स ऑफिसवर सेकंड हायएस्ट ग्रॉसर. नायक - सनी देवल
घायल वन्स अगेन. २०१६ मधे आलेला सनी देवल याचा पिक्चर. सनी देवल लिखित आणि सनी देवल दिग्दर्शित.

सनी देवल. मूळ नाव अजय सिंग देवल. १९ ऑक्टोबर १९५७ चा जन्म; म्ह्णजेच आजमितीस वय ५८ वर्ष. १९८३ पासून हिंदी चित्रपटक्षेत्रात सक्रीय. प्रामुख्याने साहसपट, अ‍ॅक्शनपट यात काम. नावाजलेले चित्रपट - बेताब, त्रिदेव, अर्जुन, घायल, डर, दामिनी, जीत, घातक, बॉर्डर, मा तुझे सलाम, ज़िद्दी, गदर इत्यादी.

हा माझा आवडता हीरो. आमचा; खरं तर. आमचा म्हणजे मी आणि माझा एक शाळेतला मित्र. आम्ही सनी देवल चे पंखे. हे पंखे आजकाल चोरबाजारातही मिळत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे अचंब्याने, आश्चर्याने, कीव आल्याप्रमाणे, थुच्च भावनेने वगैरे कुणी बघितलं तर आम्हाला त्याचं विशेष काही वाटत नाही.

त्या दिवशी मित्राचा फोन आला. माझ्याबाजूचं संभाषण असं होतं, 'हॅलो. हो जायचं ना म्हणजे काय!. अच्छा... मला वेळ काढणं कठीण आहे जरा.... नाही नाही जायचं पक्कच आहे आणि पहिलाच वीकेंड; नंतरचा भरोसा नाही. ओके. हां तो शो चालेल. राईट! सिंगल स्क्रीनच बेस्ट. आपलं नेहमीचं आहे. ठीक आहे. भेटू मग.'

माझ्या बाजूच्या व्यक्तीचा प्रश्न, 'कुठला पिक्चर?' मी, 'घायल वन्स अगेन'. 'कुठला????' 'घायल वन्स अगेन... सनी देवलचा' मग एक मोठा हशा. 'लिओनी म्हणाला असतास तरी विशेष काही वाटलं नसतं... पण सनी देवल??' मी, 'हो! मी फॅन आहे त्याचा...' एक मोठा पॉज. 'मला उडी मारावीशी वाटतेय इथून (हशा). मी पहिला असा माणूस बघितलाय जो सनी देवलचा फॅन आहे.' मी, 'हो आहेत असे तुरळक.' हा संवाद नमुनादाखल होता; असे अनेक प्रश्न करतात लोकं.

मी आणि माझा हा सनी देवल फॅन मित्र त्याचे पिक्चर आवर्जून बघतो. बघतोच. आणि तेही शक्यतो सिंगल स्क्रीनच्या चित्रपटगृहात; म्हणजे अ‍ॅक्शन सोबत रिअ‍ॅक्शनही अनुभवायला मिळतात आणि अर्ध्या पैशात दुप्पट मजा येते. तर असा
हा सनी देवलचा नवीनतम पिक्चर आम्ही बघायला गेलो. घायल वन्स अगेन.

पिक्चरची कथा मागच्या घायलचे दुवे धरून बांधलेली आहे. थोडं सविस्तर सांगतो कारण एकंदरित अनुभवावरून फार लोकांना हा पिक्चर बघायचा असेल असं नाही आणि जे माझ्यासारखे असतील त्यांना आधी गोष्टी कळल्या म्हणून फरक पडणार नाही. अजय सत्यकाम मेहरा (सनी देवल) हा 'तोच' घायल वाला अजय मेहरा आहे. दरम्यानच्या काळात तो जेलमधे जाऊन व त्यानंतर मानसिक आजाराच्या उंबरठ्यावर जाऊन परत आलेला आहे आणि त्याला परत आणणारी रिया (सोहा अली खान) आहे. हा अजय मेहरा आता एक रिपोर्टर आहे जो सत्यकाम नावाचं वृत्तपत्र चालवतो. त्याच्यासोबत 'जो डिसूझा' (ओम पुरी) जो आता पोलिसातून निवृत होऊन आरटीआय (माहिती अधिकार कायदा) अ‍ॅक्टिविस्ट म्हणून कार्य करतो. पिक्चरच्या सुरुवातीला एका महिला पत्रकाराची केस अजय घेऊन सॉल्व करतो. हिच्यावर बलात्कार झालेला असतो व हे प्रकरण हेराल्ड नामक वृत्तपत्राच्या सर्वेसर्वा राजगुरू याने केलेले असते. त्यात तिच्या निर्दोष मित्राला गोवण्यात आलेलं असतं. हे जेंव्हा अजय बघतो तेंव्हा तो 'आपल्या पद्धतीने' हे प्रकरण उघडकीस आणतो.

मग एक दिवस जो डिसूझांच्या गाडीला अपघात होऊन ते मेल्याची बातमी येते. ज़ोया नावाची एक ब्लॉगर तरुणी तिच्या चार मित्रमैत्रिणींसह कर्नाळ्याला कसल्याशा प्रोजेक्टसाठी पक्षांचं शूटिंग करायला गेलेली असताना तिने केलेल्या शूटिंगमधे जो डिसूझा यांचा गोळ्या झाडून करण्यात आलेला खून कॅप्चर होतो. हे जेंव्हा तिला दिसतं तेंव्हा ते चौघेजण हबकतात. ज़ोयाच्या आजोबांच्या सांगण्यावरून ते तो विडियो क्रिपलानी नावाच्या वकिलाला देतात जो तो विडियो नेऊन बन्सल नावाच्या बिज़नेसमनच्या ताब्यात देतात. हा बन्सल तोच, जो या क्लिपमधे असतो, त्याच्यासोबत राज्याचे गृहमंत्री व त्याचा 'स्पॉइल्ट ब्रॅट' मुलगा असतात. बन्सलच्या मुलानेच जो डिसूझावर गोळ्या झाडल्याचं या क्लिपमधे स्पष्ट कॅप्चर झालेलं असतं.

या क्रिपलानीचा मुलगाही 'त्या' चौघांमधे असतो. मग बापाने सत्याची बाजू का नाही घेतली इत्यादी विचार करून ते चौघेजण त्या क्लिपचा स्मार्टली घेऊन ठेवलेला बॅकप असलेली हार्डडिस्क अजय मेहराला द्यायला निघतात. इकडे बन्सलचा स्वतःचा सिक्युरिटी सेल हवी त्याची लोकेशन, फोन नंबर वगैरे टॅप करून हे सगळं बघत असल्याने बन्सलची माणसं त्या चौघांना अडवायला निघतात. अत्याधुनिक शस्त्र, मोटारसायकली वगैरे असलेली ही फॉरेनर्स ची टीम आणि ती चौघं मुलं यांच्यात पुढची २० मिनिटं पकडापकडी चालते. रस्त्यावर, मॉलमधे, कुठेकुठे जातात, अनेक गाड्या उडतात, काय काय होतं. मग त्या चौघांना अजय मेहरा वाचवतो पण ती हार्ड डिस्क??? ती मॉलमधल्या एका दुकानात असते. हे ती मुलं अजयला सांगतात. तो ती घ्यायला निघतो. बन्सलची माणसंही निघतात. मग बन्सलचा सिक्युरिटी हेड, ज्याचं नाव आहे ट्रॉय व सनी देवल यांच्यात पुढची १५ मिनिटं झटापट. लोकल ट्रेनमधे मारामारी, एका लोकलमधून चालत्या दुस-या लोकलमधे उडी वगैरे प्रकार करून अजय मेहरा ती हार्डडिस्क मिळवतो.

पुढे ट्विस्ट. दरम्यान त्या पकडलेल्या मुलांना बन्सल किडनॅप करतो. सोहा अली खान म्हणजेच रिया त्यांना हॉस्पिटलमधे घेऊन गेलेली असताना त्यांना तो पळवतो. मग त्या मुलांचे पालक अजय मेहराला शिव्या घालायला येतात. तिथे असं उघडकीस येतं की त्या चौघातली एक मुलगी ही अजय मेहराचीच मुलगी आहे. हे बन्सललाही कळतं. मग बन्सल बाकी तिघांना सोडतो आणि तिला मात्र ठेवतो. अजयने काही वाकडं पाऊल उचललं तर तिला मारणार अशी धमकी अजयला देतो. आता पंचाईत. मग सोहा अली खान अजयला सांगते, 'गो गेट युअर डॉटर'

मग हा पंजाबी बैल फुसफुसत सुटतो. फुल्ल शहरात या एकट्यासाठी नाकाबंदी असताना हा तिथे कसा पोचणार? हा प्रश्न पडतानाच त्याचं उत्तर समोर दिसतं. बन्सलने अजयच्या मुलीला दुस-या ठिकाणी हलवण्यासाठी प्रायवेट हेलिकॉप्टर मागवलेलं असतं; ते अजय हायजॅक करतो. आणि तो स्वतःच ते चालवत; आय अ‍ॅम सॉरी उडवत घेऊन येतो आणि बन्सलच्या बिल्डिंगमधे घुसवतो. ९/११ टाईप. मग स्फोट, आग, हाहाकार, गडबड सगळं होतं. हेलिपॅडवर बन्सलचा माजलेला मुलगा अजयच्या मुलीला मारत असताना अजय तिथे येतो. आणि एका ड्रग अ‍ॅडिक्टला, बिना ड्रगची रग काय असते त्याची झलक देतो. या फाईटमधे त्याला दोन गोळ्याही लागतात, पण त्याने विशेष फरक पडत नाही. बन्सलचं कुटुंब तिथे अडकलेलं असतं. आई, बायको, लहान मुलगी. बन्सल मुलीला आगीतून वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असतानाच अजय मेहरा तिथे येतो, त्या तिघांना तोच वाचवतो आणि हेलिपॅडवर येतो. बन्सल कुटुंबीय मुलाला मारू नका म्हणून अजयच्या पाया पडतात. पुढचा सीन हॉस्पिटलचा. अजय आणि त्याची मुलगी रिकव्हर होतायत, आणि ती चार मुलं, त्यांचे पालकही. पिक्चर संपला.

जी अपेक्षा करून गेलो होतो ते सगळं पिक्चरमधे होतं. सनी देवल ५८ वर्षाचा वाटत नाही. अजूनही त्याची अ‍ॅक्शन कितीही अतिरेकी असली तरी कन्व्हिन्सिंग वाटते. तो दोघाजणांना एकेका हातात उचलत असेल तर ते तो खरंच करू शकेल असं वाटतं. जे इतर सल्लू फल्लूंच्या बाबतीत मुळीच वाटत नाही. बन्सलचं घर म्हणजे अँटीलिया (अंबानी निवास) दाखवलेलं आहे; जे इतर वेळी ढुंकूनही बघायला आपण जाणार नाही ते पिक्चरच्या माध्यमातून डोळे भरेस्तोवर बघता येतं. स्टोरीत विशेष दम नाही. हॉलिवूडपट 'टेकन' चा भास अधून मधून होतो. पण चित्रपटातली अ‍ॅक्शन आजकाल निघणा-या इतर अ‍ॅक्शनपटांसारखीच आहे. म्हणजे, तो बेंचमार्क असेल तर माझ्यामते कुठेही पिक्चर कमी पडत नाही. हां; अतर्क्य गोष्टी अनेक आहेत बघायला गेलं तर. पण मी मुद्दाम पिक्चरचा 'समाचार' घेण्याचं काम केलं नाही; ते करण्यासाठी फारएन्ड सारखी दिग्गज मंडळी समर्थ आहेत. मला सनी देवल आवडतो. मला हा पिक्चरही आवडला.

लक्षात रहाण्यासारखा डॉयलॉगः 'प्रॉब्लेम रेज से नही; करेज से सॉल्व्ह की जाती है'. हा डॉयलॉग बन्सलच्या तोंडी आवडला नाही. तो सनीला द्यायला हवा होता. म्हणजे मग ते 'हिंदुस्तान ज़िंदाबाद था; ज़िंदाबाद है...' त्या टोनमधे मस्त जमलं असतं. असो.

घरी आल्यावर एक तासभर मला कुणीही 'कसा होता पिक्चर?' विचारलं नाही हो. मला असं वाटायला लागलं की इतकं क्षुल्लक; नगण्य असं काहीतरी मी बघून आलोय की कुणाला त्याबद्दल जाणून घ्यायची अजिबात इच्छा नाही. नंतर विचारलं म्हणा; पण ते काय..... जाऊद्या. पुढच्या वर्षी सनी देवल अजून एक पिक्चर काढतोय त्यात तो त्याच्या मुलाला लाँच करणार आहे. वाट बघतोय; पण देअर इज ओनली वन सनीपाजी. ओनली वन ढाई किलो का हात. व्हॉट अ‍ॅन एक्झांपल ही इज व्हेन इट कम्स टू फिटनेस. ख-या अर्थाने 'बीस्ट'.

ब्रावो सनी देवल!

समाजजीवनमानतंत्रचित्रपटसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

शान्तिप्रिय's picture

8 Feb 2016 - 3:54 pm | शान्तिप्रिय

छान परिक्षण.
सनि देवल कधिच वयस्कर वाटत नाहि हे खरे.
बाकी त्याचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे पाहुया कितपत प्रतिसाद मिळतोय तिकिट्बारीवर.

पहिला दिल्लगी.

वेल्लाभट's picture

8 Feb 2016 - 4:29 pm | वेल्लाभट

अगदी बरोबर! कथालेखक म्हणून पहिला प्रयत्न.

अद्द्या's picture

8 Feb 2016 - 4:01 pm | अद्द्या

अर्रे . . मला वाटलं मीच काय तो एकटा ज्याला सनी पाजी आवडतो . .

मी हाय ना. लहानपणापासून कट्टर फ्यान. (इतका फ्यान की सन्नीच्या एका डोळ्यात जसा काळा स्पॉट आहे शेम तसाच माझ्या पण डोळ्यात आहे ;) )
माझे थोडे लहानपण बार्शीत गेले. तिथल्या एका थिएटरला घायल, घातक अन गदर वर्शानुवर्शे चालले. घायलच्या पोस्टरवरचा स्टेनगन घेतलेली पोज खूप जणाच्या गाड्यावर रेडियमने केलेली असायची. भयाण चाहते बार्शीत सन्नीचे.
सोलापूरात तर एक डीएसबी (धर्मेन्द्र, सनी, बॉबी) ग्रुप आहे. तिघांचे वाढदिवस जोशात साजरे करतात.
काल २०० किलोचा हार चढला असणार थेटरला त्यांच्याकडून. येळात येळ काढून बघणार पिक्चर. कसा का असेना.
कात्या.........

रिम झिम's picture

9 Feb 2016 - 8:53 am | रिम झिम

कट्टर फ्यान मी पण आहे बार्शीत आशा ला पाहिलेला सनी देओल चे पिक्चर. जाम आवडयचा तो...

रिम झिम's picture

9 Feb 2016 - 8:53 am | रिम झिम

कट्टर फ्यान मी पण आहे बार्शीत आशा ला पाहिलेला सनी देओल चे पिक्चर. जाम आवडयचा तो...

संदीप डांगे's picture

8 Feb 2016 - 4:07 pm | संदीप डांगे

मला वाटलं डाय हार्ड ४-५-६ वैगरे ची ष्टुरी आहे ;-)

सनीपाजी के फ्यान जिंदाबाद थे, जिन्दाबाद है और जिन्दाबाद रहेंगे...!

(लेख आवडला. छान लिहिलंय...)

वेल्लाभट's picture

8 Feb 2016 - 4:32 pm | वेल्लाभट

आहे; तसंही वाटतं. डाय हार्ड; झालंच तर... एम आय....
बिट्स अँड पार्ट्स मधे असं साम्य भासत रहातं.

पैसा's picture

8 Feb 2016 - 4:27 pm | पैसा

आपल्याला पण बेताबपासूनच सन्नी भाय आवडतो. तसा सन्नीच काय आपल्याला धरम प्राजी पण लै आवडतो!

विजय पुरोहित's picture

8 Feb 2016 - 4:30 pm | विजय पुरोहित

याच्याशी अगदी सहमत...

अगदी सहमत. मला तर अभय देओल पण आवडतो. अर्थात त्याचा टाईप वेगळा. पण देवोलांचे ३ सुपुत्र (धरम प्राजी पकडुन) जाम आवडतात.

वेल्लाभट छान लिहिलंय.

नया है वह's picture

8 Feb 2016 - 4:27 pm | नया है वह

सनि देवलचे सिनेमे छान टाइम पास करतात.

टिपिकल बॉलीवूड अ‍ॅक्शन :)

उगा काहितरीच's picture

8 Feb 2016 - 5:00 pm | उगा काहितरीच

लहानपणी आवडत होता सनी देओल . एवढेच काय , लहानपणी तर जॕकी श्रॉफ आणी मिथुन चक्रवर्ती सुद्धा आवडत होते. अमिताभ बच्चन ने जशी काळाची पावले ओळखून वेगळ्या भुमीका स्विकारल्या (मोहब्बते पासून ) तसं या मंडळींना नाही जमलं . आता तीच चूक बहुतेक खान मंडळी करीत आहेत असे वाटते .

भंकस बाबा's picture

8 Feb 2016 - 9:17 pm | भंकस बाबा

अमिताभने जादूगर,अकेला, तूफान, गंगा जमना सरस्वती या चित्रपटानंतर आपले धोरण बदलले. मृत्युदाता पण त्याच पठडितला. त्यातल्या त्यात आज का अर्जुन व बड़ेमिया छोटेमियाने थोडिफार लाज राखली.

राजाभाउ's picture

8 Feb 2016 - 5:01 pm | राजाभाउ

. अजूनही त्याची अ‍ॅक्शन कितीही अतिरेकी असली तरी कन्व्हिन्सिंग वाटते

१००% सहमत.
सनी सगळ्यात जास्त आवडला तो अर्जुन मध्ये. यतीम मध्ये पण भारी वाटला. पुढेही बर्याच चित्रपटात आवडला पण अर्जुन खासच.

नाखु's picture

9 Feb 2016 - 9:00 am | नाखु

अर्जुन मध्ये एकदम लाजवाब, "बेताबची" प्रेमीकाची छ्बी च्या अगदी उलट संतापाने उसळणारा आणि डोळ्यातून बरसणारा. त्यानंतर घातक्+घायल आवडले. पण त्याने नाचाच्या नादी लागायला नको होते असे माझे वैयक्तीक मत.

भंकस बाबा's picture

8 Feb 2016 - 5:33 pm | भंकस बाबा

सनीचे अर्जुन, बेताब, घायल जाम आवडले होते.
पण तो भाव खाऊन गेला दामिनी मधे, काय जबरदस्त ताकदीची भूमिका होती ती!
तशी भूमिका सन्नीला नंतर नाही मिळाली. गदर पण छान होता पण अतिशोयोक्तिपूर्ण वाटला.
दामिनिमधे त्याने पुष्कळदा मिनाक्षीला साइडरोल मधे टाकले होते. ढाई किलो का हाथ अफलातून

कपिलमुनी's picture

8 Feb 2016 - 6:01 pm | कपिलमुनी

दामिनी बघितल्यापासून आमचे एक वकील मित्र रात्री झिंगून क्लायंट शोधत फिरायचे असे ऐकले आहे .

"एनीमी ऑफ द स्टेट" ची ष्टूरी वाटत आहे.

हेच लिहिणार होतो!! अर्थात सन्नीपाजी म्हणजे सन्नीपाजीच!! (पाजी पंजाबीतला;)

असंका's picture

8 Feb 2016 - 11:28 pm | असंका

+१

अगदी ओठावर होतं..हेच नाव आठवत होतो!!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2016 - 7:38 pm | अत्रुप्त आत्मा

च्यानेलवर यील,तवा बगू(च!)

स्वाती दिनेश's picture

8 Feb 2016 - 9:21 pm | स्वाती दिनेश

आवडले,
स्वाती

नूतन सावंत's picture

8 Feb 2016 - 10:06 pm | नूतन सावंत

पैताय सेम हिअर.

पद्मावति's picture

8 Feb 2016 - 10:23 pm | पद्मावति

मस्तं लिहिलंय. छान आहे परीक्षण. आवडलं.
मलाही आवडतो सनी देओल. त्याच्या बाबतीत टाईपकास्टिंग होतं पण प्रामाणीकपणे काम करतो. फार जेन्युईन वाटतो. अर्जुन, बेताब, दामिनी, घायल, गदर... एक से एक .
फक्त त्याने नाचू नये कुठल्याही परीस्थीतीत...यारा ओ यारा चा खतरनाक डान्स...बापरे..

वेल्लाभट's picture

9 Feb 2016 - 11:52 am | वेल्लाभट

फक्त त्याने नाचू नये कुठल्याही परीस्थीतीत

त्याहीपेक्षा रडू नये बाबा. ते जमत नाही बिचा-याला. हास्यास्पद होतं एकदम ते.

मारवा's picture

8 Feb 2016 - 10:36 pm | मारवा

सनी चा वापर बॉलिवुड च्या बिनडोक दिग्दर्शकांना कुशलतेने कलात्मकतेने करुन घेण जमल नाही.
एकाच छापाच्या अ‍ॅक्शन हिरो च्या भुमिका प्रामुख्याने देऊन त्याचा स्टीरीओटाइप करुन टाकला.
अमिताभचा ही केला मात्र अंगभुत प्रतिभेमुळे व उत्तरकालीन वयात नशिबाने साथ दिल्याने व एकुणच बॉलिवुड मल्टीप्लेक्स कल्चर ने बदलल्ल्याने उतारवयात का होईना अमिताभला " वैविध्या" च वरदान मिळाल. अर्थात तस ही म्हणता येत नाही कारण जुन्या काळात पण सौदागर - कभी- कभी - सिलसिला- मिली इ. मिळाले तसे त्याला. म्हणजे सुरुवातीला वैविध्य मग एक दिर्घकाळ अँग्री यंग मॅन मग उतारवयात अफाट वैविध्य अस म्हणण योग्य ठरेल.
सनी चा वांधा म्हणजे त्याला बॉलिवुड इतक बदलल तरी स्टीरीओटाइप च्या बाहेर आउट ऑफ बॉक्स भुमिका त्याला कोणी द्यायला अजुन ही तयार नाहीच
एकेकाच नशीब

संदीप डांगे's picture

8 Feb 2016 - 10:44 pm | संदीप डांगे

तुमच्या मते कशी भूमिका त्याला दिली तर चांगली वाटेल?

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 1:17 am | उगा काहितरीच

प्रतिसाद आवडला . खरंच नशीब दुसरं काय ? पण सनीला त्याच शरीर वगैरे ही टिकवता आलं नाही. "अपने"मधे बॉडी काही विशेष नव्हती . विशेषतः ऋतीक, जॉन अशा लोकांच्या बॉड्या (शरीरं - उगाच भलता अर्थ नको ! ) बघन्याची सवय असलेल्या पब्लिकला आवडणारच नाही.

पण सनीला त्याच शरीर वगैरे ही टिकवता आलं नाही.

असहमत.

त्याची जशी होती तशी टिकवलेली आहे. 'इतरांसारखी' करता आली नाही किंवा केली नाही म्हणाल तर ठीक आहे.

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 10:35 am | उगा काहितरीच

'इतरांसारखी' करता आली नाही किंवा केली नाही म्हणाल तर ठीक आहे.

ओके हे पण चालेल!

मारवा's picture

8 Feb 2016 - 10:36 pm | मारवा

सनी चा वापर बॉलिवुड च्या बिनडोक दिग्दर्शकांना कुशलतेने कलात्मकतेने करुन घेण जमल नाही.
एकाच छापाच्या अ‍ॅक्शन हिरो च्या भुमिका प्रामुख्याने देऊन त्याचा स्टीरीओटाइप करुन टाकला.
अमिताभचा ही केला मात्र अंगभुत प्रतिभेमुळे व उत्तरकालीन वयात नशिबाने साथ दिल्याने व एकुणच बॉलिवुड मल्टीप्लेक्स कल्चर ने बदलल्ल्याने उतारवयात का होईना अमिताभला " वैविध्या" च वरदान मिळाल. अर्थात तस ही म्हणता येत नाही कारण जुन्या काळात पण सौदागर - कभी- कभी - सिलसिला- मिली इ. मिळाले तसे त्याला. म्हणजे सुरुवातीला वैविध्य मग एक दिर्घकाळ अँग्री यंग मॅन मग उतारवयात अफाट वैविध्य अस म्हणण योग्य ठरेल.
सनी चा वांधा म्हणजे त्याला बॉलिवुड इतक बदलल तरी स्टीरीओटाइप च्या बाहेर आउट ऑफ बॉक्स भुमिका त्याला कोणी द्यायला अजुन ही तयार नाहीच
एकेकाच नशीब

पद्मावति's picture

8 Feb 2016 - 10:59 pm | पद्मावति

डर किंवा दिल्लगी मधल्या सारख्या शांत, समजूतदार भूमीकाही तो छान करतो. पण या व्यतिरिक्त त्याची रेंज मला तरी मर्यादित वाटते. धर्मेन्द्रचा कॉमिक सेन्सही त्याच्या मधे नाही.

सनी चा वांधा म्हणजे त्याला बॉलिवुड इतक बदलल तरी स्टीरीओटाइप च्या बाहेर आउट ऑफ बॉक्स भुमिका त्याला कोणी द्यायला अजुन ही तयार नाहीच

हेही कारण असेल त्यामागे.

संदीप डांगे's picture

8 Feb 2016 - 11:06 pm | संदीप डांगे

हम्म, बरोबर. मला अजून कल्पना करता येत नाही आहे, कुठल्या वेगळ्या अशा भूमिकेत तो छान वाटेल...?

एखाद्या आउट अँड आउट निगेटिव्ह भूमिकेत बघायला आवडेल त्याला

नाखु's picture

9 Feb 2016 - 9:10 am | नाखु

करिष्मा कपूर असलेल्या सिनेमात केला होता

हेच ते गाणे ही

दामीनी-अर्जुन-घायल-त्रिदेव पारायणी नाखु

मन१'s picture

9 Feb 2016 - 11:51 am | मन१

कुणी अकल्पनाही केली नसेल अशी काहीतरी भूमिका. नाविन्य हवं.
.
.
डिस्को डान्सर पासून एक कल्ट फॉलोइंग असलेला ; आणि नृत्य तरबेज आणि जरा आरडाओरडी स्टाइल वाटू शकनारा मिथुन चक्क राष्ट्रपती पुरस्कार मिळवून गेला "रामकृष्ण परमहंस " ह्यांची भूमिका करुन.
.
.
गझल , प्रेमगीत, विरहगीत वगैरेंसआठी फेम्मस असणार्‍या जगजीत सिंग ह्यांनी एकदम शास्त्रीय संगीतवर आधारित " डिफरंट स्ट्रोक्स " हा अल्बम पेश करुन चाहत्यांना चकित आणि खुश करुन टाकले होते.
.
.
वेगळेपणा ह्याला म्हणतात.
.
.
राहुल द्रविड द वॉल म्हणून फेम्मस आहेच; पण सुरुवातीला तो फक्त टुक्कु टुक्कु खेळतो मह्णून त्याला शिव्या पदात.
कसोटी वगैरे सामन्यात नाव कमावत असतानाच त्यानं चक्क बावीस का तेवीस चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावून सगळ्यांना चकित केलेलं.
.
.
सुनील गावसकर ह्यांना आख्ख्या साठ ओव्हर्स खेळून काढून पन्नास सआथ रन्स केल्याबद्दल लैच शिव्या घालतात. पण त्याच सनी गावसकरनं कारकिर्दीतल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ८५ चेंडूत शतक झळकावलं. सगळे अवाक .

१९८७ मध्ये ८५ चेंडूत शतक हे आजच्यापेक्षा फारच दुर्मिळ होतं.
अगदि सव्वाशे चेंडूत काढलं तरी नॉर्मल स्पीड - स्ट्राइक रेट समजला जायचा.
.
.
वेगळ्म म्हणजे खरोखरिच अनपेक्षित; पण दर्जेदार.

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 1:05 pm | संदीप डांगे

बास बास... अगदी हेच. खरोखर अनपेक्षित पण दर्जेदार...

प्रथम घायलसाठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार

नंतर दामिनी साठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार

दोन्ही भूमिकाही खुप वेग्ळ्या होत्या.

अभिदेश's picture

10 Feb 2016 - 4:36 am | अभिदेश

मिथुनला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. चित्रपट 'मृगया '. पण त्याच्याकडे इतर हिरोंसारखे रूप नव्हते , कामं मिळतच नव्हती , म्हणून तो डिस्को डान्सर झाला . तो FTII चा विद्यार्थी आहे आणि पहिल्यापसूनच उत्तम अभिनेता आहे.

गुंडा प्रेमी

अभिदेश

मन१'s picture

10 Feb 2016 - 10:48 pm | मन१

ओह ओके

मन१'s picture

9 Feb 2016 - 11:54 am | मन१

अथात सन्नी देवल आहे तसाच जबरदस्त आहे; आणि त्याचा मी पंखा आहेच.
त्यानं हातपंप उखडला तरी आतिशयोक्ती वाटत नाही.
इतर काही चिकण्या हिरोंनी ढेकूण मारला तरी कन्व्हिन्सिंग वाटत नाही.
सन्नी इज सन्नी.

अनन्त अवधुत's picture

9 Feb 2016 - 2:07 am | अनन्त अवधुत

याला +१
आम्ही सगळे शाळेतले मित्र अजूनही सनीचे पंखे आहोत.

वाल्मिक's picture

9 Feb 2016 - 8:45 am | वाल्मिक

सनी अजूनही सनी
पण एवढे परीक्षणे सर्व ठिकाणी वाचली ,एकाला पण बन्सल आणी अंबानी मधील साम्य सापडले नाही naval aahe

वेल्लाभट's picture

9 Feb 2016 - 10:45 am | वेल्लाभट

उघड उघड आहे ते! नमूद करण्याइतकंही रहस्य नाही त्यात. साला सगळा प्लॉट अंबानींचा आहे. बुजलेली आई, रुजलेली बायको, माजलेला मुलगा, आणि शिजलेला घंदा.

पैसा's picture

9 Feb 2016 - 9:22 am | पैसा

बॉर्डर सगळे विसरले काय? त्यातला अक्षय खन्नासोबत एक सीन खूप फेमस आहे त्याचा.

तुषार काळभोर's picture

9 Feb 2016 - 10:46 am | तुषार काळभोर

मेजर वीरभानको याद कर!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Feb 2016 - 9:51 am | ज्ञानोबाचे पैजार

अरे सनी पाजींचे इतके फॅन मिपावर असतिल असे वाटले नव्हते. माझ्या आवडत्या हिरोंपैकी एक. वर उल्लेख केलेले बेताब, घायल, दामिनी, डर, गदर हे सिनेमे तर आवडीचे आहेतच पण वर उल्लेख न झालेले पण मला आवडणारे सिनेमे म्हणजे द हिरो - लव्ह स्टोरी ऑफ द स्पाय, जाल द ट्रॅप,आणि जो बोले सो निहाल्,

या व्यतिरीक्त त्याने भगतसिंग मध्ये रंगवलेला चंद्रशेखर आझादहि आवडला होता.

जसा मला सनी आवडतो तसाच धर्मेंद्र देखिल प्रचंड आवडतो.

वर पद्मावती ताईंनी सनीने नाचू नये असे म्हटले आहे आणि त्यासाठी यारा ओ यारा चे उदाहरण दिले आहे . पण ते गाणे मला प्रचंड आवडते आणि ते केवळ सनी आअणि सनी साठीचा मी बघतो इतका मस्त तो त्या गाण्यात नाचला आहे.

सनीचा अफलातुन डान्स परफॉर्मन्स असलेल अजुन एक गाण खाली डकवतो आहे.

ऑल द सनी फॅन्स, डोंट मिस द चान्स, वॉच सनी डान्स्, सनी डान्स, सनी डान्स,

https://www.youtube.com/watch?v=LbzdOp5OBkQ

पैजारबुवा,

वेल्लाभट's picture

9 Feb 2016 - 10:50 am | वेल्लाभट

मला खूप आवडलेला एक
.इंडियन.

क्लास पिक्चर होता तो.

वेल्लाभट's picture

9 Feb 2016 - 10:58 am | वेल्लाभट

मला खूप आवडलेला एक
.इंडियन.

क्लास पिक्चर होता तो.

" यार मेरे यारा मेरे यार्रम
तुन्ने दिल चुर्राया मेरे यार्र्म
" हे थोर द्वंद्वगीतही आपणास आवडू शकते व महान नृत्यसम्राट बॉबी देओलजींचा नृत्याविष्कारही आपण पचवू शकता अशी दाद देउन गप्प बसतो ;)
ह घ्या :)

अन्या दातार's picture

13 Feb 2016 - 6:14 pm | अन्या दातार

आपल्या सणूपाजींच्या फिजिकचा पुरेपुर वापर "यारा ओ यारा" या गाण्यात केलाय. व्होल डे व्होल नाईट मध्ये ती मजा नाही =))

मदनबाण's picture

9 Feb 2016 - 10:00 am | मदनबाण

१९ ऑक्टोबर १९५७ चा जन्म
काय म्हणता ? च्यामारी मला वाटलं ही तारीख अजुन जुनी असावी !
आठवा... तारीख पर तारीख तारीख पर तारीख तारीख पर तारीख... ;)
माम्मैय्या केरो केरो केरो मामा करणारा सनी देवल हाच का ? असा प्रश्न त्याला आजही पाहुन पडतो ! जिद्दी मधल त्याच मेरा दिल ले गयी ओये कम्मो किधर गाणं बरच वाजलं होत.बाकी दामिनीत जो सनी व्यक्त झाला तसा तो कुठेच झाला नसावा... आठवा चढ्ढाला दिलेला दम !
गदर मध्ये त्यानी हँडपंप काय ताकदिने उखाडलाय ते पाहिले आहेत ? असे फक्त सनीचं करु शकतो { अपवाद फक्त रजनी अण्णा, ते उखाडलेला हँन्ड पंप परत लावुन त्यातुन भसाभसा पाणी काढु शकतात, जरी तो हँन्डपंप दुष्काळीभागातला असेल तरी सुद्धा.असो. } तर तो उखाडलेल्या हँन्डपंपचा सीन पाहुन माझ्या मनात असा विचार आला होता की हा सांड जो ढाई किलो के हात में हँडपंप उखाडे मारामारी करत आहे, त्याला खरोखरच हरामी पाकड्यांमध्ये सोडुन ध्यावा... हाण च्यायला प्रत्येकाला तिकडे आणि सगळ्यांची चांगली ठासुनच परत ये ! ;)

सनीची आरडा ओरडी आणि बुक्का आपटण्याच्या इस्ष्टाईलसाठी तरी हा पाहवा लागेल. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch

वेल्लाभट's picture

9 Feb 2016 - 10:47 am | वेल्लाभट

बुक्का

ओह दॅट थंडरस पंच ही लेज ऑन हिज प्रे..... ब्लिंक ऑफ अ‍ॅन आय; अँड बूम !

सनी देओलची अ‍ॅक्शन ही कन्विंसिंग आहे. फारच कन्विंसिंग. पण त्याचे एक वैशिष्ट्य आहे. मारामारीचा सीन शूट करताना प्रत्यक्षात अजिबात न मारताही खरोखरेच मारल्यासारखी अ‍ॅक्टिंग फक्त सनी करू शकतो. इतर हिरोंना ते जमत नाही असे बर्‍याच व्हिलनमंडळींनी मोकळेपणाने सांगितले आहे.

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 11:50 am | संदीप डांगे

+१००००

मालोजीराव's picture

9 Feb 2016 - 11:10 am | मालोजीराव

चित्रपटाचं विकेंड कलेक्शन जोरदार झालंय, मौथ पब्लिसिटी मुळे चांगला चालेल वाटतंय, अनेकांना आवडलाय

घायल, घातक, दामिनीमध्ये सनी देवलने उभा केलेला angree young man जबरदस्त होता. आपण सुद्धा त्याचे पंखे आहोत. बॉर्डरमधला मेजर सुद्धा एक नंबर होता...
पण गदर हा अतिरेक वाटतो.आणि तसेच पुढचे काही सिनेमे.
दामिनीमध्ये ढाई किलो का हात सोबत आणखी जबराट डायलॉग होता जो तितकासा प्रसिद्ध झाला नाही.
"चढ्ढा अगर कोर्ट मी तुने कोई बद्तमीजी की ना तो मै तेरा वो हाल करुंगा के तुझे अपने पैदा होने पे अफसोस होगा !!"

क्या बात हैं !!

वेल्लाभट's picture

9 Feb 2016 - 11:47 am | वेल्लाभट

तुझे अपने पैदा होने पे अफसोस होगा !!"

बेक्कार !

मला तो 'गर्दन उख़ाडदूंगा' वाला पण जाम आवडतो.
गर्दन उखाडदूंगा काय अरे !!! कैच्च्याकैच !

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 11:50 am | संदीप डांगे

"चढ्ढा अगर कोर्ट मी तुने कोई बद्तमीजी की ना तो मै तेरा वो हाल करुंगा के तुझे अपने पैदा होने पे अफसोस होगा !!"

क्या बात हैं !!

>>> क्या बात है खरंच!

एकवार नाना आणि सनी एका पिक्चर मधे आमनेसामने किंवा एका पार्टीत बघता यायला हवेत. चायला थेटरवाल्याला व्हॉल्यूम कमी करायला सांगावा लागेल. मझा येईल पण.

लय मजा येईल..शारुख,सलमान,आमिर ला एकत्र आणण्यापेक्षा या दोघांना आणा..

एका बाजूला नाना म्हणेल..."आ गये मेरी मौत का तमाशा देखने"...
आणी सनी म्हणेल..."सब के सब बिक चुके हैं...उतार के फेक दो ये वर्दी.."

सिरुसेरि's picture

9 Feb 2016 - 2:16 pm | सिरुसेरि

दामिनी मधला सनी देओलने शांत स्वरात म्ह्णलेला संवाद पुढे काय होणार याची कल्पना देतो -
"तुमने कभी पिंजरेमे बंद शेरको देखा है? शेर जब पिंजरेमे बंद होता है तो बच्चेभी उसे मुंगफलीयां मारते है !"
तसेच त्याने चढ्ढाला दिलेली समज लक्षात राहते - "तुमने इस केसको हाथ लगाया तो ऐसा झटका दुंगा के तुम झटकना भुल जाओगे "

आणी ह्या डॉयलॉगनंतर अंबरीष पुरी सन्नीपाजीला जरा थोपटायला पुढे येतो तेंव्हा त्याला झटकायची अ‍ॅक्शन, लगेच कन्नी काप म्हणून हाताने केलेला इशारा. भई काय ती खुन्नस. खत्तारनाक.

अभिदेश's picture

10 Feb 2016 - 4:45 am | अभिदेश

ये ढाई किलो का हाथ जब पडता है ना , तो आदमी उठता नहीं , उठ जाता है ।

सन्नीचि देहबोलि, तो खरोखरच वाटते की दुष्मनाचा खात्मा करेल. त्याची नैसर्गिक देहयष्टि एखाद्या पैलवानासारखि आहे. आपली खानावळ मात्र उसने अवसान आणल्यासारखी वाटते. एकतर तिघांची ऊँची कमी त्यात बहुदा स्टीरॉयड घेऊन कमावलेली बॉडी! सनी मात्र अस्सल मर्द वाटतो.

मी-सौरभ's picture

9 Feb 2016 - 7:12 pm | मी-सौरभ

मला त्याचे अर्जुन पंडीत, सलाखें पण आवडले होते. हा पिक्चर पण बहुतेक थेटरात जाऊन बघेन.

सनीचा फॅन नं ६४४०

आपण सनीभाईचे डायहार्ड फॅन.
सनी ज्या स्टाईल आणि ताकतीने पंच मारतो तसं कोणालाच जमत नाहि.
सनीच्या डोळ्यात एक करडा डाग आहे. सिरीयस रोल करताना त्याचे डोळे जितके भावुन होतात तेव्हढे कोणालाच जमत नाहि.
'डर' मधे 'बहोत सताया तुने मेरी किरण को' म्हणत शहारुखला तो गुद्दे मारतो त्यात त्याची चीड, तोवरची अगतीकता, रिव्हेंज, पनिशमेण्ट... सगळं एकसाथ मस्त उतरलय.

'जोशीले' बघितला आहे का कुणी? त्यात सनी ला कुणी फाईट मारली तर तो 'काय बे फालतु तू' असं काहिसा भाव आणत स्माईल देतो... समोरचा अधिकच चिडतो. आपल्याला लई आवडतात असले सीन :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Feb 2016 - 4:51 am | निनाद मुक्काम प...

बळवंत राय के कुत्ते
किंवा ढाई किलो का हात
अमिताभ नंतर नाना व सनी चे डायलॉग डिलिव्हरी खतरनाक
अर्जुन यतीम चा उल्लेख झाला आहे
सनी चे घायल दामिनी हा क्लासिक श्रेणीत येतात
मध्यंतरी माझ्या पाकिस्तानी कलीग ने बातमी आणली कि रॉ ने पैसे टाकून बोर्डर व त्यांतर अनेक देशप्रेमी सिनेमांची निर्मिती केली ज्यात पाकिस्तान खलनायक व सनी त्यांचा हिरो.
पंजाबी हिरो भारतीय दाखवून पाकीस्तान ला खलनायक दाखवला कि खलिस्तानी व पाकिस्तानी दोघांना एकाचवेळी ठेचता येते. सध्या रॉ वाल्यांनी खिलाडी कुमारला पकडले आहे
असो
सनी देओल हा चाकोरी बद्ध अभिनय करतो मान्य
मात्र त्याने जे केले आहे ते अजून कुणालाही जमणार नाही
लोकांनी प्रयत्न करू नये
सनी चा जीत सुद्धा आवडला होता.
त्रिदेव व विश्त्वा त्मा सुद्धा आवडला.
बोर्डर आवडला
पण आता त्याचे सिनेमे पाहणे होणे नाही
एकेकाळचा मिथुन व श्रॉफ ते अनिल हे आजकाल सिनेमात सहाय्यक भूमिकेत आढळतात त्यामुळे ते चालून जातात
मेन हिरो म्हणून सनी ते आता अट्टाहास सोडवा.
धर्मेद्र हा सनी पेक्षा केव्हाही आवडतो
प्रणय व विनोद व एकंदरीत अभिनयात तो बाप माणूस सनी बॉबी च्या मानाने खूप उजवा

अर्धवटराव's picture

10 Feb 2016 - 5:51 am | अर्धवटराव

=))
=))
सन्नी पाजी अगदी पुणेरी अवतार धारण करुन भांडतोय असा सीन डोळ्यासामोर आला.

बॅटमॅन's picture

11 Feb 2016 - 2:12 pm | बॅटमॅन

टह्ठो =)) =)) =)) =))

भंकस बाबा's picture

10 Feb 2016 - 8:33 am | भंकस बाबा

डकैत चे नाव नाही घेतले कुणी, परिस्थितिमुळे डाकू बनलेला एक सामान्य माणूस सनीने चांगला रंगवला आहे. आपली खानावळ डोळ्यासमोर आणून बघा, गुलछबू भूमिका करण्यात आयुष्य जाणार यांचे. अगदी मी.परफेकशिनिस्ट पण डाकुचा रोल करील तर कॉमेडियन वाटेल. डाकुला असणारा रांगड़ेपणा कुठून आणनार हे?

मनिशा चौधरी's picture

10 Feb 2016 - 10:41 pm | मनिशा चौधरी

ऑफर्स व डील साठी भेट द्या
http://goo.gl/YkkSjz

अभ्या..'s picture

10 Feb 2016 - 10:56 pm | अभ्या..

ऑफर्स व डील साठी भेट द्या

मला व डी मधली स्पेस दिसलीच नै. ;)

मला वाटतं, जे सनी करू शकतो ते इतर कोणी करू शकत नाही आणि जे इतर करू शकतात ते सनी करू शकत नाही अशी तुलना करणं चुकीच आहे. कथा,पटकथा,संगीत, दिग्दर्शन,उच्च निर्मीतीमुल्य आणी अभिनय या सगळ्या गोष्टी जमून आला की एक उत्कृष्ट कलाकृती तयार होते. त्यामुळे त्या कलाकृतीसाठी तोच कलाकार योग्य आहे असं आपण म्हणतो जे अगदी योग्य असते. पण तसं व्हायला या बाकीच्या गोष्टी सुद्धा आवश्यक असतात.
उदा.
१. लगानचा सह्हायक दिग्दर्शक असंलेल्या अपूर्व लाखियाने त्याच धर्तीवर अभिषेक बच्चनला घेऊन "मुंबई से आया मेरा दोस्त" नावाचा सिनेमा बनवला. हा प्रयत्न पूर्ण फसला. आता विचार करा, अपूर्वने जर लगानची पटकथा लिहीली असती तर आमिर खानने रंगवलेला भुवन कसा दिसला असता ?
२. कोई मिल गया मध्ये ह्रितिकने केलेली मतीमंद मुलाची भूमिका अप्रतीम जमली. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला. ह्याच ह्रितिकला आशुतोष गोवारीकरने 'स्वदेस ' साठी विचारले होते. नासाचा प्रोजेक्ट म्यानेजर शोभला असता का तो? तो मोहन भार्गव शाहरुखने सुरेखरीत्या साकारला. हे ह्रितिक सुद्धा मान्य करेल. कारण मोहन भार्गवच्या व्यक्तीमत्वाला शाहरुख साजेसा होता.
३. हाच शाहरुख मुन्नाभाईची भूमिका करणार होता. कल्पना तरी करू शकतो का ?
४. आमिर खान दिग्दर्शित तारे जमीन पर मधला आमिरचा अभिनय कोण विसरू शकेल. त्या सिनेमाच्या प्रत्येक बाबीत आमिर मनापासून गुंतला होता म्हणूनच तो इतकी सुंदर भूमिका करू शकला.
५. अजय देवगण गंगाजल किंवा कंपनी सारख्या गंभीर भूमिकेत शोभून दिसतो. पण विनोदी भूमिकेत तो अक्षरश: उघडा पडतो. त्या सिनेमांच्या कमाईचे आकडे जरी डोळे फिरवणारे असले तरी मी अभिनयाबद्दल बोलतोय.
६. सलमानची अभिनय क्षमता यथातथाच असली तरी मैने प्यार किया किंवा हम आपके हैं कौन मधला प्रेम असावा तो सलमानच !
थोडक्यात काय तर तुमच्या आमच्यासारख्या रसिकांच्या नशिबात असलं की सगळ्या गोष्टी जमून येतात आणि एक अविस्मरणीय कलाकृती आपल्या समोर येते.

वेल्लाभट's picture

11 Feb 2016 - 12:08 pm | वेल्लाभट

एकदम पॉलिटिकल प्रतिसाद दिलात भौ :)

चिनार's picture

11 Feb 2016 - 12:16 pm | चिनार

पॉलिटिकल काय हो त्यात?

हृतिक रोशन नक्कीच शोभला असता मोहन भार्गवच्या रोलमधे कदाचित शाहरूखपेक्षा जास्त .
नासाचा प्रोजेक्ट मॅनेजर वाटला असता तो

आणि जसा मैने प्यार किया किंवा हम आपके हैं कौन मधला प्रेम असावा तो सलमानच !
तसाच 'दामिनी'मधला वकील किंवा 'गदर' मधला हाताने हॅंडपंप उखडणारा तारासिंग तिथे फक्त सनी आणि सनीच पाहिजे दुसऱ्या कुणाची कल्पनाही करू शकत नाही तिथे !

चिनार's picture

11 Feb 2016 - 2:01 pm | चिनार

दादा..तुम्ही कदाचित आजच ह्रितिक डोळ्यासमोर ठेऊन असं म्हणताय. स्वदेस २००५-०६ मध्ये आला होता.
१२ वर्ष नासा मध्ये काम केलेला तो त्यावेळी नक्कीच वाटत नव्हता.
असो. ज्याच त्याच मत

_मनश्री_'s picture

11 Feb 2016 - 2:16 pm | _मनश्री_

मी दादा नाही ताई आहे हो
कदाचित १० वर्षापूर्वी ह्रितिक नसता शोभला किंवा शोभलाही असता , असो

चिनार's picture

11 Feb 2016 - 2:21 pm | चिनार

ताई क्षमस्व !

निशा शर्मा's picture

17 Feb 2016 - 3:36 pm | निशा शर्मा

अक्षय कुमार पण नासा मध्ये होता
आता काय बोलणार
तरी पण हे बघा मराठीत घायाळ चे परीक्षण

सिरुसेरि's picture

11 Feb 2016 - 12:54 pm | सिरुसेरि

सोल्जर , गुप्त या मध्ये बाबु देवल शोभून दिसतो.

सिरुसेरि's picture

11 Feb 2016 - 12:54 pm | सिरुसेरि

सोल्जर , गुप्त या मध्ये बॉबी देवल शोभून दिसतो.

स्मिता.'s picture

11 Feb 2016 - 2:39 pm | स्मिता.

मी काही सनी देओलचे फॅन वगैरे नाही पण तो या नवीन चित्रपटात खूप चांगला दिसतोय, तेवढा चांगला तर तो त्याच्या तरूणपणातही दिसला नाही.

_मनश्री_'s picture

14 Feb 2016 - 10:34 am | _मनश्री_

वयाच्या मानाने खरच चांगला दिसतो सनी देओल ….
1

खटासि खट's picture

13 Feb 2016 - 11:42 pm | खटासि खट

सनी आता कसा दिसतो ते राहू द्या.

रामगढ का घायल निघण्याआधी त्याने घाई केली ते बरं झालं.

त्याच्या छाताडावर बसून "ओम भगवुगे भग्नी भागोदरी" म्ह्णावं असं फार्फार वेळा मनात येतं...

माझा आत्मा त्याच्यात.... त्याचा आत्मा बाहेर !!

एक एकटा एकटाच's picture

14 Feb 2016 - 10:21 am | एक एकटा एकटाच

सही
प्रतिसाद आहे हा