एक संघ मैदानातला - भाग १
सगळ्यांच्या फायनली परीक्षा आटपल्या प्रँक्टीसला पुन्हा सुरुवात झाली. परत एकदा सकाळ संध्याकाळच मैदान गजबजायला लागलं. ह्या सिजानला लागोपाठ ६ स्टेट लेवल खेळायच्या आहेत म्हणल्यावर पोरींनी पण जोर धरला होता. आम्हाला चांगलं रगडून घ्यायचा आप्पांचा प्लान होता. त्यातच अशी बातमी आली की नँशलचे सिलेक्टर ह्या टूर्नामेंट बघूनच १८ ची टीम सिलेक्ट करणार आणि मग कॅम्प लावून फायनल १२ काढणार. मग तर काय हाणा-मारीला ऊत आला. कबड्डी कमी आणि कुस्तीचा आखाडा जास्त वाटायला लागलं मैदान.