गॉन विथ द विंड - एक अद्भुत अनुभव
'गॉन विथ द विंड' या नावाने नेहमीच एक रहस्यमय मोहिनी घातली होती. ठिकठिकाणी हे नाव वाचले, ऐकले होते. कधी खोलात जाऊन या नावाभोवतीचं वलय काय आहे हे बघावं असं मनापासून वाटलं नाही. उत्सुकता होती पण आळस म्हणा किंवा बाकीचं नीरस जगणं जास्त आवडलं होतं म्हणा, बरीच वर्षे टंगळमंगळ करण्यात गेली. दोन-तीन वर्षांपूर्वी माझा एक परममित्र किरण गायकवाड याने विश्वास पाटलांचं ' नॉट गॉन विथ द विंड' हे पुस्तक वाढदिवसाची भेट म्हणून दिलं. या पुस्तकाच्या मात्र मी अक्षरशः प्रेमात पडलो. सलग दोन वेळा वाचून काढलं.