सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल?
सकाळी सकाळी तिकडे जायची वेळ झाली, कि मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे नाडी सोडण्याचं, बांधण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल ? कधी वापरली असेल ?
आणि कशी बनवली असेल ? ... विशेषतः पायजम्याचं कौतुक वाटतं हो ,च्यायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी कापडाच्या दोन भोंगळ्या करून त्या एकमेकांना शिवून टाकायच्या, त्यात तंगड्या घुसवून मग हे झुंबाड खाली सरकून जाऊ नये, पण योग्य वेळी पटकन सरकवताही यावे, म्हणून त्यात नाडी घालावी, बांधावी, सोडावी ?