पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४)

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जनातलं, मनातलं
28 Aug 2013 - 12:53 pm

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१)
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (२)
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (३)

..त्यानं पुढ्यात पेटी घेऊन असा काही रंग उभा केला म्हणता की अनुरागने तिथल्या तिथे त्याला गुलालचे संगीत कॉम्पोज करायला आवतान दिले!
**************************************************************************************

जब शहर हमारो सो गयो थो, रात गजब की
चहूँ ओर सब ओर दिशा से लाली छाई रे
जुगनी नाचे चुनर ओढ़े खून नहाई रे
सब ओरो गुल्लाल पुत गयो बिपदा छाई रे
जिस रात गगन से खून की बारिश आई रे..

गुलालबद्दल चार शब्द बोलल्याशिवाय पियुषची गोष्ट पुढे सरकणार नाही.

राजसिंह चौधरीच्या डोक्यात ही स्क्रिप्ट काही वर्षे घोळत होती. राजपुतान्याचे स्वप्न, त्यातले मोहरे, प्यादे आणि पट हा मुख्य विषय. पण अनुराग कश्यपचा हात त्या कथेवर फिरला तेव्हा मांडणी कॉम्प्लेक्स झाली. तसेही, लेअर्ड कथानकांची मांडणी हा अनुरागचा (आणि अर्थातच कुब्रिक, लिंच, स्कॉर्सिसी या त्याच्या आदर्शांचाही) प्रांत. त्यामुळे त्यात काही इतर प्रोफाईल्स बघता येतात. जसे दुके बाना, रणसा, करण, दिलीप या चार तर्‍हेच्या नायकांसमोर उभ्या असलेल्या दुकेची पत्नी, माधुरी, अनुजा आणि किरण या चार तर्‍हेच्या स्त्रिया. किंवा दुके बाना, पृथ्वी बाना आणि त्याचा 'अर्धनारिश्वर' म्हणजे अनुक्रमे अनिर्बंध सत्ताकांक्षा, तिचा नेभळा, उपहासात्मक विरोध आणि दोघांचा मूक साक्षीदार बनलेले न धड इकडचे, न तिकडचे विटनेसेस् या प्रवृत्ती. भेद आणि दंडशक्ती हेच नाणे जिथे चालते त्या (दुर्दैवाने सर्वंकष, सर्वव्यापी) राजकारणाचा फोलपणा, त्याचे बळी आणि त्याचे अनिवार्य 'डीजनरेशन' स्पष्ट आहे. एकूण वेगळ्या धाटणीचा चित्रपट.

हे वेगळेपण गाण्यात, शब्दांत, संवादांत, फ्रेम्समध्येही दिसावे असा दिग्दर्शकाचा आग्रह होता. पियुषचा लोककलामंडळीवाला जुना अवतार, त्याचे शब्दांवर मांड ठोकणे अनुराग विसरला नव्हता. ऑफिसातल्या भेटीत पियुषने जो माहोल उभा केला होता त्यानं अनुराग एकदम प्रभावित झाला. पियुषने रचलेली जुनी गाणी 'जब शहर हमारा सोता है!' आणि 'दुनिया' फिट्ट बसली असती गोष्टीत किंवा पार्श्वभूमीवर. थोडेफार बदल केले कथानकानुसार आणि ही गाणी तयार झालीपण!

'शहर' च्या ओळी वर येऊन गेल्यात. अख्खी कविता वाचण्यासारखी आहे. वानगीदाखल..

"अधनंगे जिस्मों की देखो लिपी-पुती सी लगी नुमाइश होती है
लार टपकते चेहरों को कुछ शैतानी करने की ख्वाहिश होती है
वो पूछे हैं हैरां होकर, ऐसा सब कुछ होता है कब
वो बतलाओ तो उनको ऐसा तब-तब, तब-तब होता है
जब शहर हमारा सोता है..."

वाटतंय ना असं की हे शब्द आजच्या वास्तवापुढे चकचकीत आरसा मांडताहेत?

'दुनिया' ची गोष्ट निराळी. वरवर पाहता वाटतं की साहिरच्या करूणसुंदर कवितेवर हे ग्राफ्टींग का केलंय? पण गंमत निराळीच आहे. साहिरचं 'ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है' कारुण्याच्या उच्च पातळीवर जातं तर पियुषची दुनिया जरा रोखठोक. आहे हे असं आहे. इथे सगळंच टाकाऊ नाही, काही चांगलं आहेच. पण त्याचा फार उदोउदो नको कारण पायाखाली जाळ पेटलाय. इथे सौंदर्याची, माणुसकीची उंच शिखरं आहेत तशाच हीनत्वाच्या, ज्वालाग्राही मनोविकारांच्या गर्ताही. किंबहुना एक आहे म्हणुन दुसर्‍याचं वेगळं अस्तित्व आहे. सद्हेतू बाळगून काही करायला जाणारे किती जण बिघडले इथे! आणि चिखलातुन उठून किती जणांनी सुंदर लेणी निर्माण केली.. आधी समजून घ्या या दुनियेला. लगेच घाण येते म्हणुन नाकाला फडकं नको. आणि आरतीचं तबक देखील नकोच!

जैसी बची है वैसी की वैसी बचा लो ये दुनिया
अपना समझके अपनों के जैसी उठालो ये दुनिया
छुट पुट सी बातों में जलने लगेगी संभालो ये दुनिया…
कट पिट के रातों में पलने लगेगी संभालो ये दुनिया..

पण पुढे जाऊन चित्र बदलतं. हे असं आहे म्हणुन थांबुन चालणार नाही, पुढे जावंच लागणार. पुर्वी पुष्कळ उत्तरं मिळाल्यासारखं वाटलं, शोधणार्‍यांनी पुष्कळ नावं दिली उत्तरांना. पण प्रश्न सुटलेच नाहीत अजुन. लख्खं उजेडी हातात दिवली घेऊन फिरण्याची गरज अजून आहेच की!

आलिम ये कहता वहाँ इश्वर है
फाजिल ये कहता वहाँ अल्लाह है
काबुर ये कहता वहाँ इसा है
मंजिल ये कहती तब इंसान से की

तुम्हारी है तुम ही सम्भालों ये दुनिया
ये बुझते हुए चंद बासी चरागों
तुम्हारे ये काले इरादों की दुनिया…

ओ री दुनिया..

मग पेटी ओढली पुढ्यात, सूर लावला आणि एकेक गाणं अस्तित्वात आलं. आवाज आतलाच, स्वतःचा. इतर गाणीही लिहिली, रचली चोख.

हात शिवशिवत होते काही रोल करायला. तसा रोल मिळाला. पृथ्वी बानाचं कॅरेक्टर म्हणजे हतबल, डोळे उघडे ठेऊन नि:संतान होणं पहाणार्‍या, तिरकस बोलणार्‍या 'कॉन्शन्स कीपर' माणसाचं. गळ्यात जॉन लेननचे लॉकेट, बॅन्डवाल्याचा ड्रेस आणि सावलीसारखा सोबत असणारा 'अर्धनारिश्वर'. थोडं अतिवास्तववादी झालंय पण अर्धनारिश्वराचा 'प्रॉप' सारखा उपयोग करून घेतो पृथ्वी बाना.

या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा स्टारडस्ट पुरस्कार पियुषला मिळाला. गीतकार म्हणुनही नावाजलं गेलं.

आता आभाळ मोकळं व्हायला लागलं होतं आणि दिशा सापडली होती.

क्रमशः

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

29 Aug 2013 - 8:10 am | स्पंदना

तुम्ही स्वतः तर वेडे आहातच शिवोऽहम, पण आता आम्हालाही वेडे करुन टाकायला लागलाय.
गुलाल ज्या पिक्चरबद्दल ऐकलही नव्हत काल पाहीला, खर सांगते पियुषवरुन नजर हलत नाही तो पडद्यावर असताना. झापडा खाउनही काही तरी सिद्ध करण अन ते ही खाल नजरेने.
मस्त! दुनिया गाण रिवांईंड करुन करुन ऐकल.
ती मुजर्‍याची दोन्ही गाणी सुद्धा मस्तच जमलेत. दुसर गाण पॅरोडी वाटत.

चला, आता तुम्ही चार गोष्टी सांगाल या माणसाबद्दल. चांगल्या सिनेमाच्या प्रयत्नांबद्दल.

हा सिनेमा फार रखडला सेन्सॉरमध्ये. पब्लिक को भी कुछ जम्या नहीं. चालायचंच.

असे नट, कलाकार आहेत आपल्यात आणि अजुन त्यांच्यात गर्मी आहे काम करायची हेच खूप आहे.

मी-सौरभ's picture

6 Sep 2013 - 7:27 pm | मी-सौरभ

मस्त लिखाण
गुलाल हा चित्रपट म्हणुन खुप मस्त होता आणि त्यात पियुषचा वाटा सिंहाचा आहे :)

आदूबाळ's picture

29 Aug 2013 - 10:07 am | आदूबाळ

पुभाप्र!

दर वेळी प्रतिक्रिया देत नाही, पण वाचतो आणि वाट पहातो...

शिवोऽहम् साहेब्..सर्व प्रथम दंडवत स्विकारावे.जबरदस्त लेखमाला चालु केली आहे तुम्ही.पियुष मिश्रा सारख्या गुणी कलाकाराविषयी एवढं वाचायला मिळेल असा विचार सुद्धा केला नव्हता.

मी पियुष मिश्राला सर्वप्रथम मकबुल मधे पाहिलं.लीड रोल नव्हता पण त्याने त्या पात्रात जिवंतपणा आणला होता.
इरफान खान, तब्बु, पंकज कपुर, नसीर, ओम पुरी अशी मातब्बर मंडळी असताना देखील त्याच पात्र लक्षात राहिलं.

त्यानंतर त्याचे बरेच चित्रपट आले पण गुलाल मधे धमाका केला या माणसाने.गीतकार, संगीतकार, गायक, अ‍ॅक्टींग सबकुछ मिश्राजी.रॉकस्टारमधे,वासेपुर सुदधा मस्त काम आहे याचे.

अशा या अवलिया कलाकाराला सलाम.तुमच्यामुळे बरीच नवीन ओळख झाली या कलाकाराची.

पुढील कलाकार मनोज वाजपेयी आहे हे वाचुन तर कमालीचे ऊक्तंठा वाढली आहे.
इरफान खान,तिग्मांशु धुलिया,सौरभ शुक्ला,मकरंद देशपांडे,सुधिर मिश्रा यांच्या विषयीसुद्धा वाचायला आवडेल.

पुलेशु.

निखिल देशपांडे's picture

29 Aug 2013 - 11:48 am | निखिल देशपांडे

हे सगळं वाचतोय...
पियुष आधी अनेक चित्रपतातुन पाहिला होता. पण गुलाल आणि हुस्ना या दोन्ही मुळे शोधुन त्याचे बरेच चित्रपट पाहिले. गुलाल ची गाणी मस्तच आहेत.

पैसा's picture

5 Sep 2013 - 1:21 pm | पैसा

अन केवळ वाहवा!!

जे.पी.मॉर्गन's picture

5 Sep 2013 - 2:16 pm | जे.पी.मॉर्गन

शिवोऽहम वर अपर्णा अक्षय यांनी म्हणल्याप्रमाणे तू तर वेडा आहेसच... आम्हाला पण चटक लावतो आहेस. तुझ्या प्रत्येक शब्दातून तुझं पॅशन दिसतंय. आणि म्हणून पियुष मिश्रासारख्या खरोखरच एका अवलियाची माहिती तितक्याच अवलिया आणि "हुकलेल्या" रसिकाकडून वाचायचा आनंद मिळतोय.

काय कमाल शब्दप्रतिभा आहे यार तुझी ! आणि सलाम तुझ्या लेखणीला आणि मुख्य म्हणजे तुझ्या पॅशनला! प्रचंड आवडतिये मालिका ! लिखते रहो !

जे.पी.

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Sep 2013 - 9:35 am | लॉरी टांगटूंगकर

लिखते रहो !

तिलोत्तमा's picture

5 Sep 2013 - 2:16 pm | तिलोत्तमा

लवकर येवु द्या..

खुप मस्त लेखमाला सुरू आहे.
__/\__

पुभाप्र

एच्टूओ's picture

6 Sep 2013 - 10:43 am | एच्टूओ

"दिल से" पाहिल्यापासूनच पियुष बद्द्ल उत्सुकता होती..पुढील भाग लवकर येउ द्या !!

रमताराम's picture

8 Sep 2013 - 10:44 am | रमताराम

जबरा.
तुम्ही स्वतः तर वेडे आहातच शिवोऽहम, पण आता आम्हालाही वेडे करुन टाकायला लागलाय.>> अपर्णा यांच्याशी २००% सहमत. गुलाल ने जबरदस्त मोहिनी टाकली होती मनावर. कधीतरी त्यावर लिहिण्याचा मानस होता. पण नेमकी नस कधीच सापडली नाही. तुम्ही एका परिच्छेदातच चित्रपटाच सारं मर्म उलगडून दाखवलंत. टोपी काढली आहे.

तुमची सारी पोतडी इकडे मोकळी करावी ही विनंती. अन्यथा भूत होऊन बोकांडी बसेन ही धमकीही देऊन ठेवतोय.

_/\_