डु आयडी !
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा.
तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते.
त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा,
१. खोडसाळपणा
२. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे.
३. उगाच दंगा करणे
४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे.
५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे.
६. संपादकांना त्रास देणे.
असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो.