मित्रांनो,
दै. 'लोकमत' च्या दर बुधवारच्या 'युरेका' या पुरवणीत डॉ. साने मॅडमचे वृक्षपरिचयाचे लेख येत आहेत. दि. ११/०९/२०१३ च्या पुरवणीत कमळाबद्दल मस्त लेख आलाय तो इथे मुद्दाम देत आहे....
'पद्मपुराण'..........
'इचिरो ओहगा (Ichiro Ohga) एक जपानी तज्ञ. गोष्ट १९५० ची. त्यांना कोळशाच्या दलदलीत काही बिया सापडल्या. 'कार्बन १४' या कालमापन पद्धतीनं ओहगा यांनी त्या बियांचं वय आजमावलं. ते निघालं अंदाजे दोन हजार वर्षे. ओहगा महाशयांनी नंतर या बियांवर काही संस्कार करून, त्या रुजवल्या. बिया रुजल्या. रोपं उगवली. ओहगांनी ती दलदलीत लावली. आश्चर्य म्हणजे, या रोपांच्या छान वेली वाढल्या. त्या वेलींवर कमलपुष्पं फुलली. ओहगा तर या फुलांचं वर्णन करताना कवीच झाले. कमळाची कळी त्यांना 'साके' या मद्याची सुरई वाटली. दुसर्या दिवशी कळी उमलून त्याचा पेला झाला. तिसर्या दिवशी वाडगा, तर चौथ्या दिवशी बशी.
प्राचीन भारतीय संकल्पना आहे, की कमल-वेल अर्थात पद्मकमल अमर आहे. प्रत्येक देवतेच्या मूर्तीच्या पार्श्वभागी एक महिरप, कमान असते. त्या कमानीच्या तळाशी प्रत्येक बाजूला एक अक्राळ विक्राळ मुख असतं. हे मुख म्हणजे मकर, अर्थात मगरीचं तोंड. म्हणून हे मकर, किंवा मखर, (तोरण). या प्रत्येक तोंडातून एक वेल फुटलेली असते. मूर्तीच्या शीर्षस्थानी या दोन्ही वेली एकमेकांना मिळतात. मकराच्या तोंडापासून निघालेल्या वेली या कमलवेली मानल्या जातात. मगर (मकर) जशी दीर्घजीवी, तशीच कमलवेलीही. ओहगांच्या प्रयोगावरून कमलवेलीचं दीर्घजीवित्व सिद्ध झालं आहे. बियाण्यांच्या स्वरूपात का होईना, सुप्तरुपानं कमलवेल टिकून राहिली होती.
या कमळाचं शास्त्रीय नाव नेलम्बो, म्हणजे आपलं पद्म.
प्रतिक्रिया
3 Mar 2014 - 1:24 pm | आयुर्हित
कमळाचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे चिखलात/पाण्यात उगवून सुद्धा स्वत:ला निर्मळ/स्वच्छ ठेवते.कमळाच्या पानावर पडलेला थेंब कधीच पानाला चिकटत नाही. कमळ हे अमर असते,ही माहिती माझ्यासाठी नवीनच आहे.
छान शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आपले संसारिक जीवन असेच हवे. संसारात राहून सुद्धा, आपले मन त्यात न गुंतवता आपण स्वत:ला अलिप्त ठेवले पाहिजे, हेच आपले भारतीय तत्त्वज्ञान सांगते.
याचे भरपूर फायदे हि आहेत, यामुळे कितीही जवळची व्यक्ती(आजच्या जमान्यातील Pet सुद्धा)दुरावली तरी आपण न डगमगता आपल्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवून सर्व पुरुषार्थ करू शकतो. महत्वाचे म्हणजे आपल्याला मानसिक त्रासापासून मुक्त ठेवू शकतो.पर्यायाने आपल्या शरीरावर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखू शकतो.
जो पर्यंत बाहेरचे शास्त्रज्ञ आपल्या पुराणातातील संकल्पना, अधिक शोध लावून आपल्या समोर मांडतात, तेव्हा त्याचे महत्व आपणास कळते!
पण तोवर आपण सर्व भारतीय सर्व त्याची टर उडवत असतात.
मी नुकतेच एक नवीन संशोधनकरून तयार केलेले कापड पहिले आहे, ज्यावर धूळ, माती, डाग, अगदी पाणी सुद्धा चिकटत नाही. हया कापडाचा शर्ट घातल्यास वरून भाजीचा, चहा, कॉफीचा डागही लागत नाही.
भारतीय संकल्पनेवर सर्व जगभर संशोधन चालतात तरी आपण सारे भारतीय, भारतात संशोधन करायला इतके मागे का?
5 Mar 2014 - 9:47 pm | साळसकर
कमळ हे अमर असते,ही माहिती माझ्यासाठी नवीनच आहे.
छान शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
+७८६
10 Apr 2014 - 2:36 am | आत्मशून्य
हे हे नक्की कसे करतात हो ? मार्गदर्शन हवय.
10 Apr 2014 - 2:52 am | आयुर्हित
आता बस्स कि राव!पहाटे पहाटे माझी खेचताय?
3 Mar 2014 - 2:36 pm | शशिकांत ओक
मित्रा, साधारण १९६५ च्या सुमारास माझ्या वडिलांचा कापड व्यवसाय होता. त्यात एकदा स्टेपल कापड आणले होते. ते कापड काहीसे असेच पाणी व डाग न पडणारे होते. पण त्याला उठाव नव्हता. त्याच्या शाली खूप खपल्या. सुळसुळीत व मऊसूत शाल अंगावर लपेटून थंडीत आम्ही वापरत असू.
3 Mar 2014 - 11:26 pm | कवितानागेश
एक रीपोर्ट सापडला इथे http://www.amjbot.org/content/89/2/236.full
4 Mar 2014 - 12:22 am | शशिकांत ओक
वाचायला घेतला. पण मधेच सोडला.
4 Mar 2014 - 12:23 am | प्रचेतस
मी पण इथे अत्यल्प असे काहीसे खरडले होते.
http://misalpav.com/node/25654
5 Mar 2014 - 9:41 pm | पैसा
हेच लिहिणार होते. कमळाच्या बिया २००० वर्षांनी रुजल्या हे नवलच म्हणावे लागेल.
5 Mar 2014 - 9:54 pm | शशिकांत ओक
वल्ली,
आपल्या लेखातील विषयावर काही रंजक माहिती सादर करण्यासाठी साठवली होती. नुकतीच ती सहज हाती आली.
9 Mar 2014 - 7:05 am | सुधीर कांदळकर
लेख आवडला आणि चित्र देखील. मखर शब्द असा बनला तर.
9 Mar 2014 - 1:35 pm | कंजूस
काही
चांगली वस्तु असली की संरक्षण हवेच . गंगेचे आणि वरुणाचे वाहन मकर त्यांना
योग्य वाटले .संपूर्ण शरीर आणि शेपटी नकोशी वाटली .तिकडे पुराणातले इतर
प्राणी धावून आले .मोराची शेपटी पिसारा ,सिंहाचे पाय आणि पंजे ,वराहाचे धड
आणि हत्तीची सोंड असलेला प्राणि झाला .
गदग पासून अकरा किमी लखुंडी येथे पाहायला मिळतो . मकराच्या तोंडातूनच वेल
का काढाविशी वाटली ?
चालूक्य (कल्याणी)यांनी तो प्राणी तोरणम्हणून नाही पण देवळाच्या बाह्य
भिंतीवर ठेवला रक्षक म्हणनन
9 Mar 2014 - 3:13 pm | शशिकांत ओक
मित्रा,
जर कमलवेल व मकर हे अमर किंवा दीर्घायू म्हणून सांकेतिकपणे दाखवायचे असतील व त्यांचा एकमेकाशी संबंध दर्शवला जावा असे अपेक्षित असेल, तर वेलीला आधी (खाली) व त्याला जोडून मकराच्या शेपटीला व वर मकरमुख दाखवून त्यांचे साधर्म्य जाणवणार नाही. त्यातल्या त्यात मकराच्या मुखातून वेलीला दाखवणे सांकेतिकपणे दीर्घायू वाटणे तार्किक वाटते.
असो.
9 Mar 2014 - 4:20 pm | कंजूस
हे पटतंय .
10 Apr 2014 - 12:47 am | आयुर्हित
आपला सर्वांचा आवडता विठूराया व मकर तोरण
10 Apr 2014 - 1:18 am | शशिकांत ओक
... रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी...