सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
1 Mar 2014 - 11:03 pm | खटपट्या
छान फोटो
2 Mar 2014 - 6:45 am | कंजूस
पाच फोटो जवळचे आहेत त्यात काही खास नाही .झेंड्याचा का काढला ?तो कशावर आहे ?झाडे आणि पाण्यातले प्रतिबिंब समजले आणि पटले .अमुक एक फोटो मला का काढावासा वाटला ते फोटोच बोलला पाहिजे .थोडे वेगळे विषय येऊ द्यात .कैमरा बदलता येत नाही पण विषय नक्कीच बदलता येतात .
5 Mar 2014 - 5:55 am | नांदेडीअन
म्हणजे जवळचे फोटो चांगलेच निघतात का ?
5 Mar 2014 - 8:24 am | राजो
धन्यवाद कंजूस, नक्कीच वेगळे विषय घेण्याचा प्रयत्न करेन. सध्या कॅमेर्याच्या तांत्रिक बाबी समजून घेणे चालू आहे. तसा कॅमेरा घेऊन ६-७ महिने झाले आहेत, पण पुरेसा वेळ नाही मिळू शकला (कि आळस :)) कॅमेर्यावर हात साफ करण्यासाठी.
2 Mar 2014 - 4:54 pm | मुक्त विहारि
निदान, नक्की कशाचा फोटो काढला आहे, हे तर अगदी स्पष्टच समजते.
2 Mar 2014 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा
वाह्ह! छान! सुंदर!
4 Mar 2014 - 10:43 pm | मेघनाद
छान आहेत फोटो, मोबाइल आणि कॅमेरा दोन्ही वापरले आहेत का ?
5 Mar 2014 - 8:21 am | राजो
नाही, फक्त कॅमेराच वापरला आहे.डीएसएलआर वर प्रयत्न करतो आहे.
5 Mar 2014 - 8:47 am | श्रीरंग_जोशी
पहिल्या फोटोमध्ये कॅमेरा उंचावर न धरता बाहुल्यांच्या समोर धरला असता (जमीन दिसणार नाही असा) तर अधिक परिणामकारक वाटले असते असा अंदाज आहे.
खालील फोटो मी बर्याच वर्षांपूर्वी काढला आहे. त्यावेळी कॅमेरा बाहुलीच्या चेहर्याच्या रेषेत धरला असता तर हाच फोटो अधिक चांगला वाटला असता...
7 Mar 2014 - 12:16 pm | एस
प्रतिक्रिया व्यनिद्वारे कळवली आहे. सॉरी, धाग्यात माझे नाव मी आधी वाचलेच नव्हते :-)
7 Mar 2014 - 3:50 pm | राजो
डिटेल्ड प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद स्वॅप्स
7 Mar 2014 - 12:37 pm | शैलेन्द्र
कोणती लेन्स वापरताय?
१८-५५?
7 Mar 2014 - 3:49 pm | राजो
हो. १८-५५ किट लेन्स आणि निकॉन ३५ एम एम १.८ प्राईम लेन्स