आस्वाद

घोस्टहंटर-१

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
16 Dec 2015 - 10:36 pm

"व्हू आर यू?"
"युवर डेथ!"
तो खाली कोसळला!
"मनिष उठ!"
एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती.
ग्रेग मॉरिसन मर्डर केस!
सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत.
"झोपू दे मला!"
"अरे मूर्ख उठ!"
"मी केस सॉल्व करतोय."

हे ठिकाणधोरणवावरसंस्कृतीकलानाट्यवाङ्मयकथाशुद्धलेखनदेशांतरप्रकटनआस्वादलेखमाहितीसंदर्भप्रतिभाविरंगुळा

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
16 Dec 2015 - 8:29 am

नमस्कार मंडळी,

यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - कृषी. येथे शेतांची किंवा फळबागांची छायाचित्रे अपेक्षित आहेत.

कलासद्भावनाआस्वाद

आॅन / आॅफ ( एक भयानक अनुभव )

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
10 Dec 2015 - 4:23 pm

कुजलेल्या चेहऱ्या सारखा तो म्हातारा , जसा छिन्नविछिन्न शरीराचा , कमरेत वाकले ला होता.
त्याला पाहुन मी इतका घाबरलो की माझ्या हात पायातुन शक्तीच गेली, माझा माझ्यावरील कंट्रोल राहीला नाही व हाताचा बोट लाईट च्या बटणावर अजून तसाच होता. भितीने माझा बोट बटणावर दाबला गेला व लाईट आॅफ झाली त्या काळोखाला पाहुन माझा थरकाप उडाला.  मी पुन्हा लाईट आॅन केली पण तो खिडकी जवळ नव्हता , मी पळत जाऊन खिडकी तुन बाहेर पाहिले पण तो नव्हता.  एखादा म्हातारा इतका चपळ आसू शकतो?

कथाआस्वाद

आॅन / आॅफ ( एक भयानक अनुभव )

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
9 Dec 2015 - 9:26 pm

नुकतीच माझी बदली शहरात झाली होती . त्या दिवशी मी मला कंपनीकडून मिळालेल्या घरात  रहायला गेलो.  घर दिसायला मोठे होते त्यामध्ये अनेक सुविधा होत्या .पण माझ्यावर तुम्ही विशवास ठेवा न ठेवा , मला त्या घरात जो अनुभव आला तो अलौकिक होता.
आणि मी कधीही आशा अनुभवाची अपेक्षा माझ्या बाबतीत मला नव्हती.

त्या घरा जवळ शेजारी म्हणुन कोणी नव्हते.  मी घरात प्रवेश केला तेव्हा घरातील सर्व वस्तू व्यवस्थित होत्या.  खिडक्या , दरवाजे , जिना आणि इतर सर्व काही सुविधा.

कथाआस्वाद

पैस - दुर्गा भागवत

प्रसाद प्रसाद's picture
प्रसाद प्रसाद in जनातलं, मनातलं
8 Dec 2015 - 1:26 pm

दुर्गा भागवत यांचे ‘पैस’ वाचून खरंच आनंद वाटला. पैसविषयी आधी ऐकलं होतं, पुस्तक वाचताना लेखिकेने हे स्वान्तसुखायच लिहिले असावे असं वाटत राहते.

या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचनीय आहे.

पहिला ‘स्व‍च्छंद’ ज्यांत याच स्वान्तसुखाय लेखनाची, लेख लिहिण्याच्या ऊर्मीची आणि हे लेख लिहिण्याची सुरुवात कशी झाली हे दुर्गाबाई सांगतात. आत्मचरित्रपर लेख. साधा वाटतो पण लेखिकेच्या सहज सुलभ लेखन शैलीमुळे. छोटासा पण उत्तम आहे.

वाङ्मयआस्वादमाहिती

नासदीय सूक्त-शब्दांतरिताचे श्रवण.(एक उत्कट अनुभव!)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
5 Dec 2015 - 9:52 pm

शीर्षकामधे जरी शब्दांतरिताचे श्रवण असं म्हटलेलं असलं.तरी तो नुसताच काटेकोरपणा आहे. भाषाशास्त्राच्या नियमानुसार असलेला. मुळात उपक्रम संस्थळावर येथे श्री धनंजय यांनी या सूक्ताचे जे छंद आणि वृत्ताचा नियम पाळून शब्दशः भाषांतर तसच्या तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.. तोच ऐंशी टक्के बाजी मारून जाणारा आहे.

संस्कृतीधर्मआस्वादविरंगुळा

सुटका (कथा)

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
28 Nov 2015 - 10:58 am

सकाळी आश्विन दचकून जागा झाला असं म्हणता येणार नाही.

रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. झोप नव्हती, तर जाग येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो?
पण अशा प्रसंगी कोणाच्याही मनात यावी तशी स्वाभाविक शंका आश्विनच्या मनात आली – तो जागा आहे? की स्वप्नात आहे?

पण त्याला एकदम जाणवतं की नाही, हे स्वप्न नाही.
दु:खाचे ते सगळे क्षण आश्विनला आठवतात.

तो मुकाट्याने उठतो. सवयीने आंघोळ उरकतो. तो तयार होतो तेव्हा रोजच्याप्रमाणे सकाळचे साडेसहा वाजलेले असतात.

कथाआस्वाद

रन फॉरेस्ट रन

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 12:27 pm

मिपावर मध्यंतरी 'काही वेगळे चित्रपट' या धाग्यावर हॉलीवुडचे बरायचश्या सुंदर चित्रपटांचे उल्लेख मिळाले, त्यापैकी 'टॉम हँक्स' अभिनीत 'फॉरेस्ट गम्प' पासून सुरवात केली. निसर्गाने मानवाला बनवताना कोणते रसायन वापरले याचा उलगाड़ा अजूनही आपल्याला झालेला नाही, फॉरेस्ट गम्प मधून पुन्हा एकदा हे रसायन समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. विन्स्टन ग्रूम या लेखकाने लिहिलेल्या "फॉरेस्ट गम्प' याच शीर्षकाच्या कादंबरीवर हा चित्रपटला ऑस्करचे उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, संपादन इत्यादी एकूण सहा पुरस्कार मिळाले.

मांडणीसंस्कृतीनृत्यकथासमाजजीवनमानचित्रपटआस्वादअनुभव

ख्वाडा.....रामराम देवा!! ताणुन मारीन..!!

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
21 Nov 2015 - 9:45 pm

गावोगावच्या डोंगरदऱ्या, माळरानावर मेंढरं चरत राहतात. पाठीमागं घोडं, बैलगाडीवर संसाराच गाठोडं घेऊन 'धनगरडे' चालत असतात. संध्याकाळी एखाद्या पाण्याच्या रानात मुक्काम ठोकतात. वाऱ्या-कावदानात चुल पेटवली जाते. धगधगता निखारा पेटलेल्या भुकेल्या विझवत राहतो. चांदण्या राती थकलेले जीव गारगार झोपतात. मग पुन्हा सकाळी चारणीला मेंढरं घेऊन पाडा पुढच्या गावाला चालत राहतो.
मेंढपाळांचं हे रोजचं आयुष्य. पिढी दरपिढी चारणीचा रुळलेला रस्ता. याच रस्त्यावर कित्येक खाचखळगे, काटेकुटे, दगडधोंडे लागतात. असाच एक रापलेला दगड रस्त्याच्या मधोमध येतो आणि आख्ख्या पाड्याला 'ख्वाडा' घालुन जातो.

चित्रपटआस्वाद

"शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
21 Nov 2015 - 3:29 pm

इंग्रजीमध्ये "थ्रिलर" प्रकारच्या पुस्तकांचं बरंच समृद्ध कपाट आहे. डॅन ब्राऊन, मायकेल कॉनेली, जेम्स पॅटरसन वगैरे मंडळींच्या कृपेने. त्यात डॅन ब्राऊन कंठमणी शोभावा असा. कोणतातरी रहस्यभेद करायच्या ध्येयाने प्रेरित झालेला नायक, त्याला साथ देणारी नायिका, खलनायक किंवा खलनायकांची संघटना, नायकाला साथ देणारी चांगली माणसं / त्यांची संघटना, चोवीस ते छत्तीस तासांत घडणारं वेगवान कथानक असा थ्रिलर्सचा एकंदर ढाचा असतो. डॅन ब्राऊनने त्यात पुराणं, इतिहास, दंतकथा, गुप्त संघटना, कॉन्स्पिरसी थियरीजची जोड दिली, आणि द रेस्ट इज हिस्टरी.

वाङ्मयआस्वाद