आॅन / आॅफ ( एक भयानक अनुभव )

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
10 Dec 2015 - 4:23 pm

कुजलेल्या चेहऱ्या सारखा तो म्हातारा , जसा छिन्नविछिन्न शरीराचा , कमरेत वाकले ला होता.
त्याला पाहुन मी इतका घाबरलो की माझ्या हात पायातुन शक्तीच गेली, माझा माझ्यावरील कंट्रोल राहीला नाही व हाताचा बोट लाईट च्या बटणावर अजून तसाच होता. भितीने माझा बोट बटणावर दाबला गेला व लाईट आॅफ झाली त्या काळोखाला पाहुन माझा थरकाप उडाला.  मी पुन्हा लाईट आॅन केली पण तो खिडकी जवळ नव्हता , मी पळत जाऊन खिडकी तुन बाहेर पाहिले पण तो नव्हता.  एखादा म्हातारा इतका चपळ आसू शकतो?
इतक्यात बेडरूम मधील लाईट आॅफ झाली व त्या आधाराची मला  खरी भिती वाटली , स्वतःचा जीव वाचावण्यासाठी मी हवेत चाकू फिरवून हल्ला करू लागलो .अचानक माझा पाय कशात तरी अडकला व मी खाली पडलो. माझ्या हातातुन चाकू काळोखात खाली  पडला,   मी ओरडू व रडू लागलो. 

'कोण तू पुढे येऊ नकोस....'

' वाचवा. ......वाचावा. ..,'

जमिनीवर हात फिरवू लागलो.  अचानक माझ्या हाताला एक  वजनदार  लोखंडी सळई लागली.  मला समजले होते की माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो.
मी भितीने हातातील सळई जोर जोरात माझ्या चारही बाजूंनी फिरवू लागलो तसे करीत मी घरातून फिरू लागलो, तसे करीत मी बेडरूम मधील लाईट आॅन केली पण लाईट लागली नाही,  मी  जीवाच्या भितीने सळई फिरवत  हाॅल मध्ये आलो .
शेवटी हाॅल चा  मुख्य दरवाजा उघडला व त्या घरातुन धुम ठोकली.

जोर जोरात श्वास घेत मी धावत होतो जसे कि तो म्हातारा माझ्या पाठीमागे लागलाय .
शेवटी मी हायवेवर पोहोचलो व इतर लोकांना पाहून माझ्या मनातील भिती कमी झाली.

पहाटेचे पाच वाजले होते. दोन तास फिरून काढले.सात साडेसात वाजता पुन्हा घरी गेलो.  माझ्या त्या भितीने घराची अवस्था एका तुटलेल्या फुटलेल्या घरासारखी झाली होती . मी झटकन माझी बॅग भरली व त्या घराबाहेर पडलो.  काही अंतरावर गेल्या वर तीन वायरमन  विजेच्या खांबांवर दुरूस्ती करताना दिसले.  बहुतेक ह्या भागात विजेचा प्राॅब्लेम आसेल वाटले.  मी शेवटचे त्या घरा कडे वळून पाहिले आणि भराभर चालु लागलो.

त्या नंतर बर्‍याच दिवस या घडलेल्या प्रकारावर विचार करित होतो.
शेवटी मला त्याचे उत्तर सापडले.

तो म्हातारा मला कोणतीही इजा करणार नव्हता,  तर तो तर माझे संरक्षण करत होता.  रात्रीच्या वेळी अनेक किटक लाईट च्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि तो म्हातारा माझे त्या पासून संरक्षण करत होता. 

हे माझ्या बुद्धीला पटले आणि पुन्हा मी लाईट आॅफ करून शांतपणे त्या काळोखात झोपू लागलो.

.............
........
.....
.......
........

........

अचानक लाईट आॅन होते. ........####
.
.
.
.
.
समाप्त.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

10 Dec 2015 - 4:27 pm | पुष्करिणी

आय याम युर फॅन जीवनभौ

प्रमोद देर्देकर's picture

10 Dec 2015 - 4:28 pm | प्रमोद देर्देकर

अरे भाई कहना क्या चाहते हो?

काय राव! भुतं तर आपलं संरक्षण करत असतात! आपण उगीच घाबरतो त्यांना! हे वैश्विक सत्य मोजिंनी दाखवल्याबद्दल मिपाकरांतर्फे अनेक आभार!!!

दमामि's picture

10 Dec 2015 - 4:32 pm | दमामि

:):):):)

अजया's picture

10 Dec 2015 - 6:42 pm | अजया

=)))

सस्नेह's picture

10 Dec 2015 - 4:38 pm | सस्नेह

भुते तर सुतासारखी सरळ, सज्जन, उपकारक वैग्रे असतात की ! लोक उगाच घाबल्तात भुतांना !

अद्द्या's picture

10 Dec 2015 - 4:51 pm | अद्द्या

आता कसं . .

मोजी कथा पूर्ण झाली .

भूतं आपलं संरक्षण करत असतात . . कीटकांपसुन .

लैच भारी

अद्द्या's picture

10 Dec 2015 - 4:52 pm | अद्द्या

रच्याकने .

इलेक्ट्रिक चं काम चालू असताना शोर्ट होण्यापासून वाचवले अशी संपवली असती तरी चांगली वाटली असती

कपिलमुनी's picture

10 Dec 2015 - 5:16 pm | कपिलमुनी

मोजी भौ की जय !

चाणक्य's picture

10 Dec 2015 - 5:20 pm | चाणक्य

भयानक आवडलंय.

तिमा's picture

10 Dec 2015 - 5:24 pm | तिमा

पाणी-पुरी तोंडात घालावी आणि आंत नुसतंच मचूळ पाणी असावं, तसं झालं बघा!
ते किडे, कशावरुन त्याच्या सडलेल्या चेहेर्‍यातूनच पडत नसतील ?

प्रसाद गोडबोले's picture

10 Dec 2015 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले

मोजी भाऊ आमचे काय म्हणने आहे की

लाईट चे बिल म्हातारा भरणार असेल तर आपली काही हरकत नाही कितीही वेळा ऑन ऑफ करायला , आपण ढाराढुर झोपतो प्रकाशात !

हां फक्त म्हातार्‍याने फॅन लावला तर त्याची अगलतगल एक करण्यात येईल .... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =))))

प्रचेतस's picture

10 Dec 2015 - 6:21 pm | प्रचेतस

टुकार लेखन.

प्रसाद गोडबोले's picture

10 Dec 2015 - 6:22 pm | प्रसाद गोडबोले

ओ , आपलं काय ठरलय , प्रोत्साहन द्यायचे ना ?

निवृत्त झाल्या पासुन तुम्ही अगदी काँग्रेसी असल्या सारखे वागत आहात ... आपणच बनवलेल्या कायद्याच्या मसुद्याला अपणच विरोध करत आहात =))))

चांगल्या लेखनाला आपण चांगलेच प्रतिसाद देतो आणि टुकार ते टुकार. त्यात आपलं परकं काय करायचं.

किटकांपासून वाचवणारं भुत!

अब आया मजा.

मार्मिक गोडसे's picture

10 Dec 2015 - 6:55 pm | मार्मिक गोडसे

Casper ??

कपिलमुनी's picture

10 Dec 2015 - 7:35 pm | कपिलमुनी

सदर कथानायक लाईट पंखे चालू ठेवायचा त्यामुळे भूताची झोपमोड व्ह्यायची ,
आणि भूत काटकसरी असल्याने लाईट बंद करत असेल

मी-सौरभ's picture

10 Dec 2015 - 8:15 pm | मी-सौरभ

सदाशिव पेठी भूत असावे ते

जातवेद's picture

10 Dec 2015 - 10:32 pm | जातवेद

आज रात्री काय झोप येणार नाही. मन सुन्न करणारा अनुभव! कुणाचीही झोप उडवेल!

उगा काहितरीच's picture

11 Dec 2015 - 12:06 am | उगा काहितरीच

बाबौ ! मोजीभौ, दंडवत स्विकारा. शब्दच फुटत नाहीयेत.

बोका-ए-आझम's picture

11 Dec 2015 - 1:07 am | बोका-ए-आझम

मोजींच्या अजरामर काळी मावशीचा sequel आहे बहुतेक. मावशी ज्या चोराला हाकलते तोच हा कथानायक ना मोजीकाका? कसं पकडलं? त्याचं नाव राँर्बट हे तुम्ही सांगायचं विसरलात वाट्टं!

नाखु's picture

11 Dec 2015 - 10:13 am | नाखु

नाही सौजन्य सप्ताह असले कारणे माव्शी,काळी मांजर वगैरे "दीर्घ रजेवर" आहेत इतकेच, आपण कीटकांवर समाधान मानावे फक्त.

जीमो म्हणे उगी रहावे !!बल लावून निवांत झोपावे !!!

पुंडलीकाने परत हाणली विटकर ! श्री ध्यान देव तुखामार...

नंतर आरती व प्रसादाचा करेक्रम होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Dec 2015 - 2:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

यक्दम बरोबर हाय जिवन्भौ तुम्चं ! जिवंत असताना चावलेल्या कीटकांचा भूत झाल्यावर असा सूड घ्यायलाच पायजे !

तर नदीत लाकडे !

ये जीवन है, इस जीवन का, यही है यहि है यही है रंग रूप...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2015 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय राव अपेक्षाभंग झाला.

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

15 Dec 2015 - 5:04 pm | संदीप डांगे

कथा संपली हेच सर्वत म्ह्त्वाचे...

निवृत्त झाल्या पासुन तुम्ही अगदी काँग्रेसी असल्या सारखे वागत आहात ... आपणच बनवलेल्या कायद्याच्या मसुद्याला अपणच विरोध करत आहात =))))

हे मात्र भारी हा .