प्रकाशवाटा
अमावस्येला आकाश काळ्या चादरीवर चांदण्यांचे बुट्टे लेवून असते. त्याचा सखा शशी आज दूर फिरायला गेलाय जणू! तेव्हा या आकाशाचे पृथ्वीच्या निजरातीशी हितगुज मनमोकळे होत असावे.
म्हणूनच का दिव्यांचे उत्सव त्या आकाशाचा एकाकीपणा घालवायला अमावस्येलाच असतात का?दीपअमावस्या ,दीपावली हे त्यातले उत्सव अग्नि तत्वाशी एकरूप!
मला जशी जाण आली तशी अनेक गोष्टी पंच तत्वाशी जोडायची सवयस जडली. दीपावलीला दिव्यांची रांग ओळ मांडताना ती संपूच असं वाटतं .सगळं जग लखलख उजळून निघताना मनातला अंधार नाहीसा होतो .तिथे एक दीप मंद तेवतो .