“ही चोळी कोणाची?”: सुखद दृश्यानुभव

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 May 2023 - 11:59 am

चित्रपट पाहताना सतत मध्येमध्ये येणारे कर्कश्य संगीत नकोसे झालेय ?
घिस्यापिट्या आणि ‘फ’कारयुक्त संवादांचा कंटाळा आलाय ?
तोच तोच मसाला पण नकोसा वाटतोय?
आणि
शांतपणे एखादी निव्वळ दृश्यमालिका बघावीशी वाटते आहे काय?
वरील सर्व प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल.. तर मग खास तुमच्यासाठीच आहे हा चित्रपट: The Bra.

ok

विदेशी चित्रपट असल्याने त्याची भाषा कोणती हा महत्त्वाचा मुद्दा. परंतु काळजी करायचे काहीच कारण नाही, कारण हा कागदोपत्री ‘जर्मन’ चित्रपट असला तरी एकही संवाद नसलेला आहे!

चित्रपट प्रभावी दृश्यमान आणि पुरेसा गतिमान असल्याने संवादांची गरज जाणवत नाही. नाही म्हणायला एका म्हाताऱ्या बाईंचे आवाजरहित जोरदार हास्य मात्र खूप मजेदार दिसते.

* चित्रपटाचे चित्रीकरण बाकू या अजरबैजानच्या राजधानीत आणि जॉर्जियात.
* The Bra या नावावरून जे आपल्या मनात येते तोच तर चित्रपटाचा विषय आहे.
* एका ट्रेनचालकाने त्याला सापडलेल्या निळ्या चोळीच्या मालकिणीच्या शोधाची ही रंजक कथा.

ट्रेन खेड्यातील वस्तीच्या अगदी जवळून किंबहुना धोकादायक अंतरावरून जाताना दाखवलेली. ट्रेन वस्तीच्या शेजारून जात असताना लोकांनी अंगणात वाळत टाकलेले दोरीवरचे कपडे (ज्यात स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचाही समावेश आहे) वाऱ्याच्या झोताने उडून ट्रेनच्या बाहेरील भागात अडकून पडणे ही नित्याची घटना.

अशाच एका दिवशी ट्रेनवर एक निळी आकर्षक काचोळी (bra)अडकते. तो दिवस संबंधित ट्रेन चालकाच्या नोकरीतील अखेरचा दिवस असतो. त्याच्या त्या ट्रेन-प्रवासादरम्यान त्याने एका घराच्या खिडकीतून आतमध्ये चोळी बदलत असलेली एक स्त्री पाहिलेली असते. ती आठवण मनात ठेवून आता तो या सापडलेल्या चोळीच्या मालकिणीचा शोध घेऊ लागतो.
ही कल्पनाच मोठी मजेदार आहे.

बारीक-सारीक तपशिलांचे सुंदर चित्रीकरण. ट्रेन सुरू करताना तिचा पँटोग्राफ जेव्हा इलेक्ट्रिक वायरला स्पर्श करतो तेव्हा उडणाऱ्या ठिणग्या मस्त दिसतात.

ट्रेन नियंत्रण कक्षातील कर्मचारी स्त्रीच्या सुरेख हालचाली.

“ही चोळी कोणाची?” या मोहिमेवर निघालेला चालक… त्याला दारोदारी आलेले अनेक अनुभव..
काही स्त्रिया त्याला दारातूनच परत पाठवतात तर काही स्त्रियांनी प्रत्यक्ष ती चोळी स्वतः घालून बघितल्याची भन्नाट दृश्ये...
जेव्हा तो अशा स्त्रियांना बॅगेतून काढून ती चोळी दाखवतो, तेव्हा त्या स्त्रिया "ही माझी नाही" असे लगेच का सांगत नाहीत, हा प्रश्न मात्र प्रेक्षकांनी विचारू नये !

अशा बऱ्याच स्त्रियांकडून नन्नाचा पाढा ऐकल्यानंतरही त्या चालकाने चालूच ठेवलेला शोध..

दरम्यान त्या गावात एक फिरते मॅमोग्राफी शिबिर भरते. तिथे लागलेली स्त्रियांची रांग.. चालकाने तिथे डॉक्टरचा वेश घालून तोतया डॉक्टर बनून जाणे..
तरीही अजून त्याचा शोध चालूच ..

एका घरात हा चोळीप्रयोग केल्यानंतर त्या बायकोचा नवरा आणि त्याने बोलवलेल्या माणसांकडून चालकाची झालेली बेदम पिटाई.. त्याला साखळदंडांनी जखडून रेल्वे रुळांवर आडवे टाकतात..

त्यातून त्याची सुटका होते का ? कोण मदत करते त्याला ?
अखेर..
कर्मधर्मसंयोगाने चोळीच्या मालकिणीचा शोध लागतो का? हे प्रत्यक्ष चित्रपटातच बघा.. !

यू ट्युबवर उपलब्ध.
आधुनिक काळातील एक चांगला मूकपट !

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

18 May 2023 - 12:48 pm | कर्नलतपस्वी

ब्रुटस यू टू

नक्कीच बघणार मग प्रतिसादणार.&#128512

कुमार१'s picture

18 May 2023 - 1:50 pm | कुमार१

ब्रुटस यू टू

😀

जरूर ! येऊद्या तुमचा अनुभवी प्रतिसाद.

आग्या१९९०'s picture

18 May 2023 - 2:01 pm | आग्या१९९०

चित्रपटाचा शेवट मस्त!

तुम्हाला हा चित्रपट काय सर्च केल्यावर सापडला असे विचारत नाही. ;-) एकूण रोचक प्रयोग दिसतो आहे. पूर्ण चित्रपटात कोणीही ब्रा, सॉरी ब्र देखील काढत नाही हे आश्चर्यकारक..

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 May 2023 - 3:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

कुमार सर, तुम्ही सुद्धा?

ह.घ्या. नक्की बघणार तूनळीवर.

कुमार१'s picture

18 May 2023 - 3:37 pm | कुमार१

चित्रपटाचा शेवट मस्त!

>>> अ-ग-दी-च !
..

कोणीही ब्रा, सॉरी ब्र देखील काढत नाही

>>> 🙂
..

तुम्ही सुद्धा?

>>> आपल्या सर्वांचा लसावि एकच असतो राव 😀

दुपारी चित्रपटाविषयी उत्सुकता जागृत करणारा हा लेख वाचला आणि कामे हातावेगळी झाल्यावर लगेच पाहिला. 'पुष्पक' ह्या चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी कुठल्याही संवादाशिवायही मानवी मनातल्या विविध भावना आणि भल्या-बुऱ्या मनोवृत्तींचे दर्शन घडवणारा हा सायलेंट चित्रपट "स्टार्ट टू एन्ड" आवडला 👍

उत्तम दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटातील लोको पायलट नायक, नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी आणि डॉग हाऊस मध्ये राहणारा तो छोटा मुलगा हि पात्रे लक्षात राहण्यासारखी आहेत. विवाहोत्सुक वयस्कर नायकाची तरुण 'वधू'च्या आईने घेतलेली 'वरपरीक्षा' आणि मॅमोग्राफी शिबिर हे प्रसंग मजेशीर आहेत.

"जेव्हा तो अशा स्त्रियांना बॅगेतून काढून ती चोळी दाखवतो, तेव्हा त्या स्त्रिया "ही माझी नाही" असे लगेच का सांगत नाहीत, हा प्रश्न मात्र प्रेक्षकांनी विचारू नये !"

नायक वयस्कर असला तरी विवाहोत्सुक असतो हे आधीच्या प्रसंगावरून स्पष्ट होते. कागदोपत्री हा ‘जर्मन’ चित्रपट आहे. उत्तर जर्मनीत लग्नाच्या आदल्या रात्री होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे 'ब्रम्हचर्य' (Bachelorhood/Bachelorette) संपुष्टात येत असल्याची घोषणा/प्रतीक म्हणून वराची पॅन्ट किंवा वधूची 'ब्रा' जाळण्याची प्रथा आहे. वेगवेगळ्या स्त्रियांकडुन त्याला मिळणारे वेगवेगळे प्रतिसाद बघता जर्मनीत (किंवा अझरबैजानमध्ये) विवाहोत्सुकाने प्रपोज करण्यासाठीही अशाच 'ब्रा'शी संबंधित एखाद्या प्रथेचा संदर्भ आहे का ते तपासावे लागेल 😀

असो... एका चांगल्या चित्रपटाची ओळख करून दिलीत त्यासाठी धन्यवाद 🙏
(सुरुवातीची २० मिनिटे नॉर्मल स्पीड वर पाहताना चित्रपट थोडा संथ वाटल्याने स्पीड १.२५ करून पाहिला)

कुमार१'s picture

18 May 2023 - 7:51 pm | कुमार१

माहितीपूर्ण व रंजक प्रतिसाद आवडला.

वराची पॅन्ट किंवा वधूची 'ब्रा' जाळण्याची प्रथा आहे.

ही प्रथा नव्यानेच समजली मजेशीर आहे खरे !

टर्मीनेटर's picture

19 May 2023 - 10:28 am | टर्मीनेटर

.vcontainer {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}

.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}

वरच्या प्रतिसादात मी उल्लेख केलेला 'पुष्पक' हा १९८७ सालचा कमल हसन आणि अमलाचा 'ब्लॅक कॉमेडी' प्रकारचा चित्रपट तुम्ही पाहीला आहे का? नसेल पाहीला तर जरुर पहा, युट्युबवर आहे. 'The Bra' प्रमाणेच हा सायलेंट चित्रपटही तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे.

'पुष्पक'

कुमार१'s picture

19 May 2023 - 10:35 am | कुमार१

पुष्पक माझा बघायचा राहून गेलेला आहे. सवडीने नक्की पाहतो !
दरम्यान मला एक शंका आहे :

जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला ( bra ; जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते?
निव्वळ दिग्दर्शक / कलाकार किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली त्या भाषेत आहे म्हणून?

खरंतर निर्भाषिक अशी नोंद व्हायला व्हावी.

कुमार१'s picture

19 May 2023 - 10:35 am | कुमार१

पुष्पक माझा बघायचा राहून गेलेला आहे. सवडीने नक्की पाहतो !
दरम्यान मला एक शंका आहे :

जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला ( bra ; जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते?
निव्वळ दिग्दर्शक / कलाकार किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली त्या भाषेत आहे म्हणून?

खरंतर निर्भाषिक अशी नोंद व्हायला व्हावी.

टर्मीनेटर's picture

19 May 2023 - 10:57 am | टर्मीनेटर

जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला ( bra ; जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते?

चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडुन प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्यातली पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे चित्रपटाची पटकथा! चित्रपटाची पटकथा ज्या भाषेत बोर्डाकडे पाठवली असेल ती त्या चित्रपटाची 'अधिकृत भाषा'. त्यामुळे सायलेंट चित्रपट असला तरी त्याची 'निर्भाषिक' अशी नोंद होऊ शकत नाही. दिग्दर्शक / कलाकार किंवा चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली वगैरे दुय्यम गोष्टी आहेत, त्या अनेक भाषांमध्येही दाखवल्या जाउ शकतात, उदा. अनेक हिन्दी चित्रपटांत ह्या गोष्टी 'हिंदी', 'इंग्रजी' आणि 'उर्दु' पैकी एक, दोन किंवा ह्या तीनही भाषांमध्ये दाखवल्या जातात.

कुमार१'s picture

19 May 2023 - 11:05 am | कुमार१

चित्रपटाची पटकथा ज्या भाषेत बोर्डाकडे पाठवली असेल ती त्या चित्रपटाची 'अधिकृत भाषा'.

अगदी योग्य मुद्दा ! आता समजले.

रच्याकने,
द ब्रा मध्ये काही ओरडण्याचे आवाज आहेत असे वर्णन मी इतरत्र वाचले. कुणाला ते युट्युबवरील आवृत्तीत ऐकू आले का ?

द ब्रा मध्ये काही ओरडण्याचे आवाज आहेत असे वर्णन मी इतरत्र वाचले. कुणाला ते युट्युबवरील आवृत्तीत ऐकू आले का ?

असावेत! पण ते पार्श्वसंगीतात मिसळुन गेल्याने तितक्या प्रकर्षाने जाणवले नसावेत. तसे तर एक अगदी छोटेसे गाणेही आहे की! नायकाच्या निवृत्ती नंतर पाच-सहा लोकांच्या उपस्थितीत सेंडऑफ चा छोटासा कार्यक्रम पार पडल्यावर तो जेव्हा रेल्वे रुळांवरून चालत असतो तेव्हा रेल्वेलाइनच्या बाजूला उभ्या असलेल्या सफाई कर्मचारी महिला त्याच्यासाठी गाणे म्हणत असतात तो प्रसंग. आठवला का 😀

कुमार१'s picture

19 May 2023 - 11:37 am | कुमार१

गाणे म्हणत असतात तो प्रसंग. आठवला का ?

होय, आता युट्युबवर जाऊन खात्री करून घेतली. 35. 57 या बिंदूवर ते गाणे आहे.

राघव's picture

19 May 2023 - 2:46 pm | राघव

भारी ओळख! बघायला हवा!! :-)

श्रीगुरुजी's picture

19 May 2023 - 5:56 pm | श्रीगुरुजी

आजच पाहिला. खूप मजेशीर आहे. अर्थात पुष्पक खूपच भारी आहे. त्यातील खोपडी (समीर कक्कर) अनेकदा प्रत्यक्ष भेटल्याने पुष्पक जास्त चांगला वाठत असावा. समीर कक्कर एक दीड महिन्यांंपूर्वीच गेला.

कुमार१'s picture

19 May 2023 - 6:17 pm | कुमार१

इथली चर्चा वाचून मी आज पुष्पक बघायला घेतला. परंतु पहिल्या दोन मिनिटातच लक्षात आले की, अरे हा आपण हा पूर्वी पाहिलेला आहे !
अर्थात आता पूर्ण कथा जाम आठवत नाही.

चित्रपटाच्या सुरुवातीला ती झाडणारी बाई ‘ज्या प्रकारे’ कॅमेऱ्याने टिपली आहे ती केवळ भन्नाट आहे. ते दृश्य स्मरणशक्तीत अगदी रुतलेले आहे !! 🙂

आग्या१९९०'s picture

19 May 2023 - 7:50 pm | आग्या१९९०

पुष्पकमधील टिनू आनंदचा आईस बॉक्स आणि कमल हसनचा " गिफ्ट बॉक्स " विसरणे अशक्य.

Nitin Palkar's picture

19 May 2023 - 8:18 pm | Nitin Palkar

उत्सुकता चाळवलीय .. लवकरच बघेन.

मस्त खुसखुशीत लेख आवडला. 'सायलेन्ट मूव्ही' नावाचा एक विनोदी चित्रपट ७०च्या दशकात आला होता. तो खरोखरच मूकपट होता. 'नो' हा एकच शब्द त्या चित्रपटात उच्चारला गेला होता. त्यात एक वाह्यात विनोदी प्रवेश होता. पुरुषी विनोद होता हा. त्यात काय झाले याचा अर्थ जेव्हा मी माझ्यासोबतच्या मित्राला सांगितला तेव्हा तो कित्येक मिनिटे हसत होता हे आठवले. अशीच खसखस नंतरही प्रेक्षकात सुरू होती. ही छान आठवण जागृत केल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. लेख आवडला हेवेसांनल.

कुमार१'s picture

27 May 2023 - 4:16 pm | कुमार१

धन्यवाद हो !
बऱ्याच दिवसांनी तुम्ही मौनव्रत सोडून सक्रिय झाल्याचे पाहून आनंद वाटला.

'सायलेन्ट मूव्ही' नावाचा एक विनोदी

हा शोधायला पाहिजे. युट्युबवर तरी दिसत नाही