कलासक्त, संगीतप्रेमी, सौंदर्यासक्त रसिकांना 'बघण्याजोगे' बरेच काही... (भाग १)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
13 Mar 2023 - 4:30 am

काही काळापासून चित्रकला, संगीत, प्राचीन वास्तुरचना वगैरेंबद्दल यूट्यूबवर अनेक उत्तमोत्तम विडियो मी बघत आलेलो आहे. रसिकांकांसाठी ते हळूहळू इथे देत रहाण्यासाठी हा धागाप्रपंच करीत आहे. रसिक मिपाकरांनी त्यात आपापली भर टाकत राहून हा धागा समृद्ध करत रहावे, अशी विनंती करतो.
सुरुवात पंडित मुकुल शिवपुत्र यांनी गायलेल्या 'जमुना किनारे मेरो गाव' या पारंपारिक रचनेने (ठुमरी ?) करतो. पं. कुमार गंधर्व,
प्रभा अत्रे, राहुल/वसंतराव देशपांडे इ. विविध दिग्गज गायक-गायिकांचे, तसेच खेडोपाडीच्या अनेक लोक-कलावंतांचे (या रचनेचे) संगीत-नृत्य विडियो विपुल प्रमाणात उपलब्ध असून त्यातले अनेक बघितल्यावर मला सर्वात जास्त पंडित मुकुल शिवपुत्र यांचे गायन भावले.

हिंदी चित्रपट-संगीतापैकी एकः
जबरदस्त कोंगो वादन आणि मोठ्या वाद्यवृंदासह 'संपदा गोस्वामी' ने अप्रतिम गायलेले - दिलबर... दिलबर .. ('सिर्फ तुम'- नदीम-श्रवण) हे गीत :

चित्रकला:

.
Greek Girls Picking up Pebbles by the Sea इ.स. १८७१
(चित्रकारः Sir. Frederic Leighton 1830 – 1896)

.
Toilette der Venus १६१४/१५. चित्रकारः Peter Paul Rubens १५७०-१६४०)

वरील चित्रकार रुबेन्स याच्याविषयी एक उत्कृष्ट माहितीपटः
Rubens: Why Is He So Misunderstood? (Waldemar Januszczak Documentary)

(क्रमशः)

संस्कृतीकलासंगीतआस्वादशिफारसमाहितीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Mar 2023 - 6:24 pm | कंजूस

कलासक्त,सौंदर्यासाठी वगैरे फार मोठी विशेषणं आहेत माझ्यासाठी.

@कंजूसः या धाग्यात हळूहळू विविध क्षेत्रातील रसिक, जाणकार मिपाकरांकडून भर पडत जाऊन अनेक प्रेक्षणीय, श्रवणीय गोष्टींचा एक उत्तम संग्रह निर्माण होईल, अशी आशा आहे. प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

कंजूस's picture

13 Mar 2023 - 7:21 pm | कंजूस

मिपाकरांकडून भर पडत जाऊन . . .
पुढे विडिओ प्लेअरस वाढत गेले की धागा लवकर 'load' होणार नाही म्हणून त्यांच्या लिंका द्याव्यात.

भरतनाट्यम या प्रकाराची आवड असल्यास ,हे युट्युब channel सुंदर आहेत.
Radhakalpa Dance Academy
https://youtu.be/aSorsMy6SxY

Dr.Janaki Rangrajan
https://youtu.be/xdtPusT-F7Q

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Mar 2023 - 12:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

तबल्याची आवड असल्यास हे काही चॅनल देतो

https://www.youtube.com/@tablaofficial7803

गाण्यासाठी

https://www.youtube.com/@darbarfestival

अजुन एक

https://www.youtube.com/@naamvaibhavfestival9322

दिसायली सोपी पण काढायला कठीण पेंटिंग

https://www.youtube.com/@jayleepainting

चित्रे सादर करून रसिकांची वाहवा मिळविली आहेत.

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2023 - 1:08 pm | चौथा कोनाडा

दिलबर आणि पेंटीग्ज आवडली

शेवटच्या व्हीडिओ ला "Age-restricted content"

काय असावे बरे ह्यात ?

चित्रगुप्त's picture

1 Apr 2023 - 8:55 am | चित्रगुप्त

Peter Paul Rubens (१५७७-१६४०) हा तात्कालीन युरोपातील महत्वाचा, प्रभावशाली चित्रकार होता. याच्या बर्‍याच चित्रात नग्नदेहाचे चित्रण उत्तम प्रकारे केलेले आढळते, पाश्चात्त्य देशात वाढणारी मुले अगदी लहानपणापासून विविध संग्रहालयात शाळेकडून जात असतात त्यामुळे त्यांना कलेतील नग्नतेचे वावडे नसले तरी सर्व देशात अशी परिस्थिती नसल्याने यूट्यूबने तसे केलेले असावे. लॉगिन करून हा व्हिडियो बघता येईल.
Waldemar Januszczak याचे सर्वच माहितीपट खूपच अभ्यासपूर्ण, रंजक आणि त्या त्या विषयाचे सखोल दर्शन घडवणारे असतात. कलाप्रेमींनी अवश्य बघावेत.

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2023 - 5:36 pm | चौथा कोनाडा

कलेतील नग्नतेचे वावडे नसले तरी सर्व देशात अशी परिस्थिती नसल्याने यूट्यूबने तसे केलेले असावे.

ओके.

सुधीर कांदळकर's picture

1 Apr 2023 - 11:39 am | सुधीर कांदळकर

वरकरणी सामान्य वाटणार्‍या एखाद्या शिल्पावर एखाद्या नवीनच, अनोख्या, वेगळ्या कोनातून प्रकाश पडावा आणि ते शिल्प अद्भुत, अलौकिक सुंदर दिसू लागावे तसे कोणतीही रचना मुकुलांच्या कंठातून बाहेर पडतांना अलौकिक, अद्भुत होऊन जाते. विलंबित ख्यालात देखील लयीची प्रत्येक मात्रा खणखणीत मोजून बंदीश पेश करणारा हा शापित गंधर्व माझा सर्वात आवडता रागदारी गायक आहे.

दिलबर ध्वनीमुद्रण छान आहे. विंड ब्रासमधली अरबी पद्धतीची लकेर मस्त जमली आहे.

ग्रीक पेबल्स चित्र जिवंत हे विशेषण अपुरे पडेल एवढे जिवंत भासते. वार्‍यामुळे मुळे फडकणारी वस्त्रे आत्ता कमीजास्त फडकतील असे वाटते. हे चित्रात उतरवणे कसे काय जमू शकते हे एक आश्चर्यच आहे.

दुसर्‍या चित्रातील आरशातून दिसणारा चेहरा ही कल्पना आणि आपल्याला एकूण दृश्य इतक्या वेगळ्या कोनातून दिसणे अनोखेच आहे.

रामेंनी दिलेले तबल्याचे आणि भक्तीताईंनी दिलेले भरतनाट्यमचे दुवे ऐकेन आणि पाहीनच.

अफलातून धग्याबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

संपदा गोस्वामीने यायलेल्या 'दिलबर' गाण्यात कोंगो वाजवणारे श्री. अनुपम घटक यांची मुलाखत आणि सादरीकरण 'स्मृतिगंध' मधील 'साजतरंग' या कार्यक्रमाच्या भाग-२३ मधे बघता येईल. ही संपूर्ण मालिकाच अद्भुत आहे.
https://www.youtube.com/watch?v=KI7gpE6aVC4

सुधीर कांदळकर's picture

3 Apr 2023 - 8:33 am | सुधीर कांदळकर

मालिकेचे एकूण एक ४२ ही भाग अद्भुत आहेत. अजूनही कोणी खास रसिक भेटल्यास आम्ही या मालिकेबद्दल बोलतो. या मालिकेत नसलेल्या इनॉक डॅनिअल आणि वॉन शिप्ले यांच्याही आठवणी निघतात.

पुन्हा एकदा धन्यवाद.