‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
18 May 2023 - 3:40 pm

जर तुम्हांला बुद्धीला ताण द्यायला आवडतं असेल.आऊट ऑफ बॉक्स साय –फाय सिनेमा आवडतं असेल तर ‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’ हा सिनेमा तुमच्यासाठी आहे.

मी हा सिनेमा बघण्याचे कारण म्हणजे सात ऑस्कर या सिनेमाने खिशात घातले आहे.तेव्हा पाहायला सुरुवात केलीच.

A

सुरुवातीलाच कुरकुर करणारे,धोबी व्यवसाय असणारे पालक आणि एकुलती एक मुलगी जी गे आहे भेटतात.शेवट पर्यंत असच काहीतरी संथ चालेल तर असे वाटते.पण मग टेक्स ऑफीसमध्ये वेमोंडमुळे(नायक म्हणता येईल) जो काही धुमाकूळ सुरु होतो त्याने एवेलीन(नायिका)चे जसे डोकं गरगरत तसच आपलपण गरगरायला लागते.

तर पहिला भाग ‘एव्हरीथिंग’ सुरु होतो.तुम्ही Matrix पाहिला आहे का ? तर त्या सारखाच आपला वावर अनेक समांतर जगात असतो.प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका ,वावर वेगवेगळा पण इथे डेस्टिनी एकच आहे ...मृत्यु ,तो तुम्हाला येतोच.एवेलीनला अनेक समांतर जगाचे दर्शन देऊन त्या त्या जगातली तिची ताकद तिला मिळवून लढायचं आहे ,कोणा विरुद्ध तर जोबू (शत्रू) ती तिची मुलगी ‘जॉय’ च दाखवली आहे.

एवेलीनचे सिनेमा नायिका,शेफ,सिंगर,मोठ्या बोटाची बाई असे काही समांतर रूप आहेत.आता ही रूप का आली तर एवेलीनचं एक दु:ख आहे, ‘मी जर वडिलांविरुद्ध लग्नाचा निर्णय घेतला नसता तर माझ आयुष्य खूप वेगळे असले असते” असे तिला वाटते.हे लग्न नसत तर ती काय असती याचे हे अनेक समांतर जग ,त्यात तिचा शत्रू जोबू तिला मारणार असतो.एवेलीन मरते.पण परत जिवंत होते वेमोंडवर तिला विश्वास वाटू लागतो.

दुसरा भाग सुरु होतो ‘एव्हेरीव्हेअर यातही आता एवेलीन नशीब बदलायला त्या त्या समांतर लोकांची मदत घेवू पाहते.जरा कॉम्प्लेक्स घटना दिसतात.जॉय उर्फ जोबू आईला हे सगळ सोडून चाल दूर असं काहीतरी सांगत असते.ती तीच ऐकणारच पण वेमोंड तिला रोखतो ,सरतेशेवटी जगात प्रेमाहून मोठ काहीच नाही याचा तिला साक्षात्कार होतो.सर्वांनी प्रेमाने वागावे ,जगाला प्रेम अर्पावे असे ती सांगते.

जॉय ऐकत नाही तिला ती खूप समजावते जॉय परत येते.

मग सुरु होतो तिसरा भाग ‘ऑल at वन्स’ म्हणजे एवढे सगळ महाभारत न होता एवेलीन लग्नाचा निर्णय योग्य आहे-वेमोंडच सगळ्यात जवळचा आहे हे सगळ मान्य /accept करते तेव्हा ‘जॉय’ ही बरोबर असतो आणि सुखरूपपणे कुटुंब यशस्वी tax भरते.एकत्र नांदतात.

तर यात ‘जॉय’ हे पात्र आनंदाचे रूपक दाखवले आहे.आयुष्यात घेतलेल्या निर्णयांची आनंदाने जबाबदारी घेतल्याने ‘जॉय’ दूर जात नाही.

-भक्ती

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

22 May 2023 - 7:35 am | कुमार१

छान परिचय.

Bhakti's picture

22 May 2023 - 1:55 pm | Bhakti

धन्यवाद कुमारजी.

कानडाऊ योगेशु's picture

22 May 2023 - 2:16 pm | कानडाऊ योगेशु

कुठे पाहायला मिळेल?

Bhakti's picture

22 May 2023 - 2:59 pm | Bhakti

मी सोनी लिव (Soni LIV) वर पाहिला.

प्रचेतस's picture

23 May 2023 - 9:03 pm | प्रचेतस

परिचय आवडला मात्र ऑस्कर मिळालेले चित्रपट अपवाद वगळता रटाळ आणि कंटाळवाणे असतात असा अनुभव आहे

तुषार काळभोर's picture

23 May 2023 - 9:45 pm | तुषार काळभोर

एकूण हा चित्रपट डोक्यावरून जाईल असे वाटले.

अवांतर : वीस वर्षांपूर्वी राहून गेलेली एक गोष्ट गेल्या आठवड्यात केली. फेलोशिप ऑफ द रिंग पाहिला! निव्वळ भव्यता! तृप्त झालो!!

Bhakti's picture

23 May 2023 - 10:01 pm | Bhakti

जाऊ शकतो डोक्यावरून!

Bhakti's picture

23 May 2023 - 10:00 pm | Bhakti

हा हा ,जरा सहमत!
हा सिनेमा ज्यांना समजला त्यांनाही ओस्कर मिळाला पाहिजे असं मिम पाहिला.चला मला ओस्कर मिळायला हरकत नाही ;):)