शान्तिपुर्ण अपमृत्यु
ये उन दिनो कि बात है, जेव्हा नुकतच मिसरूड फुटायला लागली होती. विद्यालयातून महाविद्यालयात जाण्याचे दिवस सुरु झाले होते. सक्काळी उठून पहिले लेक्चर गाठणे आणि मग इतर महाविद्यालयिन कर्तव्ये आटपून जेव्हा मी आमच्या स्थानिक गोतावाळ्यासह स्टेशनच्या बस डेपोला यायचो तेव्हा दुपारच्या अधिवेशानातल्या मैना - बकुळांची हि भलीमोठी गर्दी आमच्या सोबतीला असे. (आमच्याकडे त्या काळापासून फक्त महिलांचे असे एक महाविद्यालय आहे.) त्या भर गर्दीत देखील आपली आवडती खिडकी मिळत नाही तो पर्यंत येणारी बस सोडायची चंगळ आम्ही करत असू. कोणालाही खर वाटणार नाही पण बेस्टची “झिरो वेटिंग बस सेवा” हा प्रकार आमची मदत करायचा.