प्रकटन
विनिपेग डायरीज-३
क्रिसकडे रहायची सोय झाल्यामुळे एक मोठा प्रश्न सुटला होता. आता ऑफिसमध्ये कामाकडे लक्ष देणे भाग होते. खरेतर मला घाईने विनिपेगहुन इथे बोलावण्याचे कारणच ते होते. रेव्हेन्युच्या हिशोबाने आमच्या प्रोजेक्ट्चा एक पंचमांश हिस्सा असलेला टेल्को म्हणजे टेलिफोनी किंवा व्हॉइसचा जो भाग होता त्याचा क्लायंटच्या टीमकडून हॅन्ड ओव्हर घ्यायचा होता. आणि त्याची कोणालाच नीट कल्पना नव्हती. खरेतर मलासुद्धा....
का ? का? का?
मध्यमवर्गीय कुटुंबात मिळणाऱ्या थोड्या फार रिकाम्या वेळात स्त्रीवर्ग काहीशा नाईलाजाने किंवा काहीवेळा आवडीने टीव्ही वरच्या कौटुंबिक मराठी मालिका बघतो. त्यांनाही त्यातील काही गोष्टी खटकतात. पण त्या जाने दो म्हणून सोडून देतात. मीही वृद्धावस्थेत रिकामटेकडी झाल्याने ह्या मालिका बघते. मलाही काही गोष्टी खटकतात त्या अशा-
१) प्रत्येक मालिकेत एक रडकी नायिका असतेच. ती सारखी रडतच असते. तिला कुणीतरी छळत असतं. काही वेळा अनेक जण तिला (फारसं महत्त्वाचं कारण नसताना)छळत असतात.
२) कुठलीतरी एक सत्य गोष्ट कुणीतरी,कुणापासून तरी लपवत असतं आणि त्यावर एक वर्षभर मालिका चालते.
‘पंजाब मेल’
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती.
शशक का चषक
तो एक बिचारा.......
"तुम्ही मुलखाचे वेंधळेआहात,
काहीच कसं जमत नाही हो तुम्हाला",
इत्यादी विशेषणे त्याच्या पाचवीला पुजलेली. अर्थात हे त्याच्या पत्नीचे मत.
हे काही नवीन नव्हते.लहानपणा पासूनच याची सवय होती त्याला.
आई वडिलांच्या लेखी तो एक सामान्य मुलगा.
शिक्षक सुद्धा, "तु राहू दे ,तुला जमणार नाही", एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचे उदाहरण देत "काहीतरी शिका",आसा टोमणा मारायचे.
पुढे कशीबशी एक नोकरी मीळाली. कार्यालयात काहीच वेगळे घडले नाही.नोकरी म्हणून छोकरी.
चिंता नक्को, हम हइ इद्दर!!"
"चिंता नक्को. हम हइ इद्दर!"
अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:।
पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः।।
- कालिदास (कुमारसम्भव १/१)
आजवर बघितलेला हिमालय हा कुठेतरी काव्यात वाचलेला, सिनेमांमधून पाहिलेला, अद्भुतरम्य तरीही सुंदर. निळ्या नभाला शोभायमान करणार्या पांढर्याशुभ्र सानुंचा. निळ्याशार पाण्याच्या सरोवरांचा, असंख्य जलस्रोतांचा, अगदी गुल़जारच्या "आओ हाथ पकड़ लो मेरा, पसलियोंपे पांव रखो, ऊपर आ जाओ, आओ ठीक से चेहरा तो देखूं तुम्हारा,कैसे लगते हो।" अश्या ओळींनी अगदी आजोबांच्या प्रेमाने जवळ बोलावणारा.
व्यायाम: आय डोन्ट केअर
व्यायाम आणि डाएट (विविध प्रकारची) याबद्दल इतक्यांकडून,इतक्यांदा, इतकं लिहिलं गेलंय की आता ही वृद्धा आणखी नवीन काय लिहिणार असं तुम्हांला वाटेल. पण जसा/जशी प्रत्येकजण प्रेमात पडतो/पडते. काहीजणं तर अनेकदा प्रेमात पडतात, आणि त्या प्रत्येकाला आपलं प्रेम वेगळं, नव्या नवलाईचे, नवंकोरं आणि दुसऱ्याला"सांगण्यासारखं"वाटतं तसंच हे आहे. मलाही माझ्या व्यायामाबद्दल नव्यानं सांगावंसं वाटतं.
खरं सांगायचं तर मी जन्मभर व्यायाम करत आलेली आहे. पण माझ्या वजनाचा आणि व्यायामाचा फारसा काही संबंध नाही हे माझ्या पक्कं लक्षात आलेलं आहे. वजन यदृच्छेनं वाढतं आणि कमी होतं.
विनिपेग डायरीज-२
मागचा भाग--
मागच्या भागात शेवटी समाप्त असे लिहिले होते. पण विचार करता करता असे लक्षात आले की अजूनही सांगण्यासारखे बरेच काही आहे डोक्यात. शिवाय काही वाचकांनी पुढचा भाग टाकायची सूचना केली होतीच. तेव्हा सर्वांचा मान ठेवून हा भाग टंकायला घेतला.
भोंगा - मराठी चित्रपट
गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशातही गाजत असलेल्या मशिदीवरील भोंगा या विषयाच्या निमित्ताने "भोंगा" या चित्रपटाचा अल्पपरिचय.
काही महिन्यांपुर्वी झी ५ अॅपवर मी हा चित्रपट पाहिला. शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे असे विकीवरुन समजते.
चित्रपटाची कथा मशिदीवरील भोंगा, भोंग्यावरुन दिली जाणारी अजान या विषयाभोवती गुंफलेली आहे.
अपरिचित पोलो
भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत.