तो एक बिचारा.......
"तुम्ही मुलखाचे वेंधळेआहात,
काहीच कसं जमत नाही हो तुम्हाला",
इत्यादी विशेषणे त्याच्या पाचवीला पुजलेली. अर्थात हे त्याच्या पत्नीचे मत.
हे काही नवीन नव्हते.लहानपणा पासूनच याची सवय होती त्याला.
आई वडिलांच्या लेखी तो एक सामान्य मुलगा.
शिक्षक सुद्धा, "तु राहू दे ,तुला जमणार नाही", एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचे उदाहरण देत "काहीतरी शिका",आसा टोमणा मारायचे.
पुढे कशीबशी एक नोकरी मीळाली. कार्यालयात काहीच वेगळे घडले नाही.नोकरी म्हणून छोकरी.
आयुष्यात तो एकच दिवस ,ज्या दिवशी लोकांच्या मते "सर्व अवगुणसंपन्न", असा तो "सर्व गुणसपंन्न" म्हणून ओळखला गेला. किंबहुना त्याला उगाचच भास झाला असावा.
सकाळ संध्याकाळच्या लोकलच्या भाऊ गर्दीत तो अपसुकच धक्के खात स्टेशनाच्या आत बाहेर येत जात होता.
निसर्ग चक्र, बाकी काय , मुले झाली,नातवंडेही झाली. आयुष्यात अघटित आसे काहीच घडले नाही.आता निवांत घरी.
"आराध्या" त्याची लाडकी नात, जीला तो प्रेमाने "बबन" आसा बिना काना मात्रेच्या नावाने हाक मारायचा.तीच्या लेखी तो "माय नानू स्ट्रांगेस्ट".
ऐके दिवशी त्याची नात शाळेतून उड्या मारत घरी आली, म्हणाली," आई हे बघ,मला गाण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मीळाले".
आश्चर्यचकित आई ने विचारले " गाणं कुणी शिकवले आणी कुठले म्हटंलेस"?
" आजोबांनी"!!!!
"नाही का ते संदिप खरे यांचे, आयुष्यावर बोलू काही मधले"!!!!!
" असतो जर का भाजी
तर भेंडी झालो असतो"
तो नेहमीप्रमाणेच शांत,त्याच्या बायकोला त्याच्या डोळ्यात उगाचच उद्गारवाचक चिन्ह दिसत होते.......
____________________________________________________
कथा शंभर शब्दात बसवता येत नव्हती, " आपल्याला जमणार नाही,कशाला उगाच नस्त्या फंदात पडा",म्हणत नाद सोडून दिला.
का कुणास ठाउक, उगाचच,आर के नारायणांच्या "काॅमन मॅन" ची आठवण आली.
प्रतिक्रिया
3 Jun 2022 - 12:16 pm | श्वेता व्यास
छान लघुकथा आहे, आवडली.
3 Jun 2022 - 2:03 pm | Bhakti
छान.
4 Jun 2022 - 10:24 am | कर्नलतपस्वी
श्वेता, भक्ती प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
4 Jun 2022 - 11:19 am | ज्ञानोबाचे पैजार
आई वडिलांच्या मते तो सर्वसामान्य मुलगा होता.
शिक्षक सुद्धा, त्याला "तू सोड, तुला जमणार नाही", असे टोमणे मारायचे.
"मुलखाचे वेंधळे आहात" हे पत्नीचे मत.
कशीबशी नोकरी मिळाली, नोकरी म्हणून छोकरी.
लोकलच्या गर्दीत धक्के खात आयुष्य गेले.
निसर्गचक्र म्हणून, मुले नातवंडे झाली. आयुष्यात विशेष काही घडलेच नाही.
आता निवांत घरी.
"आराध्या" त्याची नात, त्याचा जीव की प्राण, एकेदिवशी शाळेतून उड्या मारतच आली,
"मला गाण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले".
आश्चर्यचकित आईने विचारले “गाणं? कुठले? कुणी शिकवले?”
"आजोबांनी"!!!!
"आयुष्यावर बोलू काही मधले.... मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो"
तो नेहमीप्रमाणे शांत, बायकोला मात्र त्याच्या डोळ्यात उगाच उद्गारवाचक चिन्ह दिसत होते.......
०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
बघा बरं कशी वाटते आहे आता?
पैजाराबुवा,
4 Jun 2022 - 1:30 pm | कर्नलतपस्वी
खरे तर या लघुकथेचे शिर्षक आगोदर सुचले.
नुकतेच शशक स्पर्धेचे निकाल जाहीर झाले व मला तृतीय क्रमांकाचा चषक मीळाला. म्हणून " शशक का चषक ". अनपेक्षितच!
एक आणखी वाक्य डोक्यात पिंगा घालत होते. "सगळे बाबा(नवरे) एक सारखे" थोडक्यात गाढव.
नुकतीच अमेरिका वारी झाली, जेटलॅगमुळे रात्री झोप येत नव्हती. नायगरा फाॅल्स ची मंत्रमुग्ध करणारी दृष्ये डोळ्या समोर तरंगत होती.
त्याच वेळेस ही लघुकथा सुचली.
आपण सुचवलेली रचना ही लठ्ठपणा कमी झालेल्या सुंदर ललने सारखी.
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
7 Jun 2022 - 12:04 pm | नगरी
मस्त जमलंय
7 Jun 2022 - 12:26 pm | वामन देशमुख
छान वाटली न-शशक.
8 Jun 2022 - 12:28 pm | कर्नलतपस्वी
आभार.
8 Jun 2022 - 5:08 pm | चौथा कोनाडा
मस्तच !
11 Jun 2022 - 6:33 pm | चित्रगुप्त
कथा आवडली, भावली आणि खोलवर पहुचली.
छोट्याश्या कथेत मोठा आशय सामावलेला आहे.
11 Jun 2022 - 8:00 pm | कर्नलतपस्वी
सर्वश्री वामन देशमुख, नगरी,चौको ,चित्रगुप्त आणी वाचकवर्ग सर्वांचेच मनापासून आभार.