मदत हवी आहे - प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे खरेखुरे घर बांधण्यासंदर्भात..
नमस्कार मिपाकर्स..
गेले कांही वर्षे सायकल चालवत असल्याने अनेक व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य आहे.. त्यातील एका ग्रुपवर एक मदत संदेश येऊन धडकला.
घर बांधण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरलेल्या बाटल्या हव्या आहेत.
उत्सुकता चाळवली म्हणून या प्रोजेक्टची अधिक माहिती घेतली आणि बांधकाम सुरू आहे तेथे भेटही देऊन आलो.
हा प्रोजेक्ट करणार्या अवालियाचे नांव आहे राजेंद्र इनामदार, सिंहगडाच्या पायथ्याशी एके ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे.
दोन कामगार बाटल्या भरताना..