पवनचक्की.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
25 Aug 2017 - 6:03 pm

अन्न,वस्त्र, निवार्या नंतर जर मानवाची चौथी गरज असेल तर ती म्हणजे ऊर्जा. भारत हा जगातील तीसरा सर्वात मोठा विद्युत ऊर्जा निर्माण करणारा व चौथा सर्वात मोठा ऊर्जेचा वापर करणारा देश आहे.
देशात एकुण ऊत्पादन क्षमतेत पवनऊर्जेचा वाटा जवळपास 10% आहे. भारतात पवनऊर्जेची सुरूवात 1990 च्या जवळपास झाली.
.
भारताचा जगात पवनऊर्जा निर्मीतीत पाचवा क्रमांक लागतो. सुझलाँन ही भारतातील पवनऊर्जा निर्मीती क्षेत्रातील पहीली व सर्वात मोठी कंपनी. तीचे अध्यक्ष तुलसी भाई तंटी यांनी भारतात पवनऊर्जेची बीजे रोवली. असं म्हणतात की तुलसी तंटी हे आधी कापडाचे व्यापारी होते. त्यांची अहमदाबादेत कपड्यांची मील होती. ते विदेशात फिरायला गेले असतांना त्यांनी तीथे पवनचक्क्या पाहून स्वत: काही व काही त्यांच्या मित्रांनी पवनचक्क्या खरेदी केल्या. पण नंतर त्या कंपनीला ईतक्या दुरून त्यांच मेंटेनन्स करण जमेना म्हणून त्यांनी तुलसी भाईंना स्वतः मेंटेनंस करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ह्याबाबत माहिती जमा करून स्वतः ह्या व्यवसायात ऊतरण्याचा निर्णय घेतला. कपडा मील विकूण ते ह्या व्यवसायात ऊतरले. त्यांनी कंपनीचं नाव सुझलाँन ठेवण्याच हेतु म्हणजे ग्राहक आकर्षित करणे. हे नाव थोडं जापनीज वा कोरीयण वाटतं. सुझलाँन जेव्हा 1993 च्या आसपास ह्या क्षेत्रात आली तेव्हा तीला राण मोकळं होतं. कोणीही मोठा प्रतिस्पर्धी नसल्याने व भारत सरकारच्या ह्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी भरमसाठ योजना असल्याने सुझलाँन लवकरच फोफावली.
पवनऊर्जा ही निसर्गासाठी सर्वात कमी त्रासदायक. हवेशिवाय कोणताही ईनपुट नाही. व वातावरणात कोणताही गँस ऊत्सर्जीत होत नाही. त्यामुळे शुन्य प्रदुषण.
"हवेच्या गतीज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत व यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर" (Kinetic energy of wind is converted into mechanical energy and then mechanical energy is converted in to electrical energy) ह्या तत्वावर पवनचक्की चालते. जीथे हवेचा वेग सरासरी 7~10 मीटर प्रती सेकंद व त्याच्यावर असतो. त्याच ठिकाणी पवनचक्क्या लागू शकतात.
भारतातल्या तामिलनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश,केरळ ह्या राज्यांत पवनचक्कया आहेत. महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापुर, अहमदनगर, पुणे, नाशिक. ऊत्तरेत धुळे,नंदूरबार ह्या जिल्ह्यांत पवनचक्कया लावण्यासाठी चांगले हवामान आहे. पवनचक्की लावण्यासाठी आधी सरकार हवा मोजण्याचं यंत्र चांगली हवा असलेल्या ठिकाणी दोन ते तीन वर्षासाठी लावते पवनचक्की लावण्यासाठी हवेचा वेग योग्य असेल तर ती माहीती पवनऊर्जा कंपनींना दिली जाते. त्यानंतर कंपन्या स्वतः चे यंत्र लावुन हवा मोजतात. जर त्यांना हवा योग्य वाटली तर तिथे पवनचक्की लावण्यासाठी हालचाली सुरू होतात. त्यानुसार सँटेलाईट द्वारे जमिनीचं नेमकं ठिकाण ठरवलं जातं व पुढे जमीन खरेदी केली जाते. जमीन सरकारी असेल तर सरकार कडून, जर शेतकर्याची असेल तर त्याच्या कडून ती खरेदी केली जाते. कोणत्याही प्रकारच्या भाडेतत्वावर न घेता सरळ खरेदी केली जाते. त्यानंतर तीथे मोठमोठ्या क्रेन्स वापरून पवनचक्की उभी केली जाते.
.
.
पवनचक्की चा आयुष्यकाळ हा विस वर्षांचा असतो. विस वर्षांनंतर पुन्हा त्या जागी नवीन पवनचक्की ऊभी केली जाते. पवनचक्की ची ऊंची त्यांच्या माँडेल वर अवलंबून असते. माँडेल मध्ये 300 कीलोवँट(kwph) प्रती तास पासुन तर 2000 ते 3000(kwph) कीलोवँट प्रती तास पर्यंत कंपनी नुसार अनेक माँडेल्स असतात. 1 कीलोवँट म्हणजे आपल्या घरातील एक युनीट. आपण साधारणतः घरात 300 ते 700 युनीट महीन्याला वापरतो. पवनचक्की एका तासाला 2000 युनीट तयार करते. व ती ऊर्जा त्या त्या राज्य सरकारला ठरवलेल्या दराने जवळपास 4 ₹ ते 6 ₹ युनीट विकली जाते. यावरून आपल्याला ऊत्पादन क्षमतेचा अंदाज येईल. सध्या केंद्र सरकारणे केलेल्या कायद्या नुसार नव्या ऊभ्या राहणार्या पवनचक्क्यांवर 2000 kw च्या खालच्या माँडेल्सवर बंदी आणण्यात आलीय. असं नाही की पवनचक्क्या बाराही महीने चोवीस तास फीरत असतात. साधारणतः एप्रिल ते सप्टेंबर हा सहा महिन्याचा पावसाळी काळं चांगल्या वाहत्या हवेचा असतो. ह्या काळात पवनचक्क्या चांगल ऊत्पादन देतात. एरवी हवा नसल्याने त्या थंड ऊभ्या असतात. ऊत्पादन झालेली ऊर्जा कुठेही साठवणूक न करता सरळ राज्य सरकारच्या ग्रीड ला जोडली जाते. व तीथून तीचं वर्गीकरण होतं. जगात पवनचक्की बनवणार्या(manufacturer) व सेवा(service) देणार्या अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी वेस्टास व जीई ह्या ह्या क्षेत्रातील बाप कंपन्या. पण भारतीय कंपनी सुझलाँन ने देखील अनेक देशांत आपला चांगलाच विस्तार केलाय. भारतीय कंपनीत सध्या सुझलाँन, आयनोक्स विंड ह्या कंपनीज ने चांगलीच मजल मारलीय.
.
पवनचक्की ला नेहमीच तीन पाते असतात. त्याचं कारण 360 भागीले 3 बरोबर 120 ह्या नुसार दोन पात्यांमध्ये 120 अशांचा कोण असतो. तो ह्या साठी की कोणत्याही स्थीतीत एक पातं हवेच्या अँक्टीव भागात असतच. पवनचक्कीची ऊंची 70 ते 110 मीटर असते.
पवनचक्कीचे तीन मुख्य भाग असतात हब ( जीथे तीनही पाते एकत्र येतात.) गीअरबाँक्स व जनीत्र(Generator) हे तीनही भाग ज्यावर ऊभे असतात त्याला शेल म्हणतात. (70 ते 110 मीटर वर्तुळाकार मधुन पोकळ) त्यात वर जाण्यासाठी जागा असते.
गीअर बाँक्स चे काम शाफ्टची चक्रीय गती (RPM) वाढवणे. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेरून पवनचक्की चा एक फेर बघतात. तेव्हा आत 100 फेरे झालेले असतात. तर शाफ्ट प्रचंड वेगाने फीरल्याने जनीत्रात ऊर्जा तयार होते. व ती केबल्स द्वारे वरून खाली येऊन मुख्य वाहिनीला जोडली जाते.
काही कंपनीच्या पवनचक्क्या गीअरबाँक्स विरहीत देखील असतात. व त्या ठीकाणी ऊच्च प्रतीचे जनीत्रे असतात. पवनचक्की चे वैशिष्ट्य म्हणजे हवेची दिशा बदलली तरी पवनचक्की त्या दिशेने आपले मुख फीरवते. त्यामुळे हवेच्या दिशा बदलल्याने पवनचक्कीवर कोणताही परीणाम होत नाही.
आता बघु पवनचक्की ची कींमत
एका पवनचक्की ची कींमत साधारणतः 8 ते 25 कोटी रूपये असते. व ती माँडेल्स नुसार बदलत जाते. पवनचक्की बनवणार्या कंपन्या फक्त बनवण्याच व सेवा देण्याचं काम करतात. पवनचक्की चे मालकं वेगळे असतात. त्यांत टाटा, अदानी, हीरोहोंडा, आदीत्य बिर्ला, गायछाप वाले डी. जे. मालपाणी ह्यांसारखे अनेक मोठमोठे ऊद्योजक अाहेंत. तसेंच नट, नट्या व खेळाडू हे देखील पवनचक्कया खरेदी करतात. मी स्वतः नंदूरबार मध्ये ऐश्वर्या राँय च्या दोन पवनचक्कयांवर काम केलय. त्यांचे वडिलही एकदा नंदुरबारला येऊन गेलेत. ह्या क्षेत्रात गुंतवणूक करणं हे आपल्या सारख्या सामान्य माणसाचं काम नाही. सातार्यातला एक सुझलाँन कंपनीचा प्रकल्प एकेकाळी आशियातील सर्वात मोठा प्रकल्प होता.
पुर्वी केंद्र सरकार ह्या क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसीडी द्यायचं जवळपास 40% पण आता ह्या क्षेत्रात भरपुर गुंतवणूक झाल्याणे सबसीडी बंद करण्यात आलीय. हा व्यावसाय ऊद्योजकांसाठी खुप फायद्याचा आहे त्याच कारण म्हणजे कार्बन क्रेडीट. पवनऊर्जा अपारंपारीक क्षेत्रात येत असल्याने व कोणत्याही प्रकारचा हानिकारक वायु ऊत्सर्जीत होत नसल्याने सरकार ह्यावर कार्बन क्रेडीट देतं.
सरकारचा एक कायदा आहे त्या नुसार कोणताही कारखाना वातावरणात जितक्या प्रमाणात हानीकारक वायु सोडतो. तीतक्या प्रमाणात शुध्द हवा वातावरणात सोडण्याची जबाबदारी कारखानदाराची असते. ह्यासाठी कारखानदार सरकारला झाडे लावण्यासाठी पैसे देतो. त्याला कार्बन क्रेडिट म्हणतात. एक पवनचक्की वर्षाला ऊत्पादनाच्या हिशोबाने 1 कोटी चे कार्बन क्रेडिट देते. ते कार्बन क्रेडिट ऊद्योजक एकतर स्वतः च्या कारखान्यास वापरतात. किंवा मग ईतर ऊद्योजकांना विकतात. ह्यात प्रचंड नफा असतो. एका पवनचक्कीचं वार्षिक ऊत्पन्न जवळपास दोन ते चार कोटी व कार्बन क्रेडिट चे एक ते दीड कोटी वेगळे.
सध्या काळानुरूप तंत्रज्ञानात फार मोठा बदल झालाय. आता समुद्रात तेखील पवनचक्क्या ऊभ्या करण्याचं तंत्रज्ञान भारतात आलयं. विदेशात आधी पासुनच होतं. सध्या भारतात गुजरातच्या समुद्रात पवनचक्क्या ऊभारण सुरू झालय. डेन्मार्क ह्या देशात सर्वात जास्त पवनऊर्जेचा वापर केला जातो. त्या देशात जवळजवळ 80% वीजनिर्मिती पवनचक्क्यांपासुन होते.
.
भारतात ह्या क्षेत्रात सध्या फार मोठी गुंतवणूक सुरूय. व ह्या क्षेत्राचं भविष्य ऊज्वल आहे.

तंत्रलेखमाहिती

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

25 Aug 2017 - 6:16 pm | स्मिता.

पवनचक्की हा शब्द दुसरी-तिसरीत असताना पहिल्यांदा कळला होता. ती नक्की कशी चालते ते आज हा लेख वाचून कळलं :)

खूपच मस्त माहिती.. ह्यावर अजून वाचायला आवडेल..

अत्रुप्त आत्मा's picture

28 Aug 2017 - 9:05 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वन.

अनुप ढेरे's picture

25 Aug 2017 - 6:27 pm | अनुप ढेरे

छान लिहिलय. पाती कुठल्या मटेरिअलची असतात?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 6:39 pm | अमरेंद्र बाहुबली

पाती फायबरची असतात. त्यावर बरीच प्रक्रिया केली जाते.

अनुप ढेरे's picture

25 Aug 2017 - 7:47 pm | अनुप ढेरे

भारतातील पाती कुठे बनतात? सुझ्लॉन स्वतः बनवतं काय?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 7:56 pm | अमरेंद्र बाहुबली

हो! पाती भारतातच बनतात. धुळे जिल्ह्यात छडवेलकोर्डे ह्या गावात सुझलाँन चा पाती बनवण्याचा कारखाना आहे.
मी काय करत असलेल्या आयनाँक्स विंड कंपनीचा मध्य प्रदेशात बडवाणी जिल्ह्यात आहे. हे मला माहीत असलेले. अजूनही भरपुर ठीकाणी आहेत. पात्यांचा कारखाना साईट च्या जवळच असतो. रहदारीचा खर्च वाचावा म्हणून.
प्रत्येक कंपनीचा स्वतःचा कारखाना असतो.

अनुप ढेरे's picture

25 Aug 2017 - 8:10 pm | अनुप ढेरे

धन्यवाद!

सामान्य वाचक's picture

25 Aug 2017 - 6:41 pm | सामान्य वाचक

असतात पाती

त्यात जोड नसतो

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

25 Aug 2017 - 6:28 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

छान लेख .आमच्या सातार्यातील चाळकेवाडीला काहीशे पवनचक्की आहेत.कराड सातारा मेगाहायवेवरुन जाताना डावीकडे दिसतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 9:51 pm | अमरेंद्र बाहुबली

मी येऊन गेलोय तिथे. सज्जनगडा जवळ आहे तीच चाळकेवाडी ना. माझी ट्रेनिंग तिथेच झालीय.

बबन ताम्बे's picture

25 Aug 2017 - 6:30 pm | बबन ताम्बे

वारा जेंव्हा जास्त वहातो वा कमी वहातो तेंव्हा विजेच्या उत्पादनावर परीणाम होतो का? की गियर बॉक्स मुळे आतलं जनित्र सेम स्पीडने फिरते?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 6:45 pm | अमरेंद्र बाहुबली

हो वार्या चा परीणाम होतो. वारा कमी असेल तर ती वार्याच्या वेगा प्रमाणे कमी प्रमाणात ऊत्पादन देते. जर वार्याचा वेग प्रमाणाबाहेर म्हणजेच 22 मीटर प्रती सेकंदच्या वर गेला तर पवनचक्कीचे फीरणे बंद होते.

सामान्य वाचक's picture

25 Aug 2017 - 6:45 pm | सामान्य वाचक

12 ते 14 मीटर पार सेकंड हा ऑप्टिमम् वेग असतो वाऱ्याचा

25 मीटर /सेकंड पर्यंत वाऱ्याचा वेग गेला की, पिचिंग करून पात्याची दिशा बदलून windmill फिरणे थांबवतात नाहीतर पती मोडण्याचा धोका असतो जास्त वाऱ्यामुळे

भारी लिहिलंय बाहुबली! काही प्रश्न आहेत ते सावकाश विचारेन.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 8:22 pm | अमरेंद्र बाहुबली

हो. जरूर विचारा!

अत्रे's picture

25 Aug 2017 - 6:38 pm | अत्रे

खूप नवीन माहिती मिळाली धाग्यातून. धन्यवाद.

पवनचक्की एवढी मोठी असेल असे वाटले नव्हते.

सामान्य वाचक's picture

25 Aug 2017 - 6:47 pm | सामान्य वाचक

च्या पवनचक्क्या खूप ठिकाणी आहेत
त्या ही पेक्षा मोठ्या क्षमतेच्या देखील आहेत

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 6:59 pm | अमरेंद्र बाहुबली

आपनही आहात का ह्या क्षेत्रात आहात तर कुठे? कोणत्या कंपनीत व डीपार्टमेंट??

सामान्य वाचक's picture

25 Aug 2017 - 7:10 pm | सामान्य वाचक

इंजिनीरिंग आणि सोर्सिंग

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 6:59 pm | अमरेंद्र बाहुबली

सामान्य वाचक. आपनही आहात का ह्या क्षेत्रात आहात तर कुठे? कोणत्या कंपनीत व डीपार्टमेंट??

संग्राम's picture

25 Aug 2017 - 6:51 pm | संग्राम

फोटो दिसत नाहीत

भ ट क्या खे ड वा ला's picture

25 Aug 2017 - 6:56 pm | भ ट क्या खे ड वा ला

भटकंती करतांना अनेकदा दिसतात, याविषयी कुतुहूल होत,,या लेखामुळे ते शमले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2017 - 7:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती !

चष्मेबद्दूर's picture

25 Aug 2017 - 7:14 pm | चष्मेबद्दूर

पुण्यात आमच्या घराजवळ एका सोसायटी च्या गच्चीवर छोटी चक्की उभी केलीये. अजून बाणेर सुस रस्त्यावर सुद्धा अशीच एक घरगुती चक्की बघितल्याच आठवतेय. असं जर घराघरात चकल्या उभ्या करायच्या असतील तर त्याच तंत्रज्ञान वेगळं असतं का?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 7:21 pm | अमरेंद्र बाहुबली

तंत्रज्ञानात जास्त फरक नसतो. फक्त ऊर्जा साठवण्यसाठी बँटरी बसवावी लागते. त्या पवनचक्की ची कींमत दोन लाखाच्या जवळपास असते. तुम्ही देखील अशी छोटी पवनचक्की घरी बसवू शकतात. फक्त सरकारला "ऊर्जा विकणार नाही." असे लेखी द्यावे लागते.

चष्मेबद्दूर's picture

25 Aug 2017 - 8:59 pm | चष्मेबद्दूर

आपली घरं किंवा घरांच्या इमारतींवर हि चक्की बसवायची झाली तर सुरवातीपासूनच तयारी लागत असेल नाही का? कारण चक्की च स्वतः चं वजन आणि त्याच्या फिरण्यामुळे निर्माण होणारी कंपने याचा इमारतीच्या बांधणीवर काही परिणाम होत असेल ?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 9:35 pm | अमरेंद्र बाहुबली

ईतकीही वजनदार नसते. फार छोटी असते.

जर्मनीत यांचा अतिरेक होऊन नवीन कंपन्या डुबल्या. मागणीपेक्षा अधिक विज बनते.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 7:58 pm | अमरेंद्र बाहुबली

हो. बरोबर. तिथे हे क्षेत्र अतिविकसीत आहे.

मग तेथे बॅटरीवरच्या चारचाकी गाड्या उपलब्ध करून देऊन पेट्रोलचा खर्च कमी करता येणे शक्य आहे का..?

माहितीपूर्ण लेख... नवीन क्षेत्राची ओळख.

असं म्हणतात की तुलसी तंटी हे आधी कापडाचे व्यापारी होते. त्यांची अहमदाबादेत कपड्यांची मील होती. ते विदेशात फिरायला गेले असतांना त्यांनी तीथे पवनचक्क्या पाहून स्वत: काही व काही त्यांच्या मित्रांनी पवनचक्क्या खरेदी केल्या. पण नंतर त्या कंपनीला ईतक्या दुरून त्यांच मेंटेनन्स करण जमेना म्हणून त्यांनी तुलसी भाईंना स्वतः मेंटेनंस करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ह्याबाबत माहिती जमा करून स्वतः ह्या व्यवसायात ऊतरण्याचा निर्णय घेतला. कपडा मील विकूण ते ह्या व्यवसायात ऊतरले. त्यांनी कंपनीचं नाव सुझलाँन ठेवण्याच हेतु म्हणजे ग्राहक आकर्षित करणे.

तुलसी तांती यांना पवनचक्क्यांच्या उद्योगात उतरण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला. त्यांना पुण्यात व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि सुझलॉनची स्थापना झाली. सुझलॉनने पाटण व पांचगणी परिसरात सुमारे दोनशे पवनचक्क्या उभारल्या.

(संदर्भ - "लोक माझे सांगाती..." राजकीय आत्मकथा, लेखक शरद पवार, पान नंबर १६४ आणि १६५)

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 8:01 pm | अमरेंद्र बाहुबली

हे माहीत नव्हतं! नवीन माहिती मिळाली. धन्यवाद! सुझलाँन चं हेड आँफीस पुण्यात हडपसरला "वन अर्थ" ह्या नावाने आहे.

मार्मिक गोडसे's picture

25 Aug 2017 - 7:54 pm | मार्मिक गोडसे

सोप्या भाषेत छान माहिती. धन्यवाद.
घरगुती पवनचक्कीची वीजनिर्मिती क्षमता किती असते? सरकारला वीज का देता येत नाही. सबसिडी मिळते का?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 8:32 pm | अमरेंद्र बाहुबली

सबसीडी मीळत नाही. आणि ह्या छोट्या पवनचक्क्यांची मेंटेनन्स काँस्ट देखील जास्त असते. त्यामुळे त्या तितक्याशा प्रसिध्द पावू शकल्या नाहीत. आणी ऊर्जा विकण्यासाठी अनेक अटींची पुर्तता करावी लागते. सरकारचे काही नियम आहेत त्या नियमांची ह्या छोट्या पवनचक्क्या पुर्तता करू शकत नसल्याने त्यांना घरगूती वापरा पुरती परवानगी देण्यात आलीय.

खूप छान माहिती दिली आहे. अजून लिहा या विषयावर.

अमितदादा's picture

25 Aug 2017 - 8:07 pm | अमितदादा

उत्तम लेख...छान माहिती.
कीलोवँट(kwph) प्रती तास???? हे कशाचं युनिट आहे?
kWh (energy) किंवा kW (power) म्हणायचे आहे का?

भारतात पवनचक्की ची turbine तयार करणाऱ्या कंपन्या आहेत काय?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 8:16 pm | अमरेंद्र बाहुबली

ऊर्जेचं एककं वँट हे आहे. kwph म्हणजे Kilo watt per hour. 2000 kwph म्हणजे एका तासाला 2000कीलो वँट ऊर्जा तयार होते ते.
सुझलाँन व आयनाँक्स विंड ह्या शुध्द देशी कंपन्या आहेत. सुझलाँनचे मालक तुलसी तंती व आयनाँक्स जे दिव्यांश जैन हे आहेत. दोन्हीही गुजराती. या व्यतिरिक्त रिजेन पाँवर, विंड वर्ल्ड इंडीया. ह्या देखील नावाजलेल्या भारतीय कंपनीज आहेत.

अमितदादा's picture

25 Aug 2017 - 9:49 pm | अमितदादा

चूक, ऊर्जा म्हणजे energy त्याच युनिट kWh (किंवा Joule) आणि शक्ती म्हणजे power त्याच युनिट kW (Joule /second ) (Read Here). kWph हे युनिट च अस्तित्वात नाही. असो हा धाग्याचा हेतू वेगळा असल्याने इथेच थांबतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 10:15 pm | अमरेंद्र बाहुबली

अहो. ईथे आपण ऊत्पादन क्षमता मोजतोय. शक्ती चं युनिट kw हे बरोबर आहे. म्हणजे पवनचक्की कीती शक्तिशाली आहे हे kw वापरून कळेल. ऊदा. 2000 kw. पण जर आपण ऊत्पादन मोजू तर त्याला वेळेचं एककं लावावं लागेल. ऊदा. 2000 kilo watt per hour. एका तासाला 2000 कीलोवँट. ईथे आपण शक्ती कींवा ऊर्जा नाही तर उत्पादन क्षमता मोजतोय. असो. ह्यावर नंतर बोलू.

तुमच्या "kilo watt per hour" मधला per काढून टाका. 'KWH'चाच अर्थ, तासाला 'इतकी' किलोवॅट उर्जा असाच होतो.

बाकि लेख अत्यंत माहितीपूर्ण आहे.
यावर अजून लिहा.

चामुंडराय's picture

26 Aug 2017 - 4:25 am | चामुंडराय

अबा साहेब,

छान माहिती पवनचक्की बद्दल. आधी चुकून पवनचिक्की वाचलं :).

एव्हढे मोठे ब्लेड्स एव्हढ्या उंचीवर कसे असेम्बल करायचे ?

1 कीलोवँट म्हणजे आपल्या घरातील एक युनीट.

हे मात्र तितकसं बरोबर नाही. अमितदादांचं म्हणणं बरोबर आहे. १ किलोवॅट-आवर म्हणजे एक युनिट. याचा अर्थ १ किलोवॅट पॉवर तुम्ही १ तास वापरली तर १ युनिट एनर्जी तुम्ही खर्च केली.

माँडेल मध्ये 300 कीलोवँट(kwph) प्रती तास पासुन तर 2000 ते 3000(kwph) कीलोवँट प्रती तास पर्यंत कंपनी नुसार अनेक माँडेल्स असतात.

हे काही नीटसं कळलं नाही. येथे प्रति तासाचा संबंध कुठे येतो? तुमची चक्की ३०० किलोवॅटची असली तर ती ती १ तास चालवली काय किंवा १० तास चालवली तरी ती ३०० किलोवॅटचीच राहणार. ऊर्जा निर्मिती मात्र पहिल्या केसमध्ये ३०० किलोवॅट-आवर आणि दुसऱ्या केसमध्ये ३००० किलोवॅट-आवर असेल. तेव्हडी दुरुस्ती करून घ्या.

या निमित्ताने पडलेला एक प्रश्न -

मी जर टेबल फॅन घराच्या वर छतावर लावला आणि तो वाऱ्याने फिरायला लागला तर तो वीज तयार करेल का?

माझ्या लेमन मते पंख्याने वीज तयार करायला पाहिजे परंतु मी काही या विषयावरचा तज्ञ् नाही तेव्हा जाणकार पिंकतीलच (स्वारी... गगनविहारी आणि प्राडॉ सर्स )

उत्तम लेख. फार रोचक क्षेत्र आहे हे. फोटोजही उत्कृष्ट.

बरीच नवीन माहिती मिळाली या लेखामुळे. धन्यवाद.

मेन्टेनन्स किती करावा लागतो चक्कीला? सतत लक्ष ठेवावे लागते की ऑटोमॅटिकली काही प्रॉब्लेम आला तर मेसेज येऊ शकतो?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 8:19 pm | अमरेंद्र बाहुबली

काँम्प्युटरला जोडलेल्या असतात तिथे डीटेल्ड माहिती असते. प्राँब्लेम आला तर लगेच दिसते. मेंटेनंन्स वर्षातुन दोनदा करावा लागतो.

रामपुरी's picture

25 Aug 2017 - 8:33 pm | रामपुरी

सुझलॉन चा विषय आलाच आहे म्हणून हे अवांतर..
काही वर्षांपुर्वी सुझलॉन डबघाईला आली होती. शेअर कोसळला. अजूनही तो तिथेच रेंगाळतो आहे. ते का? अजूनही कंपनी गाळातच आहे काय?

मार्मिक गोडसे's picture

25 Aug 2017 - 8:45 pm | मार्मिक गोडसे

कंपनीच्या पात्यात दोष (तडे)निर्माण झाला होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 8:45 pm | अमरेंद्र बाहुबली

सुझलाँन डबघाईला येण्याचं कारण म्हणजे सुझलाँन ने 2009 च्या आसपास एक जर्मन कंपनी 13000 कोटी रूपयांना विकत घेतली होती. पण जर्मन सरकार च्या धोरणा प्रमाणे तो पैसा जर्मनी बाहेर वापरण्यावर बंदी होती. त्यामुळे ईतका मोठा पैसा जर्मनीत अडकला. अखेर 2014 साली सुझलाँन ने ती कंपनी 2900 कोटींचा घाटा खाऊन विकली. दरम्यान च्या काळात पैसा नसल्याने अनेक आँर्डर्स हातातून गेल्या. व अनेक विदेशी कंपनीं बरोबर आयनाँक्स विंड ही भारतीय कंपनी 2012 च्या आसपास ह्या क्षेत्रात आक्रमकपणे ऊतरली. व तीने मार्केट काबीज केले. सुझलाँन ची न भरून निघनारी हानी झाली. आता स्पर्धा वाढल्याने सुझलाँन च्या ऊत्पन्नातही फरक पडलाय.

सामान्य वाचक's picture

25 Aug 2017 - 9:03 pm | सामान्य वाचक

us मध्ये suzlon ला बरीच ब्लेडस बदलून द्यावी लागली
बरेच liquidity damages द्यावे लागले. @ 100 मिलियन डॉलर्स

तसाही re चे पैसे जर्मनी बाहेर वापरण्याची गरज नव्हतीच. पण 6 mw च्या offshore ऑर्डर्स फारशा मिळाल्या नाहीत
सगळ्या जगापेक्षा वेगळे विचार दाखवून गिअर बॉक्स ची एक बेलजीएम कंपनी विकत घेतली , बॅकवर्ड इंटिग्रेशन साठी
ते देखील फासे उलट पडले, ती कंपनी विकावी लागली.

या शिवाय suzlon चे अंतर्गत problem खूप म्हणजे खूपच जास्त आणि मोठे होते

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 9:40 pm | अमरेंद्र बाहुबली

कमी वेळेत अमाप पैसा आल्याने.....हे हाल झाले.

आयनॉक्स आणि सूझ्लॉन, दोन्हीचे शेअर गेले अनेक वर्ष पडत आहेत. व्यवसाय प्रचंड कॅपिटल इंटेंसिव आहे. आणि सरकारचा लहरी कारभार.

अनुप ढेरे's picture

25 Aug 2017 - 8:49 pm | अनुप ढेरे

इन्फॅक्ट आयनॉक्सवर नव्या दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाइ चालु होती.

वरुण मोहिते's picture

25 Aug 2017 - 8:53 pm | वरुण मोहिते

हल्ली कोकणात पण पवनचक्क्या उभ्या राहत आहेत . कुणकेश्वर मंदिराच्या पुढे समुद्रालगत पवनचक्क्या सध्याच उभारल्या आहेत .

प्रमोद देर्देकर's picture

25 Aug 2017 - 9:01 pm | प्रमोद देर्देकर

माहिती पूर्ण लेख. अजून आतल्या भागाचे फोटो येवू द्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 9:38 pm | अमरेंद्र बाहुबली

ते नाही देऊ शकत. confidential आहे. हवं तर आंतरजालावर शोधा. भेटतील.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

25 Aug 2017 - 10:47 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

पवणचक्क्यांमुळे पावसावर परिणाम होतो.पावसाळी ढगांचे फॉर्मेशन हजार मीटर पासूनच सुरु होते.सगळ्य पवनचक्क्या या हजार बाराशे मीटरवर उभ्या केल्याने ढगांचे फॉर्मेशन बिघडते व पाऊस कमी पडतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 11:03 pm | अमरेंद्र बाहुबली

ह्या अफवा आहेत हो. 70 ते 110 मीटर ने कीतीसा फरक पडनारे?? ह्या वर्षी गुजरातमध्ये महापुर आला. जिथे पवनचक्क्या आहेत तिथे सुध्दा. आता बोला.

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Aug 2017 - 6:31 pm | अनिरुद्ध.वैद्य

कितपत खरंय हे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2017 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

सगळ्य पवनचक्क्या या हजार बाराशे मीटरवर उभ्या केल्याने ढगांचे फॉर्मेशन बिघडते व पाऊस कमी पडतो.

खरेच ?! काही सर्वसामान्यपणे माहित असलेल्या वस्तूस्थिती पाहूया...

१. ढगांचे फॉर्मेशन बिघडते व पाऊस कमी पडतो :
सर्वप्रथम, पवनचक्क्या घरातल्या विजेच्या पंख्यासारखे काम करत नाही. घरातला पंखा विजेच्या वापराने हवा हलवून तिचा वारा बनवतो*, त्याविरुद्ध, पवनचक्की वारा निर्माण करत नाही तर वातावरणात वारा असलाच तर त्याने होणार्‍या यांत्रिक हालचालीचे रुपांतर विजेत करते.
(*: संदर्भ : दुशली ब मधिल शास्त्राचा धडा --> "हवा हलू लागली की तिला वारा म्हणतात.")

२. हजार-बाराशे मीटर उंचीच्या पवनचक्क्या : ???!!! =)) =)) =))
सर्व प्रकारे जगातली सर्वात उंच इमारत/रचना असलेली बुर्ज खलिफा ही इमारत ८३० मीटर उंच आहे. जगातली सर्वात उंच, Vestas V164 ही, पवनचक्की २२० मी उंच आहे. सर्वसाधारण पवनचक्क्यांची उंची १०० +/- १०-२० मीटर असते. जितकी उंच पवनचक्की तेवढी तिची किंमत, उभारणीचा खर्च, देखभालीचा खर्च आणि धोकादायकता वाढत जाणार आणि ती व्यापारासाठी अधिकाधिक निकामी होणार हे सांगायला नकोच*.
(*: संदर्भ : सर्वसामान्य ज्ञान उर्फ कॉमन सेन्स)

वरचे उद्धृत केलेले वाक्य (किंवा तश्या अर्थाचे विधान) काही काळापूर्वी एका राजकारणी व्यक्तीने केले होते. हे विधान, "आधुनिक शास्त्राचा गंधही नसलेले व राजकार-शास्राने ठासून भरलेले विधान स्वार्थाने प्रेरित आणि / किंवा बुद्धी गहाण ठेवलेल्या लोकांसाठी" आहे हे सिद्ध करायला फार हुशारी लागत नाही. अर्थातच, त्यावेळीही, बहुसंख्य लोकांनी त्या विधानाला केराची टोपलीच दाखवली होती :)

साधेसुधे हुशार नव्हे तर टर्बोचार्जड फिलॉसॉफर अशी आयडी घेणारे सुद्धा असे साध्यासुध्या अफवांना बळी पडतात हे पाहून आश्चर्य वाटले ! =)) ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 9:40 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत!

बबन ताम्बे's picture

27 Aug 2017 - 12:05 am | बबन ताम्बे

नेमका त्याच भागात भरपूर पाऊस पडला आणि त्या दाव्यातली हवाच निघून गेली.

"जलविद्युत केंद्रात याच पावसाच्या पाण्यातील कस काढून त्यातून वीजनिर्मिती केली आणि कस काढलेले निकृष्ट पाणी धरणातून शेतीसाठी पुढे सोडले"

असे कांही आरोप झाले नाहीत का?

मार्मिक गोडसे's picture

27 Aug 2017 - 7:49 am | मार्मिक गोडसे

खरोखर असा आरोप झाला की नाही हे माहीत नाही, परंतू 'शूल' चित्रपटात सयाजी शिंदेच्या तोंडी असा डायलॉग आहे.

जलविद्युत प्रकल्पात पाण्यातील ऊर्जा काढून घेऊन कमी कस असलेले पाणी शेतीसाठी पुरवले जाते असा आरोप माझ्या आठवणींप्रमाणे (वृतपत्रातील बातमी) बहुतेक देवीलाल यांनी हरयाणात केला होता.
महाराष्ट्रात पवनचक्कयांमुळे आजूबाजूच्या परीसरात पाऊस कमी होऊन दुष्काळ पडतो असा आरोप करून राजकीय विरोध झाला होता. त्यावेळी वृत्तपत्रात एका तज्ञाने (?) शास्त्रीय ☺ कारणमीमांसा पण लिहिली होती . पावसाचे ढग पवनचक्कयांच्या पात्यांमुळे कापसासारखे पिंजले जातात आणि त्यामुळे ते हलके होतात. असे हलके झालेले ढग कमी पाऊस पाडतात म्हणून पवनचक्कयांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये कमी पाऊस पडून दुष्काळ पडतो . आणि दुसरे म्हणजे वाऱ्याचे काम पावसाळी ढगांना पुढे वाहून नेण्याचे असते. पण वाऱ्याची काहीऊर्जा पवनचक्कयांना फिरवण्यात खर्च पडते. आणि वाऱ्याचा वेग कमी होतो. परिणामी ते ढग ठराविक भागातच पाऊस पाडतात आणि पुढची गावे उपाशीच रहातात . आता बोला ☺

गामा पैलवान's picture

27 Aug 2017 - 12:43 pm | गामा पैलवान

बबन ताम्बे, हो, ते महापुरूष देवीलालच होत.
आ.न.,
-गा.पै.

छान माहितीपूर्ण लेख! आवडला.

पिलीयन रायडर's picture

26 Aug 2017 - 4:39 am | पिलीयन रायडर

लेख आवडला. बरीच माहिती मिळाली.

कंजूस's picture

26 Aug 2017 - 5:41 am | कंजूस

जर्मनीच्या नॅशनल - dwtv - या चानेलवर याविषयीच्या पाचसहा डॅाक्यु० पाहिल्या आहेत. ( त्या बहुतेक ओनलाइन आहेत.)
*रचना
*इलेक्ट्रिक वाहक तारांना जोडून विकणे वगैरे
*याविषयीचे नियम
*धंधा आणि नफा
*त्रास - लोकांनी डोंगरात घरे बांधून हॅाटेल व्यवसाय सुरू केलेला त्यांच्या घरापाशी चक्की आल्यास सतत उँउँ आवाज येतो त्यामुळे पर्यटक येईनासे झाले, झोप येत नाही शिवाय ती घरे विकली जात नाहीत.
* जागा - डोंगरावरच्या चक्क्यांपेक्षा समुद्रात शंभर किमी दूर लावलेल्या मोठ्या चक्क्या बरेच तास प्रचंड वीज करतात परंतू त्या कंपन्या नंतर आल्या आणि वीज कोधणी घेत नाही. दोन हजार किमी केबल टाकून दुसय्रा देशांना विकणे खर्चिक आहे.
हे सर्व आहे त्या माहितीपटांत.

IT hamal's picture

26 Aug 2017 - 8:56 am | IT hamal

पण...जरा शुध्दलेखनाकडे सुध्दा बघा....मराठीत "उ" आणि "ण" अजूनतरी आहेत ना राव ....विषय व माहिती चांंगली...पण त्या न/ ण तसेच उ/ऊ ...इ/ई च्या गोंंधळामुळे रसभंंग झाला....

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 9:42 pm | अमरेंद्र बाहुबली

माझं लेखन कधीच शुध्द नव्हतं हो. अगदी 10 वी पास झालो तेव्हाही. त्याबद्दल माफ करा.

दुर्गविहारी's picture

26 Aug 2017 - 10:58 am | दुर्गविहारी

उत्तम माहिती. या पुर्वी विटा, खानापुर, वडूज, खटाव या परिसरात तसेच चाळकेवाडी पठारतर या पवनचक्क्यांनी भरून गेलेले आहे.फक्त एक गोष्ट मला समजली नाही, तुम्ही सुझलॉनचा या क्षेत्रातील प्रवेश १९९३ ला झाला असे लिहीले आहे, मग या आधी कोणत्या कंपन्या या क्षेत्रात होत्या, त्या विषयी काही लिहीले असते तर बरे झाले असते.
सेलेब्रिटींनी यात गुंतवणूक केली आहे कारण, त्यांना या गुंतवणूकीच्या बदल्यात काही सवलती मिळतात हे एकले आहे, हे खरे का? अगदी सकाळ पेपरच्याही काही पवनचक्क्या आहेत असा फोटो पाहिला होता.
शिवाय पवनउर्जेची सुरवात १९९० मधे झाली असे लिहीले आहे, मात्र आमच्या शाळेची सहल १९८६ ला जयगड, विजयदुर्ग, देवगड अशी गेली होती, तेव्हा देवगडच्या किल्ल्याच्या पठारावर पवनचक्क्या उभ्या असलेल्या मी पाहिल्याचे स्पष्ट आठवते. त्यानंतर पुन्हा या परिसरात गेलो होतो तेव्हाही पवनचक्क्या पहायला मिळाल्या. तेव्हा या प्रकल्पाची सुरवात भारतात आधी झाली असली पाहिजे असे वाटते.
बाकी जसा पवनउर्जेला प्रोत्साहन मिळते, तसेच सौर उर्जेलासुध्दा मिळायला हवे. मोदी सरकारने सत्तेवर येताच लढाख, राजस्थान किंवा देशाच्या दुष्काळी भागात सौर प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती, पण अद्याप त्याबाबत काही हालचाल झाली कि माहिती नाही ?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 12:05 pm | अमरेंद्र बाहुबली

1990 च्या आधीही पवनचक्क्या होत्या. प्रकल्प आधी पण होते पण अल्प प्रमाणात व विदेशी कंपनीचाच त्यात सहभाग होता. ह्या क्षेत्रात अनेक कंपन्या असल्याने त्यांची नावे सांगता येणार नाहीत. कारण त्यांचा सहभाग अल्प प्रमाणात होता. 1990 साली सरकारी पातळीवरून ह्या क्षेत्रवाढी साठी योजना सुरू झाल्या. त्यामुळे ह्या क्षेत्राकडे लक्ष वेधल्या गेले. 1994 साली सुझलाँन ची पहिली पवनचक्की ऊभी राहीली.
सेलेब्रिटींनी यात गुंतवणूक केली आहे कारण, त्यांना या गुंतवणूकीच्या बदल्यात काही सवलती मिळतात हे एकले आहे, हे खरे का?
40% च्या आसपास सरकारी सबसीडी मिळायची. राज्य सरकार ही युनीट मागे भाव वाढवून द्यायचे. ते सर्वांना म्हणजे उद्योगपती व सेलीब्रेटीजना सारखेच होते.
सकाळ पेपरच्याही असतील.
सध्या पवनऊर्जे पेक्षा सौर ऊर्जेला सरकारी पातळीवरून प्राधान्य मिळतय. व सौरऊर्जेमध्ये गुंतवणूक वाढलीय. अनेक ठिकाणी मोठमोठे प्रकल्प आलेय.
मोदी सरकार स्थिर असल्याने FDI ( foreign direct investment) मध्येही वाढ झालीय.

सतीश कुडतरकर's picture

28 Aug 2017 - 12:26 pm | सतीश कुडतरकर

२०१३-१४ पासून Alstom -T&D चा प्रोजेक्ट चालू आहे राजस्थानात ($२० मिलियन). मित्र लॉजिस्टिक्स सांभाळायचा.

खाबुडकांदा's picture

26 Aug 2017 - 1:35 pm | खाबुडकांदा

सुझलॉन चा भाव हजार च्या आसपास असताना शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांना विकुन प्रचंड फायदा कमवला. त्यतील थोडा जर्मन कंपनीच्या खरेदीत वापरला. खरेदी व्यवहार करण्यापूर्वी जर्मन कायदे माहितीच नव्हते ! त्यामुळे कंपनी बुडाली !
बघा ना किती भोळे आम्ही !
साहेबांचा सल्ला उगीच घेत नाहीत लोक आणि साहेब मोफत सल्ले देत फिरतात म्हणता कि काय !
सावध व्हा मित्रानो ! सध्या सुझलॉन चा भाव १७ रु आहे आणि खरेदीसाठी रेकमंडेशन जोरात होतेय ! मी हजारदा विचार करेन खरेदी करण्यापूर्वी. कारण साहेबावर माझा विश्वास आहे !

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 1:38 pm | अमरेंद्र बाहुबली

बरोबर! तुमच्या म्हणण्याला "अर्थ" आहे.

सिरुसेरि's picture

26 Aug 2017 - 1:55 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेख . +१००

खाबुडकांदा's picture

26 Aug 2017 - 2:20 pm | खाबुडकांदा

होय लेख खरच छान आहे. अभिनंदन !
एनर्जी युनिट्स बद्दल झालेली चर्चाही चांगली झाली.
प्रचंड एरिया व डेप्थ असलेले हवेचे थर आणि त्यामानाने निग्लिजिबल असलेला पवनचक्क्यांचा आकार. त्यामुळे पावसावर वा वाऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता मुळीच नाही. पूर्वी लालू व गॅंग ने जलविद्युत प्रकल्पाला विरोध म्हणुन प्रकल्पामुळे पाण्यातील उर्जा कशी काढुन घेतली जाते व त्यामुळे पाणी कसे कमी प्रतीचे होते असा आरडाओरडा केला होता. असले लोक आपल्या देशाला शाप आहेत.
एक शंका - तीन पात्यामुळे किमान एक पाते वाऱ्याच्या झोतात रहाते हे बरोबरच. पण मग चार पाती वापरल्याने एफिशियंसी वाढेल किंवा कसे ?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 2:51 pm | अमरेंद्र बाहुबली

पाते कितीही असो. efficiency वार्याच्या वेगा वर अवलंबून असते. चार पात्यांमुळे एका स्थितीला पाते equilibrium होतात. त्यामुळे त्यांचा वापर होत नाही. तसेच खर्च ही वाढत जातो.

खाबुडकांदा's picture

26 Aug 2017 - 2:55 pm | खाबुडकांदा

ओके. धन्यवाद !

गामा पैलवान's picture

26 Aug 2017 - 4:34 pm | गामा पैलवान

चामुंडराय,

मी जर टेबल फॅन घराच्या वर छतावर लावला आणि तो वाऱ्याने फिरायला लागला तर तो वीज तयार करेल का?
माझ्या लेमन मते पंख्याने वीज तयार करायला पाहिजे

हल्लीच्या टेबलफ्यानमध्ये एसी मोटर असते. ती वाऱ्याने गरगरा फिरवल्याने वीज निर्मिती होत नाही. मात्र डीसी मोटर असेल तर वीज उत्पन्न होते. डीसी मोटर आणि डीसी जनित्र बरेचसे एकसारखेच असतात.

मीही या विषयावरचा तत्ज्ञ नाही. काही दशकांपूर्वी कॉलेजात वाचलेलं आठवून लिहितोय.

आ.न.,
-गा.पै.

उल्तानं's picture

26 Aug 2017 - 4:44 pm | उल्तानं

+१

पैसा's picture

26 Aug 2017 - 6:14 pm | पैसा

उत्तम माहिती. पवनचक्क्यांमुळे पक्ष्यांना त्रास होतो. अनेक स्थलांतर करणारे पक्षी तडाख्यात सापडून मरतात असे वाचले आहे. हे किती प्रमाणात होते?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 6:43 pm | अमरेंद्र बाहुबली

हे कोणी सांगितले आपल्याला?? एखाद्या ठीकाणाचं व पक्षांच्या प्रजातींचे नाव सांगा जे तडाख्यात सापडले.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 6:44 pm | अमरेंद्र बाहुबली

ह्या सर्व अफवा आहेत हो.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 7:18 pm | अमरेंद्र बाहुबली

आपल्याकडे असा अभ्यास सुद्धा झाल्याचे दिसत नाही.

आपल्या ईथे असं कुठे झाल्याचं एकीवात कींवा वाचणात नाही.

खाबुडकांदा's picture

26 Aug 2017 - 6:25 pm | खाबुडकांदा

मी ही या विषयातील अधिकारी नाही. मात्र जनरल माहिती आहे ती अशी - डीसी मोटर व जनरेटर हे मुलत: एकच काम करतात ते म्हणजे उर्जेला एका रुपातुन दुसऱ्या रुपात बदलणे.
फरक एवढाच कि मोटर ही विद्युत उर्जेचे यांत्रिक उर्जेत रुपांतर करते आणि जनरेटर हा यांत्रिक उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर करतो.दोनही मध्ये विद्युत चुंबक व वाईंडींग चा घटक म्हणुन वापर असतो मात्र दोघांचा हेतु निराळा असल्याने दोनही उपकरणे त्या त्या कामासाठी म्हणुन डिझाईन व पॅरामीटर्स मध्ये योग्य ते फेरफार करुन बनवलेले असतात. अर्थ असा कि बेसिकली डीसी मोटर ही एक जनरेटर सारखीच असली तरी तिचा उपयोग एक जनरेटर म्हणुन तितक्याच एफिशियंटली होइल असे नाही. तेथे पाहिजे जातीचे !
म्हणुन पंख्याची पाती फिरवून व डीसीमोटर वापरुन वीज निर्मीती तत्वत: झाली तरी प्रॅक्टिकली त्यात एनर्जी लॉसेस खुप असतील व त्यामुळे तसे करणे निरर्थक ठरेल. यात माझी काही चुक होत असेल तर वा एकुणच अधिक माहिती या विषयातले अधिकारी लोकानी सांगावी .

दमण ला सुझलान आणि एनोरकॉन ह्या दोन कंपन्यांचे प्लांट होते . सुझलान लोकांना घेऊन कधीही नारळ द्यायची . पगार वेळच्या वेळी द्यायची नाही . एनोरकॉन मात्र खूप चांगली सॅलरी देते अशी ख्याती होती तिथे . बरेचजण त्यासाठी एनोरकॉन ला जायला धडपडायचे . अगदी झाडूवालीला पण चांगला पगार आहे तिथे अशी एनोरकॉन ख्याती होती, शिवाय त्यांची ती पाती आणि धूड वाहणारी कंटेनर ट्राफिक ची पूर्ण वाट लावत

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 8:29 pm | अमरेंद्र बाहुबली

आता स्थीती उलट आहे. लोकं ईनरकाँन सोडून पळताय.