क्वारंटाईनमधले प्रेम
कॉलेजातील एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या एका युगुलाची 'विलगीकरणाने' होणारी घालमेल मांडायचा प्रयत्न...
ती :
जीवघेणे हट्ट तुझे
वाऱ्यासंगे पळायचे
अबोल्याचे मास्क सोडून
क्वारंटाईन मोडायचे ।।
मन किती जिद्दी तुझे
सोशल डिस्टंसिंग झुगारायचे
अत्यावश्यक निमित्ताने
आमच्या हृदयात घुसायचे।।
नातं किती घट्ट तुझे
श्वासांनाही बांधायचे
आठवणींची गर्दी करून
क्वारंटाईन मोडायचे।।
किती रे निगरगट्ट तू?
कधीही आरश्यात यायचे
माझे डोळे कन्फर्मड् बघून
क्वारंटाईन मोडायचे