अस्त

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
7 May 2020 - 10:53 pm

चार दिसांची चहू चिंतने
भ्रमितपणाची बहू लक्षणे
विषासम त्या प्रवासातले
क्षणिक गोडवे अस्त पावले

अनाठाई त्या रूचक चिंता
स्वप् नसुखांच्या रजई विणता
सूर निराळे गवसण्यापरी
तारेवरचा नवा डोंबारी

नको म्हणाया धजते ना मन
धडगत नाही रीते रीते पण
बेधुंदपणाचि सूटली आवड
दिनपणाचि जूडली कावड

क्षिण जाहल्या नियतिच्या वाटा
नको जपाया स्वप्नांच्या लाटा
अधांतरी क्षितिजाच्या मागे
विझून गेले लख्ख पोरगे

कविता माझीकविताजीवनमान

प्रतिक्रिया

मन्या ऽ's picture

7 May 2020 - 11:28 pm | मन्या ऽ

परत परत 5-6वेळा वाचली तुमची कविता.. तरीही पुर्णतः समजली नाही.. अस वाटतंय..
वाचनखुणेत ऍड करते.. निवांत असताना परत वाचेन!

मन्या ऽ's picture

11 Jun 2020 - 2:03 pm | मन्या ऽ

कवितेत निराशेचा सुर लागलाय..

(परत वाचली.. आणि नीट समजुन घेता आली.. मी मागे कदाचित गडबडीत वाचली असावी..)

सुमित_सौन्देकर's picture

18 Jul 2020 - 11:26 pm | सुमित_सौन्देकर

कवितेच्या नावातच निराशा दडलीय... आशेचा किरण पाठीशी ठेवून.