मराठी दिन २०१८: टापा (मावळी)
टापा
सांगायचं म्हनश्यान तं गोश्टि जव्हा आम्हि सम्दि नयतर्नी व्हतो कनि ना त्या टायमाला तव्हाच्या ह्येत. रोज सवसान्चं भाकर खाउन्सनी आम्हि सम्दि गाबडी त्या बाळुनानाच्या बिरडिण्गीमो-हं जमुनसनी टापा झोडित बसायचो. तव्हर आम्च्या आइबापानि काय आम्हा खयसान्ना हाडळि आनुन धिल्या नव्ह्त्या. मंग आम्हाला काय राच्च्याला टायिमच टायिम घावायचा. राच्च्या येकदोन वाजेपोहत टापा चालु र्ह्यायच्या. कुढं याचंच माप काढ , कुढं त्याचीच रेवडि उडव. म्या कॉन्हची जिरावली, मपलि कोन्ह्या जिरावली ह्येच सान्गायच आन आयकायचं काम. निर्हा धिंगुड्शा आसाय्चा. पॉट पार कळा हानित र्हायचं हासुहासू.