(घंटा हलवून बघ)
शब्दावरती रागावू नकोस
विचार करून बघ
झोपलेल्या मेंदूची
घंटा हलवून बघ
शेवाळलेल्या मनावरती
पूर्वग्रहाचे थर
इतिहास परंपरा जाऊ देत
वर्तमान घट्ट धर
अनुदान माफी काही नकोत
पीक ऑरगॅनिक लाव
तेव्हा तुला मिळेल
शहरी मॉलमधला भाव
दिसतो तसा नाही शहरी
स्वार्थी व मग्रूर
बळीराजाच्या दुःखासाठी
त्याचाही भरतो ऊर
देऊ नकोस टॅक्स मित्रा
तुझ्या शेतकी उत्पन्नापाई
भारताच्या भल्यासाठी
भलेही इंडिया टॅक्स वाही