(घंटा हलवून बघ)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 1:19 pm

शब्दावरती रागावू नकोस
विचार करून बघ
झोपलेल्या मेंदूची
घंटा हलवून बघ

शेवाळलेल्या मनावरती
पूर्वग्रहाचे थर
इतिहास परंपरा जाऊ देत
वर्तमान घट्ट धर

अनुदान माफी काही नकोत
पीक ऑरगॅनिक लाव
तेव्हा तुला मिळेल
शहरी मॉलमधला भाव

दिसतो तसा नाही शहरी
स्वार्थी व मग्रूर
बळीराजाच्या दुःखासाठी
त्याचाही भरतो ऊर

देऊ नकोस टॅक्स मित्रा
तुझ्या शेतकी उत्पन्नापाई
भारताच्या भल्यासाठी
भलेही इंडिया टॅक्स वाही

धरू नकोस फास मित्रा
जरी निराशेची धग
डोळे उघडून खाटेशेजारील
बायका पोरांकडे बघ

चिंता नकोस करू मित्रा
श्रद्धेनं वारी घेवं
मध्यस्त काढून बाजूला
माल कस्टमरपुढे ठेव

मुक्तकशुभेच्छा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

8 Aug 2016 - 1:26 pm | ज्योति अळवणी

मस्त

नाखु's picture

8 Aug 2016 - 1:47 pm | नाखु

रॉक्स, बुडघाशी# शॉक्स.

द (लालांच्या) प्रतिक्रिया येतीलच असे नाही.

बुडघाशी उर्फ वकार यूनुस अशी मिपावर एक जमात आहे.

अमितदादा's picture

8 Aug 2016 - 4:00 pm | अमितदादा

मस्त...

चाणक्य's picture

8 Aug 2016 - 5:09 pm | चाणक्य

एकदम परखड आणि सच्ची. उगाच फुकाचे उमाळे नाहीत आणि विखारी टीकाही नाही. बेश्ट.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Aug 2016 - 12:31 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण.. टू चाणक्य!

चाणक्य's picture

8 Aug 2016 - 5:12 pm | चाणक्य

एक राहिलं :- स्वतंत्र रचना म्हणून हे काव्य परीपूर्ण आहे.

भारीच कविता की.
जमलीय बरका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Aug 2016 - 5:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान ! लिखते रहो.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

8 Aug 2016 - 5:42 pm | कंजूस

जमलंय.

विप्लव's picture

8 Aug 2016 - 6:27 pm | विप्लव

मस्तच

स्वतंत्र कविता म्हणून उत्तम आहे. त्यात कोणावर आगपाखड नाही, मोहर्रमचा मातम नाही; त्यामुळे उजवी आहे.

नाखु's picture

9 Aug 2016 - 8:35 am | नाखु

अर्थात दूषणे न देता केलेली कवीता म्हणून अस्सल.

सुबोध खरे's picture

9 Aug 2016 - 12:35 pm | सुबोध खरे

हा कविता विभागात का नाही?

यशोधरा's picture

9 Aug 2016 - 4:24 pm | यशोधरा

आवडली कविता.

मुक्त विहारि's picture

9 Aug 2016 - 6:44 pm | मुक्त विहारि

"देऊ नकोस टॅक्स मित्रा
तुझ्या शेतकी उत्पन्नापाई
भारताच्या भल्यासाठी
भलेही इंडिया टॅक्स वाही"

हे तर क्लासच...

खटपट्या's picture

9 Aug 2016 - 8:47 pm | खटपट्या

कविता भावली.

जावई's picture

9 Aug 2016 - 8:51 pm | जावई

मस्त

पद्मावति's picture

9 Aug 2016 - 9:36 pm | पद्मावति

कविता आवडली.

सस्नेह's picture

10 Aug 2016 - 10:44 am | सस्नेह

समर्पक कविता.