मुक्तक

झोका...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
6 Jul 2016 - 11:51 am

कभिन्न अंधार
विक्राळ दरीत...
विहरतो सूर
गंधाराचा...

पानाआड कुणी
बसले लपून
वाराही जपून
झोका देई!!..

हासते कुणी ते
आडून पानांच्या...
अवघा रानांच्या
मोहोर मनाला !!

अंगावर माझ्या
पावसाच्या धारा...
लपेटला वारा
काळा कुट्ट!!

कवितामुक्तक

हायकू (?)

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
3 Jul 2016 - 8:51 pm

दूर डोंगराच्या माथी
आले उतरू आभाळ
... झाडावर पानगळ

दूर क्षितिजरेषेला
फुटे प्रकाशाचा पंख
.... मनावर काळा डंख

निळ्याशार तळ्याकाठी
गूज प्रेमाचे वाजते
चैत्रचांदणी लाजते...

झुंजूमुंजू पहाटेला
किरणाचा सूर्यरंग
... ओथंबले ओले अंग

कवितामुक्तक

माझ्या मना....

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
2 Jul 2016 - 6:10 pm

माझ्या मना हास जरा
कालच्यापेक्षा आज बरा
हाही दिवस संपून जाईल
नवा उद्या घेऊन येईल

आठवणींचे डोस कडू
गिळत कुढत नको रडू
नवा दिवस साजरा कर
आयुष्यात आनंद भर

डोळे उघड पहा नीट
झटकून टाक सगळा वीट
पुसून टाक रात्रीचे भास
मोकळा कर दबलेला श्वास

कानावरचे काढ हात
आतल्या सुराला दे साथ
आतला आवाज हाच खरा
माझ्या मना हास जरा

ऐक आता गाणीच गाणी
गालावरचे पूस पाणी
अन्यायाची सारी भुते
जातील पळून कुठल्या कुठे

कवितामुक्तक

आरास...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
2 Jul 2016 - 9:45 am

ती दुरून दिसली जेव्हा
वठलेल्या झाडाखाली
मातीच्या गालावरती
उमटली लाजिरी लाली...

ती थोडी जवळी येता
हलकेच हासला वारा
गाभाऱ्यात मनाच्या
सजविला सुवक देव्हारा...

गुंफिली महिरपी ओठी
शतताऱ्यांची आरास
बरसुनी अंगणी गेली
चंद्रचांदण्यांची रास..

कवितामुक्तक

परत स्मार्टफोन!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
1 Jul 2016 - 3:31 pm

(अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'माझा पहिला स्मार्टफोन' या लेखाचा दुसरा भाग)
आधीच्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे
http://www.misalpav.com/node/27462

मुक्तकविरंगुळा

सुरज (हिंदी-उर्दू रचना आणि तिचा अनुवाद)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
28 Jun 2016 - 3:25 pm

न जाने क्या है वहाँ
जो सुरज रोज
सुबह उठकर बिना थके
दिन के चारो पहर की
सारी सीढीया चढ के
ऊपर चला जाता है
---
फिर कुछ देर
दुनिया की जानिब
घूरता रहता है
मानो कोई जंग जित ली हो
---
कभी कभी लगता है
अपने परछाई को हराने का
जूनून सवार है उसपे
---
ओ सुरज, तुम बडे कब होगे?

|-मिसळलेला काव्यप्रेमी-|
(२७/०६/२०१६)

जानिब = दिशा

----------------------------------------------------------------------
(अनुवाद)

मुक्त कविताकवितामुक्तक

पाऊसगाणे...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
26 Jun 2016 - 11:13 pm

माझ्या अंगणात आज
वाजे पावसाचा ताशा
सोहळ्यात पर्जन्याच्या
रुजे उद्याची रे आशा..

माझे घर झाले आज
आनंदाने ओलेचिंब
दिसे प्रवाही पाण्यात
भविष्याचे प्रतिबिंब...

माझ्या घरात नाचते
पावसाचे स्वैरगाणे
आणि त्याच्या तालावर
मन विभोर उधाणे...

माझ्या मनात गुजते
जुन्या पावसाची गाज
गेल्या ओल्या दिवसाची
सल छळते रे आज...

कवितामुक्तक

वाट!

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
26 Jun 2016 - 9:23 pm

कालच्या पावसात एक फांदी तुटली
आपटलीच
मग झाडंच कोसळलं
धप्पदिशी

अजस्त्र सांगाडा जमीनीवर पसरला.
कधीकाळी त्यावर किलबिल पक्षी बसायचे
आजकाल फक्त कावळेच

शतकानुशतके झाड उभं होतं
गुण्यागोविंदाने जगत होतं
संसार करावा तर झाडासारखा
पण एकाएकी खंगूनच गेलं

उन्मळून पडावं असं काही राहीलंच नव्हतं
तरीही पडलं
दु:ख त्याचं नाहीच
पण खाली एक कुत्रं बसलं होतं
गेलं बिचारं

:(

जिलबीमुक्तक

पाऊस...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
26 Jun 2016 - 9:00 pm

जडावल्या तिन्हिसांजेला
ओल्या पावसाचा गंध
... झुगारले सारे बंध

ओला पाऊस दाटतो
आभाळात अनवट
... भाळावरी मळवट

चिंब रात्रीच्या उरात
पेटलेली आग आग
... उगा अंधाराला जाग

अंधाराच्या अंगावर
उजेडाचा कवडसा
... पाण्यावर ओल्या रेषा

कवितामुक्तक