मुक्तक

रहाटगाडगं.

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
12 Sep 2016 - 9:59 am

आज जरा निवांत वाटतय..
सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.!

रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला?
बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!?

हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला.
असं का वाटत नाही? ? ?

पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला!

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तकसमाजजीवनमान

गौराई...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
12 Sep 2016 - 9:11 am

गौराई...

झाली तीच्या आगमनाची घाई
आता जोडीने येईल गौराई

दारी उमटतील पाउले कुंकवाची
सुख शांती अन समृद्धींची

सजतील लेऊन शालू भरजरी
असेल मध्ये गणराया मखरी

दोन दिसांची असेल माहेरवाशीण
पंचपक्वान्नाचे असेल जेवण

देता निरोप येईल डोळा पाणी
गौराई माझी लाडाची गं राणी

राजेंद्र देवी

कविता माझीभावकवितामुक्त कविताधर्मकवितामुक्तक

आता मला वाटते भिती

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
9 Sep 2016 - 4:27 pm

आता मला वाटते भिती

कोठे गुंड त्रास देती
कोठे पोलीस मार खाती
अशा या समाजाची
आता मला वाटते भिती

कधी तरुणाईचे भांडण तर
कधी रस्त्यावरचे भांडण
सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन
अशा या जनाची आता मला वाटते भिती

रामराज्याची अपेक्षा पण
वागण्याची रावणनिती
या समाजाला आता नाही कोणाची भीती
अशा या समाजाची आता मला वाटते भिती

या समाजाच मी एक भाग
मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कवितासंस्कृतीकवितामुक्तकसमाजजीवनमानराहणीराजकारण

रात्रीस खेळ चाले....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
9 Sep 2016 - 11:23 am

रात्रीस खेळ चाले....

गूढं त्या महाली
केस सोडून ती बसलेली
काळा मिट्ट अंधार अन
काजव्याने पण मान टाकलेली
अचानक एक टिटवी ओरडली
आढ्याशी भुते खदखदली
वारा नव्हता तरी अचानक
तावदानाची दारे खडखडली
रात्र खूपं वाढलेली
कोल्हे कुत्री केकाटली
झरोक्यातून सावली उतरली
मांजराने बाहुली पळवली....

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताभयानककवितामुक्तक

जाणिवांच्या जखमा

महेश रा. कोळी's picture
महेश रा. कोळी in जे न देखे रवी...
9 Sep 2016 - 12:07 am

हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये
करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये.

हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही
काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये.

काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा
क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये

का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या?
काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये.

....म्हैश्या

gazalसंस्कृतीकवितामुक्तकगझल

ईच्छा

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
2 Sep 2016 - 11:08 am

चांदण्यात एकदा न्हायचंय मला
ताऱ्यांच्या गावाला जायचंय मला

वेळूच्या बनात दूर किर्र रानात
गातो जे गीत वारा, गायचंय मला

रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात
सोडलेल्या दिव्यासंगे वाहायचंय मला

अंधारात सुगंधाचा मागोवा घेत घेत
स्वप्नांच्या गावाला जायचंय मला

माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून
त्याचा रूप एकदा पहायचंय मला

मुक्त कवितामुक्तक

काही ठिकाणे काही आठवणी - २ [खादाडी स्पेशल भाग]

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
30 Aug 2016 - 10:27 pm

आपण पहिला भाग वाचू शकता ह्या लिंक वर:-
http://www.misalpav.com/node/37088

मुक्तकलेख

धाक... दहशत

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
25 Aug 2016 - 10:16 am

दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते.
उरुस , जुलूसही मागे नसतातच.
त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं.
डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ;
आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात

मुक्तकराहणीस्थिरचित्रप्रतिसादअनुभव

अमरबाबा

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
24 Aug 2016 - 10:18 am

गावात पोहोचताच बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याजवळच्या मोकळ्या जागेत त्याने गाडी उभी केली. हौद्यातून गुंडाळलेले पोस्टर काढून बाहेर टांगले.
'हिमालयकी अद्भुत चमत्कारी जडीबूटीयो का चमत्कार' अशी अक्षरे असलेल्या त्या फलकावर बर्फाचा डोंगर व त्यात मधूनमधून उगवलेल्या काचेच्या, जडीबुटी भरलेल्या बरण्या असे विचित्र चित्र होते.
काही वेळातच मेगाफोनवर एक टेप लागली.
अमरत्व बहाल करणारी जडीबुटीवाला बाबा गावात आलाय, ही वार्ता लगेचच वाऱ्यासारखी फैलावत सुटली.
बघता बघता गाडीभोवती गर्दी जमली.
बाबानं आपल्या सहकाऱ्याला खूण केली, आणि बाबाचं भाषण सुरू झालं.

मुक्तकसमाजप्रकटन