विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

सहज's picture
सहज in जनातलं, मनातलं
19 Feb 2011 - 8:15 am

संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ

एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर
चक्रवाल! एन्जॉय करा.

सिनेमाची सुरवात दाखवली आहे साल १९४७. मुद्दाम ब्लॅक एन्ड व्हाईट दृश्य आहे. सेठ मोहनदासजी एक मोठ्या बिझनेस सामाज्याचे मालक आहेत. पण त्यांनी आता धंद्यात लक्ष कमी केले आहे. त्यांचे दोन विश्वासु कर्मचारी चेयरमन व जनरल मॅनेजर - जवाहरजी व सरदारजी मोठ्या मेहनतीने धंदा सांभाळत आहेत. एक दिवस मोहनदासजी आपल्या बँकेत जातात, बँक मॅनेजर त्यांचे स्वागत करतो, सेठजी आप बहुत दिनोंके बाद इ चहापाणी होते. सेठजी विवंचनेत आहेत असे दिसते. झाले असे असते की सेठजींनी सर्व काम ऑथोराइज्ड सिग्नेटरी म्हणुन चेयरमन, जनरल मॅनेजर यांच्या हवाली केले असते. बरेच दिवसात बँकेत सेठजी आलेही नसतात. त्यामुळे अचानक ५५ कोटींचा चेक सेठजींनी वटवायला दिलेला पाहून मॅनेजर काय करावे हा विचार करत असतो. सेठजींनी मॅनेजरला गळ घातली असते की हा चेक थांबवायला कदाचित चेयरमन, जनरल मॅनेजर सांगतील पण तु थांबवु नकोस. मॅनेजर म्हणतो की आज मला विचार करायला वेळ द्या, इतके पैसेही आत्ता तयार नाहीत तुम्ही उद्या या. सेठजी त्याला आपल्या जुन्या संबधांचा वास्ता देउन निघतात.

मॅनेजर आपल्या अधिकार्‍यांना बोलावतो म्हणतो मला उद्यापर्यंत ५५ कोटी हवेत सोय करा कुठूनही आणा. आता हा अधिकारी एक नंबरचा गुंडा, स्वताच खाजगी गुंड बाळगुन वसुलिचे कंत्राट बँकेसाठी घेत असतो. तो लगेच आपल्या पित्तूना बोलवतो व समुद्र किनार्‍याच्या एका निसर्ग संपन्न अश्या गावातल्या मधल्या अळीत जबरदस्ती असेल नसेल ते पैसे, दागिने, मुल्यवान वस्तु लुटून आणतो. गावाला आग लावतो.

दुसरा दिवस उजाडतो, सेठजी येतात, मॅनेजर पैसे देतो. सेठजी तशीच गाडी पुढे नेत थेट जीनामहल गाठतो. मालक 'आओ मोहनदास' म्हणून जुन्या मित्राचे स्वागत करतो. सेठजी मालकाला पैसे देतो. दोघे निवांत नीरा पीत असतात. दोघांच्या हसण्यात पलीकडे सुर्य अस्तांगाला जात असतो. (सुंदर सिनेमॅटोग्राफी व दिग्दर्शन, अभिजात कला)

नविन ट्रॅक

इकडे त्या लुटल्या गेलेल्या गावातला मुथुराम आपले बाहेरगावचे मंथन शिबीर आटोपून येतो. बघतो तर सगळे भग्न, उध्वस्त गाव. पळत पळत घरी जातो तर घरासमोर जमाव असतो, आत खाटेवर आई विकलांग जखमी असते. बेटे तु आ गया. करत
क्या हुआ माँ, ये सब कैसे हुआ? ची उत्तरे फ्लॅश बॅक इ मधे दिली जातात. मुथुरामच्या कपाळाची नस उडत असते, डोळे डबडबलेले असतात. आईचा मोनोलॉग बरोबर रोलही संपला असतो त्यामुळे ती डोळे मिटून डायरेक्टर कट बोलायची वाट
बघत असते. इकडे नथुराम &^% चुन चुन के मारुंगा, एक एक को चुन चुन के मारुंगा| रिपीट मोड मधे म्हणतो, बंदूक घेतो व बॅंकेकडे निघतो. तेथे अधिकारी धोडगेवार त्याला स्वताचे खाजगी वसुलिचे बिंग फुटू नये म्हणून खरा गुन्हेगार धडम्मक, वसुलिची नावे न घेता, हे बघ हे मोठे लोक मोहनदास सेठ त्यांना हवा तेवढा हवा तेव्हा पैसा मिळवायला बँकामार्फत गोरगरीबांकडून पैसा वसुल करतात. आमचे हात बांधले गेले आहेत. मी काही करु शकत नाही. खरे गुन्हेगार हे सेठजी आहेत म्हणून टोटल गुमराह करतो.

पुढे सेठजी सकाळाचे हास्य योगाच्या क्लासला अन्य लोकांबरोबर जमले असता मुथुराम तिथे येतो, गोळ्या घालतो, पकडला जातो, खटला, शिक्षा. ह्याच वेळीस मुथुरामची पत्नी आपल्या पोटातील बाळाला या जालीम दुनियापासुन दूर वाढवायचे ठरवते. एका आदीवासीशाळेत शिक्षीकेचे नोकरी करायला जाते. योग्य वेळी पुत्ररत्न जन्माला येते, होनहार, स्वाभिमानी इ असतेच. कल्याणकरगुरुजींच्या आश्रमात मोठा होतो. (अभिनेता सनी देओल, उत्तम वक्तृत्व , मैदानी खेळ तरबेज, नियमीत सनातन विकासमधे कॉलम लिहणारा व म्हैलाप्रिय युवक )

एक दिवस माळ्यावरच्या ट्रंकेत त्याला काही कागदपत्रे सापडतात त्यात बरीच मोठी जायदाद, पुरखोकी हवेली जप्त केली आहे असे बँकेचे कागद दिसतात. तो आईला खोदून खोदून विचारतो. आई शेवटी नाईलाजाने सगळे सांगते. त्यावेळी सनी
ह्याचा छडा लावायचा हे ठरवतो.

नविन ट्रॅक

इकडे जीनामहाल मधे आता जीनाचा मुलगा झिया व त्याचा अतिशहाणा मुलगा मुशरर्फ त्या ५५ कोटीचे भरमसाठ व्याज घेउन गब्बर झाले असतात त्यामुळे पालथे धंदे अनलिमिटेड कंपनीच्या नावे बरेच गैरकानूनी धंदे करत असतात. त्याच वेळी सीन मधे डेव्हिस रेमंड हा अमेरीकन येतो. सगळे हात मिळवतात, गोदामात माल पोहोचल्याच्या खुशीत अनिवार्य डॅन्सपार्टी होते. (गोदामात माल पोहोचल्यावरची खलनायकानी अड्यावर दिलेली पार्टी व प्रोजेक्ट लाईव्ह गेल्यावर नेहमीच्या हॉटेलात प्रोजेक्ट मॅनेजरने दिलेली पार्टी यातला तात्त्वीक फरक माझ्या अजुन लक्षात यायचा आहे.) कोण बोंगळ चेहरा करुन हॅ हॅ हॅ करणार यात मुशरर्फ व डेव्हीस मधे स्पर्धा होते पण अपेक्षेप्रमाणे जुनाजाणाता झियाच जिंकतो. अगली कन्साईन्मेंट कधी येणार, देशात आतंकही आतंक व त्याच समुद्र किनार्‍याच्या खेडेगावातुन माल आणला जाणार इ इ चर्चा होत असताना, खणकन बाटली फुटल्याचा, पलीकडच्या खोलीतून आवाज येतो. त्याचे असे असते बघा की सनातन विकास मधे काम करणारा युवा पत्रकार ठणठणपा हे सगळे सबूत के तौर पर गोळा करुन पोल खोलण्यासाठी जात असताना बाटलीचा धक्का लागून आवाज होतो. अनिवार्य ती पळापळी होते, ठ्णठण पुढे गुंड मागे डाविकडे उजवीकडे होत भर रस्त्यात येतात. महिन्द्राच्या उघड्या जीप मधुन मुशरर्फ व डेव्हीस, ठणठणला गाठतात, कापतात. इथे मुशरर्फ व डेव्हीस भर रस्त्यात हमारे इरादोंके बीच जो भी आयेगा वो ऐसेही मारा जायेगा म्हणत असतात. (सीन ऐन रस्त्यात भर जमावासमोर चर्च व मशीदीच्या बॅकग्राउंडला असतो. प्रगल्भ दिग्दर्शकाचे राष्ट्रीय पुरस्काराला नामांकन पक्के)

अवघड कपड्यातील रिलॅक्स मैत्रीणीबरोबर कपड्यांपेक्षाही अवघडलेल्या डॅन्स् स्टेप्स करुन, नंतर मसुर उसळ खायला गेलेला सनी सर्व उरकून येतो. मगच त्याच्या मांडीवर मित्र शपथा घेववून प्राण सोडतो. सनी पुन्हा एकदा चवताळतो व यावेळी मात्र बदला घ्यायचे अगदी म्हणजे अगदी नक्की करतो. इकडे इराणमधुन भारतात पाईपलाईन यायच्या प्रकल्पावर शेख बिकाजानच्या मदतीने, सनी नोकरी मिळवतो.

सनी सरहद पलीकडे अन्य कामगारांबरोबर गेला असतो. १९८० च्या दशकातील सोनी हेडफोन वापरुन आपण कुठल्या लोकेशनला आहोत हे गावातील त्याच्या कॅफेमधे मित्रांकडून गुगल मॅपच्या सहाय्याने छडा लावून घेतो. हीच मुशरर्फ व
डेव्हीसने आलटून पालटून राखण करायला ठेवलेली अण्वस्त्रांचे गोदाम कम इंटरनॅशनल पाईपलाईन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची जागा असते. उध्वस्त गावाचा बदला , मित्राच्या खुनाचा बदला व पुर्वजांवरच्या अन्यायाचा खात्मा करायची संधी आलेली सोडेल तो सनी कसला..

मग परत गावात रथयात्रेने स्वागत होते. फटाके वाजतात. एवढ्यात...

एवढ्यात त्या आवाजाने की कसे नितीनला एकदम जाग येते. बघतो तर दुपारचे साडे चार वाजले असतात तो एका ब्राउझरमधे तीन टॅब उघडुन मसंस्थळे, गुगल मधे फिरत असतो. समोर देशाच्या सद्य स्थितीवर निराशाजनक धाग्यांची रेलचेल
असते. 'साला नौटंकी' म्हणत चहा सिग्रेट मारायला बाहेर एक अमृततुल्य कम रद्दीनारळ केंद्रावर जातो. चहा पिताना शेजारी बसलेला बिंद्राज हसतो म्हणतो, ~~नितीन मला किनै १९४८ मधे प्रकाशित झालेले 'फाळणी व १७ कोटीचा तिसरा हप्ता' हे श्री. खि. स. पाडे यांचे दुर्मीळ पुस्तक मिळाले.~~ नितीन ~नऽऽऽऽही~ आरोळी ठोकून पसार होतो!!

हे ठिकाणमांडणीसंस्कृतीनाट्यप्रवासवावरदेशांतरविनोदराहती जागावाङ्मयइतिहासविडंबनसमाजनोकरीजीवनमानभूगोलराजकारणमौजमजाचित्रपटछायाचित्रणविचारसंदर्भमाध्यमवेधअनुभववादआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

19 Feb 2011 - 8:33 am | नितिन थत्ते

हा हा हा.

=)) =)) =))

विकास's picture

19 Feb 2011 - 8:42 am | विकास

एकदम सहज छाप "चित्रपट (?) परीक्षण" आहे! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2011 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> एकदम सहज छाप "चित्रपट (?) परीक्षण" आहे!
असेच बोल्तो. च्यायला, सहजराव सर्वच काही समजले नाही.
चित्रपट पाहावा लागेल. ;)

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

19 Feb 2011 - 9:30 am | प्यारे१

आयचं.

हे कसलं 'सहज'....???

हे तर 'जाणून बुजून,मुद्दामहून'.

सुनील's picture

19 Feb 2011 - 9:32 am | सुनील

मस्त! अजूनही काही पात्रांचे उल्लेख आवडले असते!

प्रीत-मोहर's picture

19 Feb 2011 - 9:39 am | प्रीत-मोहर

मस्त हो!!!

सुहास..'s picture

21 Feb 2011 - 1:56 pm | सुहास..

हा हा हा !!

इन्द्र्राज पवार's picture

19 Feb 2011 - 9:59 am | इन्द्र्राज पवार

व्वा !! अगदी 'फाईव्ह स्टार' परिक्षण....आणि त्यामुळेच आता जरी ऑस्कर एन्ट्रीची तारीख नसली तरी २०१२ साठी क्लेम लावायलाच हवा !

ग्रेट ~ पण थोडेसे खाजगी, सहजराव : त्या बिंद्राजकडील ती "१७ कोटीवाली" तिसरी आवृत्ती पाहायला मिळण्याची काही [सुतराम म्हणतात तसली....] शक्यता आहे का?

(बिंद्राजच्या शोधात असलेला...) इन्द्रा

नगरीनिरंजन's picture

19 Feb 2011 - 10:05 am | नगरीनिरंजन

हा हा हा! भारी चित्रपट! पाहिल्यासारखा वाटतोय, पण त्यात मोहनदासची कंपनी नसून तो एका संस्थेचा विश्वस्त असतो आणि वाटणी मागणार्‍या आपल्या अनौरस मुलांसाठी संस्थेच्या खात्यातून ५५ कोटी काढतो अशी काहीशी कथा असल्याचं अंधुक आठवतंय.
बाकी बॉलीवूडी धर्तीवर 'सहज'पणे इकडून तिकडून मालमसाला उचलून विरंगुळ्यासाठी बनवलेला हा चटकदार चित्रपट हिट्ट आहे यात शंका नाही.

चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते ;)
बाकी जुन्याच पण सुप्पर डुप्पर चित्रपटाच तितकच सुप्पर डुप्पर परिक्षण. :)

रमताराम's picture

19 Feb 2011 - 11:43 am | रमताराम

काय एके-४७ चालवलीये राव. सटासट गोळ्या सुटतायत. लगे रहो. खी: खी: खी:

चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते

गणपाशी बाडिस.

अवांतरः शेख बिकाजानशी तुमची वैयक्तिक ओळख आहे का, नाही म्हण्जे आम्हालाही जरा 'इन्ट्रोड्यूस' करून द्या की राव.

अतिअवांतरः पाकिस्तानात हल्ली शिकवला जाणारा इतिहास पाहता नि आपल्या इकडच्या हल्लीच्या ब्रिगेड नि संघटनांची वाटचाल बघता चार एक्-दोन पिढ्यांनंतर तुमचा लेख इतिहास म्हणून शिकवला जाण्याची शक्यता बरीच आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2011 - 11:51 am | बिपिन कार्यकर्ते

इन्ट्रोडक्शन आमाला पन पायजेलाय! ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2011 - 11:50 am | बिपिन कार्यकर्ते

=))

अमित देवधर's picture

19 Feb 2011 - 11:51 am | अमित देवधर

जबरी दिसतोय सिनेमा!
बघावा लागेल.

आगायायाया!!! बाजार उठला रे =)) =)) =))
बिंद्राज ची प्रतिक्रीया वाचण्यास उत्सुक :) चित्रपटाक कोणी कोणाला पत्र बित्र लिहीले णाही काय ?

चिंतातुर जंतू's picture

19 Feb 2011 - 12:40 pm | चिंतातुर जंतू

समाजमनावर दीर्घकाळ राज्य करणार्‍या एका अभिजात कलाकृतीचे दर्दी रसग्रहण पाहून 'मराठी माणसाचे या जगात कसे होणार' या चिंतेतून आता मुक्त झालो आहे. फक्त एक सूचना करावीशी वाटते: कलाकृतीचे आधुनिकोत्तर स्वरूप स्पष्ट होण्यासाठी त्यातील घटनांचे विविध परिप्रेक्ष्यांतून घडणारे दर्शन कसे प्रत्येक वाचनातून काहीतरी नवेनवे उलगडून दाखवत असते आणि त्यामुळे विविध राजकीय विचारसरणींच्या आणि आर्थिक-सामाजिक स्तरांतल्या अनेकविध प्रेक्षकांची नाळ पिढ्यानपिढ्या त्याच्याशी कशी जुळत गेली आहे याविषयी थोडे अधिक विस्ताराने विवेचन असते तर आवडले असते.

असो. पुलेशु ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Feb 2011 - 10:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मानवी स्वभावांचे कंगोरे उलगडून सांगताना काहीशा जुन्या, बोथट तर थोड्या नवीन आणि ताशीव संवेदनांचा एकत्र धांडोळा घेणारं सदर कथानक हे विस्तार आणि विवेचनात, आधुनिक बेब्जच्या वस्त्राप्रावरणांप्रमाणे पुरेसं झाकणारं तसंच पारंपारीक, शालीन स्त्रीच्या शृंगाराप्रमाणे योग्य तितके पदर उलगडून दाखवणारं आहे. यातच सदर लिखाणाचं यश आहे अशी सामान्यतः कल्पना होऊ शकेल परंतू हा मर्यादित परिप्रेक्ष्यातून केलेला विचार असून, विवेचन आणखी हवेहवेसे वाटणे आणि तशी कल्पना घेऊन अभिजनवर्ग सामोरा येणे यात सहजअण्णांच्या लेखणीची ताकद समाविष्ट आहे असं आमचं मत आहे.

असो. पुप्रशु.

राजेश घासकडवी's picture

22 Feb 2011 - 9:22 am | राजेश घासकडवी

प्रस्तुत कृतीत मानवी स्वभावांच्या कंगोऱ्यांपेक्षा नियतीच्या हातातल्या खेळण्यांच्या, कठपुतळ्यांच्या हालचालींचं चित्रण वाटतं. बाहुल्यांचा खेळ पहात रंगून गेलेलं असताना मधूनच त्यांच्या हातांना बांधलेले धागे प्रकाशात लक्कन दिसावेत आणि ह्याचा कर्ता करवता कोण हे क्षणभरच जाणवावं, तितक्याच चतुराईने आणि तरलपणे लेखकाने हे सूचित केलेलं आहे. प्रतीकांचा अत्यंत प्रभावी वापर. पण आधुनिकोत्तरवादी कलाकृतींच्या साक्षेपी दृष्टीकोनाच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करत नाही असं वाटलं.

आत्मशून्य's picture

19 Feb 2011 - 1:10 pm | आत्मशून्य

नसल्याने ह्या चीत्रपटाला ओस्कर भेटणार हे नक्की. मूजीक्साठी तर भेटणारच भेटणार.

नरेशकुमार's picture

19 Feb 2011 - 1:22 pm | नरेशकुमार

ष्टोरी झॅक आहे.

कुंदन's picture

19 Feb 2011 - 2:06 pm | कुंदन

नान्याने "डोक्यात..." मध्ये सहजरावांचे नाव टाकण्यापुर्वी , सहजरावांनी लवकर धडा घेउन लेख टाकलेला दिसतोय

स्वाती२'s picture

19 Feb 2011 - 5:33 pm | स्वाती२

लै भारी!

प्रियाली's picture

19 Feb 2011 - 6:06 pm | प्रियाली

मस्त, आधुनिकोत्तर कथा वाटली. ;)

तेथे अधिकारी धोडगेवार त्याला स्वताचे खाजगी वसुलिचे बिंग फुटू नये म्हणून खरा गुन्हेगार धडम्मक, वसुलिची नावे न घेता, हे बघ हे मोठे लोक मोहनदास सेठ त्यांना हवा तेवढा हवा तेव्हा पैसा मिळवायला बँकामार्फत गोरगरीबांकडून पैसा वसुल करतात. ...... त्याच वेळी सीन मधे डेव्हिस रेमंड हा अमेरीकन येतो.

हीहीहीही! कथेत परदेशस्थ सर चार्ल्स यांचा हात कसे विसरलात? हे डेव्हिस रेमंड कोण कडमडले? ;-)

सनी सरहद पलीकडे अन्य कामगारांबरोबर गेला असतो.

हेहेहेहे! कशाला? प्रगल्भ व्ह्यायला?

क्लायमॅक्शमधला एक प्रसंग राहिला बघा. सन्नी नास्तिक असतो. त्याला देवाधर्माच्या नावाची शिसारी असते आणि मग क्लायमॅक्शच्या वेळेला त्याला साक्षात्कार होतो. मंदिरातल्या घंटा टणाटणा वाजू लागतात. सर्व गुन्हेगारांच्या गोळ्यांचे नेम चुकू लागतात आणि सन्नी आस्तिक होतो. (काहीजणांच्या भावना दुखावल्या असतील तर आस्तिकाचे नास्तिकही चालेल - आपल्याला जाम फरक पडत नाही.)

श्रावण मोडक's picture

19 Feb 2011 - 7:14 pm | श्रावण मोडक

हुच्च धागा आहे.

हा खरा डोक्यात तिडिक आणणारा मिपाकर - लिहिता येत असुन न लिहिणारा !!

निखिल देशपांडे's picture

21 Feb 2011 - 1:55 pm | निखिल देशपांडे

हा खरा डोक्यात तिडिक आणणारा मिपाकर - लिहिता येत असुन न लिहिणारा !!

+१ असेच म्हणतो.

भडकमकर मास्तर's picture

20 Feb 2011 - 12:15 am | भडकमकर मास्तर

वेगवान कथानक...
अनिल शर्मा ( गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली....)..

विनोद नाही , पण अनिलभाई अशाही स्टोरीवर सिनेमा बनवतील असे वाटते...

चर्च आणि मशिदीमधला रस्त्यावरील तुफान हाणामारीचा सीन आअवडला...

मुक्तसुनीत's picture

20 Feb 2011 - 8:41 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो ! लई भारी ! :-)

Nile's picture

20 Feb 2011 - 9:48 am | Nile

कल्पना आवडली. अजुनही काही पात्रं अन प्रसंग आणता आले असते असे वाटते. ;-)

धनंजय's picture

20 Feb 2011 - 10:30 am | धनंजय

वेगवान कथानक!

वपाडाव's picture

24 Feb 2011 - 4:47 pm | वपाडाव

गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली...

त्या अफलातुन चित्तरपटाचे नांव आहे - द हिरो _ लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय
आणी झिंटा आजी पण आहेत त्यात.

बाकी . अनिल शर्माहुन खास कथानक.
गोवारीकरांच्या तोडीचं. बेष्ट.

उपास's picture

20 Feb 2011 - 7:37 am | उपास

सहजराव मस्त ठोकलत..
पण एकंदर ष्टोरी लाईन बघता आम्हाला आमच्या लाडक्या अमिताभचा 'अग्निपथ' आठवला.. बाप चित्रपट आणि जब्बरीच काम सगळ्यांची.. अगदी कांचा चिना सुद्धा :)
लगे रहो!

सहज रावांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक.
:)

अभिज्ञ.

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Feb 2011 - 9:41 am | ब्रिटिश टिंग्या

लै भारी! :)

सविता००१'s picture

21 Feb 2011 - 1:40 pm | सविता००१

लै भारी!

धमाल मुलगा's picture

21 Feb 2011 - 3:32 pm | धमाल मुलगा

साक्षात सहजरावांनी म्यान करुन ठेवलेली लेखणी (हे आपलं...कळफल्लक) पुन्हा परजला आणि तमाम 'स्क्रीनप्ले' वाल्यांना थंडीतापानं ग्रासलेलं आहे असं आमचा वार्ताहर कळवतो. :)

ओ सहजराव,
आता फुडचा शिन्मा येऊंद्या.. 'आदर्श के शोले' नाहीतर 'जेपीसी का त्रिशूल' ;)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Feb 2011 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त हो तेंडूलकर.

स्पंदना's picture

21 Feb 2011 - 9:09 pm | स्पंदना

अरे वा! कुठल्या कुठ गेली इश्टोरी . एक्दम लटांबर संग घेतल्यागत मल्टी कास्ट बनवावा लागेल ना हा पिक्चर?

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Feb 2011 - 9:59 am | llपुण्याचे पेशवेll

लै भारी हो सहजराव. :)

स्वाती दिनेश's picture

23 Feb 2011 - 12:50 pm | स्वाती दिनेश

हे राहिलं होतं वाचायचं...
गणपाने म्हटल्याप्रमाणे सहजरावांचे गिफ्ट हँपर हुकले असले तरी आम्हाला ह्या परिक्षणाद्वारे गिफ्ट मिळाले आहे, :)
मस्त !!!
स्वाती

गुंडोपंत's picture

24 Feb 2011 - 8:53 am | गुंडोपंत

खतरा ष्टोरी लिहिली की राव!
जबरी लिहिता बरं का तुम्ही.

एवढ्यात त्या आवाजाने की कसे नितीनला एकदम जाग येते. बघतो तर दुपारचे साडे चार वाजले असतात तो एका ब्राउझरमधे तीन टॅब उघडुन मसंस्थळे, गुगल मधे फिरत असतो. समोर देशाच्या सद्य स्थितीवर निराशाजनक धाग्यांची रेलचेल
असते. 'साला नौटंकी' म्हणत चहा सिग्रेट मारायला बाहेर एक अमृततुल्य कम रद्दीनारळ केंद्रावर जातो. चहा पिताना शेजारी बसलेला बिंद्राज हसतो म्हणतो, ~~नितीन मला किनै १९४८ मधे प्रकाशित झालेले 'फाळणी व १७ कोटीचा तिसरा हप्ता' हे श्री. खि. स. पाडे यांचे दुर्मीळ पुस्तक मिळाले.~~ नितीन ~नऽऽऽऽही~ आरोळी ठोकून पसार होतो!!
हे फार आवडले ;)