(वळण)

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
29 Mar 2020 - 6:37 pm

(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत

तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस
*
देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही
तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते?
पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर
शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास
तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या
चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस?
भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली
परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?
बाकी टिटवीला विचारलस का रे कधी तिलाही तिच्या
बकुळीकडे परतण्याची कोणा मोराला भेटण्याची आसं नाही ना ते ?
असे जिव्हारी लागणारे प्रश्न विचारण्यात चिमण्या आणि टिटव्या
तशा मागेच असतात म्हणून का कावळे आणि पोपट प्रश्न विचारायचे सोडतात?

आयुष्याचा हिशेब
बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी, आणि थेरडेसुद्धा
तुझ्या सोबत झालेल्या आणाभाकांपेक्षा अधिक मुल्यवान
आणाभाका घालण्यात आणि मनाजोगते करवण्यात तरबेज असतात
(* त्याक्षणी तुझ्या सोबतचे वळण टाळून मी मात्र म्हतारीचे वळण स्विकारले :))
वळणा वळणातला जनरेशन गॅप, COVID 19 आणि वीषाणूंच्या माध्यमातून निसर्गाने ने पुसण्यास घेतलेला, देव स्विकारला नाकारला तरी निसर्ग त्याची वळणे घेतो ती अशी!)
पण आयुष्याचे असेच असते
वेली आणि फांदीचे
कावळा चिमणीचे
दोन ओंडक्याचे नाते
कुठ पर्यंत याचे उत्तर
विधीलिखीत नाकारले
तरी कळणार नसते
देव नाकारले तरी
निसर्गा सोबतचे अद्वैत
टळणारे नसते
तो शेवटचा अद्वैताचा गाव
तिथे बहुतेक सगळे
उपाशी पोटी आणि कंगाल
अवस्थेतच पोहोचतात
कंगाल** न होण्याच्या आणाभाका
गुलमोहराच्या तळाच्या
ओट्यावर सोडल्या तरीही

आयुष्याचा हिशेब
बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी,
खुणावत रहाते
आणि आठवणीत बहरलेल्या
गुलमोहराची आठवण करणारे
भुकेले आणि कंगाल **
भेदरलेल्या नवरीचे रुप घेऊन
चिमणीचा घास केलेल्या सखयांना
साद देऊ लागतात
पण काळाची फांदी वठणं
निसर्गाला केव्हा टाळता आलय?
पण गौतमाच्या बोधीवृक्षाने
त्याच्या पानांवर
रेग्यांच्या सावित्रीने
पुस्तकातनं या निसर्गचक्राचे अटळ असणे
लिहून ठेवले आहे.
आपल्या आठवणीत बहरलेला
गुलमोहर आता वठण्यास आलाय
आणि त्याचे काळाच्या आडजाणे
आणि तिथेच कालांतराने नवा गुलमोहर बहरणे
आणि त्या गुलमोहरा खाली नवे कावळा चिमणीचे
आणि हो टिटव्या आणि मोरांचेही खेळ
होतील त्यातील रम्य आठवणीच्या अद्वैतात हरवून जा
लागलेच तर तुझ्या स्वत:च्या आंगणातच
बकुळीच्या झाडाला पालवी असेल तर
तिची काही पाने मागवून घे
किंवा टिटवी सोबत आणा भाका घेताना
टांगलेल्या दिव्व्या सारख्या दिव्वा पुन्हा लाव
जिच्या बकुळीच्या बहराचा
सॉरी शहरी दिव्व्या खालच्या मोहरांचा
कदाचित तुला विसर पडलाय
तिला एक अद्वितीय अलिंगन दे
आणि बहरलेल्या गुलमोहराची आठवण करत
झडून जा.

** चाँदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल
एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल

(ह. घ्या. हे पुन्हा सा.न.ल. ---- प्रेर्ना अर्थातच)

**

gholmiss you!अदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरसप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजा

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 5:23 pm | रंगीला रतन

साहेब, प्रेर्ना आणि विडंबनाचा काय संबंध आहे ते जरा इस्कटुन सांगाल का? अजाबात काय कल्ला नाय!

माहितगार's picture

30 Apr 2021 - 5:19 pm | माहितगार

:)

(प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.)

मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा.

बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.