परिपक्व
जाणीव एक कोण्या बीजापरीस असते
संवेदना फळाची शाखेस भार नसते
गंधास स्वाद जेंव्हा परिपक्व फूल होते
शब्दात भावना अन सारीतेसामान झरते
त्या ओढ अर्पणाची समिधा समर्पणाची
व्हावा तृषार्थ कोणी आकंठ तृप्त ह्याची
………………… अज्ञात
जाणीव एक कोण्या बीजापरीस असते
संवेदना फळाची शाखेस भार नसते
गंधास स्वाद जेंव्हा परिपक्व फूल होते
शब्दात भावना अन सारीतेसामान झरते
त्या ओढ अर्पणाची समिधा समर्पणाची
व्हावा तृषार्थ कोणी आकंठ तृप्त ह्याची
………………… अज्ञात
चीत्कला चपळ चमके गगनी
स्वर उमड घुमड घन प्रतिध्वनी
थरकापे अवनी तपोवनी
डोळ्यात आंसवे विद्ध मनी
काळीज तळी अवखळ पाणी
जळ खळाळे विकल होवोनी
अस्वस्थ मेघ धावे कोणी
चातक चोचीत शुष्क रमणी
वेदना सखी मिरवे अंगी
श्रम दाह शमे ना एकांगी
शिडकावा तनभर भावुकसा
व्हावा अमृतमय शतरंगी
……………. अज्ञात
सालस थंडी लालस डोळा गंध मदनमय घोटाळा
समिर नव्हाळा करतो चाळा झुळझुळतो मद लडिवाळा
एकल बेटावरती फिरतो खग पक्षांचा नभ मेळा
पाउल पाउल नटल्या वाटांवर झुलवी मन हिंदोळा
वेस क्षितीजाची असीमच माणुस ऐसा भव भोळा
कसा पुरावा पुरवावा हा नाही ठावे वानोळा
कुणा पुसावे काय करावे भरे न ओंजळ जीव खुळा
कल्लोळांचे लोळ अचानक राशीवर झाले गोळा
.......................अज्ञात
गूढ धीर गंभीर मेघदळ स्तब्ध अचल का वारा ?
चंचल मन बेभान चिंतनी पहाटेस पट कोरा
रुधिराचे घर विषम स्वरांचे हृदयी अलख चकोरा
अंतर्यामी कल्लोळांचा सागर उसळे खारा
नकोच वाटे पण ना त्यजवे कर्तव्याचा तोरा
आस आंसवे अभिलाषेची गोचिड सम अंगारा
पंख निखळले मिटले डोळे अंध दिशा धांडोळा
ना कळते आकळते मग हा जन्म कसा वानोळा ?
........................अज्ञात
पहिले ठिगळ मि.का. च्या कवितेला.
वरिगिनल कविता <a href="http://www.misalpav.com/node/17298" title="प्रलय">प्रलय</a>
शंख करत माझ्या नावाचा
बाप धावतो मागे मागे
गुणपत्रक ते बघता बघता
नेत्र तिसरा उघडु लागे
अकडा मोठा बॅकलॉगचा
तरी भटकतो मित्रांसंगे
लेक्चर बुडवुन कट्ट्या वरती
रात्रं दिन करीतसे दंगे
निर्लज्ज हात पुढे पसरतो
पॉकेटमनी संपताच तो
छळायस जन्मला कारटा
हताश बाबा करवदतो
मग
पुसू पहातो पुसू शके ना अवकाशातिल मेघ दळे
उचंबळे तळ लाटेवरती अस्पर्शच पण चंद्र खळे
फुटे किनारा व्रण काठावर कातळ अविचल स्वर आदळे
घोंघावे वारा माडातुन वय झालेले गोत गळे
.................... अज्ञात
धुके सभोवर मन काठावर
गूढ प्रभात रुपेरी
भास आभासे असलेलेपण
भ्रामक दुनिया सारी
दंव; लव तृण पानांवर पसरे
अगाध नीर पथारी
गंध मोकळा मातीचा
असमंती घेई भरारी
कोण संग तो कुणा व्यापतो
अगतिक आभा चकोरी
नील आकाशी पाचू रानी
नवथर हिव अंबारी
………………. अज्ञात
देशाच्या प्राक्तनाचे
लिलाव जवळ येताच
भावी विधात्यांची
स्वप्नांची दुकानं
पॉश एरीयातल्या
आर्ट गॅलरीतली
कोलाज बनून सजतात
गूढ, अगम्य, गुंगवणारी
पण प्रेक्षणीय
आणि चक्क श्रवणीयही
तेव्हां..
टाळ्या पिटायला
आख्खी धारावी धावते
आणि वाट पाहते
पुढच्या शो ची
पुन्हा पाच वर्षांसाठी
- संध्या
१७.९.१३
(चाल- किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला -)
"किती अडवू मी अडवू कुणाला, आज सिग्नलहि का बंद झाला
द्या हो बाजू चला, रस्ता सोडा मला" - आला ओरडत पोलीस आला .....
पावसाळी खड्ड्यांत, रस्त्याच्या काठी, पोलीस अवतरले
नाही हसू गालात, नाचवती चिखलात, सर्वजण कुरकुरले
पोलीस दिसतो दुरून, शिट्ट्या झाल्या फुंकून, साऱ्या ट्र्याफिकचा गोंधळ झाला .....
पोर लहानमोठी ही, म्हातारी कोतारी, भ्यालेत सर्व किती
कुणी इथे गाड्या, कुणी तिथे गाड्या, पब्लिकला नाही भिती
दहा गाड्या धडकून, पाचमध्ये अडकून, तोंड भरूनी फेसच आला .......
अजाणता जाणले कसे
इप्सित शब्दांनी मनातले
भातुकलीने लक्ष्य वेधले
गतकाळात विखुरलेले
चिमणी पोपट बुलबुल आदी
सवंगडी सारे जमले
चित्त हरखले हरली चिंता
वय उरले शैशवातले
बडबडगाणी हिरव्या रानी
राज्य परीचे सापडले
नितळ मोगरी अवकाशावर
बाळ निरागस बागडले
…………… अज्ञात