तहान

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
11 Oct 2009 - 6:31 am

कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ
प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन
काल आम्हीही पाठवला
मुद्दाम तयार केलेला एक मेघ
प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे
आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता.
काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर?
आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच!
व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ.
आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल.
त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे,
बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे.
तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा,
तो तुला काय कामाचा?
आम्ही तो घेऊन दुषीत करायला लवकरच येत आहोत.

---------------------------------

प्रवासवावरदेशांतरमुक्तकसमाजजीवनमानतंत्रराहणीविज्ञानअर्थकारणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सहज's picture

11 Oct 2009 - 7:16 am | सहज

नासाचा चंद्रावर स्फोट!

मी वाट बघतोय कुठला भारतीय राजकीय नेता, चंद्रावरुन त्याच्या वार्डात पाइपलाईन टाकायची घोषणा करणार :-)

क्रान्ति's picture

11 Oct 2009 - 8:28 am | क्रान्ति

त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे,
बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे.
तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा,
तो तुला काय कामाचा?
आम्ही तो घेऊन दुषीत करायला लवकरच येत आहोत.

खरंच खास लिहिलंय! इतक्या मोजक्या शब्दांत मांडलंय केवढं मोठं सत्य!
क्रान्ति
अग्निसखा

श्रावण मोडक's picture

11 Oct 2009 - 11:43 am | श्रावण मोडक

+१

ज्ञानेश...'s picture

11 Oct 2009 - 1:07 pm | ज्ञानेश...

आवडली कविता!

"Great Power Comes With Great Responsibilities"

स्वाती२'s picture

11 Oct 2009 - 5:39 pm | स्वाती२

+३