जिद्द - मराठी माणसांची

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
31 Jul 2009 - 2:29 pm

* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही.

* छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो.

* मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे.

* एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे.

असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधेही आहेत अन आत्ताआत्तापर्यंत मीही त्याला फारसा अपवाद नव्हतो. (तेव्हा आपले अनेक छंद, व्याप सांभा़ळुन मिसळपाव नावाचे सुपरडुपर हिट लोकप्रिय हॉटेल चालु करणार्‍या अन एव्हढा मोठा पसारा निर्माण करणार्‍या महामहिम तात्या अभ्यंकर यांच्याबाबत मला माहिती नव्हते.) अन म्हणुनच जेव्हा आधी विवेक इनामदार अन नंतर हृषिकेश तपशाळकर या माझ्या दोन मित्रांनी त्यांच्या चांगल्या नोकर्‍या सोडुन व्यवसायात उडी मारली अन जेव्हा सगळीकडे विवेक अन हृषिकेशने आत्यहत्या करण्याचाच निर्णय घेतलेला दिसतोय अशी चर्चा सुरु झाली तेव्हा मला फारसे काही वाटले नाही.

विवेक अन हृषिकेश - दोघेही माझे खूप जवळचे मित्र. विवेक पत्रकारीतेचा कोर्स करताना मझा वर्गात होता तेव्हापासुन त्याची अन माझी मैत्री. हृशिकेश त्यानंतर दोन चार वर्षांनी भेटला अन नंतर घट्ट मित्र झाला. विवेक तळेगावचा तर हृषिकेश निगडीचा. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातले अन दोघेही कष्टाळु. दोघांचाही प्रचंड जनसंपर्क. विवेक बातमीदारीतला किडा - आम्ही त्याला पिंपरी-चिंचवड सम्राट असे म्हणायचो. हृशिकेश न्युज फोटोग्राफर, छायापत्रकार. कर्ण जसा कवच कुंडले घेऊन जन्माला आला तसा हा कॅमेरा घेऊन आलेला असावा असे आम्ही म्हणायचो एव्हढी त्याची फोटोग्राफीची कुवत अन त्याशिवाय बातमीची जाणही उत्तम. असे हे दोघेजण, जवळपास पंधरा-वीस वर्षे कष्ट करुन आपापल्या क्षेत्रात उच्चपदावर पोहोचलेले अन चांगला पगार असलेले. त्यांच्याबरोबर जवळपास बारा वर्षे नोकरी केल्याने माझे दोघांशीही भावनीक नाते जुळलेले.

त्यामुळेच हृषिकेशची अस्वस्थता मला समजु शकली. २००७ पासुनच हृषिकेश बेचैन होता. काम व्यवस्थित सुरु होते पण त्याची अस्वस्थता जाणवायची. "मला नोकरी करण्याचा कंटाळा आलाय रे. स्वतःचे काहीतरी करायचेय मला आता," तो मला सांगायचा अन मी त्याला "अरे असे करुन कसे चालेल. तुझ्यावर जबाबदार्‍या आहेत. धंदा म्हणजे खायची गोष्ट आहे का? त्याला पैसा लागतो तो आपल्याकडे आहे का? जरा शांत हो. अ‍ॅडजस्टमेंटतर सगळ्यांनाच कराव्या लागतात," असे समजवायचो. खरेतर त्याला वाटत होती तशीच अस्वस्थता मलाही वाटत होती पण मी स्वतःलाही असेच समजावत होतो. एकदा पुर्वी अनुभव घेतला होता - आत्माराम कांबळे नावाच्या मित्राने १९८९-९० मधे स्वतःचे साप्ताहिक काढले तेव्हा त्यात सामिल झालो पण त्यात फार पैसे मिळतील असे न वाटल्याने काही महिन्यातच नाद सोडुन गप नोकरीला लागलो होतो. त्यामुळे पुन्हा प्रयत्न करण्याचे धाडस होत नव्हते.

पण हृशिकेश मात्र अस्वस्थच राहिला. त्याने नोकरी बदलुन पाहिली. त्याने नोकरी सोडली त्यानंतर काही दिवसातव मी पण नोकरी सोडली अन माझे गुरु अन काही ज्येष्ठ सहकारी एक इंग्रजी साप्ताहिक काढण्याच्या उद्योगात गुंतले होते त्यांना सामिल झालो. हृषिकेश सतत संपर्कात होता अन त्याचा विचार पिंपरी-चिंचवड भागात एक पेपर काढण्याचा होता. आमच्या प्रोजेक्टला फायनान्सर मिळालेला असुनही बरेच प्रश्न येत होते अन ते पाहुन हृशिकेशला तो नाद सोड, किंवा असा प्रोजेक्ट केला तर काहीतरी टुलकिट ऑपरेशन पण सुरु कर. सध्या नोकरी न सोडता प्रोजेक्ट चांगला सुरु झाला की सोड असे (विझवटे) सल्ले मी देत राहिलो. दरम्यान हृशिकेशच्या डोक्यात अजुन एक कल्पना आली - पिंपरी-चिंचवड भागातल्या बातम्या अन लेखांना वाहिलेले एक वृत्तसंस्थळ काढण्याची. लगेचच त्याने डोमेन स्पेस खरेदी पण केली. त्याच्या डोक्यात वृत्तसंस्थळाला द्यायला नावपण तयार होते - माय पिंपरी चिंचवड डॉट कॉम (www.mypimprichinchwad.com ).

एकदा एव्हढी तयारी झाली अन हृशिकेश वेगाने कामाला लागला. त्याच्या डोक्यात होते कम्युनिटी ई-पेपर काढायचे. तसे प्रयोग पुर्वी कुठे-कुठे झालेत याचा शोध त्याने सुरु केला. जगभरच्या ए-पेपरचा अभ्यास केला. अन वेब पेजची टेंपलेटस बनवली.

त्याकाळात (२००८ च्या सुरुवातीला) हृशिकेश माय पिंपरी चिंचवड डॉट कॉमप्रो़जेक्टमयच झाला होता. रोज सोळा तास तो नोकरीकरता काम करायचा अन त्यानंतर प्रोजेक्टवर. फायनान्शिअल फिजिबिलीटी, अ‍ॅडव्हर्टायझिंग प्रॉबेबिलिटी, एडीटोरियलचे कम्युनिकेशन पॅकेज हेच विषय त्याच्या बोलण्यात कायम येत. त्याच्या अश्याच बोलण्यातुन कळले विवेक पण त्याला सामील होणार होता अन दोघे मिळुन नवा प्रोजेक्ट करणार होते. "बघ रे बाबा. संभाळुन. नोकरी सोडु नको. जे काही करायचे ते नोकरी सांभाळुन. जम बसल्यावर मग सोड नोकरी वाटल्यास," माझे विझवते सल्ले त्याला मिळतच होते. पण हृषिकेश अन विवेक ठाम होते. दरम्यान त्यांना योगेश वाणी नावाचा आणखी एक मित्र सामील झाला. त्यांनी भांडवल जमा केले अन प्राथमिक सेटअप उभाही केला. १६ एप्रिल २००८ ला त्यांच्या पिंपरी-चिंचवड इन्फोमिडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. सात मे २००८ ला आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कंपनीचे औपचारिक उद्‌घाटन झाले. २२ जुलै २००८ ला महापौर अपर्णा डोके व महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांच्या हस्ते पोर्टलचेपण उदघाटन झाले.

अन ऑगस्ट २००८ मध्ये पुण्यातल्या पत्रकारितेत एकदम वादळ उठले. लोकसत्तामधे १६ वर्षे नोकरी केल्यानंतर विवेकने पिंपरी-चिंचवड विभाग मुख्य वार्ताहर या पदावरुन राजिनामा दिला होता, माय पिंपरी चिंचवड डॉट कॉम या वेबपोर्टलमध्ये तो १ सप्टेंबरपासुन जॉईन झालापण. सगळीकडे एकच चर्चा, "विवेकचे बहुधा डोकं फिरलंय. चांगली नोकरी सोडली. हे न्युजपोर्टल वगैरे काही खरे नाही. हे सगळे अळवावरचे पाणी." नोकरी, एव्हढ्या वर्षात जमवलेले सर्व पैसे असे पणाला लावण्याला दोघांच्याही कुटुंबियांकडूनही तीव्र विरोध झाला पण त्यांना कुटुंबियांना समजावण्यात यश आले.

वेबपोर्टल सुरू तर झाले पण त्याची माहिती लोकापर्यंत पोहचविणे मोठे आव्हान होते. होर्डिंग्ज, पोस्टर्स लावून किंवा वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन ब्रँडिंग करण्याएवढी आर्थिक ताकद नव्हती. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे माऊथ पब्लिसिटीवरच भर दिला. इतर माध्यमांपेक्षा लवकर व सविस्तर बातमी हे पोर्टल देऊ शकते, हे जनमानसावर बिंबविण्यासाठी वेबपोर्टलवरच्या ठळक बातम्यांचे एसएमएस आमच्या स्वतःच्या मोबाईल फोनवरून लोकांना केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला तश्या वेबपोर्टला हिट्स पण वाढू लागल्या. अन मग एसएमएसचा प्रभावी वापर करण्यासाठी या मंडळींनी आवश्यक ती संगणक प्रणाली मिळवली. त्यामुळे ३६ पैसे प्रति एसएमएस हा दर त्यांना मिळाला. जसजसा प्रतिसाद वाढत गेला तसतसे एमपीसी अपडेट व पुढे एमपीसी न्यूज हे स्वतंत्र ब्रँड प्रस्थापित झाले. आता ही सेवा २० हजार जण घेतात अन ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

लवकरच या डेटाबेसचा वापर करून पिंपरी-चिंचवड इन्फोमिडिया प्रायव्हेट लिमिटेड एसएमएस जाहिरात क्षेत्रातही शिरले. शिवाय पब्लीसीटी व पीआर कन्सल्टन्सीपण सुरु झाली. त्यातून खर्चाची हातमिळवणी करणे सोपे होत गेले. दरम्यान मार्च्-एप्रिल २००९ च्या सुमाराला हृषिकेशनेपण नोकरी सोडली अन पिंपरी-चिंचवड इन्फोमिडिया प्रायव्हेट लिमिटेड करता पुर्णवेळ काम सुरु केले.

हे करत असताना त्यांना बरेच प्रश्नांचा सामनाही करावा लागला. पण शेवटी जिद्दीचा विजय होतोच ना?

रविवारी मी एका मीटींगमधे होतो अन मला विवेकचा एसएमएस आला, "माय पिंपरी-चिंचवड डॉट कॉमला एक वर्षात दोन लाख हिट्स मिळाल्या आहेत. या हिट्स केवळ पिंपरी-चिंचवड व शेजारच्या पुणे शहरातूनच नव्हे मुंबई, दिल्ली एवढेच नव्हे तर जगातील १४ देशांमधील ८० शहरातून मिळालेल्या आहेत."

हे वाचले अन माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. जगभर सुरु असलेल्या मंदीच्या लाटेविरुद्ध माझ्या मित्रांची झूंज यशस्वी ठरत आहे याचे समाधान तर वाटलेच पण एक खंतावणारा विचारही मनी आला. मी जे विझवते सल्ले दिले त्या ऐवजी हृषिकेशला २००७ पासुनच जर प्रोत्साहन दिले असते तर मंदी सुरु होण्याआधीच त्याच्या व्यवसायाचा जम बसला असता का?

वाङ्मयमुक्तकसमाजनोकरीजीवनमानप्रकटनविचारलेखमाध्यमवेधअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

31 Jul 2009 - 3:03 pm | क्रान्ति

आपल्या मराठी मित्रांच्या जिद्दीचं आणि झुंजीचं कौतुक वाटलं. वर लिहिलेले मराठी माणसाबद्दलचे समज मराठी माणसानं अलिकडच्या काळात बर्‍याच प्रमाणात खोटे ठरवले आहेत. नोकरी एके नोकरी आणि तीही त्यातल्या त्यात सुरक्षित-संरक्षित या चाकोरीतून बाहेर पडतोय आणि नव्या नव्या आव्हानांना सामोरा जातोय मराठी माणूस आता. त्यामुळे अशी नव्या क्षेत्रात उडी घेणार्‍या मराठी माणसाला आपण प्रोत्साहन जरी देऊ शकलो, तरी बरंच काही मिळवलं असं समजायला हरकत नाही. तुमची खंत पण पटली, पण योग्य वेळ आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत! :) त्यातही मंदीच्या लाटेत यशस्वी झुंज देणं हे किती मोलाचं आहे! या आपल्या मित्रांची या लेखाच्या माध्यमातून ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

विशाल कुलकर्णी's picture

31 Jul 2009 - 3:33 pm | विशाल कुलकर्णी

असेच म्हणतो, तुमच्या मित्रांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला लाखो सलाम !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

चकली's picture

31 Jul 2009 - 9:33 pm | चकली

साइट छान आहे. मला खात्री आहे, की धंदे जसे जास्त ज्ञान साधने वर अवलंबून होतील तशी कष्टाळू आणि प्रामाणिक माणसे वर येतील.

चकली
http://chakali.blogspot.com

सहज's picture

31 Jul 2009 - 3:10 pm | सहज

तुमच्या मित्रांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा!

शेवटचा परिच्छेद बोलका!

विसोबा खेचर's picture

31 Jul 2009 - 4:04 pm | विसोबा खेचर

तुमच्या मित्रांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा!

हेच बोल्तो...

आपला,
(मराठी) तात्या.

ज्ञानेश...'s picture

31 Jul 2009 - 3:14 pm | ज्ञानेश...

तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन.
एक चांगला प्रेरणादायी लेख दिल्याबद्दल आभारी आहे.

"Great Power Comes With Great Responsibilities"

श्रावण मोडक's picture

31 Jul 2009 - 3:15 pm | श्रावण मोडक

दोन मराठी माणसे व्यवसाय करतात. त्यात यशस्वी होतात आणि त्यांच्याविषयी तिसरा मराठी माणूस भलं बोलतो... विरळा अनुभव. आगे बढो...

एकलव्य's picture

31 Jul 2009 - 3:40 pm | एकलव्य

टाळ्या वाजवतात... विरळा अनुभव!

चांगला विचार करायला लावणारा लेख. धन्यवाद!

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2009 - 1:05 am | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो...

बिपिन कार्यकर्ते

अजय भागवत's picture

2 Aug 2009 - 9:02 am | अजय भागवत

+१
माझ्या मनातलं बोललात!

शितल's picture

31 Jul 2009 - 4:04 pm | शितल

मराठी पाऊल पडते पुढे..:)
अभिनंदन तुमच्या मित्रांच्या जिद्दीचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे. :)

प्रकाश घाटपांडे's picture

31 Jul 2009 - 4:29 pm | प्रकाश घाटपांडे

हे सल्ले काळजीपोटी / हितचिंतनापोटी होते. तरी परस्परांमुळे उत्साह वृद्धींगत होत असतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jul 2009 - 7:59 pm | llपुण्याचे पेशवेll

जिद्दीचा विजय होतो हेच खरे.
तुमच्या मित्रांचे अभिनंदन.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

सुनील's picture

31 Jul 2009 - 8:19 pm | सुनील

साइट पाहिली. उत्तम वाटली. तुमच्या मित्रांचे कौतूक वाटते. त्यांना शुभेच्छा!

आणि हो, त्या विझवत्या सल्ल्यांबद्दल फार वाईट वाटून घेऊ नका. ज्याचा शेवट चांगला ते सगळे चांगले, हेच खरे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टुकुल's picture

31 Jul 2009 - 9:11 pm | टुकुल

साइट एकदम मस्त आहे.. रोज बातम्या वाचुन हिट काउंट वाढवतो आता..

--मराठमोळा, टुकुल.

मदनबाण's picture

1 Aug 2009 - 7:42 am | मदनबाण

तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

भडकमकर मास्तर's picture

1 Aug 2009 - 9:06 am | भडकमकर मास्तर

विवेक इनामदार आणि हृषिकेश तापशाळकर यांचे अभिनंदन....
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दशानन's picture

1 Aug 2009 - 10:27 am | दशानन

तुमच्या मित्रांच्या जिद्द आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक वाटते. दोघांचे अभिनंदन.

+++++++++++++++++++++++++++++

राजू's picture

1 Aug 2009 - 3:10 pm | राजू

=D> तुमच्या मित्राचे अभिनंदन...संकेतस्थळ छान आहे. =D>

आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.

स्वाती२'s picture

1 Aug 2009 - 5:46 pm | स्वाती२

तुमच्या मित्रांचे अभिनंदन! साईट आवडली. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

लिखाळ's picture

1 Aug 2009 - 6:39 pm | लिखाळ

वा .. तुमच्या मित्रांचे कौतुक वाटले. त्यांच्या पुढील प्रवासाला अनेक शुभेच्छा.
त्यांनी केलेल्या संकेतस्थळाला भेट दिली. सं.स्थळ छान आहे. आवडले.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

संदीप चित्रे's picture

1 Aug 2009 - 9:48 pm | संदीप चित्रे

तुमच्या मित्रांच्या जिद्दीला शुभेच्छा.
साईट चांगली वाटतीय.
आता त्या साईटला जगभरातून हिट्स मिळायला लागतील :)

बट्ट्याबोळ's picture

2 Aug 2009 - 10:23 am | बट्ट्याबोळ

सुंदर !!
वाचून छान वाटलं. आणि प्रोत्साहन मिळालं.

प्राजु's picture

3 Aug 2009 - 4:03 am | प्राजु

खरंय!! मलाही प्रोत्साहन मिळालं.
काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या दृष्टीने खरंच विचार करायला सुरूवात केली आहे.
आपल्या मित्रांचे अभिनंदन!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/