टिळक, पाटील, बेंडे, गोखले, या सर्वांच्या विचारांशी पूर्णत: सहमत...
आपला,
(उत्तम पगाराची नोकरी सोडून गुज्जू-मारवाड्यांच्या शेयर बाजारात स्वत:च्या कन्सल्टन्सीच्या धंद्याचा जम बसवलेला!) तात्या.
अवांतर - उप्पाशी मरेन पण कुणाचीही चाकरी न करण्याचा, आणि कुणालाही 'हो साहेब', 'करतो साहेब', 'सॉरी साहेब!' असे न म्हणण्याचा आमचा मूळ स्वभाव बळावू लागला आणि आम्ही नोकरी सोडून धंद्यात जम बसवला. सुरवातीला खूप कष्ट पडले, प्रसंगी पदरी नैराश्यही आले, परंतु आता बरं चाललं आहे! :)
एखादा माणूस आपलं गाव सोडून एखाद्या परक्या ठिकाणी जातो त्यावेळी सहजिकच त्याला धोका पत्करणं भाग असतं. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला निरनिराळ्या वाटा पडताळून पाहणे सहाजिकच आहे. पण यामुळे मराठी माणूसच लेच्यापेच्या आणि सगळे प्ररप्रांतीय कष्टकरी असं कसं म्हणता येईल?
आपण समस्त मराठी जनांबद्दल बोलतोय की फक्त महाराष्ट्रात राहणार्या मराठी माणासांबद्दल बोलतोय?
समस्त मराठी जनांबद्दल बोलायचं असेल तर दुसर्या राज्यात राहून जम बसवलेल्या मराठी माणसं काय कामचुकार म्हणून त्या ठिकाणी राहू शकली?
उद्या एखादा मराठी माणूस अमेरिकेत गेला तर तेथील स्थानीकांपेक्षा कितीतरी कमी पगारात तो काम करील. परक्या ठिकाणी राहून येणार्या असुरक्षिततेच्या भावनेतून तो कमी पगारात जास्त काम करावं लागलं तरी तो त्याची तक्रार करणार नाही.
याचा अर्थ समस्त मराठी जन तेवढे कामचूकार आणि परप्रांतिय तेवढे कष्टकरी असा होत नाही.
बिहार बद्दल बोलायचं तर बिहारी माणूस खरोखरंच कष्टकरी असेल, उद्यमशील असेल तर सगळ्या बिहारचाच विकास होणार नाही का? त्यासाठी त्याला दुसर्या राज्यात स्थलांतर करायची काय गरज?
खर्याखुर्या कष्टकरी माणसाला संधीची काय आवश्यकता? सगळ्यांनी आपापल्या राज्यात रहावं आणि कष्ट करून आपापल्या राज्याचा विकास करावा असं शक्य होणार नाही का? असं केलं तर समस्त देशाचाच सर्वांगीण विकास होऊ शकेल.

मला वाटतं आपण अशिक्षित/अर्धशिक्षित मराठी माणसांबद्दल बोलत आहोत. एकही मराठी माणूस सामाजिक/आर्थिक/राजकिय क्षेत्रात 'वरच्या' पदाला पोहोचलेला नाही असे विधान कोणीही करणार नाही. यशस्वी मराठी माणसांची खुप मोठी यादी देता येईल. पण आपण ह्या चर्चेत सर्वसाधारण बेरोजगार मराठी माणसांबद्दल बोलत आहोत.
एक मुद्दा असा. 6 Feb 2008 - 8:41 pm | llपुण्याचे पेशवेll
अवांतर: चोप द्यायचा असेल तर तो लालूप्रसाद, अमरसिंग, मुलायमसिंग, रामविलास पासवान या नेत्याना द्या. त्या लोकांमुळेच कदाचित हे परप्रांतीय लोक आपला विकास स्वतःच्या राज्यात करू शकत नाहीयेत.
मराठी माणूस : देखील मराठी नेत्यानी केलेल्या लाडांमुळे कष्ट करून पैसे मिळवू इच्छीत नाही. मी काही वर्षे स्वतः कोकणात राहीलो आहे. माझे गाव पोंभुर्ले हे खारेपाटण जवळ आहे. आमच्या गावात ९७-९८ साली आलेल्या एका भैय्याने आता चांगले चौसोपी घर बांधले आहे ते स्वत:च्या कमाई वर. तुम्ही आम्ही फक्त मुंबई घेऊन बसलो आहोत. पण संपूर्ण कोकणात भैया हे विष असे काही भिनले आहे की ते तिथला मराठी माणूस गिळूनच संपेल. या लोकांना कामे देणारे लोक जसे आपण आहोत तसेच त्याना कामे मिळायला मदत करणारे लोक हे ही आपले आळशी मराठी मजूरच आहेत. शेतीमधे पैसा नाही हे मान्य. पण हे लोक स्वतः शेती कसतही नाहीत आणि ती विकून येणार्या पैशात फुकटचे खाण्यात धन्यता मानतात. मराठी आंबा उत्पादक ४५०-५०० च्या पट्टीवर मारवाडी दलालास माल पाठवतो आणि तो माल दलाल २०० रु. डझनावारी विकतो. पहा विचार करा हे बदलायचे आहे. पण सुरूवात कशी करायची????? आहे कोणाकडे उत्तर?
मराठी माणसाने प्रगती करायची असेल तर सहकार हा एक उपाय म्हणता येऊ शकेल.
पश्चिम महाराष्ट्राने सहकाराने स्वतः चा बराच विकास करून घेतला आहे.
पण कोकणात (कधीकाळी) मराठी माणसांसाठी लढणारी शिवसेना जशी रुजली तसा सहकार का रुजला नाही कुणास ठाऊक?
प्रतिक्रिया
6 Feb 2008 - 11:52 am | विसोबा खेचर
टिळक, पाटील, बेंडे, गोखले, या सर्वांच्या विचारांशी पूर्णत: सहमत...
आपला,
(उत्तम पगाराची नोकरी सोडून गुज्जू-मारवाड्यांच्या शेयर बाजारात स्वत:च्या कन्सल्टन्सीच्या धंद्याचा जम बसवलेला!) तात्या.
अवांतर - उप्पाशी मरेन पण कुणाचीही चाकरी न करण्याचा, आणि कुणालाही 'हो साहेब', 'करतो साहेब', 'सॉरी साहेब!' असे न म्हणण्याचा आमचा मूळ स्वभाव बळावू लागला आणि आम्ही नोकरी सोडून धंद्यात जम बसवला. सुरवातीला खूप कष्ट पडले, प्रसंगी पदरी नैराश्यही आले, परंतु आता बरं चाललं आहे! :)
तात्या.
6 Feb 2008 - 1:46 pm | रम्या
एखादा माणूस आपलं गाव सोडून एखाद्या परक्या ठिकाणी जातो त्यावेळी सहजिकच त्याला धोका पत्करणं भाग असतं. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला निरनिराळ्या वाटा पडताळून पाहणे सहाजिकच आहे. पण यामुळे मराठी माणूसच लेच्यापेच्या आणि सगळे प्ररप्रांतीय कष्टकरी असं कसं म्हणता येईल?
आपण समस्त मराठी जनांबद्दल बोलतोय की फक्त महाराष्ट्रात राहणार्या मराठी माणासांबद्दल बोलतोय?
समस्त मराठी जनांबद्दल बोलायचं असेल तर दुसर्या राज्यात राहून जम बसवलेल्या मराठी माणसं काय कामचुकार म्हणून त्या ठिकाणी राहू शकली?
उद्या एखादा मराठी माणूस अमेरिकेत गेला तर तेथील स्थानीकांपेक्षा कितीतरी कमी पगारात तो काम करील. परक्या ठिकाणी राहून येणार्या असुरक्षिततेच्या भावनेतून तो कमी पगारात जास्त काम करावं लागलं तरी तो त्याची तक्रार करणार नाही.
याचा अर्थ समस्त मराठी जन तेवढे कामचूकार आणि परप्रांतिय तेवढे कष्टकरी असा होत नाही.
बिहार बद्दल बोलायचं तर बिहारी माणूस खरोखरंच कष्टकरी असेल, उद्यमशील असेल तर सगळ्या बिहारचाच विकास होणार नाही का? त्यासाठी त्याला दुसर्या राज्यात स्थलांतर करायची काय गरज?
खर्याखुर्या कष्टकरी माणसाला संधीची काय आवश्यकता? सगळ्यांनी आपापल्या राज्यात रहावं आणि कष्ट करून आपापल्या राज्याचा विकास करावा असं शक्य होणार नाही का? असं केलं तर समस्त देशाचाच सर्वांगीण विकास होऊ शकेल.
6 Feb 2008 - 2:04 pm | प्रभाकर पेठकर
आपण समस्त मराठी जनांबद्दल बोलतोय की फक्त महाराष्ट्रात राहणार्या मराठी माणासांबद्दल बोलतोय?
समस्त मराठी जनांबद्दल बोलायचं असेल तर दुसर्या राज्यात राहून जम बसवलेल्या मराठी माणसं काय कामचुकार म्हणून त्या ठिकाणी राहू शकली?
मला वाटतं आपण अशिक्षित/अर्धशिक्षित मराठी माणसांबद्दल बोलत आहोत. एकही मराठी माणूस सामाजिक/आर्थिक/राजकिय क्षेत्रात 'वरच्या' पदाला पोहोचलेला नाही असे विधान कोणीही करणार नाही. यशस्वी मराठी माणसांची खुप मोठी यादी देता येईल. पण आपण ह्या चर्चेत सर्वसाधारण बेरोजगार मराठी माणसांबद्दल बोलत आहोत.
6 Feb 2008 - 8:41 pm | llपुण्याचे पेशवेll
अवांतर: चोप द्यायचा असेल तर तो लालूप्रसाद, अमरसिंग, मुलायमसिंग, रामविलास पासवान या नेत्याना द्या. त्या लोकांमुळेच कदाचित हे परप्रांतीय लोक आपला विकास स्वतःच्या राज्यात करू शकत नाहीयेत.
मराठी माणूस : देखील मराठी नेत्यानी केलेल्या लाडांमुळे कष्ट करून पैसे मिळवू इच्छीत नाही. मी काही वर्षे स्वतः कोकणात राहीलो आहे. माझे गाव पोंभुर्ले हे खारेपाटण जवळ आहे. आमच्या गावात ९७-९८ साली आलेल्या एका भैय्याने आता चांगले चौसोपी घर बांधले आहे ते स्वत:च्या कमाई वर. तुम्ही आम्ही फक्त मुंबई घेऊन बसलो आहोत. पण संपूर्ण कोकणात भैया हे विष असे काही भिनले आहे की ते तिथला मराठी माणूस गिळूनच संपेल. या लोकांना कामे देणारे लोक जसे आपण आहोत तसेच त्याना कामे मिळायला मदत करणारे लोक हे ही आपले आळशी मराठी मजूरच आहेत. शेतीमधे पैसा नाही हे मान्य. पण हे लोक स्वतः शेती कसतही नाहीत आणि ती विकून येणार्या पैशात फुकटचे खाण्यात धन्यता मानतात. मराठी आंबा उत्पादक ४५०-५०० च्या पट्टीवर मारवाडी दलालास माल पाठवतो आणि तो माल दलाल २०० रु. डझनावारी विकतो. पहा विचार करा हे बदलायचे आहे. पण सुरूवात कशी करायची????? आहे कोणाकडे उत्तर?
पुण्याचे पेशवे..
7 Feb 2008 - 11:35 am | रम्या
मराठी माणसाने प्रगती करायची असेल तर सहकार हा एक उपाय म्हणता येऊ शकेल.
पश्चिम महाराष्ट्राने सहकाराने स्वतः चा बराच विकास करून घेतला आहे.
पण कोकणात (कधीकाळी) मराठी माणसांसाठी लढणारी शिवसेना जशी रुजली तसा सहकार का रुजला नाही कुणास ठाऊक?
(सहकारावर विश्वास असलेला) रम्या