मिपा मुखपृष्ठ: अभ्यंकर वहिन्या ते बाबूजी!

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
14 Jan 2009 - 8:24 pm

मिपाच्या मुखपृष्ठावर आजकाल अभ्यंकर वहिन्यांची वर्दळ असते. त्यांच्या अनुमोदनानंतर मिपाच्या तर्रीवर ताव मारायला आम्ही मिपाच्या दालनांमध्ये प्रवेश करतो. आज मात्र मिपाचे दर्शन मंगलमय वाटले. सकाळी सकाळी बाबूजींची आठवण, त्यांनी वीर सावरकर बनवताना केलेले शर्थीचे प्रयत्न, खाललेल्या खस्ता यांचे स्मरण करुन दिल्याबद्दल मिपाचे आभार!

वीर सावरकर बनवताना बाबूजींनी वर्षानुवर्षे एक तपश्चर्याच केली. तिची माहिती सर्वसाधरणपणे मराठी जनतेला नाही. मला वाटते बाबूजींच्या या तपाची माहिती असणारे वा ती तपश्चर्या थोड्याफार प्रमाणात जवळून बघणारे काहीजन मिपावर आहेत. त्यांनी या विषयावर एखादा माहितीपर लेख लिहावा ही त्यांना विनंती.

हे ठिकाणधोरणमांडणीशिक्षणचित्रपटप्रकटनविचारसद्भावनासंदर्भप्रतिसादचौकशी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 11:36 pm | विसोबा खेचर

मला वाटते बाबूजींच्या या तपाची माहिती असणारे वा ती तपश्चर्या थोड्याफार प्रमाणात जवळून बघणारे काहीजन मिपावर आहेत.

मी त्यापैकी एक.

त्यांनी या विषयावर एखादा माहितीपर लेख लिहावा ही त्यांना विनंती.

नक्कीच लिहायचा प्रयत्न करेन.

तात्या.