ह्या आधीचा लेख इथे किंवा इथे वाचावा.
जरी लहान मुलांना जवळपास सर्व वस्तू हव्या असतात तरी आपल्या वस्तू कोणाला द्याव्यात न द्याव्यात हेही त्यांना तितकेच चांगले कळते असे मला वाटते. समजा एखाद्या मुलाकडे एक खेळणे आहे, जर कोणी मोठा माणूस ते घ्यायचा प्रयत्न करेल तर तो त्याला घेऊ देईल. कारण त्याला माहीत आहे की हा काही हे घेऊन टाकणार नाही. पण तेच खेळणे जर त्याच्याच वयाच्या (किंवा थोडाफार लहानमोठ्या) मुलाने घेतले तर तो काही ते घेऊ देणार नाही. लगेच त्यांच्यात स्पर्धा सुरू होईल किंवा मग रडारड. अर्थात दोन्हीतही त्या मुलाला दुसऱ्याबद्दलची वाटणारी ओळख कशी आहे ह्यावर ही ते अवलंबून असेल. एखाद्या नवीन माणसाला ते काही देणार नाहीत किंवा मग सर्व काही उदार मनाने देतील. तेच दुसऱ्या लहान मुलाकरीताही.
खाणे.. ही गोष्ट तर लहान मुलांची आवडीची. समोर मग काहीही असो, ती वस्तू त्यांना खाल्ल्याशिवाय, चाखल्याशिवाय कळतच नाही की ती किती चांगली आहे. :D ही अतिशयोक्ती असेल पण प्रत्यक्षात काहीसे असे आहे. मी दहावीत होतो तेव्हा असेल, शेजारी राहणारा एक मुलगा. नुकताच रांगायला लागला होता. त्याला कसे माहीत पण डोंगळे (मुंगळे) खायची सवय लागली. रांगता रांगता समोर एखादा मुंगळा जाताना दिसला की लगेच तो त्याच्या तोंडात. एके दिवशी मुंगळा त्याला जिभेवर चावला तेव्हा त्याची ती सवय सुटली.
आता थोडया मोठ्या मुलांविषयी. जरी आपल्यापेक्षा लहान मुले,भावंडे ह्यांच्याशी ते खेळत/भांडत असतील तरी त्यांच्याबद्दलची जबाबदारीही कळते. हे जरी भरपूर ठिकाणी पाहिले असेल तरी त्यातील एक पाहिलेला अनुभव सांगावासा वाटतो. बहुधा २००४ मध्ये, आम्ही मित्र पुण्यात फिरत होतो. तेव्हा पाहीले की एका मोटार सायकलवर मागे बसलेली २ मुले (वय ४ आणि ५/६ वर्षे असेल). लहान मुलाला मोठ्याने एकदम नीट पकडून ठेवले होते. जाणवत होते की तो मोठा मुलगा आपल्या लहान भावाची जबाबदारी कशी घेतो आहे ते.
असो, एखादे सर्वेक्षण करून आणखी भरपूर गोष्टी लक्षात येतील. पण वरील सर्व गोष्टी मी अर्थातच अनुभवातूनच लिहिल्या आहेत. आणि अनुभव तर पुढे येत राहतीलच.
डार्विनच्या त्या सिद्धांताप्रमाणे आणि मानवाच्या, जगाच्या प्रगतीवरून ही क्षमता वाढतच राहील हेच खरे.
प्रतिक्रिया
29 Dec 2007 - 8:35 pm | धनंजय
:-)
अवांतर :
"डार्विनच्या सिद्धांतानुसार" ही क्षमता वाढत जाणार की नाही हे सांगता येत नाही.
डार्विनचा सिद्धांत लागूच झाला तर या पुढील परिस्थितीत :
जर (१) ही क्षमता आनुवांशिक असेल, आणि
जर (२) ही क्षमता अधिक असलेले लोक अधिक प्रमाणात प्रौढत्वापर्यंत जाणारी मुले जन्मास घालतील
तर ही क्षमता वाढत जाईल.
(१) आणि (२) हे दोन्ही "जर" शंका करण्याजोगे आहेत.
27 Jun 2017 - 4:47 pm | धर्मराजमुटके
लहान भाऊ - मोठी बहिण
लहान बहिण - मोठा भाऊ
या नात्यांत काही समिकरणे बदलतात काय ?