मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in जनातलं, मनातलं
22 Oct 2008 - 11:14 pm

मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा

सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे.
ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्‍याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते.

मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते. याच संघशक्तीचा ताकदीतुन आपण बेरोजगार तरुण-तरुणींना मदतीसाठी एखादा वेबमंच (Internet Forum) उभारु शकतो काय ?

नोकरी.कॉम किंवा इतर स्थळांपेक्षा महाराष्ट्रातल्या सामान्य तरुणांच्या गरजा भागवणारा - सोयी / माहिती/ मार्गदर्शन पोहचवणारे स्थळ हा यामागचा उद्देश आहे. हा वेबमंच दादर(प) व आंबेगाव(खुर्द) या दोन्ही ठिकाणच्या मराठी युवकास उपयोगी असावा.

माहितीच्या युगात विदा/माहिती म्हणजेच पैसा हे समिकरण आपण समजतो. तुमच्याकडे असलेली एखादी क्षुल्लक माहिती कदाचित इतरांचे आयुष्य बदलु शकते. हे आदानप्रदान आपण करु शकु काय ?

नोकरी पुरते मर्यादित न राहता शेती वा इतर कोणत्याही व्यवसायाची माहिती पोहचली तर कोणा होतकरु उद्योजकच्या जडणघडणीतही खारीचा वाटा उचलला जाईल.

कोणत्याही स्पर्धा-परिक्षेची माहिती आपल्या नजरेतुन सुटु नये;
स्पर्धा-परिक्षेतल्या यशाच्या टीप्स येथे आपणास शेअर करता येतिल. युपिएसी ची तयारी करणार्‍या ( किंवा जेथे जेथे ग्रुप स्टडी लागतो) व एका शहरात राहणार्‍या विद्यार्थ्यांची ओळख होईल.

आपापली क्षेत्रे गाजवलेल्या पण मराठी लोकांस फारसे परिचय नसणार्‍या मराठी icons ची ओळख येथुन व्हावी . ह्या कहाण्या इतरांची प्रेरणा-गीते ठरतील

बंगळुर मधे कानडी लोकांमधील रोजगाराच्या मागणीला अशी योग्य दिशा देण्यासाठी अशा स्वरुपाची वेब फोरम आहे. अशा स्वरुपाचे काम विधायक पद्धतीने करत आहे. आपण त्याचा रोल मॉडेल म्हणुन विचार करु शकतो.
( http://www.kannadamitra.com/ : हे स्थळ कानडीत आहे. आपणास रस वाटल्यास ध्येय-धोरणे मराठीत प्रकाशित करेन)

महत्वाचे:
हे वैयक्तिक आवाहन असून कोणताही आर्थिक लाभ अपेक्षित नाही. केवळ विधायक व विधीमान्य सूचना कराव्यात.मि.पा. चा केवळ माध्यम म्हणुन वापर केला आहे;

धोरणमांडणीसमाजनोकरीजीवनमानमतशिफारसचौकशीप्रश्नोत्तरेमाहिती

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

22 Oct 2008 - 11:20 pm | मुक्तसुनीत

एक साधा-सोपा उपाय : मिसळपावर च्या या धाग्यावर माहिती देत ठेवा. मिपाचे एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे नवे प्रतिसाद असलेला धागा वर वर येत रहातो. नवी माहिती येत राहील तसा हा धागाही ताजा राहील. (५० प्रतिसाद झाले की नवा धागा उघडणे सोयीचे ! )

भडकमकर मास्तर's picture

23 Oct 2008 - 12:52 am | भडकमकर मास्तर

सहमत... स्वतःची माहिती याच धाग्यावर देत राहावी...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भाग्यश्री's picture

23 Oct 2008 - 12:00 am | भाग्यश्री

मलाही कल्पना आवडली.. नोकर्‍यांच्या जाहीराती असतात बर्‍याच.. त्याही मोजक्या ठीकाणांच्या..
या माध्यमातून अशा माहीतीची देवाण घेवाण होईल.. रोजगार,नोकरी-बिझनेस ,मराठी माणसाला उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त कल्पना..
राज ठाकरेंच्या सर्व धाग्यांमधे हाच मुद्दा यायचा, की मराठी माणूस ही कामं करत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचत नाहीत.
या कल्पनेने थोडाफार तरी हातभार लागेल.. असे वाटते..

तसेच समान कार्यपद्धत/अभ्यास असणार्‍यांचा स्टडी ग्रुप हे ही आवडलं..

विकास's picture

23 Oct 2008 - 12:05 am | विकास

नक्की केले पाहीजे. भरपूर चांगला वापर करता येईल.

फक्त असे संकेतस्थळ हे निष्पक्ष (नॉन पार्टिजन) असले पाहीजे.

सुक्या's picture

23 Oct 2008 - 1:03 am | सुक्या

अभिरत भिरभि-या,

उत्तम सुचनेबद्दल धन्यवाद.
मिपा वर चर्चा, काव्य, साहित्य, पाककृती, कौल, संपादकीय असे बरेच विभाग आहेत. रोजगार म्हनुन एक असा स्वतंत्र विभाग सुरु करता येइल. त्याचा फायदा सर्व गरजु लोकांना होउ शकेल. मिपा च्या संपादक मंडळाकडे असा प्रस्ताव मांडता येउ शकतो. अंतीम निर्णय तात्या व मिपा संपादक मंड्ळाचा.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 9:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगली कल्पना आहे ही!
आणि त्यावरून आठवलं जी.एम.आर.टी.मधे एक तात्पुरत्या स्वरुपातली नोकरी आहे, तिची जाहीरात (बहुदा) अजून दिली नाही आहे. आणि ती नोकरी शक्यतो मराठी भाषिकासाठी आहे.
कामाचं स्वरुपः खोडद, नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांत जाऊन जी.एम.आर.टी.च्या दृश्य दुर्बिणी वापरून खगोलशास्त्राची स्थानिक लोकांना ओळख करून देणे.
रहाण्याची सोय तिथेच (जी.एम.आर.टी.ला) असेल (आणि महिना ~पाचशे रुपये भाडं), जेवण-खाणही सबसिडाईझ्ड (मराठी शब्द?) दरात होईल. कामासाठी प्रवास करण्यासाठी कार्यालयाची गाडी असेल (खर्च आणि त्रास शून्य), महिन्याचा पगार ~६०००
शैक्षणिक पात्रता: शक्यतो एम.एस्सी. (भौतिकशास्त्र), खगोलशास्त्राची थोडीफार माहिती असल्यास उत्तम! मराठी भाषिक लोकांना प्राधान्य कारण नारायणगावच्या जवळपासच्या खेड्यांतल्या लोकांशी बोलायचं असेल तर मराठीच भाषा असलेली बरी!
कोणी इच्छुक उमेदवार असल्यास माझ्याशी संपर्क साधा. पुढची फॉर्मल अर्ज करण्याची इत्यादी सगळी माहिती काढून देईन.

वेताळ's picture

23 Oct 2008 - 9:38 am | वेताळ

रोजगार संधी असा एकादा विभाग मिपा वर सुरु करण्यास काही हरकत नसावी. जिथे एकादी नोकरी उपलब्द असेल त्याची माहिती संबधिताने मिपा वर द्यावी. म्हणजे मराठी गरजवंताला नोकरी मिळु शकेल.
वेताळ

शैलेन्द्र's picture

23 Oct 2008 - 9:56 am | शैलेन्द्र

माझ्या कंपनीत ३- ४ जागा आहेत..

कामाचे स्वरुप- हाय टेक बायोटेक्नोलॉजी संयंत्राचे विक्री व्यवस्थापण.

शिक्षण- एम एस्सी इन लाइफ सायन्स / बायोटेक्नोलॉजी

पगार- १५०००- ८०००० महीना अनुभवानुसार, मराठी ऊमेद्वारास प्राधान्य.( कंपनीचे मालक मराठी.)

वैदेहि's picture

23 Oct 2008 - 10:03 am | वैदेहि

कम्पनीच नाव कळु शकेल का?बायोटेकनोलोजी मधे एम्.बी.ए असेल तर चालेल का?

शैलेन्द्र's picture

23 Oct 2008 - 9:21 pm | शैलेन्द्र

कंपनीचे नाव, labindia Instruments Pvt Ltd, we represent biotech giant "Applied biosystem Inc.(ABI)" in india. Labindia is a appx. 700 Cr group and ABI is a 5 billion $ US multinational after merger.

Labindia Instruments Pvt. Ltd. was founded in 1981 and promoted by a group of committed and visionary technocrats, engineers and professionals. The founders have since grown Labindia into a highly successful sales, marketing, service and support organization that is recognized all over India as a key supplier of state-of-the-art instrumentation and reagents for biotechnology and life science research.

I request you to visit www.labindia.com and www.appliedbiosystems.com

For any further details, feel free to contact me at shailendrakawade@gmail.com

The four directors of company are, Mr Bhalerao, Mr bibikar, Mr Bapat and Mr upadhye

कपनीचे नाव,पत्ता तसेच तुमच मेल पत्ता ही दया.

जैनाचं कार्ट's picture

23 Oct 2008 - 11:03 am | जैनाचं कार्ट (not verified)

येथे काही जॉब उपलब्ध आहेत ह्याचा ही उपयोग होतो का पहा !
काही लॉगिन न करता फक्त सरळ आपला सिव्ही अपलोड करु शकता ...!

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

मिंटी's picture

23 Oct 2008 - 11:06 am | मिंटी

माझ्या कंपनीत २-३ जागा आहेत

.net Developer

अनुभव :- ६ महिने ते २ वर्ष

पुणे, मुंबई साठी...

mina's picture

23 Oct 2008 - 5:58 pm | mina

मराठी तरूणांचा विचार मराठी माणसानेच करणे आज आवश्यक आहे.यानुसार अभिरत भिरभिर्‍या यांनी सुचवलेली कल्पना अतिशय उत्तम आहे.मिपावर ही कल्पना यश संपादन करेल,याची मला पूर्ण खात्री आहे.

आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 6:11 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/ आपले अभिनंदन. हेच तर करायचे असते.

शितल's picture

23 Oct 2008 - 6:12 pm | शितल

खुपच चांगला दुवा चालु केला आहे.
मराठी तरूण्-तरूणींना नक्की याचा उपयोग होईल. :)

अभिरत भिरभि-या's picture

23 Oct 2008 - 6:26 pm | अभिरत भिरभि-या

एकूण सर्व प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत. :)

कन्नडमित्र ह्या साईटवर कानडी लोकांना भेडसावणार्‍या माहितीचा अभाव/ मार्गदर्शनाची कमतरता/ उत्तम इंग्रजी नसणे वगरे समस्या दिल्या होत्या.
एकूण वर्णन इतके तंतोतंत फिट्ट बसत होते की मी इथे कानडी शब्दाऐवजी सरसकट "मराठी" शब्द टाकला तरी चालेल.

असो,
हे इवलेसे रोपटे मोठे होवो :)

मि.पा. वर प्रस्ताव कसा देतात ते ठाऊक नाही. पण ही औपचारिकता न पाळता आपल्या सार्‍यांचा पाठिंबाने हा प्रस्ताव मि.पा. पंचांकडे सोपवतो.

कलंत्री's picture

23 Oct 2008 - 11:55 pm | कलंत्री

आपले हे पाऊल विधायक असेच आहे. मिपावर याचे वेगळे सदर होऊ शकते. त्यापेक्षाही आपण एक वेगळे संकेतस्थळ निर्माण करु शकतो.

त्यामध्ये स्वताचे विश्लेषण, भविष्यकालिन व्यवसाय / नौकरीच्या गरजा, यशस्वी लोकांचे मनोगत इत्यादी आपण व्यावसायीक स्वरुपात निर्माण करु या.

त्याचबरोबर समज / गैरसमज इत्यादीही देऊ या.

मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा हे आपले ब्रीदच आहे.

सागर's picture

29 Oct 2008 - 1:27 pm | सागर

अभिरत भिरभिर्‍या... मस्त नाव आहे...

सर्वप्रथम उपक्रमाबद्दल अभिनंदन....मराठी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अतिशय चांगले समाजोपयोगी काम आपण करत आहात.

माझ्या काही सूचना:
१. शासनाच्या मुख्य रोजगार केंद्रातून रोजगाराच्या संधींबद्दल माहिती मिळवून ती जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवणे ( सरकार मदत करेन की नाही माहीत नाही. पण हेतू पटवून दिलात तर सरकारात काम करणारे मराठी जन नक्कीच मदत करतील. )

२. इंटरनेट या माध्यमाचा प्रभावी वापर : याहू ग्रुप्स , गूगल ग्रुप्स , मराठी फोरम अशा अनेक माध्यमांतून ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल.

३. ग्रामीण भागात इंटरनेटवर अवलंबून राहता येणार नाही. पण त्यासाठी चर्चा करुन नेटवर्क उभारता येईल...

४. एक कमिटी असावी जी सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांमधून उपलब्ध होणार्‍या रोजगारांच्या संधींवर लक्ष ठेवीन (युपीएससी, एमपीएससी, मर्चंट नेव्ही, आर्मी, इ...) आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ई-मेल , परिपत्रक या माध्यमातून पोहोचवेन.

५. एक स्वतंत्र कमिटी असावी जी अभ्यास करेन की एखाद्या विभागात परप्रांतीयांनी रोजगार उभे केले आहेत, त्यांना टक्कर देईन अशी मराठी उद्योजकांची फौज उभारण्यात मदत करेन. इथे लांबचा विचार करुन परप्रांतीयांना टक्कर देण्यासाठी दीर्घमुदतीची नियोजन आखणी करणे आवश्यक आहे

या सर्व ढोबळ सूचना आहेत, ४ डोकी एकत्र आली की त्याला चांगले स्ट्रक्चरल स्वरुप देता येईन.

एकच सांगतो, सगळी कामे छोट्या छोट्या स्वरुपात वाटून दिलीत तर कामाचा ताणही कोणावर पडणार नाही आणि मराठी जनांसाठी रोजगार मिळवून देण्यात हातभार लावल्याचे समाधानही लाभेल...

जय महाराष्ट्र
- सागर

चैतन्यकुलकर्णी's picture

12 Nov 2008 - 12:08 am | चैतन्यकुलकर्णी

Namaskar.
I am Chaitanya Kulkarni, living in Pune and doing self business from last four years in ERP software. I have developed an ERP system for companies based on Indian Work Pattern and Standards. This ERP system is already sold to two private sugar factories and are working properly on three locations. But due to my personal problems and lack of sufficient finance, I am searching for a Job now.
But still I think ERP software which I developed has a good potential and can stood in Market very well. If any one is interested in business for marketing and sales/support of this software then please give me the details at shreeseva.it@gmail.com.
You can also contact me if there is any opportunity for the ERP/any such software, Data Analysis tools or s/w etc. in your company.

आपल्या सहकार्याबद्द्ल धन्यवाद व अशी महत्वपुर्ण संकल्पना मांडल्याबद्दल आपले अभिनंदन!

केवळ_विशेष's picture

13 Nov 2008 - 12:39 pm | केवळ_विशेष

जपान मधे लॉजिस्टिक्/सप्लाय चेन मॅनेजमेन्ट संदर्भात असणार्‍या संधींची माहीती देऊ शकेल का? (थोडीफार जपानी भाषा बोलू शकेन्...डे टू डे ...सरावानी ऑफिशिअल भाषा बोलता येईल.)

व्य नि/खरड चालेल

संदीप डांगे's picture

8 Nov 2016 - 12:02 am | संदीप डांगे

धागा काढतोय वर...

नाखु's picture

8 Nov 2016 - 9:06 am | नाखु

भारी खोदकाम केलेत की हो.

दिवाळी अंकातला एक उप्क्रम म्हणून हा धागा दखलमध्ये दाखल करावा आणि नेहमी अद्ययावत करावा (विशेष तः शालेय-कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धा परिक्षा यांची माहीती,जाहीराती, वेळा इत्यादी या धाग्यात आल्या तर उत्तमच. नेट पेक्षाही थेट आणि सुटसुटीत समजेल अशी माहीती केव्हाही जास्त श्रेयस्कर.

नाखु पालकायनी

संदीप डांगे's picture

8 Nov 2016 - 2:19 pm | संदीप डांगे

खोदकामाचं माझं श्रेय नाही हो, खरडफळ्यावर कोणीतरी लिन्क दिली काल.. बहुतेक सही रे सई यांनी.
मी फक्त धागा वर काढला.

अजून काय काय रत्नं असतील मिपामायच्या पोटात देवजाणे! खोदा म्हणजे सापडेल.

ही कल्पना आधीही चर्चिली होती.
छोट्या जाहिराती (घर, इत्यादी विकणे/विकत घेणे)
रोजगार

या विभागांचा विचार होऊ शकतो

NiluMP's picture

18 Jan 2017 - 11:18 pm | NiluMP

Please think about this.