बम भोले बम

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in जनातलं, मनातलं
6 Dec 2007 - 7:03 pm

मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी.

दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को" काय डान्स केलाय. मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो.

गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.

आम्ही १२०-३०० हातात घेऊन बोटावर चुना घेतला आणि शाहरुखला दोन्ही हात वर करून प्रणाम केला.
"नमो नम:"

"वालेकुम अस्सलाम!", शाहरूख बाकी संस्कारांचा पक्का.

"कॉम मॉम मम माअयं?" आम्ही पान खाऊन चुन्याचे बोट तोंडात खुपसले?

शाहरूखने फक्त भुवई वर करून प्रश्नार्थक चेहरा केला.

"काय मग कसं चाललंय?", आम्ही.

"एएएएएए... काही नाही. निवांतच आहे.अम्म अम्म" धुराचा झुरका तोंडातून सोडत शाहरूख.

"बाकी पिक्चर मस्तच चाललंय. विशेषत: शर्ट वगैरे नाही म्हणजे खासच. पण हे शर्टाचं काय काढलंय मध्येच?" नसत्या काड्या घालायची आमची सवय जाणार नाही.

"एएएएएए.. शर्टाचं कुठे काढलंय. शर्टच काढलंय की! अम्म अम्म" शाहरूखची विनोदबुद्धी त्याला दगा देत नाही.

"हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते.

"थोडीशी कॉम्पीटिशन आहे पण बाकी धोधो चाललाय की!", इति आम्ही.

"कॉम्पीटिशन? कसली कॉम्पीटिशन?" शाहरूख थोडा चिडला.

"अहो 'चक दे' ची. गैरसमज नको.", बाजू सावरणे आम्हाला बरोब्बर जमते.

"एएएएएए... तो होय. घ्या मेन्टॉस घ्या." शाहरुख अपेक्षेप्रमाणे पाघळला.

पटकन हात पुढे करून मेन्टॉस खिशात घातली आणि आम्ही एक काडी सारली.

"हा आता पुढे काय नवे प्रोजेक्ट्स वगैरे?"

"एक पिक्चर काढतोय. ऑस्कर नक्की मिळणार बघा. पिक्चरला नाही तर मला नक्कीच.", शाहरूख

"ते तर आहेच. तुम्ही असल्यावर काय अशक्य आहे. तुम है तो क्या गम है? आणि तुम्हाला ऑस्करची काय गरज? खर्‍या हिर्‍याला तळपण्यासाठी कोंदणाची गरज थोडीच असते." नको त्या वेळी आमच्यातला लेखक बाहेर येऊ पाहतो. खरे म्हणजे मलाही ज्ञानपीठ मिळायला हवा. ते असो.

"काय नाव काय आहे पिक्चरचं. कॅची पाहिजे बुवा. ओएसओ, के३जी सारखं.", आम्ही.

"एएएएएए... . बास बास. आपले विचार जुळतात. नाव तर जबरदस्तच आहे. बम-भोले-बम. ३बी म्हणता येईल. किंवा बी३. बघूया आकडेतज्ज्ञ काय सांगतात ते."

"राग मानणार नसाल तर एक विचारू का?" आता मेन्टॉस मिळाल्यामुळे आमचा कार्यभाग साधला होता.

"एएएएएए... असं काय? विचारा ना.शरमाओ मत. आम्ही तुम्हाला परके थोडेच मानतो. "

"ओएसओ मध्ये शर्ट काढला. आता या चित्रपटात तुम्ही प्यांट काढणार का?"

- (शाहरुखप्रेमी) आजानुकर्ण खान

नृत्यविनोदमुक्तकमौजमजाचित्रपटअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

6 Dec 2007 - 7:11 pm | प्रियाली

"एएएए.... शिळी आयडीया खूप खूप शिळी झाली की उचलायची असते नाही का? सल्लूने पहिल्यांदा शर्ट कधी काढला आठवंतय का? प्यांटीचं असं आहे की रणबीरने आताच काढली नाही का सांवरियात. मीही लगेच काढली तर किंग खान पोरासोरांशी काँपिटीशन करतो म्हणायची पब्लिक." शाहरूखने गालांवर खळ्या पाडत उत्तर दिले.

आजानुकर्ण's picture

6 Dec 2007 - 7:17 pm | आजानुकर्ण

मस्त. +१ ;)

सल्लूने काढल्यामुळेच शाहरूखने शर्ट काढला. आता प्यांट काढण्यासाठी त्याला रोल मॉडेल आहेच. एकूण काहीच ओरिजिनल नाही. कसें. ;)

- आजानुकर्ण

मुक्तसुनीत's picture

6 Dec 2007 - 8:20 pm | मुक्तसुनीत

कर्णा ! फार उच्च कोटीचा प्रकार ! येऊ द्यात ...अजून येऊ द्यात !

आजानुकर्ण's picture

6 Dec 2007 - 9:38 pm | आजानुकर्ण

उच्च कोटीचा प्रकार की उच्च प्रकारची कोटी?

(सुमार) आजानुकर्ण

झकासराव's picture

6 Dec 2007 - 9:19 pm | झकासराव

कर्ण बेश्ट रे
त्यावर प्रियालीच उत्तर जबराच :)

देवदत्त's picture

6 Dec 2007 - 9:54 pm | देवदत्त

वा वा... मस्त..

अहो... शाहरूख ला पँट काढण्याकरीता काय विचारताय? त्याने ते तर आधीपासूनच केलेय...
दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, यस बॉस मध्ये (आणखी सध्या आठवत नाही आहेत). त्यात थोडा चेंज म्हणून आणि सलमान सध्या नाही म्हणून बहुधा शाहरूख ते करत असेल.

बम भोले बम वाचून पहिल्यांदा मला वाटले की भोले शंकर किंवा अमरनाथ यात्रेबद्दल लिहिताय की काय? रस्त्यात प्रत्येकाला सहज म्हणून किंवा त्याचा उत्साह वाढावा म्हणून लोक 'बम भोले' म्हणायचे त्याची आठवण झाली :)

सहज's picture

6 Dec 2007 - 10:33 pm | सहज

कर्णा मजा आली रे!

अवांतर - रणबीर कपुरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनींमधे जबरदस्त स्पर्धा. का विचारताय? त्यांना कपडे काढावे लागत नाहीत तो असताना. :-)

प्रियाली's picture

6 Dec 2007 - 11:32 pm | प्रियाली

अवांतर - रणबीर कपुरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनींमधे जबरदस्त स्पर्धा. का विचारताय? त्यांना कपडे काढावे लागत नाहीत तो असताना. :-)

उलटः रणबीर कपूरच्या सिनेमात काम करायला हिरॉइनी हवालदील! आपल्याकडे "त्या"निमित्तानेही आता कोणी पहाणार नाही असे त्यांना वाटू लागले आहे.

सर्किट's picture

6 Dec 2007 - 11:37 pm | सर्किट (not verified)

"एएएएएए.. शर्टाचं कुठे काढलंय. शर्टच काढलंय की! अम्म अम्म" शाहरूखची विनोदबुद्धी त्याला दगा देत नाही.

"हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते.

ह ह पु वा !!!!!

येउ द्यात !!

माइंड इट !

- सर्किट

बेसनलाडू's picture

7 Dec 2007 - 3:29 am | बेसनलाडू

नॉटी कर्णा नॉटी कर्णा, माइन्डिट!!
(लेख जबरा हे वे सां न ल)
(आण्णा)बेसनलाडू

केशवसुमार's picture

8 Dec 2007 - 4:34 am | केशवसुमार

आजानुकर्णशेठ,
झकास लेख..आवडला..
हा हा. +१. मस्त. " प्रतिसाद कुठे आणि कसा द्यावा ते आम्हाला बरोबर कळते. हे तर खासच..
केशवसुमार

अवांतर.. लाडूशेठ प्रतिसाद उत्तम..;)

जुना अभिजित's picture

7 Dec 2007 - 9:16 am | जुना अभिजित

झकास मधे मकास..

अभिजित
आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.

ध्रुव's picture

7 Dec 2007 - 12:43 pm | ध्रुव

झकासंच झालाय संवाद.

--
ध्रुव

मुक्तसुनीत's picture

7 Dec 2007 - 7:54 pm | मुक्तसुनीत

या अल्टिमेट् सुंदर विनोदाच्या हलक्याफुलक्या वातावरणाला काहीसा न शोभणारा एक प्रश्न :

शाहरुखखानच्या ज्या "ए ए ए ए ए ए ए ए" या बोलण्याच्या शैलीची इथे (फारच "सही" रीतीने !) चेष्टा उडवली आहे , ती त्याची बोलण्याची पद्धत अजून आहे का ? का "दिलवाले ..." च्या दिवसांपेक्षा एक वेगळी शैली त्याने अंगिकारली आहे ?

(माफ करा, त्याचा मी अलिकडे पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे "चक दे.." . ऍंड ही वॉज ऑ-इन्स्पायरींग् इन इट् ! असो. )

देवदत्त's picture

7 Dec 2007 - 9:00 pm | देवदत्त

नाही हो... माझ्या निरीक्षणाप्रमाणे 'दिलवाले दुल्हनिया...' नंतर त्याची ती शैली बदलली आहे.

विसोबा खेचर's picture

8 Dec 2007 - 12:39 am | विसोबा खेचर

काही म्हणा मंडळी, साला शाहरुख खान आपल्याला लई आवडतो! साला, लंबे रेस का घोडा है :)

कर्णा, धम्माल लेख.. औरभी लिख्खो...

(कर्णाचा फ्यॅन आणि प्रियालीदेवींचा ई-मित्र!) तात्या.