खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने मिपाकरांकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.
1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल?
2)संगीतकार यशवंत देव यांनी मल्याळी गायक के जे येसुदास यांच्याकडून गाऊन घेतलेलं "शब्दमाळा पुरेशा न होती स्पर्श सारेच सांगून जातो" हे सुप्रसिध्द गीत Mp 3 किंवा व्हिडिओ स्वरुपात आंजावर किंवा कोणाकडे मिळेल का?किंवा
खाली दिलेल्या लिंकवर ते आहे.
https://m.youtube.com/watch?v=GXVzBI34h4E
पण दर्जा खराब आहे.खरखर ऐकू येते.ते कोणते software वापरुन ते सुश्राव्य करता येईल?
3)खुप पूर्वी ईटीव्ही मराठीवर सुनिल बर्वे,रविंद्र मंकणी,रसिका जोशी,सुलभा देशपांडे यांची "भुमिका" नावाची मालिका लागायची.याचं शीर्षक संगीत नरेंद्र भिडे यांनी केलं होतं ते Mp3 स्वरुपात आंजावर कुठे मिळेल?
4)छ.शिवाजी महाराजांनी तमिळनाडूतील तंजावर पर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता.त्यांच्याबरोबर शेकडो मराठी कुटूंबे वेगवेगळ्या कार्यासाठी त्यांच्याबरोबर तिकडे गेली;तिथेच राहिली.
त्यांनी तिकडे मराठी भाषा,संस्कृती अद्यापही जपली आहे.यावर मुंबई दुरदर्शनने चेन्नई दुरदर्शनच्या सहकार्याने एक व्हिडीओ रिपोर्ट बनवला होता.तो आंजावर कुठे मिळेल?
5)खाली मराठी शादीच्या एका व्हिडिओची लिंक देतोय.
https://m.youtube.com/watch?v=PQ866yYfDdM
यात अभिनेते रुषी देशपांडे यांच्या पत्नीचे काम केलेल्या अभिनेत्रीचे नाव काय?त्यांनी कोणत्या सिनेमात काम केले आहे का?
6)कृष्णमुर्ती ज्योतिष पध्दतीचे जनक प्रोफेसर के एस कृष्णमुर्ती यांनी या पध्दतीच्या प्रसारार्थ मलेशिया देशाचा दौरा केला होता.त्यावेळी त्यांनी मलेशियाच्या दूरदर्शनवरून एक व्याख्यान दिले होते.याचा व्हिडीओ कुठे मिळेल?त्यांचा हा एकमेव व्हिडिओ असावा असा अंदाज आहे.
सर्वांना उद्यापासून येणार्या गणेशागमनाच्या शुभेच्छा!!
प्रतिक्रिया
4 Sep 2016 - 7:06 pm | अभ्या..
५) मराठी शादीच्या अॅडमधील मराठी अभिनेत्री बहुधा इरावती हर्षे आहे. त्यांनी अलिकडच्या डॉ. मोहन आगाशे अभिनीत 'अस्तु' मध्ये काम केलेलं आहे. (असं वाटते ;) )
4 Sep 2016 - 7:10 pm | अभ्या..
सॉरी. त्या नाहीत. त्यांच्या गालावर तीळ आहे.
4 Sep 2016 - 7:38 pm | उपयोजक
नाना पाटेकर दीप्ती नवल यांचा सुर्योदय नावाचा मराठी चित्रपट आहे(1991)यात "समदी दुनिया आमची" अशा नावाचं एक सुंदर गाणं अाहे.संगीतकार बहुधा देवदत्त साबळे.ते गाणं अांजावर कुठे मिळेल?
विशेष म्हणजे या सिनेमाचा उल्लेख नानांच्या विकिपेजवर नाही.
4 Sep 2016 - 8:02 pm | कंजूस
४)राहूल कुलकर्णीने स्टारमाझावर(एबीपी)असाच एक माहितीपट दि लेला होता.
६)केपी चा जनक दुसराच एक सामान्य माणूस होता.केपीने फक्त इंटरनेटातून पोहोचवले.शोधून सांगेन तो लेख.
4 Sep 2016 - 8:22 pm | उपयोजक
के पी चे जनक दुसरेच कोणी?
खात्रीशीर पुरावेशीर माहितीच्या प्रतीक्षेत
4 Sep 2016 - 9:47 pm | कंजूस
२९ जून २०१४ ची suhasg यांची खरड इथे पाहा
4 Sep 2016 - 11:56 pm | उपयोजक
गजानन तेंडुलकर यांच्या 'कृष्णमुर्ती पध्दती एक चिकित्सा' या पुस्तकात यावर विस्तारपूर्वक दिले आहे.केपीतील महत्वाच्या अश्या 'सब' (नक्षत्रांचे भाग)चे मूळ जुन्या नाडी ग्रंथात असल्याचा लेखकाचा अंदाज आहे.शिवाय ज्यांनी ही पध्दत कृष्णमुर्तींची नसून ज्यो.आर गोपालकृष्ण उर्फ मीन यांची आहे;असा आरोप करणारे बी.व्ही रामन यांचा के एस के यांच्याबद्दलचा दृष्टीकोन मुळातच पूर्वग्रहदुषित असावा (भले दोघांची मैत्री होती तरीही).
एडीसन आणि ग्राहम बेल दोघांनाही टेलिफोनची संकल्पना एकाच वेळी सुचली.बेलचा पेटंटचा अर्ज दोन तास आधी पोहचल्याने त्याला पेटंट मिळाले.एडीसनचं डिझाईन बेलपेक्षा जरा अधिक दर्जेदार असुनही!तसाच काहीसा हा प्रकार आहे.
तरीही यामुळे कृष्णमुर्तींच्या मेहनतीचे महत्त्व कमी होत नाही.अन्यथा यावर बर्याच केपी जाणकारांनी यापूर्वीच आक्षेप घेतला असता.
कंजुसराव या लिंकबद्दल धन्यवाद.
ABP Majha ची त्या report ची कृपया लिंक द्याल का?
5 Sep 2016 - 9:05 am | कंजूस
श्रेय नक्की कुणास द्यायचे असं म्हटलंय यातच सर्व आलं.बाकी केपी म्हणजे सुत गुंडाळून पर्वताला समुद्रमंथनाचा प्रयत्न असावा असं माझं मत झालं आहे.असो.
आपली आमटी तंजावुरमध्ये कशी पोहोचली त्याबद्दल एबिपीचा भाग होता तो टिव्हीवरच पाहिलेला.
5 Sep 2016 - 9:56 pm | भाते
१ मे २०१५ ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एबीपी माझावर हा कायर्क्रम दाखवला होता. मुळ कार्यक्रमाचा दुवा मिळाला नाही. पण हा दुवा मिळाला.
मिपाकर शशिकांत ओक यांनी मागे तंजावर मराठीच्या एका ऑडियो ब्लॉगवर धागा काढला होता.
6 Sep 2016 - 11:20 pm | उपयोजक
धन्यवाद
4 Sep 2016 - 10:00 pm | असंका
या गीताबद्दल मीही एकदा विचारलं होतं. मला तर शब्दही आठवत नवते. त्याचं उत्तर आपणच दिलेलंत ना?
फार जबरदस्त गीत होतं...
मीही उत्तराची वाट बघतोय...
20 Aug 2017 - 8:49 pm | उपयोजक
ही नटी कोण?
20 Aug 2017 - 8:55 pm | उपयोजक
ही पहा
4 Jan 2019 - 9:45 pm | उपयोजक
अभिनेत्री कोण?
20 Aug 2017 - 9:07 pm | उपयोजक
हि कोण?
4 Jan 2019 - 9:48 pm | उपयोजक
नाव हवंय
4 Jan 2019 - 9:50 pm | उपयोजक
टी शर्टमधील अभिनेत्री अग्निहोत्र या मालिकेत होती.