"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या.
संदर्भ "http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5525909934268008440&Sectio...
भाई वैद्य साहेब मी समाजवादी मंडळींना मतभेद असतील तरी विचारवंत मानत होतो. पुण्यात काही मुस्लीम मंडळींनी चौकात येऊन औवैसी यांच्या विचाराचा निषेध केला. सर्वच मुस्लीम काही औवेसी च्या मताला बांधलेले नाहीत.
आपल्याला रा स्व संघ जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर टीका करायला मोकळीक आहे पण अस राष्ट्र्विरोधी कृत्याच समर्थन करुन टीका करु नका. हा पायंडा चांगला नाही.
आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. जिथे जिथे मुस्लीम जास्त झाले तेथुन हिंदुंना पळवौन लावले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा इतिहास पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही. आजही पाकिस्थानातुन हिंदु भारतात येत आहेत. काश्मिरमधला हिंदु संपला आहे. का आम्हाला आत्मीयता वाटेल ? तुम्ही घेतला असेल मक्ता आम्ही नाही.
भारतात मुस्लीमांना भय वाटेल असे काही घडत नाही. या उलट जे नरसंहार काश्मीरमधे झालेत त्याची आठवण ठेवा.
मुस्लीमांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाज काम करतो आहे. तुम्ही संघाला शिव्या दिल्याने त्यात फरक पडणार नाही.
भाई वैद्य साहेब.
१) तुम्ही कधी ज्या मुस्लीम महिलेला तोंडी तलाक मिळालेला आहे त्यावर आवाज उठवलाय ?
२) तुम्ही कधी मेहेर की रकम तलाक पिडीत महिलेच्या उपजिवीके इतकी असते का यावर विचार केलाय ?
३) तळपत्या उन्हात काळ्या बुरख्यात वावरणार्या महिलांना बुरख्या बद्दल काय वाटत हे जाणलय ?
४) सासर्याने केलेल्या बलात्काराला एका मुल्ला ने बलात्कारीत सुनेला तिच्या नवर्याने तलाक द्यावा व पुन्हा सासर्याने निकाह लावावा ही शिक्षा स्वतंत्र भारतात योग्य वाटते ?
५) या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो.
यामुळे तलाक पिडीत महीला ताठ मानेने जगु शकत नाहीत. त्यांना कोणी अमिर शोधुन त्याची तिसरी किंवा चवथी बिवी म्हणुन रहावे लागते.
या पेक्षा जर भारत माता की जय चा आग्रह झालाच तर तो सौम्य असेल.
तुम्ही संघद्वेशाने पछाडलेले मानसीक रोगी आहात. विचारवंत जर कोणी तुम्हाला यापुढे म्हणणार असेल तर ती मोठी चुक असेल.
राष्ट्र प्रेम हा संस्कार असतो हे सुध्दा तुम्हाला राष्ट्र सेवा दलात शिकता आल नाही. भारत माता की जय म्हणल्याने राष्ट्र विरोधी कृत्य करताना एखादा क्षण विचार करावा इतकाच संस्कार या घोषणेत आहे.
आज अनेक मुस्लीम तरुण देषविघातक कृत्ये करत आहेत त्याचा निषेध भाई तुम्ही कधी केलात का ?
भाई वैद्य साहेब तुम्ही संघाच्या विचाराच्या लोकांच्या पाठींब्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कधी काळी उपभोगल आहे त्याची आठवण ठेवा. एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
प्रतिक्रिया
25 Mar 2016 - 12:35 am | भंकस बाबा
कुराणाचा अर्थ लावायला गेले तर अनेक भयानक प्रश्न निर्माण होतील. एक उदाहरण देतो.
इस्लामच्या शिकवणीनुसार मुस्लिमानी केवळ हजची यात्राच नव्हे तर आपले आयुष्य देखिल मेहनत करून कंठावे असे म्हटले आहे. त्यामुळे धार्मिक कारण सोडून इतर गोष्टीसाठी भिक मागणे इस्लाममधे हराम आहे. आता हेच आमचे इस्लामी बंधू जेव्हा भारतीय सरकारने दिलेली सबसीडी रेशन दुकानामार्फत वा गॅस सब्सिडी घेतात तेव्हा एखादा मौलवी त्यांना सांगत नाही की 'लाहोलबिलाकुवत ये इस्लाममें हराम हैं' कसे सांगेल पोटाची आग ही सर्व धर्माच्या वर असते.
मुंबईच्या 92 दंग्याविषयी थोडेसे, मुस्लिम समाज हां सरकारी आस्थापन, मोठ्या कंपन्या , स्थिर नोकरी अशा ठिकाणी फार कमी दिसतो, पण गैरेज लाइन , छोटे उद्योग अशा ठिकाणी तो भरपूर असतो. नेमकी हीच बाब दंग्याबाबत मुस्लिम समाजाबरोबर झाली. पहिल्यांदा यांना मजा वाटली पण नंतर कळले की काम नाही तर अन्न नाही, तोपर्यंत उशीर झाला होता. एकजुट झालेला हिंदू पहिल्या खालेल्या माराचा बदला घेऊ लागला, तेव्हा मुस्लिमाना दुहेरी फटका बसला. एकतर काम नाही म्हणुन पैसा नाही आणि चवताळलेले हिंदू फटके मारताहेत. त्यामुळे दंगा नको ही संकल्पना पुढे आली. आणि ज्याला स्लीपर सेल म्हणतात तो प्रकार उदयाला आला. आता आमचे सेक्युलर नेते दहशतवादाला धर्म नसतो हे बोलायला मोकळे झाले.
24 Mar 2016 - 11:52 pm | अत्रुप्त आत्मा
@दहशतवादी पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत, त्यामुळे रे मुस्लिम नाहीत,पवित्र कुराण मानवतावाद शिकवते .>>> अह्हाह्हा ! आले सांगायला. एका तरी इस्लामिक देश/सँघटनेनी "इसिस गैर इस्लामिक वागते,म्हणून तिला इस्लाम मधून हाकलून देत आहोत!" अशी घोषणा अगर फतवा काढलाय का? निषेधाचे मोर्चे काढलेत का इसिस/लादेन वगैरेन विरुद्ध. कायच्या काय बोलताय उगाच.
25 Mar 2016 - 12:26 am | ट्रेड मार्क
वर त्यांनीच दिलाय तोच परत.
पण मी तुमच्याशी सहमत आहे.
हे आतापर्यंत कोणीही केलं नाही आणि करणारही नाही. तेवढी हिम्मत नाही या लोकांमध्ये. भ्याडाप्रमाणे लपून हल्ले/ बॉम्बस्फोट करणार. इतर धर्मीय जास्त असतील तिथे नुसते तोंड देखले विरोधाचे नाटक करणार आणि मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा जिहाद.
25 Mar 2016 - 1:09 am | अर्धवटराव
निदान भारतीय मुसलमान तरी कधि दहशतवादाचे समर्थन करत नाहि... तीव्र विरोधच करतो.
जगभरात मुस्लीम वि. इतर अशी काहिशी संघर्ष स्थिती दिसते (किंवा ति तशीच आहे म्हणुन जाहिरात केली जाते) त्यात अनेकांना (इंक्लुडींग मुस्लीम्स) तथ्य वाटते. मुस्लीमांना धर्मबांधवांकरता काहि कणव वाटणं देखील स्वाभावीक आहे. पण एकुणच दहशतवादातला फोलपणा, त्यातुन होणारं नुकसान सर्वच भोगत असतात.... मुस्लीम्स सुद्धा. तेंव्हा प्रॅक्टीकली त्यातला कुणी दहशतवादाचं समर्थन करत असेल असं वाटत नाहि.
24 Mar 2016 - 7:05 am | श्री गावसेना प्रमुख
गरीब चिमणा जी इसिस हे इस्राईल किंवा अमेरिकेचे पाप नसून तुर्की आणि सौदी अरेबियाचे पाप आहे,जेव्हा तुर्कीने रशियन विमान हद्दीचे कारण दाखवून पाडले तेव्हा ते विमान 17 सेकंदासाठी तुर्की हद्दीत होते, आणि इतक्याश्या कारणावरून जर जेट पाडायला लागले तर तुर्कस्थान चे किती विमान पडायला हवे होते इथे बघा।त्याचे कारण तुर्की ला आपण इसिस चे आश्रय दाते आहोत हे उघड होऊ द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी रशियाचे टेहळणी विमान पाडले।। आता हि बातमी बघा।https://m.facebook.com/story.php?story_fbid=982115515156894&id=108734602...
24 Mar 2016 - 3:54 pm | DEADPOOL
इसिस हे ईस्त्राईल आणि अमेरीकेचे पाप आहे >>>>> अरेरे! विवाहाआधी असं नव्हत करायला पाहिजे =))
असो आई कोण आणि बाप कोण?
24 Mar 2016 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा
मुस्लिम व्हा,आणि सू-रक्षित बना! .. हा कुरणीय संदेशच दहशतवादी सन्देश आहे.
23 Mar 2016 - 9:03 pm | Ram ram
ग. चि. जी भारताला इजराइल च बनावे लागेल, इथेच आपल्यात किती एकी आहे हे दिसतय
24 Mar 2016 - 1:18 am | धनंजय माने
लेख पटला. पण हे जे कोणी भाइ वैद्य आहेत त्यांच्याकडे हा पोचणार कसा?
की भाई वैद्य हे मिपा सदस्य आहेत ? (स्पा यांनी विचारलेला प्रश्न)
24 Mar 2016 - 12:14 pm | प्रकाश घाटपांडे
http://www.muslimsatyashodhak.org/ इथे भेट द्या
25 Mar 2016 - 7:19 am | विकास
मुस्लीम राष्ट्रीय मंच देखील बघण्यासारखे आहे...
25 Mar 2016 - 1:26 pm | तर्राट जोकर
आपले माननीय पंतप्रधान खुद्द म्हणालेत इस्लाम हा शांततेचा धर्म आहे म्हणून. आता बोला?
25 Mar 2016 - 2:41 pm | गॅरी शोमन
मी प्रिंट काढुन रजिस्टर्ड ए डी पोस्टाने भाई वैद्य यांना या धाग्याची प्रत पाठवतो. शेण खाल्लेच आहे तर पुर्णच खातो.
25 Mar 2016 - 2:48 pm | गॅरी शोमन
http://www.muslimsatyashodhak.org/ इथे भेट द्या दिली भेट आणि या वेबसाईटवरचे हे वाक्य फारच उद्बोधक आहे.
Muslim Satyashodhak Mahila Manch is the main activity of the MSM. Muslim women's problems are multi dimensional. Apart from social,economical and educational poor condition, they have to face the problems generated from Muslim Personal Law.
मला सांगा ह्या संदर्भात एक तरी वाक्य ह्या मंचावरुन भाई वैद्य बोलले आहेत का ? कृती बद्दल विचारणे गैर ठरेल कारण समाजवाद म्हणजे सगळे विचारवंत. फक्त विचार मांडायचे आणि कृती करायची नाही.
तुम्हाला हेच म्हणायच होत का?
26 Mar 2016 - 9:33 am | प्रकाश घाटपांडे
यावर जाता जाता बोलले थोड पण तो मेन फोकस नव्हता. मेन फोकस संघ. पण त्यांच स्वातंत्र्य लढ्यात योगदान नक्कीच आहे.
अवांतर- तुम्हाला पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका हा सदानंद मोरे यांचा साधना साप्ताहिकातील लेख वाचायला कदाचित आवडेल.
https://drive.google.com/open?id=0B2X6bSru0D7IbFkyeDZWNGFHRG8
25 Mar 2016 - 3:01 pm | गॅरी शोमन
घाटपांडे यांनी पाठवलेली लिंक आणि तुमची लिंक दोन्ही ही उदबोधक आहेत. दुर्देवाने या दोन्ही ही संघटनांना मुस्लीम समाजात फारशी किंमत नाही. सत्यशोधक समाजाचे एक नेते जेव्हा मृत्यु पावले तेव्हा त्यांच्या दफनाला जागा द्यायला तत्कालीन कमिटीने नकार दिला होता. कित्येक तास त्यांचे शव तसेच पडुन राहिले. पुढे काही समझोता घडला आणि दफनविधी झाला. पण सामान्य मुस्लीमांच्या मनावर ही घटना आणि त्याला मिळालेली प्रसिध्दी याचा खुप परिणाम झाला. आता सध्या तरी तलाक पिडीत वयोवृध महिला याच्या सदस्य आहेत ज्यांचा निकाह लागु शकत नाही आणि जगण्याचे साधनही उपलब्ध नाही.
25 Mar 2016 - 5:20 pm | विकास
माझ्यामते कुठलेही सकारात्मक समाजप्रबोधनाचे काम पुर्ण वाया जात नाही. त्याचे ripple effects असतात. पण ते सकारात्मक हवे. मात्र प्रबोधन करायला जायचे आणि ज्यांचे करायचे त्यांनाच शिव्या घालायच्या याने परीणाम उलटे घडू शकतात. सुदैवाने या दोन्ही संघटनांनी तसे केलेले नाही.
तुम्ही जे उदाहरण दिले ते मला वाटते हमिद दलवाईंचे आहे. त्यांना सगळ्यात जास्त विरोधाला सामोरे जावे लागले होते.
मुस्लीम सत्यशोधक समाजाचे हमिद दलवाईंच्या नंतर नक्की किती सक्रीय काम चालले आहे याची कल्पना नाही. पण हा एक स्वागतार्ह उपक्रम मुस्लिमांसाठी प्रथमच काढला गेला होता असे वाटते. अर्थात त्याची मर्यादा ही महाराष्ट्रातील मराठी मुसलमान समाजापुरतीच राहीली असे वाटते.
मुस्लीम राष्ट्रीय मंच हा प्रामुख्याने उत्तर भारतात चालू केला गेला आणि त्याला मानणारे टक्केवारीने अर्थातच कमी असतील पण खूप मुस्लीम नागरीक आहेत. यात अर्थात संघाचा पुढाकार होता. त्यामुळे मध्यंतरी आलेल्या एका विनोदानुसार, "मोहनजींनी श्वास घ्या म्हणले तर, आम्ही स्वतःचे नाक दाबू पण घेणार नाही" अशी वृत्ती असलेल्या डाव्या आणि तथाकथीत पुरोगाम्यांनी त्यांच्या पध्दतीने प्रयत्न केले. इंद्रेश कुमारांना अडकवण्याचे जे काही युपिएच्या काळात प्रयत्न झाले तो त्याचाच एक भाग होता असे म्हणले गेल्याचे आठवते. - अडकवता आले नाही तरी वर्षे वाया घालवून आणि बदनामी तर करता येते! असो.
25 Mar 2016 - 6:05 pm | प्रदीप
मुस्लीम सत्यशोधक समाजाविषयीचे तुमचे विधान बरोबर आहे. हमीद दलवाईंच्या पश्चात त्यांच्या पत्नि, मेहरून्निसा दलवाई ह्यांनी संस्थेचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना समाजाकडून इतका त्रास झाला, की त्या ते नेटाने पुढे सुरू ठेवू शकल्या नाहीत. ह्याविषयी त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर कथन केले आहे.
अलिकडेच ह्या संस्थेचे एक ज्येष्ठ सभासद, श्री. तांबोळी ह्यांनी, संस्थेच्या कामातून आलेल्या नैराश्याने आत्महत्या केली. थोडक्यात किमान इथेतरी काही रिपल इफेक्ट दिसून आलेला नाही.
26 Mar 2016 - 12:01 pm | प्रदीप
मी लिहीले होते: "अलिकडेच ह्या संस्थेचे एक ज्येष्ठ सभासद, श्री. तांबोळी ह्यांनी, संस्थेच्या कामातून आलेल्या नैराश्याने आत्महत्या केली". इथे माझ्या नजरचुकिने चुकिचे नाव पडले आहे, त्याबद्दल दिलगीर आहे. आत्महत्या केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या त्या जुन्या कार्यकर्त्याचे नाव हुसैन जमादार असे आहे. प्रकाश घाटपांड्यांनी खरडवहीतून ह्याविषयी चौकशी करून, श्री. तांबोळी हे मंडळाचे सध्याचे अध्यक्ष आहेत, ह्याकडे माझे लक्ष वेधले आहे. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे.
श्री. जमादारांच्या आत्महत्येविषयीची बातमी येथे वाचावयास मिळेल.
28 Mar 2016 - 11:31 am | कलंत्री
तांबोली यांना दिर्घायुष्य लाभो.
25 Mar 2016 - 5:12 pm | इरसाल
पिज्जा हट मधे जसं प्रत्येक पिज्जापुढे १ लाल मिरची, २ लाल मिरच्या, ३ लाल मिरच्यांचे चित्र काढलेले असते जेणेकरुन कोणता जास्त तिखट (मराठीत -स्पायसी)त्यानुसार मागणी करता येते.
तर ईथे येणार्या धाग्याच्या कंटेंटनुसार तिथे अश्या लाल मिरच्यांचे चित्र लेखाच्या नावा आधी लावावे. लोकांना लेखाचे पोटेंशियल समजण्यास मदत होईल.
26 Mar 2016 - 10:31 am | गॅरी शोमन
मुस्लीम सत्यशोधक समाजाच्या मुळच्या उद्दीष्टांना भाई वैद्य यांच्या भाषणाने किती बळ मिळाले ? मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. हे वाक्य तर मुस्लीम समाजाला मध्य युगात नेण्यासारखे आहे. यातुन निर्माण होणारी मुस्लीम समाजाची मानसिकता मुस्लीम स्त्रीयांना अजुन बंधने घालायला कारणीभुत ठरेल इतका सामान्य विचार या व्यासपीठावर चढण्यापुर्वी भाई वैद्य यांनी केला की नाही हे समजायला मार्ग नाही.
26 Mar 2016 - 9:07 pm | चेक आणि मेट
काही लोकं लंगडी बाजूसुद्धा किती हिरारीने मांडत आहेत,हे पाहून अंमळ गंमत वाटली.
:
:
100
30 Mar 2016 - 11:13 am | सुबोध खरे
जोकर साहेब
आपण म्हणता तशी विचारसरणी पोथ्यात किंवा धर्म ग्रंथात पण सापडते. उदा. काफिराला इस्लाम स्वीकारायला लावा किंवा मारून टाका हे कुराणात स्पष्टपणे लिहिले आहे. कारण ख्रिस्ती किंवा इस्लाम मध्ये जमेल तितक्या लोकांना आपल्या धर्मात आणा हा धर्माचा "आदेश"च आहे. त्यामुळे अतिशय सज्जन असणारे कॅथोलिकसुद्धा इतरांचे धर्मांतर करून त्यांना आपल्या धर्मात आणणे हे पवित्र कर्तव्य समजतात.
भगवद्गीतेत किंवा झेंद अवेस्तात( पारशी धर्मात)किंवा ज्यू लोकांच्या धर्म ग्रंथात दुसर्या धर्माच्या लोकांना सम दाम दंड किंवा भेद या मार्गांनी आपल्या धर्मात आणा असे कुठेही लिहिलेले नाही. यामुळेच हिंदू पारशी आणि ज्यू हे एकत्र सहज आणि गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. पण हेच ख्रिस्ती किंवा मुसलमान धर्माच्या बाबतीत आढळत नाही.
त्यातून आपल्याला हव्या असलेल्या विदा मध्ये फक्त १० % लोक मदरसा मध्ये शिकतात पण जेंव्हा १८ कोटी मुसलमान लोकसंख्येच्या शाळेय वयातील मुले पहिली ती जरी १ % असतील तरीही ती १८ लाख होतात. हि मुले फक्त कुराण आणि इस्लाम धर्माचा २०० वर्षे पूर्वी लिहिलेला शिक्षणक्रम शिकतात ज्याचा व्यवहारात काहीच उपयोग होत नाही. तेंव्हा धड नोकरी नाही कि व्यवहार ज्ञान नाही अशा मुलांना दहशतवादि बनवणे किती सोपे आहे हे आपल्या लक्षात येईल.
तुम्ही उत्तर ध्रुवावरील पांढर्या अस्वलाच्या उवांवर संशोधन करून अगाध ज्ञान मिळवून पी एच डी मिळवली तरी आपल्या नावाच्या मागे डॉक्टर लावण्याव्यातिरिक्त त्या ज्ञानाचा काहीच उपयोग होत नाही. अशा व्यवहारात काडीचाही उपयोग नसलेल्या ज्ञानाने केवळ उद्विग्नता आणि रिकामेपण येते
राहिली गोष्ट धर्मग्रंथात लिहिलेले नसले तरीही जर तुम्हाला तुमच्या जातीचा खोटा अभिमान बाळगायला तुमच्या आईबापानी लहानपणापासून शिकवले ( उदा तू उच्च जातीचा राजपूत आहेस उगाच लुन्ग्यासुन्ग्याशी जवळीक करू नकोस) तर उद्या अशा तरुणाच्या बहिणीने एखाद्या निम्न जातीच्या मुलाशी प्रेम संबंध जुळवले तर त्या मुलाचा किंवा बहिणीचाही वाढ करण्यास तो मुलगा चूक समजत नाही.
याच न्यायाने मी असे म्हणेन कि गायीला मत समजले कि गोहत्या हे एक महत्पाप होते मग माथेफिरू तरुणांना त्याविरुद्ध भडकावण्यास कितीसा वेळ लागेल. आधुनिक आणि वैज्ञानिक शिक्षण हे जास्त महत्त्वाचे आहे. महात्मा गांधीजीनी गायीचे महत्त्व अवास्तव वाढवले. स्व. सावरकर यांची विचारसरणी "गाय हा उपयुक्त पशु आहे" अशी स्वीकारली गेली असती तर इतिहास वेगळा झाला असता.दुर्दैवाने त्यांना गांधीजींचा खूनी म्हणण्या इतकी कॉंग्रेस ने नतद्रष्टता दाखविली आणि समाजाचे अपरिमित नुकसान झाले.
महात्मा गांधीजीनी दुर्दैवाने सर्व धार्मिक लोकांना खूष ठेवण्याचे धोरण ठेवले त्यामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजला नाही असे मला वाटते.
म्हणजे केवळ पोथ्या किंवा धर्मग्रंथ नव्हे तर लहानपणा पासून मिळालेली शिकवण पण हिंसेला आणि असहिष्णूतेला आमंत्रण देते.
यात एक भाग हा आहे कि धर्मग्रंथातील शिकवणीचा प्रतिवाद सहज शक्य नसतो. पण वागणूक बदलणे जास्त सोपे असते.
हा विषय फार गहन आहे आणि माझी त्यावर भाष्य करायची लायकीही नाही आणि ज्ञानही नाही तेंव्हा येथेच थांबतो.
30 Mar 2016 - 11:44 am | अत्रुप्त आत्मा
__/\___/\____/\__
30 Mar 2016 - 11:14 am | सुबोध खरे
वाढ नसून वध आहे
क्षमस्व
30 Mar 2016 - 11:15 am | सुबोध खरे
गायीला मत समजले किऐवजी
"गायीला माता समजल्याने" असे वाचावे
4 Apr 2016 - 3:17 pm | श्रीगुरुजी
देशातील सध्याचे वातावरण दुरुस्त करावयाचे असेल, तर सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र यावे. त्यासाठी शरद पवार यांच्याखेरीज दुसरे नाव नाही. केवळ पाण्याचाच दुष्काळ नाही तर सामाजिक समस्यांचा दुष्काळ संपल्याशिवाय राहणार नाही, असे भाई वैद्य यांनी सांगितले.
नव्वदीच्या घरात असूनही भाई वैद्य यांची विनोदबुद्धी (की तिरकसबुद्धी?) अजून शाबूत आहे हे वरील वाक्यांवरून दिसून येते.
http://www.loksatta.com/pune-news/authoritarian-minded-sharad-pawar-warn...