मसाल्या'ची मी तर प्रोमोज पाहिल्या पासुन वाट बघत होतो. वासही चांगला खमंग येत होता.आणी कारखान्याचा अंदाज असल्यानी तो खमंग असणार इतकं मनाशी पक्कं झालेलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिनुमा बघत असताना त्यात पुर्ण हरवायचा आनंद घेता आला.
गिरिश कुलकर्णि. आणी अमृता सुभाष एक गरिब जोडपं अतिशय कष्टाळुपणा हा अंगिभूत गुण असलेलं,हे जोडपं हीच चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका आहे.
हा निरनिराळे छोटेछोटे व्यवसाय करणारा माणुस(रेवण पाटिल) दर व्यवसायात ठेकेदारांकडली पैशाची उधारी आणी उ(दा)धार गिर्हाइकांची ठकबाजी या दुष्ट चक्रात अडकलेला असतो.त्यामुळे एका गावातुन गाशा गुंडाळुन दुसृया गावात पुन्हा नवा डाव खेळायचा असं सगळं चाललेलं असतं.कारभारिण त्याला अगदी एक घरटं मोडलं की दुसरं विणुन दे अशी साथ देत असते.पण तिही या सगळ्या भागंभागीला थकलेली असते.पण एक दिवस असं होतं की अश्याच एका गावाहुन किराणा मालाच्या दुकानाला लोकार्पण मस्तु करुन दोघंही रात्रीच्या वेळी एका ट्रक मधे आपलं छोटसं पाठिवरचं बिर्हाड घेऊन बसतात.आणी त्यांना नाशिकला सोडणारा ट्रक म्हणुन जो भेटतो तो नेमका हैद्राबादला जाणारा...!इथे मग ट्रकवाल्याशी शेटलमेंट सुरु होते आणी तो सोलापुरला सोडायचं कबुल करतो.कारभारणीला अख्खा महाराष्ट्र फिरायची सवय झालेलीच असल्यानी ती यालाही तयार होते.आणी तिला सोलापुरात असलेला आपला भाऊ अठवतो.त्याच्या कडे जाऊ असं ठरवतात.पण इतक्या वर्षानी भाऊ तोच असला तरी सोलापुर त्यांच्यासाठी बरच बदललेलं असतं.मग काही दिवस धर्मशाळेत उतरणं,एक दिवस अचानक ज्याला पत्ता विचारला तोच हा भाऊ निघाला वगैरे प्रसंग घडुन बहिण भावाकडे पोहोचते.
हे भाऊ प्रकरणही भलतच गमतिदार व्यक्तिमत्व आहे.नंबर एकचा आळशीराजा...! (त्याच्या खास सोलापुरी भाषेची मजा मात्र बादशाही आहे.) एकेकाळी बार-रेस्टॉरंटमधे चखण्याच्या पुड्या पुरवणारा छोटासा धंदेवाइक पण त्याचा पोरगा कानात पेन्सिल घालण्याच निमित्तं होऊन तो धंदा सोडुन पोराच्या कानाच्या उपचारासाठी रहात घर विकुन घरी बसलेला असा असतो.विकलेल्या घराचा पैसाही संपत आलाय,तेंव्हा याला परत कामधंद्याला कसा जोडावा या चिंतेत त्याचीही कारभारिण असते. आणी आपल्या या धंदा करायचं नशिब घेऊन जन्माला आलेल्या (नायकाला)-रेवण पाटलांना,आता तो स्नॅक्सच्या मसाला शेंगदाण्याचा धंदा करायचं स्वप्न पडतं.बास हा व्यवसाय तात्काळ सुरुही होतो.पण या कानाच्या आजारासाठी काय करता येइल या चिंतेनी त्रस्त असलेल्या बायकोच्या भावाखातर रेवण त्या मुलाच्या कानाच्या एक्स-रे घेऊन पुण्याला जायला निघतो.आता गेल्यावेळी अ-मराठी असलेल्या ट्रकड्रायव्हरमुळे जो घोटाळा झाला,तो होऊ नये म्हणुन यावेळी पाटिलबुवा 'आपला' मराठी ट्रकवाला पुण्याला जाण्यासाठी पकडतात.आणी नेमका तो ट्रक एका पोलिस चेकपोस्टवर लाइनीत लागला असताना आपला हा भाबडा नायक पोलिसांजवळ जाऊन,सायब आपला ट्रक हाए,सोडा ना लवकर पुन्याला जायचय म्हत्वाच्या कामाला असं म्हणतो,आणी पोलिस चेकिंग होताना ट्रकमधे निघतो तो गांजा...!
अता आपले रेवण पाटिल नको तिथे दाखवलेल्या आपुलकीची सजा भोगायला लॉक-अप मधे जाऊन बसतात.पोलिसांनाही यानी गयावया करुन आपण फक्त सोलापुअरहुन पुण्याला जाण्यासाठी या ट्रक मधे बसलो होतो हे सांगितल्यामुळे आणी ''हा'' ट्रक मालक असल्याचा कोणताही पुरावा नाही हे कळल्यामुळे,याला आपण पकडु शकत नाही हे उमगलेलं असतं,पण असा सरळ याला सोडतील तर ते पोलिस कसले..? ते त्याच्या घाबर्या स्वभावाचा पुरेपुर फायदा उपटुन एका साखळीचोरीच्या न सापडलेल्या गुन्हेगाराच्या नावावर याला आत टाकतात.''हे बघ नारकोटिक्सच्या गुन्ह्यात अडकलास तर लंबे जाशील त्यापेक्षा या साखळीचोरीला तुझी म्हणुन स्विकार,म्हणजे आमची एक केस मार्गी लागेल.आणी तु २/४महिन्याची माफक सजा होऊन सुटशील''...इती पोलिस.
ही साखळी चोरिला गेलेली असते ती एका मोठ्या उद्योजकाच्या बायकोची,हा उद्योजक आणी त्याची बायको म्हणजे डॉ.मोहन अगाशे आणी ज्योती सुभाष...ते दोघेही चोर सापडला म्हणुन पोलिस ठाण्यात येतात आणी रेवणला बघता क्षणी त्यांना नक्की मामला काय आहे हे लक्षात येतं.आणी ते पोलिसांना केस बंद करण्याची विनंती करुन रेवणला सोडुन द्यायला लावतात.नंतर या अडकलेल्या गरीब रेवणला, ''रात्री झोपायची सोय आहे का..?'' असं विचारुन परोपकार बुद्धीने स्वतःच्या गोडाऊन मधे झोपायला देतात.....
आणी इथुन पुढे चित्रपट संपे पर्यंत सुरु होते रेवण पाटलांच्या नव्या आयुष्याची लढाई... हा मोठा उद्योजक मनानेही तितकाच मोठ्ठा असतो.तो या गरिब कष्टाळु तरुणाच्या पाठिशी एखाद्या सावध मित्राप्रमाणे खंबिरपणे उभा रहातो.तो त्याला लोकव्यवहारात सावध आणी शहाणं कसं करतो...? रेवण पाटलाचे जुने कर्जदार ''मोकळे'' कसे करतो...? आणी शेवटी अनेक अडचणी येऊन रेवण पाटलाची टच मसाल्याची स्वतःची छोटिशी कंपनी त्याच्या कारभारणीच्या साथिने कशी उभी रहाते...? हा एक अत्यंत रंजक आणी मार्गदर्शक प्रवास नुसता अवडणाराच नाही,तर अश्या या खर्याखुर्या जिवन संघर्षाच्या प्रेमात पाडणारा आहे.
चित्रपटाची कथा/पटकथा/संगीत(बर्याच काळानंतर-पुन्हा एकदा आनंद मोडक)/दिग्दर्शन/पात्र योजना या सगळ्या बाजुही चांगला मसाला जमायला जश्या हव्या तश्याच सकस आहेत. त्यामुळे हा चित्रपट कितिपैकी किति मार्क द्यायचे या कॅटॅगरीत रहातच नाही. अत्ताच्या अजिर्ण झालेल्या तथाकथित इनोदी आणी इतर चित्रपटांच्या पंगतीत एक भरपुर पोषणमुल्य देणारं हे खास वेगळं पान आहे,त्यामुळे याचा अस्वाद घेणे मस्ट आहे. या मसाल्याचं वैशिष्ठ्य म्हणजे हा आपल्या रोजच्या जेवणातला मसाला आहे.त्यामुळे यात वापरलेले सगळे घटक पदार्थ एकदम जेनुइन आहेत. ताजे आहेत. कुठलिही मुद्दाम निर्माण केलेली चव नाही.प्रॉडक्ट उठवायला घातलेला कुठलाही बेगडी रंग नाही,आकर्षक पॅकिंगही नाही.आणी म्हणुनच मसाला अस्सल आहे. रोज वापरण्यासाठी आपल्याकडे भरलेला असणं आवश्यकंही आहे.... मग जाणार ना मसाला घ्यायला...? :-)
प्रतिक्रिया
21 Apr 2012 - 4:56 pm | परिकथेतील राजकुमार
परिक्षण सुंदर आणि दृश्यभास निर्माण करणारे.
एकदम आवडेश.
फुडल्या शनिवारी मसाला बघितल्या जाणार आहे.
21 Apr 2012 - 5:04 pm | सुहास झेले
मस्त परीक्षण... !!
मला मसाला प्रोमोजमध्ये इतका अपिलिंग वाटला नव्हता, पण हे परीक्षण वाचून एकदा नक्की बघेन म्हणतो :) :)
21 Apr 2012 - 5:15 pm | यकु
व्वा.
छान परिक्षण.
21 Apr 2012 - 5:22 pm | स्मिता.
मसाल्याचे परिक्षण आवडले. त्यावरून चित्रपट नक्कीच बघावासा वाटतोय. आता 'आपली-मराठी'वर येईल तेव्हा बघू.
21 Apr 2012 - 5:30 pm | रेवती
परिक्षण आवडले.
21 Apr 2012 - 6:26 pm | स्वाती दिनेश
परीक्षण वाचून सिनेमा पहावासा वाटत आहे.
स्वाती
21 Apr 2012 - 10:47 pm | दादा कोंडके
मग तर बघितलाच पाहीजे!
22 Apr 2012 - 12:17 am | श्रीरंग
मस्त परिक्षण!
22 Apr 2012 - 8:50 am | प्रचेतस
चित्रपटाचे परीक्षण एकदम फर्मास.
अर्थात कुलकर्णी द्वयीचे(आता त्रयीचे) चित्रपट पचनी पडत नसल्याने 'मसाला' कदाचित पाहणार नाही. ग्रामीण भाषेचे फार वाभाडे काढतात हे लोक.
गड्या आपला मकरंद अनासपुरेच बरा.
22 Apr 2012 - 9:26 am | अत्रुप्त आत्मा
नाहि वल्ली तसं नाही, दिग्दर्शक संदेश कुलकर्णिने सिनेमाचा खरच वेगळा बाज ठेवलाय. त्यामुळे आधीच्या चित्रपटाचं कुठेही कसलंही रिपिटेशन आलेलं नाही. :-)
22 Apr 2012 - 8:57 am | पिंगू
मसाला मसालेदार आहे तर. आता नक्कीच बघितला जाईल.
- पिंगू
22 Apr 2012 - 9:34 am | चौकटराजा
सिने प्रिक्षान येक्दम + १०१
आनि अ आ ला कामातून येळ मिळाल्याचा आणंद !
22 Apr 2012 - 11:03 am | चिंतामणी
सुरेख परीक्षण.
अ.आ. - चित्रपट डोळ्यासमोर उभा केला तुम्ही.
तुमचे अजून एका गोष्टीसाठी अभीनंदन. (कश्यासाठी अ.आ. नक्कीच ओळखतील)
22 Apr 2012 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमचे अजून एका गोष्टीसाठी अभीनंदन.
(कश्यासाठी अ.आ. नक्कीच ओळखतील)>>> तुमच्या मनात तयार होणार्या ओळखिसाठी .... :-p
22 Apr 2012 - 3:18 pm | चिंतामणी
पण ह्या पोस्टने ती ओळख पुसुन टाकली. :(
22 Apr 2012 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा
@ती ओळख पुसुन टाकली. >>> अरेरेरे काहितरी आक्रित झालं वाटतं.. :-( काका अहो मला वाटलं तुंम्ही गमतिनं तसं लिहिलय,म्हणुन मी ही गंमतिनच लिहिलं... सॉरी हं
23 Apr 2012 - 8:17 am | ५० फक्त
अरे अभिनंदनाची बातमी एवढी गुप्त ठेवुन आलीच का मिपाच्या बोर्डापर्यंत ? आता कसं व्हायचं ते त्या भोलानाथालाच विचारावं लागेल.
23 Apr 2012 - 8:29 am | अत्रुप्त आत्मा
@अरे अभिनंदनाची बातमी एवढी गुप्त ठेवुन आलीच का मिपाच्या बोर्डापर्यंत ? >>>
@आता कसं व्हायचं ते त्या भोलानाथालाच विचारावं लागेल. >>> काहिही अर्थबोध होत नाहिये...
23 Apr 2012 - 10:14 am | प्रचेतस
अभिनंदन हो बुवा.
24 Apr 2012 - 11:00 am | जेनी...
अभिनंदन गुर्जि ....:P
आमच्यापासनं लपवायच प्रयोजन नाय कळलं :(
तरिबि अभिनंदन :D
22 Apr 2012 - 3:55 pm | मी-सौरभ
बघावा लागेल असं दिस्तयं
23 Apr 2012 - 12:39 am | कौतिक राव
आशु जोग चा लेख मधुन बातमी मिळाली की मसाला नावाचे काहितरी आलेय..
इथे तर प्रॉप्पर अग्रलेख वाचायला मिळाला..
छान होता ...
धन्यवाद!!
23 Apr 2012 - 12:41 am | कौतिक राव
धन्यवाद, तिकडे या लेखाचा दुवा टाकल्या बद्दल!!
23 Apr 2012 - 12:06 pm | मृत्युन्जय
परिक्षण आव्डले चित्रपट बघितल्या जाइल.
23 Apr 2012 - 3:01 pm | हसरी
इथे तर अख्खा चित्रपटच लिहून काढलाय (शुद्धलेखनाच्या भयंकर चुकांसहीत) ... प्रेक्षकांना पडद्यावर अभिनय बघायचे बाकी ठेवलेत फक्त :-(
23 Apr 2012 - 4:23 pm | अत्रुप्त आत्मा
@इथे तर अख्खा चित्रपटच लिहून काढलाय>>> :shock: अख्खा ???? जरा नीट वाचुन प्रतिक्रीया द्या हो महाशय...!
@(शुद्धलेखनाच्या भयंकर चुकांसहीत) ..>>> भयंकर चुका कोणत्या...? दाखवा ना जरा..?
23 Apr 2012 - 5:38 pm | हसरी
नमुन्यादाखल पहिला परीच्छेद : ;-)
मसाल्या'ची मी तर प्रोमोज पाहिल्या पासून वाट बघत होतो. वासही चांगला खमंग येत होता.आणि कारखान्याचा अंदाज असल्याने तो खमंग असणार इतकं मनाशी पक्कं झालेलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिनुमा बघत असताना त्यात पूर्ण हरवायचा आनंद घेता आला.
गिरीश कुलकर्णी. आणि अमृता सुभाष एक गरीब जोडपं अतिशय कष्टाळूपणा हा अंगिभूत गुण असलेलं,हे जोडपं हीच चित्रपटाची मध्यवर्ती भूमिका आहे.
===
याशिवाय, इंग्रजी प्रोमो शब्द मराठीतून अनेकवचनात लिहिताना 'प्रोमो' असाच लिहावा. 'पाहिल्या पासून' हा शब्द 'पाहिल्यापासून' असा हवा.
23 Apr 2012 - 10:05 pm | अत्रुप्त आत्मा
ठिक आहे...या शुद्ध लेखनाच्या चुका आहेत... पण या काय भयंकर चुका होतात की काय..? शुद्ध लेखनाच्या बाबतीत भयंकर चुक त्यालाच म्हणता येइल ज्याच्या मुळे एखाद्या वाक्याचा अर्थ मूलतः बदलून जातो...किंवा ते वाक्य अथवा संपूर्ण विषय त्यामुळे अर्थहीन होऊन जातो...माझ्या वरिल प्रमाणे झालेल्या अ-शुद्ध लेखनाच्या परिणामी प्रस्तुत लेखाचे असे काही झाले आहे काय..? आपण वरिल काढलेल्या चुका, आणी त्याला लावलेलं भयंकर हे विशेषण म्हणजे पोह्यात चुकुन राहिलेल्या फोलपटांना/भातकणांना खडे म्हटल्यासारखं हास्यास्पद आहे.
@याशिवाय, इंग्रजी प्रोमो शब्द मराठीतून अनेकवचनात लिहिताना :shock: 'प्रोमो' असाच लिहावा.>>> हे तर अजिबात मान्य करणार नाही... सामान्य प्रांतात होणार्या लेखनामधे अशा स्वरुपाच्या संमिश्र व्याकरणाची अपेक्षा ठेवणं तर प्रचंड हास्यास्पद आहे.
@ 'पाहिल्या पासून' हा शब्द 'पाहिल्यापासून' असा हवा. >>> ही तुमची सुद-लेखनाची अपेक्षा म्हणजे सत्यनारायणाच्या शिर्यात पावशेर रव्याला पावशेरच तुप हवं...!(नंतर पातेल्यात शिर्यासह तरंगल,किंवा वाहुन गेलं तरी ;-) ) अश्या स्वरुपाची निव्वळ पोथिनिष्ठ आहे.त्यामुळे स्वाभावीकच ती दुर्लक्षणीय आहे
23 Apr 2012 - 10:11 pm | प्रचेतस
सहमत आहे.
24 Apr 2012 - 10:55 am | धन्या
मीपन समत हाय.
पन भटजीबुवा तेवडा "सामान्य प्रांतात होणार्या लेखनामधे अशा स्वरुपाच्या संमिश्र व्याकरणाची अपेक्षा ठेवणं तर प्रचंड हास्यास्पद आहे." म्हंजे काय तो सांगा.
** काय कल्ला नाय. ;)
हितपन सुद्दलेकन म्हनुन कुनी वराडला तं त्याला आमी लोनेरे फाटयावर मारु.
24 Apr 2012 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा
@काय कल्ला नाय.;-) >>> वाइच थांबा..कलेल.. ;-)
23 Apr 2012 - 5:35 pm | किसन शिंदे
मस्त चित्रपट परिक्षण!
या शुक्रवारी नक्की पाहिल्या जाईल.
23 Apr 2012 - 5:37 pm | इरसाल
बघावा लागेल.
24 Apr 2012 - 11:21 am | हसरी
अहो अतृप्त आत्मा, चिडताय कशाला एवढे? चुका दाखवलेल्या आवडत नसतील तर तसं सांगा.
आपली भाषा शुद्ध लिहिली जावी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही.
24 Apr 2012 - 11:31 am | प्यारे१
शुद्ध, अशुद्ध सगळं ठीक आहे हो!
आपला खरा आयडी कोणता?
24 Apr 2012 - 4:14 pm | अत्रुप्त आत्मा
@शुद्ध, अशुद्ध सगळं ठीक आहे हो!
आपला खरा आयडी कोणता?>>> ख्याक...! :-D
24 Apr 2012 - 4:11 pm | अत्रुप्त आत्मा
@अहो अतृप्त आत्मा, चिडताय कशाला एवढे? >>> हां...मला वाटलच ,आपल्याला असं वाटेल...असो...मी चिडलेलो नाही...
@ चुका दाखवलेल्या आवडत नसतील तर तसं सांगा. >>> असा का बर वाटलं आपल्याला../ मी शुद्ध लेखनाच्या चुकी बद्दल चिडलोच नाही,,किंबहुना मी चिडलेलोच नाही...फक्त सामान्य चुकिला भयंकर चुक असं जे आपण म्हटलत,त्याचा खेद वाटला...
@आपली भाषा शुद्ध लिहिली जावी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही. >>> मलाही नाही वाटत, किंबहुन माझंही तेच मत आहे. म्हणुनच सुचवतोय...अपेक्षा करा... ''भयंकर'' असे शब्द अस्थानी वापरु नका... ते आरोप केल्यासारखं वाटतं ...
=====================================================================
अता माझे तुंम्हाला एक/दोन प्रश्न----
@ इथे तर अख्खा चित्रपटच लिहून काढलाय >>> मध्यंतरा पर्यंतचा आशय व्यक्तवुन,पुढिल भाग,लोकांनी प्रत्यक्ष पहावा ,,,अश्या स्वरुपाच्या केलेल्या मांडणीला,आपण ''अख्खा चित्रपटच लिहून काढलाय'' असं का बरं म्हणुन गेलात...? ही प्रतिक्रीया लिहिण्यापूर्वी आपण जर चित्रपट पाहिलेला होतात काय..?
@(शुद्धलेखनाच्या भयंकर चुकांसहीत) ... या दिलेल्या अयोग्य विशेषणाचा उहापोह वरती अन्यत्र येऊन गेलेला आहेच... मी काहिसा नाराज झालो,तो याच वाक्यावर...! याबद्दल आपण काहि दिलगिरी व्यक्त कराल अशी आशा होती... पण वरुन आपण मलाच चिडलात का..? असा उपप्रश्न करित आहात..हे अनाकलनीय आहे... असो...
@प्रेक्षकांना पडद्यावर अभिनय बघायचे बाकी ठेवलेत फक्त >>> हेही असं लिहायची काय गरज होती बरं..? मी ''प्रेक्षकांना-पडद्यावर अभिनय बघायचे बाकी ठेवले-'' म्हणजे असं लेखन करुन काहि गुन्हा केला काय..? की परिक्षण (माझ्या मते निरिक्षण) असं मांडू नये...असं आपलं मत आहे..? असेल तर का..?
24 Apr 2012 - 6:40 pm | मृत्युन्जय
सुदलेकनाच्या एवध्या चुका करता ते कराता आणी वर इतरांना जाब विचार्ताय होय? काही लाज लजा शर्म हया आहे की नाही?
बाय द वे तो जेनुइन शबद पन चुकला आहे. तो जेन्युइन असा हवा. आणी इतराम्च्या सुदलेकनाच्या चुका काढता तस्या माझ्या काडुन दाखवा की जरा. मग मानले तुमाला.
24 Apr 2012 - 10:39 pm | अत्रुप्त आत्मा
मृत्यूं-जय :-D हो...!
@आणी इतराम्च्या सुदलेकनाच्या चुका काढता तस्या माझ्या काडुन दाखवा की जरा.
मग मानले तुमाला. >>>
25 Apr 2012 - 12:39 am | पाषाणभेद
पहिल्या चित्रातले गिरिश कुलकर्णि आणि अमृता सुभाष एक गरिब जोडपं अजिबात वाटत नाही.
इकडे तबकडी ऑनलाईन विकत घेवून पहावा लागेल.
25 Apr 2012 - 3:32 am | निनाद मुक्काम प...
सिनेमा आंजा वर उपलब्ध झाल्यावर पाहीला जाईल.
खूप दिवसांनी मिपावर शुद्धलेखनाच्या नावाने गळे काढणारे पहिले. नी उर भरून आले. मुळात आमच्या बालपणी म्हणजे १९८० च्या दशकात एक पिढी इंग्रजी माध्यमातून शिकली ९० आणी २००० च्या पहिल्या दशकात ह्यात वाढ होत गेली.
आज आंजा वर अनेक महाराष्ट्रीय आहेत. मात्र त्यातील मराठी लेखन करणारे त्यामानाने फारच कमी. कारण मराठीतून लिहिण्याची सोय उपलब्ध असली तरी शुद्धलेखनाच्या भीतीमुळे अनेक जण मराठीतून लिहिणे टाळतात. पण वास्तविक आयुष्यात फर्डे मराठी बोलतात.
इंग्रजी माध्यमातील अनेकजण आजकाल मराठीच्या सर्वत्र चाललेल्या घोश्यामुळे मराठी सिनेमे किंवा नाटके आणी इतर कलांकडे वळत आहेत. ही लोक आपले भविष्यातील वाचक होऊ शकतात. पर्यायाने मराठीत वाचक व लेखक निर्माण होऊ शकतात
तेव्हा मुळात ही भाषा आंजावर प्रवाही राहण्यासाठी शुद्ध्लेखांचे नियम लवचिक असणे गरजेचे आहे.
ध चा मा होणार नाही एवढे पहिले म्हणजे झाले.
परीक्षण वाचून तू नळीवर ह्या सिनेमाची झलक पहिली.
पण परीक्षणामुळे ते पाहणे सुसह्य ठरले. म्हणजे कारण नुसती एक झलक पाहून ह्या सिनेमाचा आवाका लक्षात येणे एरवी कठीण गेले असते. पण ही कसर कसदार परीक्षणाने भरून काढली.
25 Apr 2012 - 11:19 pm | अमोल सहस्रबुद्धे
प्रोमो शब्दावरून प्रतिक्रिया वाचल्या आंग्ल भाषेतील शब्द मराठीत आणताना त्याला सगळे विभक्ति प्रत्यय मराठी भाषेप्रमाणे लावणे अपेक्षित आहे. जसे कॅसेट कॅसेटी सीडी सीड्या वगैरे..
26 Apr 2012 - 12:26 am | अत्रुप्त आत्मा
@जसे कॅसेट कॅसेटी सीडी सीड्या वगैरे.. >>> भुभू तुझं इथे ''हे'' मत बघुन ड्वले पाणावले ;-)