रस्त्यावरुन जाताना चालू सिग्नलमधून धप्पकन आवाज कानात घुसला..
कोणाचा तरी फाटलेला स्पिकर असणार..
छातीत नुसतीच धडधड आणि मनात कचकचीत शिव्या आल्या..
संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या..
पुन्हा पुन्हा कानात खुपणारा तो भसाडा आवाज...
कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा..
कुठच्याही वेळेला कारटेप लावून शायनिंग मारतात...
काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची...
मान वळवून मागे बघितलं तर तो '४१४१ घड्याळवाला' स्कॉर्पिओ होता...
मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!!
-(मनातल्या मनात)
प्रतिक्रिया
12 Apr 2012 - 3:30 pm | गवि
खी खी खी... हाण्ण...
12 Apr 2012 - 3:36 pm | इरसाल
हाण्ण नंतर ......तिच्या फुल्या फुल्या फुल्या राहिल्या काय ?
12 Apr 2012 - 3:42 pm | कपिलमुनी
आमच्या मावळात असे गुंठा मंत्री पदोपदी आढळतात ...
12 Apr 2012 - 4:17 pm | भीमाईचा पिपळ्या.
अजुन एक घड्याळपीडीत.
:D :D :D
अवांतर : विडंबण आवडल्या गेले आहे.