(कॉमन मॅन यांनी पुन्हा धागा काढला)

अन्या दातार's picture
अन्या दातार in जनातलं, मनातलं
28 Feb 2012 - 1:52 pm

मिपा वरचे तथाकथित वकील सदस्य कॉमन मॅन यांनी आजच पुन्हा एकदा कथ्याकुट सदरात धागा काढून त्यांची मते मांडली आहेत दोन वाक्यात आपले मत व्यक्त करण्यासाठी नमनालाच घडाभर तेलाची उधळपट्टी केली आहे

कॉमन मॅनच्या हाताशी असलेला जिलेबीचा सोऱ्या, इतर सदस्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ आणि आपणच इथले कायद्याचे जाणकार असून, प्रत्येक धाग्यात कलमांचा संदर्भ लावलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह आता बळावलेला दिसतो असेच म्हणावे लागेल

कॉमन मॅन यांनी पाडलेल्या जिलेब्यांच्या विषयांवरून जयंत कुलकर्णी यांनी त्यांच्या पोशाखाला चालेंज करायचे ठरवलेले दिसते. त्यांना कॉमन मॅन चा नेहमीचा पोशाख नको असून काळा कोट व पांढरा बो असा पोशाख हवा आहे असा उघड अजेंडा दिसतो. टीम अण्णांच्या माकडछाप चाळ्यांमुळे कॉमन मॅनही धागा काढण्याचा चाळा करताना दिसत आहेत.

मिपा घटनेतील कलम क्र. १ नुसार कॉमन मॅन यांना धागा काढण्याचे व आपले विचार मांडण्याची मुभा आहेच, परंतु अघोषित वाचक कलम (र.टा.ळ.) काय म्हणते (...repeatedly publishing boring content having unanimous views for most members of misalpav) याकडे कॉमन मॅन चे लक्ष गेलेले दिसत नाही. म्हणूनच मिपावर धागा काढून मिपा सदस्यांना कंटाळा आणण्याचा गंभीर प्रयत्न त्यांनी केला आहे. यासाठी आम्ही या विडंबनाद्वारे त्यांचा हिरमोड करू इच्छित नाही, व मिपा वाचक दंड संविधान कलम ४२० (अ) च्या अंतर्गत Neglegence for next 3 threads, uncognizable--- triable by members या तरतुदीनुसार काही होऊ नये अशी इच्छा व्यक्त करतो.

त्यातून त्यांना जर मिपा हे कायद्याचा किस पाडणारे संस्थळ हवे असेल तर स्वतःचा ब्लॉग काढून त्यांच्या स्वप्नातले धागे टाकण्याची मुभा आहेच. परंतु त्यांनी खुद्द मिपाच्या खेळीमेळीच्या स्वरूपावर कदापी हल्ला करू नये, तो कुणीच सहन करणार नाही असे या विडंबनाद्वारे आम्हाला सांगावेसे वाटते.

हे ठिकाणधोरणविनोदमुक्तकशब्दक्रीडाप्रकटनसद्भावनामतशिफारसआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

यकु's picture

28 Feb 2012 - 1:56 pm | यकु

(...repeatedly publishing boring content having unanimous views for most members of misalpav)

Neglegence for next 3 threads, uncognizable--- triable by members

कॉमन मॅन यांच्या खरडवहीत प्रत्येक सदस्याने किमान 5 निरर्थक आणि लंब्याचौड्या खरडी टाकाव्यात.
खरडवही बंद केली तर व्यनितून शिक्षा पोच करावी.

सुहास..'s picture

28 Feb 2012 - 1:58 pm | सुहास..

शिक्षा झालीच पाहिजे. जिलेब्यापाडु सदस्याचा अपमान आम्ही मिपाकर कदापी सहन करणार नाही. ;)
(युवानेते कॉमॅचा चाहता) वांझोटा ;) ÌÌÌ

प्रचेतस's picture

28 Feb 2012 - 2:01 pm | प्रचेतस

छप्पर फाड
दाण्णकन् आदळलय विडंबन.
विडंबनकुमार अन्याभौ दातारांचा इजय असो.

चिरोटा's picture

28 Feb 2012 - 3:11 pm | चिरोटा

तुम्ही "कॉमॅना पर्सनली ओळ्खता का हो ?
का ख.फ.मध्ये जे काही लिहिले जाते त्यावर जास्ती विश्वास आहे तुमचा ?
एकतर आपला सामान्य मिपाकर मिपासाठी काही करत नाही वरुन असले धागे काढूण ,वाचुन ,तुमच्या धाग्यातुन प्रेरणा घेउन काही साध्य / हासिल होइल ? की होणार आहे ? हे तुम्हालाच ठाउ़क ?
काय मत काय आहे तुमच स्वतःच ( एकन्यासाठि उत्सुक )
धन्यवाद
लस्सी

होतीच गरज अश्या विडंबनाची...!!!!

कपिलमुनी's picture

28 Feb 2012 - 3:22 pm | कपिलमुनी

कोणाच्या आय डी चे पिशाच्च आहे का ?

मी-सौरभ's picture

28 Feb 2012 - 3:26 pm | मी-सौरभ

मनातील भावना मोकळ्या करायला विडंबनाचा आधार योग्य प्रकारे घेतला आहे मात्र सदर सदस्यास अनुल्लेखाने मारणे जास्त श्रेयस्कर असे मला वाटते. असो

धाग्यात सदस्यनाम टाळले असतेस तर धाग्याचे आयुष्य वाढले असते. ;)

जिलब्यापाडू रोगाचा संसर्ग वाढू लागला आहे असे वाटते. काही ठोस उपाय केले जातील तर बरें.

पियुशा's picture

28 Feb 2012 - 3:58 pm | पियुशा


य्यो ..अन्या रॉक्स ;)

आबा's picture

28 Feb 2012 - 4:29 pm | आबा

काल बातमी वाचल्यानंतर कॉमन मॅन यांचा धागा येणार याची खात्री होतीच.
बाकी विडंबन झकास !

कॉमन मॅन's picture

28 Feb 2012 - 4:47 pm | कॉमन मॅन

दातारजी,

विडंबन छानच झाले आहे. मनापासून अभिनंदन.. :)

टीम अण्णांच्या माकडछाप चाळ्यांमुळे कॉमन मॅनही धागा काढण्याचा चाळा करताना दिसत आहेत.

अगदी खरे. आपण म्हणता त्याप्रमाणे टीम अण्णांनी जर त्यांचे माकडछाप चाळे थांबवले तर आमचाही धागा काढण्याचा चाळा थांबेल.. :)

किंबहुना, या विडंबनाद्वारे आपण 'टीम अण्णा माकडछाप चाळे करते आहे' हे नमूद केलेत, हे या विडंबनाचे आम्ही एक चांगले फलित समजतो..

एका चांगल्या विडंबनाकरता पुन्हा एकदा आपले मनापासून आभार.

धन्यवाद..

अण्णा एकवेळ माकडचाळे करण्याचे थांबवतील पण...
पण गिरण्यांचा पट्टा थांबणार नाही,
बेसन निघायचे थांबणार नाही,
घाणा निघायचा थांबणार नाही,
जिलब्या पडायच्या थांबणार नाहीत.

वपाडाव's picture

28 Feb 2012 - 7:20 pm | वपाडाव

मरेश ऐ आज...

हंस's picture

28 Feb 2012 - 8:55 pm | हंस

+१ वल्ली

अन्या, एकदम चुरचुरीत लेखन! कोल्हापुरी मिरचीसारखं नाका तोंडातून जाळ काढणारं! लगे रहो..............

कपिलमुनी's picture

28 Feb 2012 - 5:50 pm | कपिलमुनी

टीम अण्णांच्या माकडछाप चाळ्यांमुळे कॉमन मॅनही धागा काढण्याचा चाळा करताना दिसत आहेत.

>>अगदी खरे. आपण म्हणता त्याप्रमाणे टीम अण्णांनी जर त्यांचे माकडछाप चाळे थांबवले तर आमचाही धागा काढण्याचा चाळा थांबेल..

मलिंगाने गोलंदाजी करणे थांबवावे का ?

उदय के'सागर's picture

28 Feb 2012 - 7:01 pm | उदय के'सागर

/*म्हणूनच मिपावर धागा काढून मिपा सदस्यांना कंटाळा आणण्याचा गंभीर प्रयत्न त्यांनी केला आहे.*/

खरं बोललात दातार साहेब तुम्ही.... हे "कॉमन मॅन" जाम पकवतात.... खुपच!!!

/*यासाठी आम्ही या विडंबनाद्वारे त्यांचा हिरमोड करू इच्छित नाही, व मिपा वाचक दंड संविधान कलम ४२० (अ) च्या अंतर्गत Neglegence for next 3 threads, uncognizable--- triable by members या तरतुदीनुसार काही होऊ नये अशी इच्छा व्यक्त करतो.*/

कॉमन मॅन ह्यांना मिपा वरुन काढुनच का टाकत नाही.. किती बोर करतात ते.... सारखं सारखं हा कलम आणि तो कलम... तुम्ही कॉमन मॅन अहात तर जरा कॉमन माणसा-सारखं बोला कि राव.... नाहि तर तुमचा कॉमन मॅन हा आय.डी. बदलुन "कलम मॅन" तरी करा :P

हंस's picture

28 Feb 2012 - 8:57 pm | हंस

"कलम मॅन"................भारीये!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2012 - 10:23 pm | अत्रुप्त आत्मा

!@नाहि तर तुमचा कॉमन मॅन हा आय.डी. बदलुन "कलम मॅन" तरी करा >>>

जेनी...'s picture

28 Feb 2012 - 7:15 pm | जेनी...

" कलम मॅन "

:P

लै भारी :D

विडंबन्कुमाराचा इजय का काय म्हन्त्यात तो असो ;)

अन्या भारी लिहिलय्स ..मोजक्या शब्दात ....मस्तच :)

काय हे? आँ?
त्यांनी असे धागे काढले ते काढले, तुम्ही कश्याला अजून पेटवताय?
शांतता आवडत नाही वाटतं.

पाषाणभेद's picture

28 Feb 2012 - 11:48 pm | पाषाणभेद

+१

विनोदी अंगाने जाणारे विडंबन आवडले. मस्त चुरचुरीत आहे.
पण हा प्रयत्न म्हणजे कॉमॅ यांना लेखनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न नसावा. अन्या दातारांचा उद्देश तसा नसेलही पण किमान प्रतिसादातून तरी तसलेच वक्तव्य व्यक्त होत आहे असे जाणवते.