जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो.
यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.
ज्यांना कोणाला या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे असेल त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा आणि पुढील माहिती विचारावी. मात्र, मेळ्याच्या पाच दिवस आधी पर्यंत नावे द्यावीत म्हणजे व्यवस्था करणे शक्य होईल.
योगिनी खानोलकर : ९४२३९४४३९०
विजयाताई चौहान : ९८२०२३६२६७
अजून काही असल्या बिपिन कार्यकर्ते आणि श्रावण मोडक यांना सामायिक व्यनिद्वारेही संपर्क करू शकता.
प्रतिक्रिया
11 Jan 2012 - 10:55 pm | श्रावण मोडक
वर बिपिन यांनी दिलेल्या दोन क्रमांकापैकी योगिनी खानोलकर यांचा क्रमांक अनेकदा न लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गैरसमज करून घेऊ नका. त्या ज्या भागांत आहेत तेथील नेटवर्कची ती समस्या असेल. :)
12 Jan 2012 - 5:08 am | विकास
या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.
12 Jan 2012 - 12:45 pm | स्वाती दिनेश
या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत..
हेच म्हणते,
स्वाती