भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in जनातलं, मनातलं
21 Dec 2011 - 4:33 pm

अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.

या पत्रात नमूद केल्याप्रमाणे शासनाच्या ज्या विविध खात्यांची फसवणूक होत असल्याचे मी म्हंटले होते त्यांची चौकशी करण्याकरता शासनाने विविध खात्यांना माझ्या तक्रारपत्राच्या प्रती पाठविल्या व त्या पत्राची एक प्रत मलाही पाठविली.

माझ्या मूळ तक्रारपत्रातील ११ व्या मुद्यावर विचार करीत शासनाने ग्राहक तक्रार निवारण मंचासही एक प्रत पाठविली.

पुढे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून काहीतरी चूकीचा समज झाला व त्यांनी मला हे असे काहीसे असंबद्ध पत्र पाठविले.

खरं तर माझ्या पत्रात मी ग्राहकाची अप्रत्यक्ष फसवणूक असा शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे हा मुद्दा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अंतर्गत येत नव्हताच. यास्तव ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सल्ला मी मानणे शक्यच नव्हते. (तसेही माझ्या मूळ तक्रारीत बिल्डरचा कुठलाही संबंध नसताना तसा उल्लेख करणार्‍या या मंचाने आपल्या गलथान कारभाराचा दाखला दिलाच होता.) तेव्हा मी माझ्या तक्रारीची एक प्रत अजय पॉलीचे थेट ग्राहक असणार्‍या एलजी या उद्योगास पाठविली.

इकडे सरकारी खात्यांमार्फत चौकशी सुरू झाली. अजय पॉली यांनी स्वत:ची बाजू मांडली, ज्याच्या प्रती मला विविध सरकारी खात्यांमार्फत फिरून पाठविल्या गेल्या, कारण मी तक्रारदार होतो आणि तक्रारदारास काय कार्यवाही होत आहे ते कळवावे असे मुंबईहून स्पष्ट आदेश होते.

अजय पॉली यांनी दिलेले स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशातलाच प्रकार होता. त्यांनी सरळ माझ्यावरच कारवाई करावी अशी मागणी केली होती. (प्रत्यक्षात अशी कुठलीही कारवाई झाली नाही. खरे तर अशी काय कारवाई होते हे पाहण्यास मी देखील उत्सुक होतोच व त्या कारणास्तवच हे वृत्त अनेक महिने प्रसिद्ध केले नव्हते. म्हणजे पुढे काय अंतिम लढाई होईल ती झाल्यावरच सगळा सविस्तर वृत्तांत टाकावा असा विचार होता. परंतू आता इतक्या कालावधीनंतर आता अजय पॉली असे काही करेल असे वाटत नाही म्हणून आता हे सर्व प्रकाशित करीत आहे.) गंमतीची गोष्ट म्हणजे शासनास माझ्या विरोधात लिहीणारे अजय पॉलीचे श्री. अनिल गोखले मलाच दूरध्वनी वरून संगणकावर मराठी कसे टंकावे याबाबत मार्गदर्शन घेत होते. मी त्यांना याबाबत पूर्ण सहकार्य करीत होतोच परंतू बहुदा शासनाकडून स्पष्टीकरणाकरिता दबाव येत असल्यामूळे पुरेसा वेळ न मिळाल्याने शेवटी त्यांनी घाईने हे हस्तलिखीत स्वरूपातच पाठविले. पुढे निवांत वेळ मिळताच त्यांनी माझ्याकडून पुन्हा दूरध्वनीवरून सविस्तर मार्गदर्शन घेत संगणकावर मराठी टंकणे शिकून घेतले. त्यावेळी मजपाशी त्यांनी लिहीलेल्या स्पष्टीकरणाची प्रत शासनामार्फत पोचली होती, ज्याची त्यांना कदाचित कल्पनाही नसावी. असो. तर त्यांनी आपल्या स्पष्टीकरणाच्या पुष्ट्यर्थ अनेक कागदपत्रे जोडली होती ज्या सर्वांची प्रत शासनाने मला पाठविली. त्या सर्वच प्रती इतक्या असंबद्ध तसेच वाचता येऊ नये इतक्या काळसर झालेल्या असल्याने इथे प्रकाशित करीत नाहीये. परंतू त्यातील एका दाखल्याची प्रत इथे देत आहे. हा दाखला मंडल आयोग शिरूर यांनी दिला आहे. या दाखल्यावर स्वाक्षरी सोबत जो दिनांक टाकला आहे तो आहे २०.०२.२०११ तर स्पष्टीकरणाच्या पत्राची तारीख १९ एप्रिल २०१० आहे. या एकच गोष्टीवरून अजय पॉलीच्या स्पष्टीकरणातील भंपकपणा सिद्ध होतो.

अर्थात मी ही गोष्ट पुन्हा शासनास कळवायच्या फंदात पडलो नाही. कारण शासनाने मला या प्रती केवळ माझ्या माहितीकरिता पाठविल्या होत्या. त्यांनी त्यावर माझा अभिप्राय मागविला नव्हता.

पुढे यथावकाश चौकशी / कार्यवाही या गोष्टी झाल्या. अजय पॉलीतील काही चमचे मंडळी वगळता तमाम कर्मचारी वर्ग खुश झाला. त्यांचे वेतनही वाढले व त्यांनी मला तसे कळविले.

इकडे शासनाकडूनही मला या त्रुटींची पूर्तता झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला.

समाजजीवनमानप्रकटनविचारमतसंदर्भबातमीशिफारससल्लाअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

शाहिर's picture

21 Dec 2011 - 4:56 pm | शाहिर

चेसुगु इज बॅक

शहीर म्हनवनारा
लेखाबद्दल बोल, लेखकाबद्दल नको

बाकी तुमच्या माळेतील पहिला मणी गळाला त्यामुळे तुम्ही सध्या....

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2011 - 4:56 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. गुगळे आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

आता असाच लढा तुम्ही इथल्या काही अन्यायी संपादकांविरुद्ध द्याल अशी आशा करतो.

का आमच्या जीवावर उठलायस बे?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2011 - 5:01 pm | परिकथेतील राजकुमार

का आमच्या जीवावर उठलायस बे?

मी अन्यायी संपादकांविषयी बोलत होतो. तू अन्यायी आहेस असे तुझे मत आहे का ? ;)

सोत्रि's picture

21 Dec 2011 - 7:22 pm | सोत्रि

कधी नव्हे ते सारे संकेत गुंडाळून पर्‍याचा गालगुच्चा घ्यावासा वाटत आहे.

- (अन्यायाविरूद्ध लढाणारा) सोकाजी

अवांतरः
आंबटशौकिनांनी लगेच माझ्या ईच्छेने चळून माझ्याविषयी काही गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंती ;)

पत्र व्यवहार नीट वाचता आला नाही. पण तुमच्या तक्रारीची दखल शासनाने घेतली.
इतकच नाही तर त्याचा पाठपुरवठा करताना तुम्हाला नेहमी अद्ययावत ठेवलं याबद्दल शासनाचं कौतुक.
शेवट गोडं झाला.
तुम्ही एक हाती लढा देउन भ्रष्टाचाराला वाचा फोडुन, काही लोकांच कल्याण केलतं त्याबद्दल तुमचं ही कौतुक वाटते. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2011 - 5:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

21 Dec 2011 - 9:11 pm | पैसा

सहमत आहेच!

मोदक's picture

22 Dec 2011 - 12:24 am | मोदक

सहमत..!

आशु जोग's picture

22 Dec 2011 - 10:27 pm | आशु जोग

-दिलीप बिरुटे

"असेच म्हणतो." ही तुमची स्वाक्षरी आहे का !

(शंकेखोर )जोग

प्रीत-मोहर's picture

22 Dec 2011 - 9:21 am | प्रीत-मोहर

असेच म्हणते..

चेतनजी तुम्ही मिपाकर व इतर लोकांसाठी एक आदर्श घालुन दिला आहे, की चिकाटी व जिद्द असेल तर अजगरासारखी सुस्त पडलेली शासन्-व्यवस्था ही तुमची दखल घेते.

आम्हाला तुमचा अत्यंत अभिमान वाटतो.

साती's picture

22 Dec 2011 - 2:56 pm | साती

गुगळे यांचे अभिनंदन.

शिल्पा ब's picture

22 Dec 2011 - 4:39 am | शिल्पा ब

+२. चेसुगुंचे अभिनंदन. उगाच कशाला नस्त्या लफड्यात पडा असं करुन माहीती असुन काहीच न करणार्‍यांना एक धडा घालुन दिलात. आवडलं. मीम सारखी टाळ्या वाजवायची स्मायली आणा बॉ!!

नगरीनिरंजन's picture

21 Dec 2011 - 5:07 pm | नगरीनिरंजन

आपल्या देशाला अशा अनेक चेतन सुभाष गुगळेंची गरज आहे.
तुमच्या या खरोखर कौतुकास्पद कार्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा.
खाजगी कंपन्यांबरोबरच लवकरच आपण सरकारी खात्यांमधला भ्रष्टाचार निपटण्यासाठी प्रयत्न करावा ही सदिच्छा!

मन१'s picture

21 Dec 2011 - 5:08 pm | मन१

आख्खा पत्र व्यवहार वगैरे वाचू शकलो नाही. पण शासनाकडे तगादा लावून काम करून घेतलेत ह्याचे कौतुक वाटते.
शासन यंत्रणेला ढिम्म हलायला लावणेही किती कर्मकठिण असू शकते हे काही फुटकळ चार-दोन कामासांठी सरकारशी गाठ पडली तेव्हा प्रथमच समजले होते.

यशोधरा's picture

21 Dec 2011 - 5:08 pm | यशोधरा

आपले अभिनंदन.

आत्मशून्य's picture

21 Dec 2011 - 5:39 pm | आत्मशून्य

kaay bolaayache ? Gugale aamhala tumachaa abhimaan vaatato. Mipakar mhanaje kaay chij aahe he aaj shasanala v udya jagala kalel te ashaa lokaanmukech. Aapalyala vinamra abhiivaadan...
Tasech tumacha MIPA-editors sobatachaa ladhha hi tumhi jikala aahe hech aapale likhan dakhavate. You are(like) super hero...

गंमतीची गोष्ट म्हणजे शासनास माझ्या विरोधात लिहीणारे अजय पॉलीचे श्री. अनिल गोखले मलाच दूरध्वनी वरून संगणकावर मराठी कसे टंकावे याबाबत मार्गदर्शन घेत होते.

चेतन गुगळेनी अनिल गोखलेंना पराचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक द्यावे असा ठराव मी मांडत आहे.
जेणेकरून चेतनच्या लिखाणाचे फ्यान असणारे परा हे अतिशय खुश होवून जातील.
(संदर्भ : जर तुम्ही लिहिणार नसाल तर इथे म्हणजे मिपावर येण्यात काय हशील इति. परा )

वसईचे किल्लेदार's picture

21 Dec 2011 - 5:59 pm | वसईचे किल्लेदार

आधी अभिनंदन ...
पण खरेच सरकारने तुम्ही नीदर्शीलेल्या १४ मागण्या पुर्ण केल्या का? कारण तसे पत्रात स्पष्ट केलेले दिसत नहि.
बाकी लढा चांगलाच दिलात ... मला ह्याच्या (procedure) च्या बद्द्ल काहि कळेल काय?

मानल तुम्हाला , चेतनजी
बाकी मनापासुन सांगवस वाटत म्हणुन सांगतो स्वतः ची काळजी घ्या!

मोहनराव's picture

21 Dec 2011 - 6:21 pm | मोहनराव

आपण लढा दिलात व जिंकलात. अभिनन्दन!!
तुम्ही ग्रेट आहात. भविष्यात कधी तुम्हाला भेटायची संधी मिळाली तर आवडेल मला.
असेच कार्य करत राहा. आम्हाला तुमचा अभिमान आहे गुगळे साहेब.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2011 - 6:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे

इमेजेस वाचायला त्रास पडत असल्याने अजून संपूर्ण धागा वाचला नाही. पण मधले मधले तुमचे लिखाण वाचले.
मला खरोखरच तुमचे कौतुक वाटते (हे मनापासून आहे. यात किंचितही उपरोध नाही)

नीट वाचून परत प्रतिसाद देईन.

दादा कोंडके's picture

21 Dec 2011 - 6:24 pm | दादा कोंडके

अगदी मनापासून तुमचं कौतूक वाटतं.

हार्टी कंग्रॅच्युलेशन्स!

प्रचेतस's picture

21 Dec 2011 - 6:27 pm | प्रचेतस

भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा यशवी केल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.

विजुभाऊ's picture

21 Dec 2011 - 6:42 pm | विजुभाऊ

तुमच्या चिकाटीला सलाम

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2011 - 7:00 pm | अत्रुप्त आत्मा

चेतन भाऊ तुमच्या जिद्दीला व चिकाटिला आपला मनापासुन सलाम.... ---^---

तिमा's picture

21 Dec 2011 - 7:09 pm | तिमा

२१ डिसेंबर चा १६:५९ चा लेख आधी वाचल्यामुळे, डोळे इतके पाणावले की हा १६:३३ चा लेख वाचू शकलो नाही.

मराठी_माणूस's picture

21 Dec 2011 - 7:21 pm | मराठी_माणूस

ह्या भरीव आणि ईतराना प्रेरणा देणार्‍या कार्याचे खुप कौतुक

इंटरनेटस्नेही's picture

21 Dec 2011 - 9:10 pm | इंटरनेटस्नेही

तुमचा अभिमान वाटतो. मी अनेकदा फसवले जात असताना, संबंधित कायद्यांची पुर्ण माहिती असुन देखील पाठपुरवठा करण्यास वेळ नाही या सबबीखाली फसुन घेतलं आहे स्वत:ला. आपला लढा प्रेरणादायी आहे, आणि मार्गदर्शकही.
अश्या प्रकारचे काम करत रहा, त्यासाठी आमच्या अनेक शुभेच्छा.

कौतुक वाटते.

आमच्या ऑफिसमध्ये गोखले साहेबांनी (कॅप्टन, से.नि.) विमानातळावर लहानमुलाची ट्रॉली देण्यात आली नाही म्हणून विमानतळावर केस दाखल केली होती ग्राहक मंचात... ती अजुन चालु असेल कदाचित.
त्याच ऑफिसमधल्या एका से.नि. विंग कमांडरला रेल्वेप्रवासात एका टी.सी.ने लाच मागीतली होती.
त्यांनी पुढच्या स्टेशनवर त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. चौकशी झाली.
काही दिवसांनी तो टीसीच आमच्या ऑफिसमध्ये आला आणि त्या साहेबांसमोर चुक झाली, तक्रार मागे घ्या म्हणून रडून माफी मागू लागला. त्याला निलंबीत करण्यात आलं होतं.
त्या टीसीने त्या से.नि. विंग कमांडर साहेबांचे पाय धरले तरी ते बधले नाहीत.
त्या साहेबांचा निग्रह पाहून अपुन तो चाट पड्या था.

माझी स्वतःचीच ३ वर्षांपासून एचडीएफसी बँकेविरुद्ध ग्राहक मंचासमोर तक्रार पेंडींग आहे.. काय झालंय काय माहित.

प्रास's picture

21 Dec 2011 - 9:51 pm | प्रास

तुम्ही कामगारांची बाजू घेऊन सनदशीर मार्गाने सरकार दरबारी जो काही पत्रप्रपंच केलात तो प्रयत्नपूर्वक वाचला आणि त्यानंतरच या विषयावर काही लिहित आहे.

कामगारांच्या भल्यासाठी हे तुम्ही करत असाल पण यात तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत होतं ते किमान मला नीट समजलेलं नाही आहे. मला समजलेले मुख्य महत्त्वाचे मुद्दे आणि चौकशीची फलश्रुती मी पुढे मांडत आहे -

# कारखाना केवळ दुसर्‍या पाळीत चालवला जात होता.
# कारखान्याच्या पटावर कर्मचार्‍यांची संख्या कमी दाखवली होती.
# कामगारांना पगार आणि बोनस कमी मिळतो. इतर कँटिन वगैरे सुविधा मिळत नाहीत.
# कारखान्यात सेफ्टी ऑफिसर नाही

माझ्या माहिती प्रमाणे वरच्या सर्व बाबी फॅक्टरी अ‍ॅक्टच्या अन्तर्गत येतात. फॅक्टरी अ‍ॅक्टच्या निरीक्षकाने यात कोणतेही तथ्य सापडलेले नाही असा रिपोर्ट दिलेला दिसत आहे.

# कारखाना बिगर शेती परवानाधारी जागेत उभा नाही

कारखाना जर 'डी' झोन मध्ये असेल तर बिगर शेती परवान्याची आवश्यकत नसते. बिगर शेती परवान्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता केली असेल आणि तलाठ्याकडून परवाना मिलायला विलंब होत असेल तर अर्ज दाखल केल्यानंतर १८० दिवसांनंतर परवाना न मिळाल्यास त्या संबंधात सरकारला अडचण नाही असं गृहित धरून कारखाना सुरू करता येतो असा सरकारी नियम सांगण्यात येतो कारण ही सरकारी दिरंगाई मानली जाते. गोखल्यांच्या पत्रात असा अर्ज प्रलंबित असल्याची नोंद आढळते.

# कारखान्याचे बँकांचे व्यवहार संशयास्पद आहेत.
# कारखान्याकडून सरकारी टॅक्स बुडवला जातो

या गोष्टी लेखपालाशी संबंधीत आहेत. कंपनी कारखान्याचे सर्व ऑडिट रिपोर्ट सादर करतेय आणि त्यानुसार कोणताही संशय राहत नाही.

# कारखाना बाद केलेला माल रिसायकल करून विकते

या मुद्द्याचा संबंध कारखाना ज्यांना माल पुरवतो त्यांचा आहे. जोपर्यंत ते या मालाबद्दल लॅब रिपोर्टसह लायसन्सिंग ऑथॉरिटीकडे तक्रार करत नाहीत तो पर्यंत इतर तक्रारींची दखल घेतली जात नाही.

# कारखाना बिगर लायसन्स चालतो.

सरकारी करांच्या आणि लेखपालाच्या चौकशी दरम्यान इतक्या वेळा लायसन्सेसची प्रत लागते की बिगर लायसन्स कारखाना चालणं ही महाकठीण बाब आहे. लायसन्स दर वर्षी किंवा दोन वर्षांनी रिन्यू करावं लागत असल्याने हे कठीण वाटते. कारखान्याने निरिक्षकाकडे आपल्या परवान्याची प्रत दाखवल्याचे कळते.

# कारखान्याला वीज बिगर औद्योगिक दरात मिळते

असं होताना दिसत नाही. कारखान्याला लागणारी वीज आणि बिगर औद्योगिक वीज यांच्या प्रमाणाचं गणित करता असा आरोप बाष्कळ होतो. वीज कर्मचारी पैसे खाऊनही असं करू शकत नाही. पुन्हा याची शहानिशा वीज बिल बघताच होते.

असो. मला एक प्रश्न पडलाय. कारखान्याने २००८ साली १२५ केवीचं जनित्र मागवलं आणि त्याची जोडणी केली. अशी जोडणी कुणीही करू शकतो का हो? ते वीज मंडळाच्या कर्मचार्‍याच्या माहितीशिवाय झालेले आहे का? मग त्या जनित्राला वीजेची जोडणी कुणी केली? जर हे वीज मंडळाकडूनच झालेलं आहे तर महसुल कसा बुडेल?

पुन्हा कारखान्याला तुमच्या म्हणजे श्री. चेतन सुभाष गुगळे यांच्या स्वाक्षरीने २००८ सालीच विद्युत संचांच्या जोडणीचे प्रमाणपत्र दिले गेले आहे मग तोपर्यंत कारखाना योग्य दराच्या वीजेचा वापर करत होता का आणि त्यानंतर बिगर औद्योगिक वीज पुरवठा होऊ लागला का? जर आधीपासूनच बिगर औद्योगिक पुरवठा होता तर २००८ सालीच ते तुम्हाला माहिती पाहिजे. क्षमतापत्र देताना तुम्ही या बाबीकडे दुर्लक्ष का केलेत? आणि मग आता ती बाब तक्रारीच्या स्वरूपात का नोंदवत आहात? एकूण मग या तक्रारीत तुमचेच काही अंतस्थ हेतू आहेत असं कुणी म्हंटलं तर?

गुगळे साहेब, मी काही अजय पॉली प्रा. लि. शी संबंधीत नाही नि मला तुमच्याबद्दल काही आकसही नाही. किंबहुना मी खरोखरच तुम्हाला मित्र मानतो आणि या मैत्रिच्याच नात्याने काही बाबींची शहानिशा करत आहे. ते ही तुम्ही हा धागा काढलात म्हणूनच. अन्यथा मला काय पडलेलं?

एकूणच या प्रकरणात कारखान्याविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही आणि गुगळे साहेब म्हणतायत म्हणून या दट्ट्याने कारखान्यातलं कामगारांचे वेतन वाढले वगैरे मान्य करायचे.

माफ करा गुगळेसाहेब एरवी माझ्या दृष्टीने हा सरकारी वेळेचा अपव्यव वाटतोय.

रामपुरी's picture

22 Dec 2011 - 2:38 am | रामपुरी

अतिशय मुद्देसूद प्रतिक्रिया
याच बरोबर या आस्थापनेची (आणि फक्त याच आस्थापनेची का???) इतकी सखोल तपशीलवार माहीती मिळाली कशी याचीही उत्सुकता आहेच.
उत्तराच्या प्रतिक्षेत...

प्रास's picture

22 Dec 2011 - 9:36 pm | प्रास

याच बरोबर या आस्थापनेची (आणि फक्त याच आस्थापनेची का???) इतकी सखोल तपशीलवार माहीती मिळाली कशी याचीही उत्सुकता आहेच.
उत्तराच्या प्रतिक्षेत...

कसं आहे, कोणत्याही आस्थापनेची माहिती जरा कुठे शोधली तर मिळतेच कारण अण्णांनी तसा कायदाच करवला आहे ना, थोडंसं गूगललं की मिळतेय सगळं.

बाकी, कागदपत्रांचं वाचन न करता दिलेले वरचे प्रतिसाद आवडले. शेवटी चेतन गुगळेंनी पत्र लिहिण्यासाठी श्रम तर केलेलेच आहेत. त्याचं कौतुक करायलाच हवं पण ते केव्हा, तर जेव्हा ते, अनावश्यक, सरकारी वेळेचा अपव्यय न करणारे, बिनबुडाचे आणि (कृपया थोडं स्पष्ट लिहितोय) ओल्ड स्कोर सेटल करण्यासाठी केलेले असल्यासारखे न वाटतील तेव्हा.

मात्र इथे वरचे सर्व मुद्दे उपस्थित दिसत आहेत, याचं दु:खं वाटतं आणि चुकीच्या कृतीचं कौतुक झाल्याचं वाईट अधिक वाटतं.....

जाऊ द्या हो प्रास शेठ.
इथे लोक सगळ्यांचच कौतुक करतात.
कुठे टेन्शन घेत बसता चुकीचं कौतुक होतंय की बरोबर केल्याचं?

आता वरच्या प्रतिसादात मी(ही) कौतुक वाटते असं लिहीलेलं असलं तरी त्याखाली दोन किस्से दिले आहेत.
विमानतळावर लहान मुलाची ट्रॉली दिली नाही ही गोष्ट काय केस टाकण्याची असू शकते का?
पण आमच्या गोखले साहेबांनी केस केली होती आणि नेटानं चालवली पण होती.. त्याचंही मला कौतुकच वाटलं होतं.
त्या टी.सी.ने विंग कमांडर साहेबांचे पाय धरले व रडला होता तरी ते बधले नव्हते.. त्यांच्याही त्या निग्रहाचं मला कौतुकच वाटलं.

आणि हो, तुम्ही वरचे दस्तऐवज वाचून जे म्हणणं मांडलंत त्याचंही मला कौतुकच वाटतं.
गुगळेंच्या केसवर तुम्ही केलेल्या संशोधनावर ते त्यांची बाजू मांडतील तेव्हा गुगळेंचंही आम्हाला कौतुकच असेल..
हाकानाका

अन्या दातार's picture

23 Dec 2011 - 9:36 am | अन्या दातार

गुगळेंच्या केसवर तुम्ही केलेल्या संशोधनावर ते त्यांची बाजू मांडतील तेव्हा गुगळेंचंही आम्हाला कौतुकच असेल..
हाकानाका

इथे एक दुरुस्ती सुचवत आहे.

गुगळेंच्या केसवर तुम्ही केलेल्या संशोधनावर त्यांनी त्यांची बाजू मांडली तर गुगळेंचंही आम्हाला कौतुकच असेल..
कारण त्यांचा प्रतिसाद इतिहास बघता ते कितपत शक्य होईल सांगता येत नाही.

शिल्पा ब's picture

22 Dec 2011 - 4:47 am | शिल्पा ब

हात्तिच्या!!! हा प्रतिसाद वरचा टंकल्यावर पाहीला. मला कागदपत्रांच्या चित्रात काय लिहिलंय ते नीट दिसलं नाही पण प्रास यांचे मुद्देही योग्य आहेत.

<<<मला एक प्रश्न पडलाय. कारखान्याने २००८ साली १२५ केवीचं जनित्र मागवलं आणि त्याची जोडणी केली. अशी जोडणी कुणीही करू शकतो का हो? ते वीज मंडळाच्या कर्मचार्‍याच्या माहितीशिवाय झालेले आहे का? मग त्या जनित्राला वीजेची जोडणी कुणी केली? जर हे वीज मंडळाकडूनच झालेलं आहे तर महसुल कसा बुडेल?

पुन्हा कारखान्याला तुमच्या म्हणजे श्री. चेतन सुभाष गुगळे यांच्या स्वाक्षरीने २००८ सालीच विद्युत संचांच्या जोडणीचे प्रमाणपत्र दिले गेले आहे मग तोपर्यंत कारखाना योग्य दराच्या वीजेचा वापर करत होता का आणि त्यानंतर बिगर औद्योगिक वीज पुरवठा होऊ लागला का? जर आधीपासूनच बिगर औद्योगिक पुरवठा होता तर २००८ सालीच ते तुम्हाला माहिती पाहिजे. क्षमतापत्र देताना तुम्ही या बाबीकडे दुर्लक्ष का केलेत? आणि मग आता ती बाब तक्रारीच्या स्वरूपात का नोंदवत आहात? एकूण मग या तक्रारीत तुमचेच काही अंतस्थ हेतू आहेत असं कुणी म्हंटलं तर?

याबद्द्ल चेसुगुंचे मत वाचायला उत्सुक.

पान्डू हवालदार's picture

22 Dec 2011 - 1:27 am | पान्डू हवालदार

माफ करा गुगळेसाहेब, माझ्याही दृष्टीने हा सरकारी वेळेचा अपव्यव वाटतोय.

आशु जोग's picture

22 Dec 2011 - 10:29 pm | आशु जोग

बाकी कुठेही ग्राहक म्हणून भांडायला पेशन्स लागतो

आणि **** मधे दमही लागतो

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2011 - 9:27 am | llपुण्याचे पेशवेll

गुगळेंच्या धाडसाचे कौतुक वाटले.
सदर अजय पॉली कंपनीचा मालक कोण आहे? मराठी आहे का ?
असो.
गुगळे एक आगंतुक सूचना. सरकारी स्वस्त धान्याचा अपहार करून आटा मिल चालवणार्‍या हजारो छोट्या कंपन्या चाकण, शिरूर, पिरंगुट या पट्ट्यात आहेत. त्यातल्या बहुतेक कंपन्या महावीर, पार्श्वनाथ अशा नावांच्या आहेत.
काढायची का शोधमोहीम?

मन१'s picture

23 Dec 2011 - 9:47 am | मन१

शेन वॉर्न, कुंबळे ह्यांना मानतो ब्वा आपण. हवेतल्या हवेत बेमालूम टर्न करतात चेंडूला.

अन्या दातार's picture

23 Dec 2011 - 10:27 am | अन्या दातार

काढायची का शोधमोहीम?

पुपे तुम्हारा चुक्याच!
बेताज बादशाह है गुगळे मिपाके. यहा वो चॅलेंज लेते नही, देते है!

(संदर्भासाठी: हे बघा)

चेतन सुभाष गुगळे's picture

23 Dec 2011 - 2:22 pm | चेतन सुभाष गुगळे

खरं तर मी मिसळपाव या संकेत स्थळावर आता यापुढे वाचनमात्रच राह्यचं ठरविलेलं आहे. परंतू तसं जिथे मी जाहीर केलं होतं तो धागाच (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...) सध्या अप्रकाशित आहे. का? ते मला ठाऊक नाही. असो. त्यामुळे झालंय काय की अनेकांना मी वाचनमात्र असल्याचं ठाऊक नाही व त्यांनी माझ्या या धाग्याबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे केवळ या शंकांचं निरसन करण्याकरिताच हा प्रतिसाद प्रपंच.

सर्वप्रथम - इथे डकविलेला पत्रव्यवहार नीट वाचता आला नसल्यास तो आपण पिकासावर सुस्पष्टपणे पाहू शकता.

https://picasaweb.google.com/102676953318994666706/ApplComplaint#

@प्रास

<< माझ्या माहिती प्रमाणे वरच्या सर्व बाबी फॅक्टरी अ‍ॅक्टच्या अन्तर्गत येतात. फॅक्टरी अ‍ॅक्टच्या निरीक्षकाने यात कोणतेही तथ्य सापडलेले नाही असा रिपोर्ट दिलेला दिसत आहे. >>

असं आपण कुठे वाचलंत जराही मलाही दाखवा. नाहीतर मी खाली लिहीलंय ते पुन्हा वाचा. त्या पत्रात (https://picasaweb.google.com/102676953318994666706/ApplComplaint#5688459...) तुम्हाला असं आढळेल की -

दि. ३०.०७.२०१० रोजी या कार्यालयातील निरीक्षकाने मे. अजय पॉली प्रा. लि. या आस्थापनेस भेट देऊन विविध कामगार कायद्यांतर्गत निरीक्षण शेरे पारित केले आहेत. निरीक्षकाने शेर्‍यात नमूद केलेल्या त्रुटीबाबत दि.०४.०८.२०१० च्या पत्रान्वये पूर्तता अहवाल दाखल केलेला आहे. त्याबाबत निरीक्षकाने खातरजमा केलेली आहे.

यातील ठळक शब्द पुन्हा वाचा. "निरीक्षकाने शेर्‍यात नमूद केलेल्या त्रुटीबाबत" - याचाच अर्थ निरीक्षकाच्या शेर्‍यात आधी त्रुटींचा उल्लेख होता, ज्याची नंतर पूर्तता झालेली आहे. यातच सारे काही आले.

<< असो. मला एक प्रश्न पडलाय. कारखान्याने २००८ साली १२५ केवीचं जनित्र मागवलं आणि त्याची जोडणी केली. अशी जोडणी कुणीही करू शकतो का हो? ते वीज मंडळाच्या कर्मचार्‍याच्या माहितीशिवाय झालेले आहे का? मग त्या जनित्राला वीजेची जोडणी कुणी केली? जर हे वीज मंडळाकडूनच झालेलं आहे तर महसुल कसा बुडेल? >>

आपले हे प्रश्न वाचून अतिशय दु:ख झालं. ते ह्या च साठी की आपण अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या शंका विचारण्याकरिता टंकन श्रम घेतलेत. त्याची काहीच गरज नव्हती. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की जनित्र कुणीही विकत घेऊन जोडू शकतो. त्याकरिता काही विशेष कौशल्य लागत नाही. जनित्राची जोडणी कंपनीच्याच इलेक्ट्रीशियनने केली. वीज मंडळाला हे माहीतही पडत नाही. वीज मंडळाकडे मनुष्यबळ कमी असल्याने दरदिवशी प्रत्येक कारखान्यात शिरून तपासणी करायला कुणी असेलच असे नाही. कंपनीने कळवलं तर आणि तरच ते येतात. मुख्य म्हणजे त्यांचा प्रश्नच नाहीये. आधी हे जनित्र जोडल्याचं आपण "ऊद्योग, ऊर्जा व कामगार" विभागाला कळवावं लागतं व त्याचं शुल्क भरावं लागतं. शुल्क ही फार नसतं पण सोबत जे टेस्ट रिपोर्ट जोडावे लागतात त्यांचाच प्रश्न असतो. कंपनीने हे २५ वर्ष जुनं पुराणं जनित्र आणून बसविल्याने काहीच कागदपत्र नव्हते म्हणून संबंधित विभागाला न कळविता परस्पर जोडणी केली. ही अतिशय घातक बाब आहे.

<< पुन्हा कारखान्याला तुमच्या म्हणजे श्री. चेतन सुभाष गुगळे यांच्या स्वाक्षरीने २००८ सालीच विद्युत संचांच्या जोडणीचे प्रमाणपत्र दिले गेले आहे मग तोपर्यंत कारखाना योग्य दराच्या वीजेचा वापर करत होता का आणि त्यानंतर बिगर औद्योगिक वीज पुरवठा होऊ लागला का? जर आधीपासूनच बिगर औद्योगिक पुरवठा होता तर २००८ सालीच ते तुम्हाला माहिती पाहिजे. क्षमतापत्र देताना तुम्ही या बाबीकडे दुर्लक्ष का केलेत? आणि मग आता ती बाब तक्रारीच्या स्वरूपात का नोंदवत आहात? एकूण मग या तक्रारीत तुमचेच काही अंतस्थ हेतू आहेत असं कुणी म्हंटलं तर? >>

ह्या शंकाही तितक्याच अर्थहीन आहेत. कृपया राग मानु नये परंतू तुम्हाला एकंदरीत विद्युत अभियांत्रिकीची फारशी माहिती नसावी असं तुमच्या या शंकावरून दिसतंय. त्यामुळे अगदी प्राथमिक पातळीवर येऊन स्पष्टीकरण देत आहे. मी जे प्रमाण पत्र देतो त्याचा आणि कंपनीने कुठल्या प्रकारची जोडणी केली त्याचा काहीही संबंध नाही. मी एक विद्युत पर्यवेक्षक म्हणून फक्त मेगर / अर्थ टेस्टर च्या साहाय्याने प्रत्येक यंत्राचा (जे वीजेवर चालणार आहे) विद्युत अवरोध किती आहे. त्याचं इन्सुलेशन सुस्थितीत आहे की नाही याचं प्रमाण पत्र देत असतो. त्यावर मी लिहीलेल्या शेर्‍यावरून ऊद्योग ऊर्जा कामगार विभाग फक्त या तांत्रिक गोष्टींची खात्री करून घेते की या यंत्रांना वीज जोड दिल्यास काही धोका आहे अथवा नाही. बाकी जोडणी व्यापारी आहे की औद्योगीक की शेतीची किंवा जागा अधिकृत आहे की अनधिकृत या कायदेशीर बाबींचा विचार इतर कागदपत्रावरून केला जातो. त्याचा माझ्या अहवालाशी संबंध नाही. अर्थात मला ह्या बाबी ही कामे करताना माहीत पडतात पण माझ्या अधिकारक्षेत्रात त्या येत नाहीत. त्यामुळेच ह्या बाबी कळविण्याकरिता मला स्वतंत्र पत्रप्रपंच करावा लागला.

आपल्या इतर अनेक मुद्यांबाबत एवढेच सांगतो की आपण कंपनीचे स्पष्टीकरण वाचून ते मुद्दे लिहीले आहेत. परंतू आपण कंपनीच्या स्पष्टीकरणाबाबत मी मांडलेले निरीक्षण वाचलेले दिसत नाहीये. नाहीतर या शंका काढल्याच नसत्या. असो. पुन्हा वाचा -

<< त्यांनी आपल्या स्पष्टीकरणाच्या पुष्ट्यर्थ अनेक कागदपत्रे जोडली होती ज्या सर्वांची प्रत शासनाने मला पाठविली. त्या सर्वच प्रती इतक्या असंबद्ध तसेच वाचता येऊ नये इतक्या काळसर झालेल्या असल्याने इथे प्रकाशित करीत नाहीये. परंतू त्यातील एका दाखल्याची प्रत इथे देत आहे. हा दाखला मंडल आयोग शिरूर यांनी दिला आहे. या दाखल्यावर स्वाक्षरी सोबत जो दिनांक टाकला आहे तो आहे २०.०२.२०११ तर स्पष्टीकरणाच्या पत्राची तारीख १९ एप्रिल २०१० आहे. या एकच गोष्टीवरून अजय पॉलीच्या स्पष्टीकरणातील भंपकपणा सिद्ध होतो. >>

थोडक्यात कंपनीने स्पष्टीकरण देताना भरपूर खोटेपणा केला होता. ज्याचा मी पुन्हा प्रतिवाद करत बसलो नाहीये. शासकीय अधिकार्‍यांनीच परस्पर केला. आपली गल्लत इतकीच होतेय की आपण कंपनीचे सारे स्पष्टीकरण खरे धरून चालत आहात.

दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात.

१. मी इतक्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी करूनही त्यात तथ्य आढळले नसते तर शासनाने मला मोकळे सोडले असते का? कारवाई केली नसती? बरं शासनाचं सोडा अब्जावधी संपत्तीचा मालक असलेल्या या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव जैन व त्यांचे पिताश्री श्री. डी. सी. जैन यांनी तरी मला सोडलं असतं का? अब्रूनुकसानीचा दावा केला नसता का?

२. प्रत्येक जण आयुष्यात वेगवेगळ्या लढाया लढतो. एखादी जिंकतो, क्वचित एखादी हरतो. मी देखील असाच एक सर्वसामान्य माणूस आहे. जर ही लढाई हरलो असतो तर इथे संकेतस्थळावर त्याची वाच्यता करीत बसलो असतो का?

शासनाने मला जी कागदपत्रे पाठविली आहेत ती एकूण ८५ आहेत. प्रत्येकच कागद इथे डकविता येणार नाही, परंतू कुणी जर उत्सुक असेल तर मला प्रत्यक्ष भेटून पाहून खात्री करून घेऊ शकतो.

@रामपुरी,

<< या आस्थापनेची (आणि फक्त याच आस्थापनेची का???) इतकी सखोल तपशीलवार माहीती मिळाली कशी याचीही उत्सुकता आहेच. >>

उत्सुकतेचं कौतूक आहे पण अशा माहितीचे स्त्रोत सांगितले जात नाहीत. इथे या संकेतस्थळावरच एका सन्माननीय सदस्याने मला व्यक्तिगत निरोपात स्वत:च्या भ्रमणध्वनी क्रमांकासह एका दुचाकी उद्योगाविषयी (उद्योगाचे नाव नमूद न करता) काही माहिती पाठविली आहे व मी त्यांना इमेलवर प्रतिसाद ही दिलाय. मग आता त्यांचं नाव इथे जाहीर केलं तर त्यांना चालणार आहे का? तसंच काहीसं या कंपनीच्या माहिती स्त्रोताविषयी आहे. ते उघड नाही करता येत. इतकंच सांगेन की वीजेशी संबंधित गैरप्रकारांची माहिती मला थेट झाली इतर गोष्टींची मात्र दुसर्‍याकडून..

@ llपुण्याचे पेशवेll Fri, 23/12/2011 - 09:27.
<< सदर अजय पॉली कंपनीचा मालक कोण आहे? मराठी आहे का ?
असो.
गुगळे एक आगंतुक सूचना. सरकारी स्वस्त धान्याचा अपहार करून आटा मिल चालवणार्‍या हजारो छोट्या कंपन्या चाकण, शिरूर, पिरंगुट या पट्ट्यात आहेत. त्यातल्या बहुतेक कंपन्या महावीर, पार्श्वनाथ अशा नावांच्या आहेत.
काढायची का शोधमोहीम? >>

कंपनीचे मालक आहेत श्री. राजीव जैन (व्यवस्थापकीय संचालक) व श्री. डी.सी. जैन (अध्यक्ष). तुमच्या आगंतुक सूचनेचा रोख लक्षात आला. http://www.misalpav.com/node/19142 हे जर वाचलं असतं तर असला प्रश्न विचारायची गरज पडली नसती इतकंच नमूद करतो.

@ अन्या दातार,

आपण स्वतः कुठलीच शंका स्वतंत्रपणे उपस्थित केली नसली तरी इतरांच्या शंकांना पुष्टी दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र उत्तर देत नाही. वरील उत्तरांमध्येच आपल्या शंकांचे समाधान शोधावे.

इतर सर्व प्रशंसकांचे आभार.

पुन्हा एकदा नमूद करतो की मी इथे वाचनमात्र राह्यचं जाहीर केलंय. फक्त शंकांना मी बगल देतोय असा पळपूटेपणाचा आरोप होऊ नये म्हणूनच हा प्रतिसाद दिला. तरी पुन्हा मी इथे येण्याची अपेक्षा करू नये. मला शंका थेट माझ्या मोबाईल / ईमेलवर विचारू शकता. एका धाग्यावर आश्वासन दिलं होतं व हे वर्ष संपण्याआधी त्याची पूर्तता करावी म्हणून हा धागा टाकला अन्यथा इथे प्रतिसादाकरिता सुद्धा येणं अतिशय वेदनादायी आहे. का ते इथं वाचलं म्हणजे कळेल -

https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...

स्पा's picture

23 Dec 2011 - 3:09 pm | स्पा

पुन्हा एकदा नमूद करतो की मी इथे वाचनमात्र राह्यचं जाहीर केलंय. फक्त शंकांना मी बगल देतोय असा पळपूटेपणाचा आरोप होऊ नये म्हणूनच हा प्रतिसाद दिला. तरी पुन्हा मी इथे येण्याची अपेक्षा करू नये. मला शंका थेट माझ्या मोबाईल / ईमेलवर विचारू शकता. एका धाग्यावर आश्वासन दिलं होतं व हे वर्ष संपण्याआधी त्याची पूर्तता करावी म्हणून हा धागा टाकला अन्यथा इथे प्रतिसादाकरिता सुद्धा येणं अतिशय वेदनादायी आहे. का ते इथं वाचलं म्हणजे कळेल -

=))

=))

=))

=))

असो... तुमच्यासाठी हि शेवटची भेट

पुढचा प्रवास सुखाचा होवो हीच आमची शुभेच्छा

एवढा आनंद कशासाठी?गुगळे मिपा सोडून जातात हे मिपाच दुर्भाग्य आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Dec 2011 - 11:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे

स्पा, एक गोष्ट सांग. तुझी जिलबी ची नक्की व्याख्या काय आहे ?? उगाच द्यायचे म्हणून एकाचा साच्याचे प्रतिसाद नको रे देऊस. गुगळे इथे येणार नाहीत याचा तुला नक्की काय आनंद झाला हे मला पण नाही कळले.
(खरे तर तुझे एक टार्गेट कमी झाले याचे तुला दु:ख झाले असावे असा माझा अंदाज आहे. ते त्या गाण्यासारखे "तुम इतना जो मुस्कुरा..." तसे हास्यामागे दु:ख लपवतो आहेस का रे ?)

अन्या दातार's picture

23 Dec 2011 - 3:37 pm | अन्या दातार

फक्त शंकांना मी बगल देतोय असा पळपूटेपणाचा आरोप होऊ नये म्हणूनच हा प्रतिसाद दिला......इथे प्रतिसादाकरिता सुद्धा येणं अतिशय वेदनादायी आहे

एकतर आजवर कधीही तुम्ही प्रतिवादासाठी पुढे आला नाहीत (For whatever reason) हा इतर मिपाकरांचा दोष नाही. तुमच्या हेतूबद्दल शंका नाही, पण संपूर्ण मॅटर सांगत जा व अश्या प्रकारे मांडा की जेणेकरुन शंकेस फारसा वाव राहता कामा नये.
इतरांनी शंका उपस्थित कराव्यात व तुम्ही त्यास प्रतिवाद न करणे हे चांगल्या काथ्याकूटाचे चिन्ह कदापि मानता येत नाही. आणि शंका विचारणे हे जर तुम्हाला इतकेच वेदनादायी वाटत असेल तर काय करावे याचा निर्णय घेण्यास तुम्हीच समर्थ आहात.

वाचनमात्रच राहत असलात तरीसुद्धा हे घ्यावेतः

सूड's picture

23 Dec 2011 - 3:52 pm | सूड

>>मला शंका थेट माझ्या मोबाईल / ईमेलवर विचारू शकता.
गुगळे, राग मानू नका. पण जर तुम्ही हा धागा इथे काढलात तर त्यातून निघणार्‍या शंकांचं निरसन इथेच व्हायला हवं असं माझं मत. जेणेकरुन योग्य अयोग्य काय हे कळून आमच्या ज्ञानातही भर पडेल.

होय, प्रत्येक माणूस तुमच्यासारखा सर्वज्ञ असणार नाहीच आणि त्यामुळे त्यांच्या शंकानिरसनासाठी तुम्हाला अगदी प्राथमिक पातळीवर स्पष्टीकरणंही द्यावी लागतीलच त्याला इलाज नाही. ती द्यायची तुमची तयारी असेल तर प्रश्न विचारण्याची आमचीही तयारी आहेच. काय करणार आमची शिकण्याची प्रगाढ इच्चा याला कारणीभूत आहे.

म्हंटलं तर तुमच्याच टंकणावरून अजून काही, भले प्राथमिक स्वरुपाचे असतील, प्रश्न उत्पन्न होत आहेतंच.

बाकी जोडणी व्यापारी आहे की औद्योगीक की शेतीची किंवा जागा अधिकृत आहे की अनधिकृत या कायदेशीर बाबींचा विचार इतर कागदपत्रावरून केला जातो. त्याचा माझ्या अहवालाशी संबंध नाही. अर्थात मला ह्या बाबी ही कामे करताना माहीत पडतात पण माझ्या अधिकारक्षेत्रात त्या येत नाहीत.

थोडक्यात कंपनीने स्पष्टीकरण देताना भरपूर खोटेपणा केला होता. ज्याचा मी पुन्हा प्रतिवाद करत बसलो नाहीये.

हेच तर विचारतोय, का?

मी इतक्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी करूनही त्यात तथ्य आढळले नसते तर शासनाने मला मोकळे सोडले असते का? कारवाई केली नसती? बरं शासनाचं सोडा अब्जावधी संपत्तीचा मालक असलेल्या या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव जैन व त्यांचे पिताश्री श्री. डी. सी. जैन यांनी तरी मला सोडलं असतं का? अब्रूनुकसानीचा दावा केला नसता का?

शासन असं केलेल्या तक्रारी विरोधात स्वतःहून कारवाई करू शकतं का हो? आणि अजून अजय पॉली ने तुमच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला नाही म्हणजे त्यांचंच काहीतरी चुकलं असणार असंच का म्हणायचं आपण? शेवटी हा सारा पत्रप्रपंच करण्यामागे तुमचा हेतू नेमका कोणता होता हे अजुनही गुलदस्त्यातच राहिलं आहे.

असो.

असे खूप मुद्दे निघतील आणि वेळ नुसता फुकट जात राहिल.

तसंही तुम्ही

तरी पुन्हा मी इथे येण्याची अपेक्षा करू नये

असं म्हंटलेलं असल्याने पुढील स्पष्टीकरणाची अपेक्षा नाही असं म्हणून मी इथेच थांबतो.

गुगळेसाहेब, तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

कळावे,

लोभ असावा ही विनंती.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2011 - 4:30 pm | llपुण्याचे पेशवेll

गुगळे तुमच्या उपक्रमाचे कौतुक आहे असे आम्ही आधीच नमूद केले आहे. अजय पॉली सरकारी महसूल बुडवत आहे असे तुमचे म्हणणे आहे हे कळले. ते योग्यही आहे. परंतु आम्ही जो रोख मांडला आहे तो तुम्हाला कळलेला दिसत नाही. अजय पॉली ही एक कंपनी आहे व साधारण जी उत्पादने विकतात ती जीवनावश्यक वस्तूंच्या सारणीत येत नाहीत. उलट सरकारी धान्याचा अपहार करणार्‍या ज्या कंपन्या आम्ही उल्लेखिल्या त्या तुम्ही जो पत्ता दिला आहे त्याच्या आसपासच्याच भागात बर्‍याच मिळतील. तुमची काकदृष्टी एकट्या अजय पॉलीवरच कशी पडली असा प्रश्न पडला. असो. तुम्ही एकटे कोणा कोणाला पुरे पडणार म्हणा.

बाकी तुम्ही हे वाचले असते तर हा प्रश्न का विचारला आहे हे कळलं असतं. असो.

बाकी कुठेही कशावरहि भांडायला पेशन्स लागतो

आणि **** मधे दमही लागतो (ह. घ्या.)

रमताराम's picture

24 Dec 2011 - 1:02 pm | रमताराम

गुगळेसाहेब. सर्वप्रथम तुम्ही दिलेल्या लढ्याबद्दल हार्दिक अभिनंदन. माझ्या परिचयात असा चिकाटीने पाठपुरावा करणारी नि प्रश्नाची तड लावणारी कोणी व्यक्ती आहे याचे समाधान आहे. आपल्या स्वतःच्या समस्यांबद्दल रडतराऊगिरी करणार्‍यांच्या समाजात दुसर्‍यासाठी झगडणारा नि त्यासाठी शासनासारख्या सुस्त नि किचकट व्यवस्थेच्या सार्‍या प्रोटोकॉल्स वगैरेची माहिती असणारा एखादा आहे हे स्पृहणीय आहे.

जाताजाता थोडे तुमच्या उठसूठ भीमगर्जना करण्याच्या वृत्तीबाबत. अहो जालावर लिखाण केले की त्यावर कुजकट, हलकट शेरे मारणारे भरपूर आहेत हो. त्यांचे मनावर घेतले तर कसे चालणार. तसेही समाजात माकडेच अधिक, त्यांच्या माकडचेष्टांकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. आता मूठभर मूर्खांसाठी तुम्ही सार्‍यांनाच दोष देणार का? त्यांच्या टीकाटिपण्णीतून भले भले श्रेष्ठी सुटले नाहीत, तुम्हालाच मान देतील ही अपेक्षा अनाठायी आहे. तिकडे दुर्लक्ष करून तुमच्या विचारांशी सहमत असलेल्या किमान त्याबद्दल आदर असणार्‍यांशी तुम्ही संपर्क वाढवून शकताच ना? की त्याची तुम्हाला आवश्यकता वाटत नाही? तसे असेल तर जाऊ द्या झालं. तुम्हीही संकेतस्थळाबद्दल तुच्छता दाखवत 'आम्ही फक्त ब्लॉग लिहितो' असे म्हणत आपले तथाकथित जालहुच्चभ्रूपण मिरवणार असाल तर तुमचा निर्णय. मिपासारख्या संस्थळावर लिखाण करणे म्हणजे सुज्ञ असुज्ञ दोन्हींच्या चिकित्सेला सामोरे जाणे नि त्या अनुषंगाने आपले दोष हुडकून त्यांची पुनरावृत्ती टाळणे हा उद्देश असतो. तुम्हाला तुमचे लेखन स्वयंसिद्ध अथवा निर्दोष आहे असे समजत असाल तर तर निव्वळ ब्लॉग लिहून तुम्ही ही आत्मसंतुष्टता तुम्ही संभाळू शकता.

खरंतर 'आम्ही चाललो' च्या जालगर्जना करणार्‍यांना आम्ही 'थ्यांक्यू' पण म्हणण्याची तसदी घेत नाही. पण तुमचा अपवाद करावासा वाटला. असो.

अश्या समाजपयोगी कार्याला तुम्हाला शुभेच्छा........

शिंगाड्या's picture

26 Dec 2011 - 10:58 am | शिंगाड्या

गुगळेसाहेब,

आपल्या चिकटीला सलाम...आणि वरील बहुतेक प्रतीसाद आपले कौतुक करणारे आहेत..
तुमच्या ले़खान्ची कधीकधी रेवड्या उडवणार्‍या मिपाकरांची दिलदारी ही यातुन तुम्हाला दिसेल..

नमस्कार,
आत्तापर्यंत मी स्पष्टवक्ता आहे, सरळमार्गी आहे, मला अन्यायाची चीड आहे असे गावभर दिंडोरा करणारे अनेक बघितलेत.पण तीच लोक वेळ आली कि मुग गिळून गप्प बसतात.पन तुम्च्यासारखेही समजत आहेत हे बघून आनंद झाला.
तुम्ही जे काम करतंय त्याबद्दल खूप शुभेच्छा. तुमच्या कामामध्ये आम्हालाही सामील करून घेतलात तर आनंद होईल.
आपल सोडून दुसर्याच कौतुक होत असेल तर वाईट तर वाटणारच.बहुदा तुमच कौतुक करण्याऐवजी , तुमचे पाय खेचायला लोकांना जास्त आवडत.ह्या असल्या बेडकांची कोणत्याही क्षेत्रात कमी नाही.तुम्ही दुर्लक्ष करा.
ज्यांनी वेळ नुसता फुकट जात राहिल.अस लिहिलंय त्यांनी परत एकदा विचार करावा.वेळ नक्की कोणी सत्कारणी लावलाय आणि कोणी फुकट घालवलाय.
खर तर तुम्ही मिपा सोडू नये अशी माझी फार इच्छा आहे.इथे ज्यांनी शाल,नारळ, चपला (ह्या कशासाठी? चेतन गुगळे काय टोळीयुद्ध लढत होते?) त्यांनी खर तर तुम्हाल;अ थांबण्याची विनंती करायला हवी होती.
तसाही ब्लोग्वारही प्रतिक्रिया देण्याची सुविधा असतेच.तुमचा ब्लोगच नाव सांगता का?.प्रतिक्रिया द्यायची नसेल तर संदेश किवा ख.व.त टाका.

:(