साडू म्हणे कामच तोडू...
पूर्वाश्रमीचे घनिष्ठ मित्र असलेले व आता एकमेकांचे साडू बनलेले दोघेजण नेमक्या फ्रेंडशिप डे च्या दिवशी एकत्र येतात. त्यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद घडतो...
“काय साडू, लग्नाचे लाडू फुटल्यापासून तू चांगलाच सुटलाय की रे.”
“आणि हे माझ्या प्रिय साडू तुझंही पोट फारच वाढू लागलंय त्याचं काय?”
“अरे आज फ्रेंडशिप डे. विसरलास की काय?”
“छे छे कसा विसरेन?”
“मग बँड नाही आणलास? मागच्यावर्षी तर चांगले कोपरापर्यंत बँड बांधून फिरत होतास ना?”
“अरे साडू, मागच्या आठवणी नकोस काढू.. त्रास होतो...”
“तरी पण मागच्यावर्षीच्या तुलनेत आज हातात एकही बँड नाही म्हणजे कमालच म्हणायची.”
“आता घरातच एवढा मोठा बँड असतांना बाहेरचा बँड कसा वाजवू?”
“हं, तेही खरंच की. आपण भलत्याच बँडमध्ये पुरते बांधले गेलो, नाही?”
“आमचा बँड म्हणजे ढोल, ढोलकी, हलगी सगळ्यात मोडतो.”
“आणि आमचा तरी काय वेगळा आहे? सकाळपासून तडमताशा वाजत असतो.”
“हं किती केलं तरी ते बँड सख्ख्या बहिणी बहिणी! सारख्याच वाजणार, अन् वाजविणारही...”
“काय सांगतोस? माझी साली तुझं डफडं वाजवते?”
“अरे बाबा नुसतं वाजवतच नाही कधी कधी कानाचा पडदाही फोडते.”
“तू नको ते बँड बांधू लागल्यावर ती तुझे हात पाय बांधणार नाही तर काय रे?”
“तुझं तर बरं चाललंय ना? माझी साली काय म्हणतेय? की तुझाही बँड बडवते?”
“काय सांगू साडू? तुझी साली महाकाली आहे रे.”
“ती तर चांगली गोरी गोमटी होती ना? अचानक कशी काळवंडली?”
“अरे महाकाली म्हणजे रुद्रावतारी आहे.”
“मग तूही कुठे बाहेरचा बँड अटेंड करतोस की काय?”
“करावाच लागतो. घरचं डफडं सैल झालं की बाहेरची थोडी वाफ लावून ताणून घ्यावंच लागतं.”
“हा हा हा. दे टाळी...”
“नको नको. पुन्हा तू काहीतरी पुढचं मागचं बोलून जाशील. तशी तुला सवयच आहे.”
“अरे साडू आता कसली सवय अन् कसली लवय? निस्ता बेंडबाजा आहे बघ, निस्ता बेंडबाजा.”
“असं झालं तरी काय?”
“मी तुझ्या सालीला म्हणालो, आज फ्रेंडशिप डे.”
“मग काय म्हणाली माझी साली?”
“म्हणे माझा वाली कोणी दुसराच आहे, तू नाहीस.”
“काय बोलतोस? अरे तुझीही साली मला डिक्टो असंच म्हणाली.”
“ह्या दोघी काय ठरवून बोलतात का रे साडू?”
“बहुतेक बोलत असाव्यात. त्याशिवाय का एवढं हजारांवर फोनबील येतं.”
“गेल्या महिन्यात तर मी दोन हजार मोजले.”
“काय करावं रे साडू?”
“चल कामच तोडू.”
“कसे काय?”
“असं सांगायचं, मी माझ्या सालीचा बँड वाजवायला जाऊ का?”
“शाब्बास! आणि मीही सांगणार, मी चाललो सालीला बँड बांधायला.”
“मग बघ दोघीही कशा सरळ होतात ते...”
आणि ते दोघे साडू आपापल्या घरी गेले. पुढे काय झाले हे कळायला मार्ग नाही...
प्रतिक्रिया
11 Aug 2011 - 11:33 am | ईश आपटे
:) हे अत्यंत स्त्रीमुक्तीविरोधी लिखाण आहे....
11 Aug 2011 - 11:38 am | सविता
काय जिलब्या पाडल्यासारखे लेख पाडताय मिपावर काही दिवस झाले!
11 Aug 2011 - 11:50 am | वसईचे किल्लेदार
डॉ. साहेब,
आमच्या सच्च्या स्टोरीला लेखाचे स्वरुप दिल्याबद्दल आभारी!
काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे ... पण विनोद निर्मितीसाठी आवश्यक बाब म्हणुन नो कमेंट!
एकंदरीत आवड्ण्यात आला आहे!
11 Aug 2011 - 1:25 pm | शैलेन्द्र
वाइट वाटुन घेवु नका, पण तुमचे इतर लेख वाचलेले असल्याने हा लेख पकावु वाटतो..
11 Aug 2011 - 1:41 pm | वपाडाव
वाचले साडु अन समजलो साले.....
अंमळ गल्लत झाली....
पुन्हा साडु हा शब्द डोक्यात साठवला....
अन मज्या घेतली....
11 Aug 2011 - 1:45 pm | विनायक प्रभू
मुद्दाम दोन दा वाचला.
आयच्यान काहीच कळले नाही.
स्वॅपिंग बद्दल लिहीले आहे की काय????????
11 Aug 2011 - 1:52 pm | परिकथेतील राजकुमार
प्रभात बॅंड व राजकमल बॅंड ह्यावर तौलनिक चर्चा सुरु आहे गुर्जी.
11 Aug 2011 - 3:16 pm | स्मिता.
बेंजो (बँजो) बँड राहिला का रे? की तोच बाहेरचा आहे??
11 Aug 2011 - 3:04 pm | वपाडाव
गुर्जी असे प्रतिसाद देउन लहान मुलांच्या मनावर कलुषित असे विकार जडवण्याचा हा शीण प्रयत्न असफल झालाय असे नमुद करु इच्छितो.....
12 Aug 2011 - 6:02 am | आत्मशून्य
_/\_