साडू म्हणे कामच तोडू...
साडू म्हणे कामच तोडू...
पूर्वाश्रमीचे घनिष्ठ मित्र असलेले व आता एकमेकांचे साडू बनलेले दोघेजण नेमक्या फ्रेंडशिप डे च्या दिवशी एकत्र येतात. त्यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद घडतो...
“काय साडू, लग्नाचे लाडू फुटल्यापासून तू चांगलाच सुटलाय की रे.”
“आणि हे माझ्या प्रिय साडू तुझंही पोट फारच वाढू लागलंय त्याचं काय?”
“अरे आज फ्रेंडशिप डे. विसरलास की काय?”
“छे छे कसा विसरेन?”
“मग बँड नाही आणलास? मागच्यावर्षी तर चांगले कोपरापर्यंत बँड बांधून फिरत होतास ना?”
“अरे साडू, मागच्या आठवणी नकोस काढू.. त्रास होतो...”
“तरी पण मागच्यावर्षीच्या तुलनेत आज हातात एकही बँड नाही म्हणजे कमालच म्हणायची.”
“आता घरातच एवढा मोठा बँड असतांना बाहेरचा बँड कसा वाजवू?”
“हं, तेही खरंच की. आपण भलत्याच बँडमध्ये पुरते बांधले गेलो, नाही?”
“आमचा बँड म्हणजे ढोल, ढोलकी, हलगी सगळ्यात मोडतो.”
“आणि आमचा तरी काय वेगळा आहे? सकाळपासून तडमताशा वाजत असतो.”
“हं किती केलं तरी ते बँड सख्ख्या बहिणी बहिणी! सारख्याच वाजणार, अन् वाजविणारही...”
“काय सांगतोस? माझी साली तुझं डफडं वाजवते?”
“अरे बाबा नुसतं वाजवतच नाही कधी कधी कानाचा पडदाही फोडते.”
“तू नको ते बँड बांधू लागल्यावर ती तुझे हात पाय बांधणार नाही तर काय रे?”
“तुझं तर बरं चाललंय ना? माझी साली काय म्हणतेय? की तुझाही बँड बडवते?”
“काय सांगू साडू? तुझी साली महाकाली आहे रे.”
“ती तर चांगली गोरी गोमटी होती ना? अचानक कशी काळवंडली?”
“अरे महाकाली म्हणजे रुद्रावतारी आहे.”
“मग तूही कुठे बाहेरचा बँड अटेंड करतोस की काय?”
“करावाच लागतो. घरचं डफडं सैल झालं की बाहेरची थोडी वाफ लावून ताणून घ्यावंच लागतं.”
“हा हा हा. दे टाळी...”
“नको नको. पुन्हा तू काहीतरी पुढचं मागचं बोलून जाशील. तशी तुला सवयच आहे.”
“अरे साडू आता कसली सवय अन् कसली लवय? निस्ता बेंडबाजा आहे बघ, निस्ता बेंडबाजा.”
“असं झालं तरी काय?”
“मी तुझ्या सालीला म्हणालो, आज फ्रेंडशिप डे.”
“मग काय म्हणाली माझी साली?”
“म्हणे माझा वाली कोणी दुसराच आहे, तू नाहीस.”
“काय बोलतोस? अरे तुझीही साली मला डिक्टो असंच म्हणाली.”
“ह्या दोघी काय ठरवून बोलतात का रे साडू?”
“बहुतेक बोलत असाव्यात. त्याशिवाय का एवढं हजारांवर फोनबील येतं.”
“गेल्या महिन्यात तर मी दोन हजार मोजले.”
“काय करावं रे साडू?”
“चल कामच तोडू.”
“कसे काय?”
“असं सांगायचं, मी माझ्या सालीचा बँड वाजवायला जाऊ का?”
“शाब्बास! आणि मीही सांगणार, मी चाललो सालीला बँड बांधायला.”
“मग बघ दोघीही कशा सरळ होतात ते...”
आणि ते दोघे साडू आपापल्या घरी गेले. पुढे काय झाले हे कळायला मार्ग नाही...
प्रतिक्रिया
हे अत्यंत स्त्रीमुक्तीविरोधी
काय जिलब्या पाडल्यासारखे लेख
+१
वाइट वाटुन घेवु नका, पण तुमचे
वाचले साडु अन समजलो
काहीच कळ्ळे नाही.
नाही !
बेंजो
आँ...
स्वॅपिंग बद्दल लिहीले आहे की काय ?