पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)
संदर्भ:
http://www.misalpav.com/node/17667
http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm
http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7995952.cms
१. पाणीपुरी हि विक्रेतीकडची असली पाहिजे. (विक्रेत्याकडची नको.)
२. पाणीपुरी विक्रेती मराठी असेल तर जास्त काळजी करण्याचे कारण नाही.
२. आधीचे गिर्हाईक तेथेच असले पाहीजे व त्याची पाणीपुरी (व तत्सम पदार्थ - {यापुढे फक्त पाणीपुरी असा उल्लेख राहील.}) खाल्लेली असली पाहीजे व फक्त पाणी पिणे बाकी असले पाहिजे. त्याने पाणी पिल्यानंतर सर्व काही ठिकठाक वाटल्यासच आपण ऑर्डर द्यावी.
३. जेथे जास्त गर्दी असते तेथेच जावे जेणेकरून जे काही दुष्परीणाम होईल ते जास्त प्रमाणातल्या लोकांत विभागून झाल्याने त्याची त्रीव्रता कमी होवू शकते.
४. पाणीपुरी खाण्यास जाण्याचेवेळी जमल्यास PH पेपर घेवून जावा जेणेकरून तेथील पाण्याची PH व्हॅल्यू पहाता येईल. "०" (शुन्य) PH युक्त पाणी असलेल्या पाणीपुरीला प्राधान्य द्यावे. (इतर व्हॅल्यू आल्याच तर आपापल्या मनाचा निर्णय घ्यावा.)
५. आपल्या घरचे पाणी व भांडे घेवून जावे.
६. सर्वात धोकेदायक नसलेला प्रकार म्हणजे घरच्या घरीच पाणीपुरी बनवाव्यात. आपण घरीच पाणीपुरी बनवली तर शेजार्यांनाही निमंत्रीत करावे म्हणजे 'शेजार्यांवर प्रेम करणे' हि उक्ती साध्य होईल.
७. तसेही पाणीपुरी, भेळपुरी, पॅटीस, शेवपुरी आदी पदार्थ परराज्यातील आहे. तसेच तेथील विक्रेत्यांची मानसीक स्थिती आपल्याला माहीत नसू शकते. तेथील (परराज्यातील) राहणीमान, वागणूक, परस्पर सामंजस्य, समाजाप्रती असलेले विचार व आपल्या राज्यातील परिस्थीती यात प्रचंड तफावत आहे. असले विक्रेते आर्थिक द्रुष्ट्या (व मानसिकही) मागासलेले असतात. (जगातल्या प्रत्येक परिस्थितीला अपवाद असतोच असतो.) त्यामुळे ते असले पदार्थ, (खाण्याव्यतिरीक्त इतर वस्तू सुद्धा) कमी प्रतीच्या वापरतातच. त्यामुळे असले परराज्यीय पदार्थ शक्यतो न खाल्लेलेच बरे. (येथे प्रांतवाद हा प्रत्यय लावू नये.)
त्याचप्रमाणे (पोटाची) गरज असल्यास आपल्या महाराष्ट्रातील नाष्ट्याचे पदार्थ खावेत.
जाता जाता एक सांगावे वाटते:
हॉटेल मध्ये व हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्स मध्येही पंजाबी, साउथ ईंडीयन, नॉर्थ ईंडीयन, जैन- गुजराथी आदी पदार्थ अनुक्रमे मिळतात व शिकविले जातात.
महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ असलेल्या 'महाराष्ट्रीय डीश' केव्हा (सगळ्याच) हॉटेलात मिळतील व हे आपले पदार्थ हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात अखिल भारतीय पातळीवर केव्हा शिकवीले जातील?
राज ठाकरेंना याविषयी आंदोलन करता येण्यासारखे आहे.
आपले काय मत आहे?
प्रतिक्रिया
17 Apr 2011 - 6:51 pm | नरेशकुमार
त्यापेक्षा आमी सॉफिस्टिकेटेड हाटेलातच जाऊन (काहीहही) खाने पसंत करतो.
४ पैसे भले जास्त जातात, पन मनाला समाधान.
17 Apr 2011 - 6:53 pm | पाषाणभेद
हो हा मुद्दा राहीलाच. अजूनही इतर मुद्दे येवूद्यात ना!
17 Apr 2011 - 6:54 pm | नरेशकुमार
जरुर जरुर, हाटेलाचा मालक मराठी मानुस असेल तर प्राधान्याच आहे.
17 Apr 2011 - 11:45 pm | शिल्पा ब
ठिक आहे, समजलं आम्हाला की तुम्ही मोठ्ठ्या हाटेलात जाउन पाणीपुरी खाता ते. कीती वेळा सांगाल?
बाकी टीपा भारीच. अर्थात आता बाहेर पाणीपुरी वगैरे खाण्याची इच्छा मेलीच आहे. पण स्त्रीने पाणीपुरी वा तत्सम पदार्थ विकले तर ते स्वच्छ्च असतील हे गृहीत धरायचे काही कारण नाही.
20 Apr 2011 - 2:17 am | पंगा
आमची नाही बॉ मेली. (परवाच जाऊन खाऊन आलो.)
20 Apr 2011 - 5:09 am | नरेशकुमार
काय पंगाराव, एक पानि-पुर्या कट्टा आयोजीत करायचा का ?
21 Apr 2011 - 12:25 am | पंगा
सगळ्यांसाठी? जरूर!
17 Apr 2011 - 7:50 pm | रेवती
एका भय्याने केलेल्या कृतीवर किती ते धागे आणि काय काय........
पण टीपा चांगल्या आहेत.;)
18 Apr 2011 - 10:11 am | किसन शिंदे
एका भय्याने केलेल्या विकृतीवर किती ते धागे आणि काय काय........
पण टीपा चांगल्या आहेत आणी टिपुन घेतो आहे.
17 Apr 2011 - 8:51 pm | नितिन थत्ते
पण पटल्या नाहीत.
पीएच ० असलेले पाणी? एवढ्या आंबट पाण्याची पाणीपुरी नाय बॉ आपण खाऊ शकत.
अवांतर: चांगल्या हाटेलात पाणीपुरी खाण्यापेक्षा खाऊच नये.
18 Apr 2011 - 10:03 am | शरद
(०) शून्य पी-एच ?
अहो, शून्य पी एच करिता चिंचेच्या पाण्या ऐवजी con. H Cl लागेल. एक पूरीभर असे आम्ल प्यालात की स्वच्छ-अस्वच्छ हा विचार करावयाची गरजच पडणार नाही. दाखला देण्याकरिता एखादा डागदर बरोबर ठेवावा हेच उचित !
शरद
18 Apr 2011 - 10:12 am | पिवळा डांबिस
संहत हायड्रोक्लोरिक अॅसिड वापरूनही पाण्याला ० पीएच देणे अशक्य आहे.....
बाकी रस्त्यावरची पाणीपुरी खाऊ इच्छिणार्यांना ० पीएचचं पाणी दिल्यावर त्यांना डॉक्टरही वाचवू शकणार नाही!!!!
:)
21 Apr 2011 - 5:16 pm | वपाडाव
घाई-गडबडीत "न्युट्रल म्हंजे शुन्य" असे त्यांना वाटुन-चाटुन गेले असावे....
पण त्यांना पी.एच.७ म्हणावयाचे असेल....
17 Apr 2011 - 9:03 pm | निनाव
पाभे:
बाकिचे मला माहित नाही आणिक माहिती पण करून घ्यायचे नाही.. ह्यावेळेस भारतात आलो नं कि सी.एस्.टी हवाईअड्ड्यावरून सरळ पाणीपुरी स्टॉल बघा .. तुम्च्या लेखा मुळे.. अधिकच मिस्स करतो आहे हे सर्व चट्पटीत खाणे.. :( ..... ;)
20 Apr 2011 - 1:58 am | कुंदन
पा भे , जसे इडलीचे तय्यार पीठ मिळते , तसे तय्यार पुरण कुठे मिळत असेल तर कळवा ब्वॉ. विकांताला पुरणपोळी करुन बघावी म्हणतो.
20 Apr 2011 - 1:58 am | कुंदन
पा भे , जसे इडलीचे तय्यार पीठ मिळते , तसे तय्यार पुरण कुठे मिळत असेल तर कळवा ब्वॉ. विकांताला पुरणपोळी करुन बघावी म्हणतो.
20 Apr 2011 - 2:40 am | विनायक बेलापुरे
गेल्या गेल्या आपणच त्याचा लोटा मागून घ्यायचा. काय चव यायचीय तिच्यावर .... अपनीच मुहर लगानेका ;)
20 Apr 2011 - 5:16 am | नरेशकुमार
एक पानी पुरी कट्टा आयोजीत करायचं ठरवत आहे,
कोन्कोन तय्यार आहे, त्यांनी हात वर करा...