Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
वाचकहो,
ही लेखमाला मधेच खंडित झाल्याबद्दल मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो. पण मागून सगळेच अडचणीत येऊ नयेत म्हणून मला कठोर होऊन ते लेख उडवावे लागले होते. त्याचे कारण मी माझ्या शेवटच्या भागात दिले होतेच.
मी निलकांताचे आभार मानतो की त्याने संपादनाची सुवीधा ठेवलेली आहे. जर मी हे लेख लगेच उडवू शकलो नसतो तर नसत्या कटकटींना तोंड देत बसावे लागले असते. तेव्हा ही सुविधा जरूर चालू ठेवावी व कोणाच्याही दडपणाखाली बंद करू नये. चुकीची दुरुस्ती करणे व लेख कुठल्याही प्रकारे संपादित करणे हा लेखकाचा अधिकार आपण अबाधित ठेवल्याबद्दल आपले परत एकदा आभार.
आता मी परत एकदा परत रितसर परवानगी घेऊन हा लेख टाकत आहे. विनंती आहे, वाचावा आणि आवडला का ते कळवावे. आता यात मोठमोठे भाग टाकत नाही कारण एकदम वाचायला ते फार जड जातात. या लेखात काय आहे ? या लेखातील मते माझी नाहीत. लेखकाने या विषयात कुठे काय संशोधन चालले आहे हे सामान्य लोकांना कळावे म्हणून हा लिहीला. मी पण याच कारणासाठी याचे रुपांतर केले. जरी हा माझा आवडीचा विषय असला तरी मी माझी मते यात घुसडण्याचे कटाक्षाने टाळलेले आहे. या लेखात उल्लेख केलेले शास्त्रज्ञ व इतर लोक हे त्या त्या क्षेत्रातले दिग्गज असून आपण सर्वांनीच त्यांचा व त्यांच्या मतांचा मान ठेवला पाहिजे असे मी मानतो. सध्याच्या काळात शिकणारे डॉक्टर्स (MD,MS, etc.....) यांना या विषयाची फार माहीती असणे कठीण आहे. पण मेंदूवर काम करणारी एक संस्था भारतात आहे. http://www.nbrc.ac.in/ जेथे अशा विषयांवर काम करण्यासाठी लागणार्या सुविधा उपलब्ध आहेत. यात काम करणार्या शास्त्रज्ञांच्या पदव्या बघितल्या किंवा अभ्यासक्रम तपासलेत तर मी काय म्हणतो ते आपल्या लक्षात येईल. अधिक माहीतीसाठी या संस्थेत जाता आले तर जरूर जावे.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ?
भाग-१
आज जो लेख मी आपल्यासमोर वाचण्यासाठी ठेवणार आहे त्याला एका दु:खद घटनेची झालर आहे. माझी आईचे वाचन प्रचंड होते. आता “होतेच” असे म्हणावे लागेल. मला आठवतंय माझ्या लहानपणी मी ऐकलेले माझे वडील आणि तिच्यातले संभाषण. या संभाषणात तिने वडिलांना वाचनालय बदलायला सांगितले होते. कारण काय तर त्यातली पुस्तके तिची वाचून संपली होती. मला हसू आले. यातले किती तिला कळले असेल का नुसते वाचन ? दोन वर्षापूर्वी जेव्हा तिची प्रकृती अचानक बिघडली तेव्हा तिचे बिचारीचे वाचन बंदच पडले. शेवटी शेवटी ५/६ महीन्यापूर्वी जेव्हा तिला दवाखान्यात दाखल केले तेव्हा मी हा लेख वाचत होतो. रात्री जेव्हा मी दवाखान्यात झोपायला जायचो तेव्हा मी हा इंग्रजी लेख वाचत बसायचो. माझ्या हातातले त्या लेखाचे कागद बघून तिने विचारले की काय वाचतो आहेस? मी तिला विषय सांगितल्यावर ती मला म्हणाली की तिला तो वाचायचाय. मी म्हटले की हा इंग्रजीमधे आहे तर ती म्हणाली तू वाचून मला मराठीत सांग. तो तिला समजवून सांगितला, तो हा लेख. मी मराठीत लिहीला नंतर ! त्यामुळे जरा बोजड झाला आहे.
१५ दिवसांनंतर आई जवळ जवळ बेशूध्द अवस्थेत गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जायला सांगितले. घरी बरेच दिवस ती याच अवस्थेत होती. त्या वेळी तिच्या मेंदूत, मनात काय चालले असेल हा विचार मला सारखा छळत होता. का? हे तुम्हाला हा लेख वाचल्यावर कदाचित कळेल. असो.
आई गेल्यावर आम्हाला एक चिठ्ठी तिच्या मोडक्या तोडक्या हस्ताक्षारात (लिहीताना तिला त्रास झाला असावा) सापडली. ही तिने मला वाटते मी तो लेख मराठीत समजाऊन सांगितला त्या नंतर लिहीली असावी. नाहीतर जिच्या आख्या आयुष्यात जिची देवाची पुजा, सगळे सणवार चुकले नाहीत तिने त्या चिठ्ठीत असे का लिहीले असावे ?
॥श्री॥
माझे निधन झाल्यावर माझे काहीही धार्मीक विधी करु नयेत. माझी ही अखेरची इच्छा समजावी...........
........
या सगळ्यातला फोलपणा तिला समजला का ? कदाचित हे सगळे मनाचे खेळ आहेत हे तिला उमगले असावे. हे लाखमोलाचे मृत्यूपत्र लिहून तिने माझ्यावर हिमालयाएवढे उपकार केले, कारण जो विचार आपण आयुष्यभर जोपासतो त्याच्या बरोबर विरुध्द वागायला लागणे ( कुठल्याही कारणाने) या सारखा पराभव नाही व दु:ख नाही. जर तिने याच्या बरोबर विरूध्द लिहीले असते तर मी ते सगळे धार्मीक विधी केले असते का ? माहीत नाही. हे लिहीताना मात्र त्या उपकाराच्या ओझ्याखाली मी दबून गेलो आहे. पण आईच्या उपकाराचे कसले ओझे ?...... तो लेख आता वाचा....
या लेखात या क्षेत्रात काय चालले आहे याचा अनुभव घेताना सामान्यांच्या मनात काय विचार येऊ शकतात हे सांगायचा लेखकाचा प्रयत्न आहे. मुळ लेखातली क्लिष्टता कमी होण्यासाठी मी माझी बरीच वाक्ये यात टाकली आहेत.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ?
लेखक : क्रेग हॅमिल्टन.
आत्मा वगैरे विषयात ज्यांना रस असतो, त्या लोकांचे विज्ञानाशी जसे नाते असते तसे माझेही आहे. थोडेसे संघर्षाचे, थोडे गैरसमजाचे ! दुसर्याजबाजूला हेही खरे आहे की मानवाच्या उत्क्रांतीमधे या शतकात जे काही घडले आहे त्याने मी अचंबीत होतो. उदा. पोलीओचे उच्चाटन, जेनेटीक कोडची उकल, अवकाशात घिरट्या घालणारी अवकाशयानं आणी इंटरनेटचा सोधसुध्दा. पण प्रामाणिकपणॆ सांगायला हरकत नाही, विज्ञानाचा या सजीवसृष्टीच्या प्रत्येक रहस्याचा उलगडा करताना जो पवित्रा असतो तो मला तितकासा मान्य नाही. याचे रहस्य बहुदा माझ्या लहानपणात असावे. माझे आई-वडील धर्मशास्त्रातील कुठल्या मार्गाचा स्विकार करायचा याबद्दल ठाम नव्हते. विचाराअंती त्यांनी अज्ञेयवाद स्विकारला. त्याकाळातील प्रथेप्रमाणे जसे इतर वादाचे ठाम पाठिरखे होते, तसेच ते पण अज्ञेयवादाचे ठाम पाठिराखे झाले. यामुळे लहानपणीच प्रेरणा, एखादे तत्व, साक्षात्कार किंवा एखादे दुराग्रही मत यापेक्षा विज्ञान, कार्यकारणभाव, बुध्दीप्रामाण्य हे आपल्याला सत्याच्या जास्त जवळ घेऊन जाण्याचे मार्ग आहेत हेच मला शिकवले गेले होते. पण जसाजसा काळ उलटू लागला तसा तसा माझ्या अज्ञेयवादची धार कमी होऊ लागली. विज्ञानाच्या पुस्तकात न सापडणार्या गोष्टींची व त्या सत्याची मला खोल जाणीव होऊ लागली. या जाणीवे नंतर जी अर्थ, प्रयोजन आणि गुढता यांची कवाडे उघडत गेली तसे विज्ञानाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत आणि अंतिम सत्य हे विज्ञानाच्या (सध्याच्या व्याख्येनुसार) माध्यामातूनच सापडणार आहे या श्रध्देवरचा माझा विश्वास डळमळीत व्हायला लागला. माझ्याच या दोन विचारांचा संघर्ष मी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात असताना, पराकोटीस पोहोचला. मी मानसशास्त्रात पदवी मिळवणार होतो कारण माझी अशी प्रामाणिक समजुत होती की त्या योगे मला माणसाच्या अंतरंगात डोकावता येईल. माझी पहीली तीन वर्षे मी त्यामुळे मानसशास्त्रातील विज्ञान बाजूला ठेऊन त्या शास्त्राच्या इतर बाजूंवर जास्त लक्ष केंद्रीत केले जसे सामाजीक, मानसोपचार, मानवता, इ.. पण शेवटी जेव्हा मला सांख्यिकी आणि प्रायोगिक मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायला लागला, तेव्हा माझे कसे होणार हाच विचार माझ्या मनात प्रामुख्याने होता. पण हाती आलेल्या माहितीचे विश्लेषण आणि प्रयोगांच्या रचना यांची मला केव्हा गोडी लागली हेच मला कळले नाही. एखादी सुंदर कल्पना प्रयोग, सांख्यशास्त्र वापरून चुकीची किंवा बरोबर ठरवता येते याची मला त्या काळात धुंदी चढली होती. जेव्हा मी प्रायोगिक मानसशास्त्रामधे पुढचे शिक्षण घ्यायचा विचार करायला लागलो तेव्हा मात्र मित्रांनी मला वेड्यात काढ्ले. अर्थात पुढे काय वाढून ठेवले आहे हे लक्षात आल्यावर मी व्यावाहारिकपणे त्याचा नाद सोडला आणि दुसरे काही करता येईल का याचा विचार करायला लागलो. माझी पदवीपूर्व वर्षातली माझी अध्यात्म आणि धर्मशास्त्र या विषयांची आवड परत एकदा जागृत झाली आणि मग मी माझा मार्ग ठरवला. त्या निर्णयाने माझ्या आयुष्याची आणि कार्यक्षेत्राची दिशाच बदलून गेली.
माझा आतला आवाज ऐकून मी स्वत:ला त्या सगळ्या प्रयोगातून वाचवले खरे, पण माझ्या मनात विज्ञानासाठी एक छोटीशी का होईना एक जागा होतीच. याचा परिणाम असा झाला की जेव्हा धर्म आणि विज्ञान यांच्यातल्या संघर्षात भाग घ्यायची वेळ आली तेव्हा कोणा एकाची बाजू घेणे मला जड जाऊ लागले. इतके, की शेवटी त्यामुळे माझ्याच मनात या विषयांवर तुंबळ युध्द जुंपू लागले. अगदी बायोटेक्नॉलॉजीवरचा किंवा विश्वघट्नाशास्त्रातल्या एन्थ्रोपीक तत्वावरचा सभ्य वाद असो, शेवटी असे वाटायला लागले की एका कानात कोणीतरी एक बाजू मांडतोय आणि दुसर्या कानात दुसरी. कोणाचे ऐकायचे? असा नुसता गोंधळ उडून गेला......
पुढे चालू............
जयंत कुलकर्णी.
भाग - १ समाप्त.
पुधे चालू.....
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 8:52 pm | Nile
पुन्हा हे लेख पाहुन बरे वाटले. वाचतो आहे आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
-Nile
27 Jun 2010 - 5:18 pm | युयुत्सु
जे लोक मृत्युनंतर धार्मिक संस्कार नकोत असे सांगून ठेवतात त्यांचा धर्मावरचा विश्वास उडाला असे मानायचे का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
27 Jun 2010 - 5:18 pm | युयुत्सु
जे लोक मृत्युनंतर धार्मिक संस्कार नकोत असे सांगून ठेवतात त्यांचा धर्मावरचा विश्वास उडाला असे मानायचे का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
27 Jun 2010 - 5:58 pm | तिमा
धर्म व धार्मिक कर्मकांड यात फरक आहे. मूळ धर्मात कोणी किती कर्मकांडे घुसवली हा वादाचा विषय आहे. तेंव्हा फार तर असे म्हणता येईल की क्रियाकर्म नको असणार्यांना कर्मकांडातील फोलपणा समजला असेल.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
27 Jun 2010 - 9:17 pm | युयुत्सु
कसा तो स्पष्ट करा. कर्मकांडाशिवाय धर्म असूच शकणार नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
28 Jun 2010 - 5:05 pm | तिमा
हिन्दु धर्म हा जीवन जगण्याची एक पध्दत आहे. अमुक केलेच पाहिजे अशी सक्ती न करणारा हा एक महान उदार धर्म आहे. कुठलीही कर्मकांडे न करता आम्ही अजून हिंदु म्हणून राहू शकतो हाच याचा पुरावा नाही का ? दुसर्या कुठल्या धर्मात असतो तर आम्हाला केवढा त्रास झाला असता!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
5 Jul 2010 - 9:21 pm | सतिश
जयन्त मे देखिल गेल्य अतवद्यते एक पुस्तक वाचले.पुस्तक मन्देउ य विशयवर सन्शोधनत काय चलेले आहे ते दिले आहे.श्रिकन्त जोशि अनि सुबोध जवदेकर यने लिहल आहे.
सतिश गो.