नाडीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से २ - किस्सा श्रीनगरच्या ३१ मार्चचा
तिकडे विमानाची घरघर आणखी वाढलेली आवाजावरून कळत होते. मी काही झालेच नाही असे नाटक करत उभा होतो. तेवढ्यात बॉस पुन्हा म्हणाले, 'गो.'
मी 'नो सर' म्हटले. तर ते जरबेच्या आवाजात म्हणाले, 'बेटर गो. आदरवाईज यू विल मिस द प्लेन'.
तो टोन बॉसच्या ऑर्डरचा होता मी ताडले....
बॉस म्हणाले, 'रन मॅन!'
ओंम श्री शुक उवाच, भारतवर्षे एवम् गतिकाले को योग तस्य किंम फलम ओं श्री. भृगु उवाच एवम ग्रहगति काले मनोरथ इति योग प्रभावे परमवचा, (मनोरथ या नावाच्या योगावर)) नंदवेद नंद९, वेद ४ (म्हणजेच ४९ व्यावर्षी) शशीकान्त या पितृ ज(नार्दन?) सत(लज)व्यास नदी मध्ये(दोआबात) चंचलपुरी, (होशियारपुरचे भृगुसंहितेतील नाव) चैत्रमासे (महिन्याच्या) तीज(तृतिया) – मंगळ(वारी) आज म्हणजेच दि. ३१ मार्च १९९८ ,हा जातक हे कथन ऐकायचा योग आहे. आदी आदी...
ते ऐकून मला धक्का बसला
काश्मीर - श्रीनगरचा विमानतळ. मार्चचा महिना. दूर दूर पीरपंजालच्या पहाड्यांवर बर्फांचे साम्राज्य. हवेत थंडीची शिरशिरी. आधी पडलेल्या बर्फाचे थिजून घट्ट झालेले अस्ताव्यस्त ढीग. दुतर्फा रस्त्यावरील सफेदा झाडांचे खराटे झालेले. चिनारांच्या झाडाला हिरवे कोंभ निघालेले. गुलाब झुपक्यांनी येण्यासाठी कामाला लागलेले, सफरचंदांचे घोसले अजून आंबट हिरवे.
आमचा थंडीचा युनिफॉर्म, त्यावर कोटपरका नावाचा बोजड पण गरमागरम ओव्हरकोट. दरवर्षाचे हवाईदलाचे जीवघेणे एक्सरसाईज होऊन गेलेले.
आमच्या अकौंट्स सेक्शनमधे फायनान्शियल वर्षांच्या शेवटचे हिशोब जुळवण्यात कर्मचारी रंगलेले. दरमहा प्रमाणे करोडो रुपये वेतनाच्या वाटपासाठी आणून ठेवलेले. मी मंथ एन्डचे कॅश चेकिंगसाठी सर्व तयारीने बॉसची वाट पहात तयार. बुढा अब्दुल चपरासी नेहमीच्या प्रमाणे गरमागरम चहा उर्फ केहवा बनवायच्या कामाला लागलेला.
सकाळी आठचा सुमार मी माझ्या ऑफिसमधे कामात गुतलेलो. तेवढ्यात विमानाची प्रचंड घरघर होत एक भले थोरले विमान आमच्या ऑफिसच्या शेजारी थांबले. तो होता व्हीआयपी बे. आर्मीचे बडे जनरल तेथून जात येत. आमचे एअर ऑफिसर कमांडींग 'बॉस' त्यांना सोडायला वा घ्यायला जाणे हा प्रोटोकॉलचा भाग होता.
काही काळात त्या विमानाचे चालक फ्लाईगसूट मधे आमच्या व्हरांड्यात दाखल. माझा डेप्युटी त्यांचा कोर्समेट म्हणून भेटायला आलेले. पण त्यावेळी टेबलावर ठेवलेले करोडो रुपये पाहून ही वेळ मित्राला भेटायची नाही असे वाटून परताना मी त्यांना विचारले, 'कोण येतय?' म्हणाले, 'लेहहून चंदीगडला निघालो होतो. अचानक जीओसी इन सींना येथून घेण्याचा आदेश आला म्हणून वाटेत वळवले विमान. आता ते येतच असतील.'
थोड्याच वेळात एसेकॉर्ट्सच्या सायरनचे आवाज घणघणू लागले. काही गाड्यांचा ताफा विमानाजवळ येऊन थडकला.
मला फोन आला बॉसचा. 'जनरलसाहेबांना निरोप देऊन येतो कॅश चेकिंगला. तयार रहा.'
मला दुरून दिसत होते. विमानाचे एक एकपंख हळूहळू गरगरायला लागले. बॉसनी कडक सॅल्यूट ठोकून जनरलसाहेवांना रिसीव्ह केले. ते विमानात चढलेले पाहून आमच्या सेक्शनकडे बॉसची गाडी वळवली. रेड कारपेट हटवले गेले. मी सर्व पाहात होतो. बॉसना मी रिसीव्ह करायला मी फाटकापर्यंत गेलो. कडक सॅल्यूट ठोकून गुलाबाच्या बागेतील वाटेवरून चालताना सहज बोललो, 'सर मी या विमानातून जाऊ का?
त्यांनी माझ्याकडे नजर दिली. तोवर मला माझ्या विचारणेतील मुर्खपणा जाणवला.
ते कॅश ठेवली होती त्या स्ट्रॉंगरूम मधे दाखल झाले. सिगरेट पेटवून समोरच्या नोटांच्या ढिगाकडे पहात, माझ्या डेप्युटीच्या मोजणीकडे लक्ष देत एक दीर्घ झुरका घेत माझ्याकडे पहात म्हणाले, 'जाओ.' मी ओशाळून तो विषय झटकत म्हटले, 'नो, नो सर'.
मंथएन्ड कॅश मोजणी सोडून मी त्या चालू झालेल्या विमानातून जाण्याची गोष्ट करणे म्हणजे करीयरवर आफत ओढवून घेण्याचे धाडस होते.
तिकडे विमानाची घरघर आणखी वाढलेली आवाजावरून कळत होते. मी काही झालेच नाही असे नाटक करत उभा होतो. तेवढ्यात बॉस पुन्हा म्हणाले, 'गो.'
मी 'नो सर' म्हटले. तर ते जरबेच्या आवाजात म्हणाले, 'बेटर गो. आदरवाईज यू विल मिस द प्लेन'.
तो टोन बॉसच्या ऑर्डरचा होता मी ताडले....
बॉस म्हणाले, 'रन मॅन!'
मी कोटपरका काढून टाकला. डोक्यावरची टोपी सांभाळत माझी छोटीशी एव्हर रेडी एअर बॅग अब्दुल घेऊन माझ्या मागे पळत, आम्ही विमानाकडे धावलो. विमान तोवर एअर ट्रॅफिक सिग्नलची वाट पहात थबकले होते. पंखांच्या तीव्रगतीने वादळी वातावरण तयार झाले होते. मी कॅप पकडून मागच्या दाराकडून विमानात पाय ठेवला अन् घप्प करत तो दरवाजा बंद झाला. माझ्या अगांतुक येण्याने जनरलांचे लक्ष माझ्याकडे वळले. मी त्यांना कडक सॅल्यूट केला. ते खुष नक्की नव्हते. मी विमानात स्थिर झाल्यावर इतरांशी बोलून चंदीगडला उतरल्यावर पुढे काय करावे असे ठरवत होतो. जनरलांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एकातून मी चंदीगडच्या बस स्टँडला पोचलो. एक बस पठानकोटला जायच्या अगदी तयारीत होती. त्यात उडी मारून चढलो. करता करता होशियारपुर आले. तोवर हिवाळी संध्याकाळ व्हायला आली होती.
सायकल रिक्षात चढलो. 'कहा जाना बाबूजी? 'किसी भीरगू शास्त्री के पास ले चलो.' मी रिक्षावाल्यावर ठरवायचे काम सोपवत म्हटले.
'तो मोहल्ला गोकुल नगरवाले के पास चलते है' । एका टिपिकल पंजाबी घरापाशी त्याने सोडले. भाग २ ...
क्रमशः पुढे चालू....
प्रतिक्रिया
31 Mar 2010 - 12:43 pm | चेतन
79 वाचने प्रतिक्रिया नाही :S
बहुतेक वाचकांनी नाड्या आवळलेल्या दिसत्यात.
क्रमशः पुढे चालू.... हे पुढे चालु आहे असे वाचावे... ;)
चालु द्या...
अवांतरः बहुतेक आज मी प्रतिसाद देणार हे नाडिग्रंथात लिहल असाव :? (काय चालु आहे)
31 Mar 2010 - 2:36 pm | सुनील
आत्तापावेतो तरी नाडीचा उल्लेख आलेला नाही! किस्सा वाचनीय. पुढे नाडीचा उल्लेख आल्यावर वेगळी प्रतिक्रिया देईनच!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Mar 2010 - 7:52 pm | शशिकांत ओक
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही
..
{कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते.
नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत.
आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.
नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल.
नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत